Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2014 - 02:49
माझ्या "फ्रेंडस अॅण्ड कलीग्ज" या धाग्यावर `बेफिकीर' यांनी सुचवल्याप्रमाणे "ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव" हा वेगळा धागा काढत आहे.
धाग्याचा फायदा सर्वांनाच, खास करून माझ्यासारख्या ४-५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि तुलनेत मॅनेजमेंटच्या लोअर लेव्हलला असलेल्यांसाठी येथील अनुभवी लोकांचे अनुभव, त्याचे विश्लेषण आणि एक्स्पर्ट टिप फार मोलाचे ठरतील.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योगी भारी, एखादी स्टोरी असावी
योगी भारी, एखादी स्टोरी असावी तसा अनुभव आहे
ईथले अनुभव रिलेट होत आहेत, तसेच त्यातून काही टिप्सही मिळत आहेत..
धन्यवाद सर्वांना...
धन्यवाद सर्वांना...
बापरे योगी. असे अगदी होते. माझ्याक डे खूप अनुभव आहेत पण लिहू शकत नाही.
@अमा तुमचे पण अनुभव लिहा हो...आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल.
Office madhe siniyar lok jast
Office madhe siniyar lok jast politics kartat.
ऋन्मेष, भरत, अनेक वेळा ऑफिस
ऋन्मेष, भरत, अनेक वेळा ऑफिस मध्ये किंवा इतरत्र व्यवसायिक नीतिमूल्य, आर्थिक फायदा हे सोडून राजकारण महत्वाचे असते असे वाटू शकते. परंतू हा एक काही विशिष्ट अनुभवातून निर्माण झालेला नकारात्म द्रुष्टीकोन असू शकतो.
बहुसंख्य कर्म क्षेत्रांमध्ये बहुसंख्य व्यक्तींच्या हिताचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय आपल्या द्रुष्टीकोनातून व्यवहार्य किंवा व्यावसायिक नीतीमत्ते ला धरून अथवा आर्थिक शिस्तीला धरून असतीलच असे नाही त्यामुळे
हे राजकारण वाटू शकते. त्यामुळे बहुजन हिताय काय आहे याचा विचार करावा. मग ते व्यावसायिक क्षेत्र असो किंवा वैयक्तिक आयुष्य. ज्या क्षेत्रात बहुसंख्य व्यक्ती कमी सुखासीन आहेत त्या क्षेत्रामध्ये सकारात्मक गोष्टी करायचा प्रयत्न करावा.
अंतरंगी, भगवद्गीते च्या संदर्भा वरून आठवले, गीते मध्ये सुध्दा अशा स्त्रीयांना आणि क्षुद्रांना कमी लेखले आहे असे वाटेल असे श्लोक आहेत. वस्तुतः गीतेचे तत्वज्ञान पाहिले तर ते संकुचित विचारांना पाठींबा देणारे असेल असे वाटत नाही. या वर एका अभ्यासकाने असे मला सांगितले कि, जर त्या काळाचा बहुसंख्य समाज स्त्री यांना आणि क्षुद्रांना दुय्यम स्थान देणारा असेल आणि त्याला गीतेमध्ये विरोध केला आहे असे त्यांना वाटले असते तर त्या समाजाने गीतेचे इतर तत्वज्ञानाही स्विकारले नसते आणि ख्रिस्ता प्रमाणे व्यासांनाही क्रुसावर चढवले असते.
आपल्या संदर्भात बोलायचे तर, बहुजनास जे योग्य वाटेल ते व्यवसायिक नीती मत्ता किंवा अर्थिक शिस्त यापेक्षा अधिक प्रमाणात स्विकारले जाते.
वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवावे .
लग्नाच्या दिवसापर्यंत ती मला
लग्नाच्या दिवसापर्यंत ती मला मोबाईलवर फोन करुण त्रास द्यायची >>> त्यांच्या साडीचा कलर पोपटी होता का ?
Pages