हल्लीचीच गोष्ट . सकाळी आठ ची वेळ. न्यू जर्सीतले एक शांत सबर्ब. मिडलस्कूल च्या मुलांना शाळेत सोडून ड्रायव्हर रॉबर्ट टली ने डेपो मध्ये बस घेऊन जायच्या आधी नेहमीप्रमाणे बस चेक केली. कोणी काही विसरले का? एखादे मूल चुकून बस मध्येच झोपले तर नाही ना? सगळ्या सीट्स चेक करता करता एका सीट वर त्याला काहीतरी दिसले. चमकून त्याने ते नीट वाकून पाहिले. ही वस्तू टीनेजर्स कडे सापडणे अगदीच अशक्य होते असे नव्हे पण या शांत गावातल्या, रेप्युटेड स्कूल च्या बस मध्ये नक्कीच अपेक्षित नव्हते. रॉबर्ट ने वेळ न दवडता पोलिसांना आणि त्याच्या सुपरवायजर्स ना कळवण्याचा निर्णय घेतला. पोलिस ५ मिनिटात आलेच. ती वस्तू बघून तेही गंभीर झाले. ताबडतोब ती ताब्यात घेण्यात आली. स्कूल प्रिन्सिपल ना कळवण्यात आले. तसे ती वस्तू कुणी आणली हे समजणे सोपे होते. लगेचच बस चे सिसिटिव्ही फूटेज तपासण्यात आले. सगळे चेहरे रॉबर्ट च्या व्यवस्थित ओळखीचे होते, इतकेच नव्हे तर कोण कुठल्या स्टॉप वर चढते उतरते हेही पाठ होते त्याला! तरीही जो चेहरा ती वस्तू हाताळताना त्या फूटेज मध्ये दिसला तो अजिबात अपेक्षित नव्हता त्याला!!
दुपारचे चार. त्याच गावातले एक सुंदरसे भले मोठे घर. बेल वाजली. स्मिताने दार उघडले. बघते तर दारात एक पोलिस ऑफिसर! बाहेर पोलिसांच्या एक नव्हे दोन गाड्या! त्यातली एक या ऑफिसर ची आणि दुसरी बॅकप होती!
"मॅम, तुमच्या मुलीशी आम्हाला बोलायचं आहे, तिला बोलवा प्लीज!"
दारात कॉप ची गाडी? स्मिता टरकलीच.
"मॅम प्लीज, आय नो राधा इज होम. प्लीज कॉल हर. वी नीड टु टॉक!"
वी नीड टु टॉक!! अमेरिकन भाषेत या वाक्याचा अर्थ " यू आर इन बिग ट्रबल" असा असतो.
राधा म्हणजे स्मिताची आठव्या यत्तेत शिकणारी लाडकी टीनेज लेक. नवरा न्यूयॉर्कात कामाला आणि मुलगा कॉलेज साठी बाहेर पडलेला, स्मिता माँटेसरीत पार्ट टाइम जॉब करते. असं साधारण नॉर्मल घर. आमच्या अगदी जवळच्या ओळखीतले आमच्याच गावातले मराठी कुटुंब. स्मिता माझी मैत्रिण तर राधा माझ्या लेकीची मैत्रिण.
तर अशा कुटुंबाला दुपारी कॉप येऊन मुलीबद्दल विचारतो म्हणजे बर्यापैकी दचकवणारी गोष्ट!
स्मिता ने राधाला हाक मारली. राधा अगदी स्मार्ट, हुषार, स्कूल मधे अगदी "पॉप्युलर" मुलगी. तिने अगदी न घाबरता कॉप ला हॅलो केलं.
" हॅलो राधा. तुला काही प्रश्न विचारणार आहे. त्यांची अगदी सरळ उत्तरं दे.यू आर नॉट इन ट्रबल - फॉर नाऊ. ओके?"
"ओके"
" तुला इतक्यात कोणी काही पॅकेट्स दिली होती का?"
"पॅकेट्स? नाही, पण कसली पॅकेट्स ?"
"इतक्यात तू आणि कुणी मित्र मैत्रिणींनी मिळून घरी, गराज मधे वगैरे काही सायन्स एक्सपेरिमेन्ट्स वगैरे केले का? "
"व्हॉट? नो!"
"बर मग कोणाबरोबर काही कुकिंग वगैरे केले का?"
"अम्म ? कुकिंग? नो?!! "
"ऑफिसर, व्हॉट इज धिस अबाउट? कॅन यू प्लीज टेल मी?" - स्मिता मध्येच.
तशी कॉप ने सांगितले " मॅम आज सकाळी आम्हाला स्कूल बस ड्रायव्हर ने इन्फॉर्म केले की त्याला बस मध्ये ड्रग्ज सापडले आहेत. बस च्या सीट वर सापडलेल्या पुड्या आणि सिसिटिव्ही फूटेज बघून हे राधाच्या बॅग मधून आले आहे या निष्कर्षाला आम्ही आलो आहोत. वी फाउंड समथिम्ग जे मेथ क्रिस्टल्स असावेत असा संशय आहे ! पुड्या आता लॅब मधे गेलेल्या आहेत पण आय हॅव सम पिक्चर्स फॉर यू"
त्याने फोन वर काही फोटो दाखवले. त्यात राधा स्कूल बस मध्ये बॅग मधून कसल्याश्या पुड्या मैत्रिणीला देताना दिसत होती.
"राधा, नाऊ कॅन यू टेल अस व्हॉट धिस इज अँड हू गेव्ह यू धिस?"
स्मिता अन राधा तरीही कम्प्लीट नॉन प्लस. काय प्रकार आहे हा? दोघी फुल टेन्शन मधे! मग दुसर्या एका फोटोत बस च्या सीट वर पडलेल्या त्यातल्या एका पुडीचा क्लोजप दाखवण्यात आला. पुडीत पांढरट क्रिस्टल्स स्प्ष्ट दिसत होते. त्या पुडीचा तो क्लोजप बघून मात्र राधा आणि स्मिता दोघींना एकाच वेळेस एकाच क्षणात या टेन्शन चा फुगा फाट्कन फुटणे, युरेका मोमेन्ट, खो खो हसण्याचा अटॅक असे बरेच काही काही एकदमच झाले!!
स्मिताने आतून तसल्याच "क्रिस्टल्स" ची मोठी पिशवीच आणली अन ऑफिसर समोरच दोन चार तोंडात टाकून पण दाखवले! त्या ऑफिसरला नीट एक्सप्लेन केल्यावर त्यानेही डोक्याला हात लावला !
"यू विल नॉट बिलिव हाउ अलार्म्ड वी वेअर! आम्ही पार शेजारच्या काउंटीतल्या पण एक्सपर्ट्सना बोलावलेय हे नेहमीपेक्षा वेगळे इन्ट्र्रिकेट दिसणारे क्रिस्टल्स पहायला. नाऊ आय अॅम शुअर दोज गाइज आर गोइंग टु हॅव अ किक आउट ऑफ धिस! "
तर त्या पुड्या होत्या खडीसाखरेच्या !! हो ख डी सा ख रे च्या पुड्यांनी इतके रामायण झाले होते!!
स्मिता आमची भारी सोशल. सतत टी पार्टी म्हणू नका, हळदि कुंकू म्हणू नका, काही ना काही चालू असते तिच्या घरी. आज पण कसलेतरी गुरुवार की शुक्रवारचे कसले तरी हळदीकुम्कू होते तिच्याकडे. त्यासाठी कालच पटेल कडून खडीसाखर, फुटाणे, नारळ, पेढे इ. तयारी स्मिताने केली होती. राधाला खडीसाखर आणि फुटाणे तोडात टाकायला आवडीचे. म्हणुन व्यवस्थित लहान झिप लॉक च्या पिशव्यात खडीसाखर घालून तिने स्कूल मधे नेली आणि मैत्रिणींना पण वाटली! त्यातलीच एक पुडी बस मध्ये पडली होती जी आमच्या छोट्या गावातल्या एरव्ही कसलीच एक्सायटमेन्ट नसलेल्या पोलिस स्टेशनला एक "एक्सायटिंग डे अॅट वर्क" आणि राधाला दुसर्या दिवशी फ्रेन्ड्स ना सांगायला एक आयता कूल किस्सा देऊन गेली होती!!
तसे दर वर्षी होणार्या साग्रसंगीत ढोल वगैरे सह होणार्या "होली पार्टीज" मधली चित्र विचित्र रंगीत तोंडं , दिवाली फायरवर्क्सवरून होणार्या शेजार्या पाजार्यांच्या कम्प्लेन्ट्स , दर वर्षी पोस्टात ऑगस्ट च्या सुमारास पडणारे स्ट्रेन्ज थ्रेड्स (राख्या) असलेले एन्वलप्स आणि त्यामुळे जॅम होणारी स्कॅनिंग मशीन्स हे सारे इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेच आहे, तसे खडीसाखर पण आता नोंदवली गेली असेल यांच्या रेकॉर्ड मधे
टीप - ही घटना खरीच घडलेली आहे. पात्रांची नावं आणि थोडे तपशील बदलले आहेत.
एकेक किस्से!
एकेक किस्से!
आधी गन असेल असं वाटलेलं.
आधी गन असेल असं वाटलेलं.
आमच्या कॉलनीत करवा चौथ च्या
आमच्या कॉलनीत करवा चौथ च्या सायंकाळी
"चंद्र दिसला का? "
"हो"
"मला नाही दिसला अजून"
"पाच नंबरच्या बिल्डिंग मध्ये गॅलरीतून बघ"
असे मेसेजेस फटापट येताना पाहून नॉन देसी चक्रावलेच, काही अमेरिकन्स तर घाबरलेच.
काय एकेक ताप! असा विनोदीपणे
काय एकेक ताप! असा विनोदीपणे फुटला फुगा ते बरं झालं पण.
(No subject)
क्रिस्टल्स
क्रिस्टल्स
हो ना फारच फनी प्रकार, पण तो
हो ना फारच फनी प्रकार, पण तो थोडा वेळ कसले टेन्शन आले असेल!! मला बिचार्या पोलिसांचा पोपट झाला ते जास्त फनी वाटले. बिचारे दिवस भर माग लावत होते त्या पुडीचा.
अरेच्या, भलतच कि हे
अरेच्या, भलतच कि हे,खडीसाखरेपासून सावधान रहायला हवं, मागे इंडीयाहून येताना थोडा खोकला कि घसा बसला होता म्हणून फ्काइटमधे चघळायला खडीसाखर आणणार होते , विसरले आयत्यावेळी एवढच, नाहीतर मलाही डीटेन केलं असतं !
किस्सा लिहायची स्टाइल भारी, एकदम डेस्परेट हाउजवाइव्ह्ज सबर्बच्या एपिसोडच्या नरेशन सारखं
(No subject)
मला क्रिस्टल्ससारखं सापडलं
मला क्रिस्टल्ससारखं सापडलं म्हटल्यावर खडीसाखर असावी असा अंदाज आला होता.
पण हे किती स्केअरी , हे सगळं
पण हे किती स्केअरी , हे सगळं सहज होऊ शकतं देशी लोकांच्या बाबतीत
संशयीत दिसणारं फुड सुध्द्दा कॅरी करु नये थोडक्यात !
इमॅजिन ती मिड्ल स्कुल मुलगी अफ्रिकन अमेरिक असती तर पोलिसांचं काय धोरण असतं, बेस्ड ऑन रेस जज केलं गेलं अस्स्तं का ? आणि मग खरा प्रकार समजल्यावर किती आंदोलनं झाली असती, किती हॅशटॅग आले असते ?
पण खरंय. ‘बिचारे पोलीस‘ असे
पण खरंय. ‘बिचारे पोलीस‘ असे वाटले मलाही.
(No subject)
डीजे- खरं आहे. इतर
डीजे- खरं आहे. इतर फॅक्टर्सनुसार संबंधितांच्या रिअॅक्शन्स अजून वेगळ्या/ स्केअरी असू शकल्या असत्या.
एग्जॅक्टली मै. कधी कधी पोलिस
एग्जॅक्टली मै. कधी कधी पोलिस लोकं ओवररियॅक्ट करतात आणि नंतर खरं काय आहे ते उघडकीस आलं तरी मग आधी घेतलेल्या स्ट्राँग अॅक्षन जस्टिफाय करायला नवीन सर्कस सुरु होते. गमती गमतीत निपटलं ते बरं झालं. अर्थात पदार्थ होता त्यामुळे नेमका काय पदार्थ आहे हे कळाल्या शिवाय ते अॅक्षन घेऊ शकत नव्हते म्हणा पण तरी काही गंगहो/याहू पोलिस असतात. त्यांना हिरोगिरी दाखवायची असते.
डेंजर आहे . आमच्याकडे दारावर
डेंजर आहे . आमच्याकडे दारावर पोलिस आले आणि चिल्लर शी बोलायचंय म्हणाले तर मी आधी खेटराने पूजा बांधीन अन मग प्रश्न विचारेन बहुतेक : )
च्च, ऐसा करके नय चलताय शोनू.
च्च, ऐसा करके नय चलताय शोनू. अॅज अ गुड पेरेंट, मुलांवर विश्वास आधी दाखवायचा मग पोलिस.
मी आधी खेटराने पूजा बांधीन अन
मी आधी खेटराने पूजा बांधीन अन मग प्रश्न विचारेन बहुतेक>>>>
अरे सहसा नेबरहूडातले पोलिस ओळखीचे असतात पोट्ट्या पाट्ट्यांच्या. शाळेत बंदोबस्ताला असतात रोटेशन वर सगळेच त्यामुळे.
मागच्या वर्षी मी दिवाळीत फटाके वाजवले घरासमोर तर कोणीतरी पोलिसांना बोलवलं होतं. तो आल्यावर मला आणि बायकोला एक क्षण थबकायला झालं पण बारका आधीच पुढे जाऊन हाय ऑफिसर क्ष्क्ष करत पुढे अन आम्ही घाम पुसत मागे.
भारिच किस्सा!
भारिच किस्सा!
सायो
सायो
मी विचारणारच होतो, खेट्रानं पूजा कुणाची बांधणारे मेधा ते...
crystal meth dealer ?!! lol
crystal meth dealer ?!! lol .
(No subject)
बापरे! किती व्याप! अर्थात
बापरे! किती व्याप! अर्थात त्यांची स्टॅंडर्ड प्रोसिजर असते. त्यात आजकाल खूप डेंजरस सिंथेटिक प्रकार निघालेत त्यामुळे अजूनच अॅलर्ट असतात मंडळी!
घसा खवखवला तर म्हणून लेकाजवळ नेहमी खडीसाखर असे झिपलॉकमधे. मात्र शाळेत त्याबद्दल टिचर्सना माहित होते आणि कुणासोबत शेअर करायची नाही हे सांगितले होते.
>>बारका आधीच पुढे जाऊन हाय ऑफिसर क्ष्क्ष करत पुढे अन आम्ही घाम पुसत मागे.>>
बाप रे! अवघड आहे!
बाप रे! अवघड आहे!
मस्त लिहिलंयस.
ओह भारीच किस्सा.... ब्रेकिंग
ओह भारीच किस्सा.... ब्रेकिंग बॅड च आठवले एकदम क्रिस्टल मेथ कुकींग म्हटल्यावर
तसे दर वर्षी होणार्या साग्रसंगीत ढोल वगैरे सह होणार्या "होली पार्टीज" मधली चित्र विचित्र रंगीत तोंडं , दिवाली फायरवर्क्सवरून होणार्या शेजार्या पाजार्यांच्या कम्प्लेन्ट्स , दर वर्षी पोस्टात ऑगस्ट च्या सुमारास पडणारे स्ट्रेन्ज थ्रेड्स (राख्या) असलेले एन्वलप्स आणि त्यामुळे जॅम होणारी स्कॅनिंग मशीन्स हे सारे इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेच आहे, तसे खडीसाखर पण आता नोंदवली गेली असेल यांच्या रेकॉर्ड मधे>>>>>>>>>>>>>> आईला येताना तांदळाचं पीठ आणायला सांगणार होते आता कॅन्सल.....
भारी किस्सा आहे. छान रंगवून
भारी किस्सा आहे. छान रंगवून लिहीलाय.
बाकी मी बस ड्रायव्हर असते तर
बाकी मी बस ड्रायव्हर असते तर मीही रिपोर्ट केले असते .
असो, भीती वाटली किस्सा वचून आणि खरं तर पोलिस त्यांचं काम चोख बजावतात बघून एक प्रकारे समाधानही वाटल !
शोनुची पोस्ट एकदम जायदाद
शोनुची पोस्ट एकदम जायदाद से रफादफा करणार्या प्राण टाइप बाप लोकांची वाटते आहे किंवा ती सागर मधली आजी.
भारीच आहे किस्सा!
भारीच आहे किस्सा!
(No subject)
Pages