आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा.....
भाग-1
https://www.maayboli.com/node/65783
भाग-2
https://www.maayboli.com/node/65793
भाग-3
https://www.maayboli.com/node/65800
भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807
भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818
भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825
भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात....
या सगळ्यात फक्त राजेश असंतुष्ट होता. भयंकर चवताळलेला तो त्याच्या अशा अपमानामुळे...धक्क्यातून सावरल्यावर दोन दिवस विचार करून त्याने नवीन कारस्थान रचलं...प्लॅन संपूर्ण ठरवल्यावर त्याच्या चेहेर्यावर आसुरी हास्य पसरलं.......
आता इथून पुढे...
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दुसर्याच दिवशी सकाळी राजेश लवकर उठला. सगळ्या प्रकाराबद्दल त्याने घरच्यांची माफी मागितली . त्याचे वडील चार वर्षांपूर्वी हार्ट अॅटॅकने वारले होते. आता त्याला जिवाभावाची जवळची अशी त्याची आईच या जगात राहिली होती. इतर तो कसाही असला तरी त्याचा त्याच्या आईवर खूप जीव होता. म्हणून त्याने ही गोष्ट आईला कळू देऊ नका अशी विनंती केली. बाबांच्याही मनात आपल्या बहीणीचा विचार आला आणि त्यांनी संमती दिली. आठ दिवस राजेश तिथेच राहीला.
दोन दिवसांनी राजेश पुन्हा कारखान्यात गेला. गेल्या गेल्या त्याने सोहमला बोलवून घेतलं.सोहम हे त्याचा जवळचा मित्र आणि कारखान्याचा मॅनेजर होता. अगदी राजेशच्या कारकिर्दीच्या सुरूवातीपासून सगळ्या चांगल्या वाईट कामांमधला त्याचा भागीदार. राजेशचा सोहमवर विश्वास होता. दहा मिनीटांनी सोहम केबिनमध्ये हजर झाला. "दोन दिवस का आला नव्हतास रे?"; असं सोहमने विचारलं. दोन सेकंद राजेश याला सांगावं की सांगू नये या विवंचनेत पडला. कारण त्या प्रकरणात त्याला काहीच रिस्क घ्यायची नव्हती म्हणून त्याने रोहन कसा मेला हे सोहमलाही कळू दिलं नव्हतं. पण पुढच्या प्लॅनमध्ये त्याचाही थोडा सहभाग असणार होता. मग यालाही इतिहास माहिती असावा असं वाटलं.
"राजेश ; का बोलवलयस मला, काही महत्त्वाचं होतं का? " सोहमचा प्रश्न ऐकून राजेशची विचारशृंखला तुटली.त्याने एक दिर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरूवात केली. राजेश म्हणाला; "सोहम तुला माहितच असेल रोहन मेला ते. पण त्याचा अपघातात मृत्यू नव्हता झाला. मीच मारलेलं त्याला". सोहम राजेशकडे विचित्र नजरेने बघत म्हणाला; " राजा बरा आहेस ना रे? काहीही काय बोलतोयस. बरे वाटत नसेल तर घरी जा. मी बघतो इथलं". राजेश म्हणाला; "मला माहितीये तुला यावर विश्वास नाही बसणार. पण हेच खरं आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक." असं म्हणून त्याने रोहनच्या खुनापासून ते परवा रात्रीच्या भयावह अनुभवापर्यंत सगळं सांगितलं सोहमला. जवळपास वीस मिनीटं न थांबता तो बोलत होता. त्याचं बोलणं संपल्यावर सोहमला एसीत बसूनही घाम फुटला होता. भूत बघीतल्यासारखं तो राजेशकडे बघत होता. "आता पुढे पुढे काय करणारेस राजा?" एवढाच प्रश्न विचारून तो गप्प बसला. राजेशने पंधरा मिनीटात त्याला सगळा प्लॅन सांगितला. सोहम म्हणाला; " राजा तू आधी माझ्यावर विश्वास ठेवला असतास तरीही तुझी साथ दिली असती रे. पण हरकत नाही. आता तुझी मदत करायला तयार आहे. पण यात अजून एका गोष्टीची कमतरता आहे." राजेशला काय राहीलय हे कळत नव्हतं. त्याने चमकून विचारलं; "काय रे मला नाही वाटत काही राहीलय. "सोहम म्हणाला; "राजा नीट शांत पणे विचार कर. रोहनला बोलवणार्या माध्यमाला धडा शिकवायचा विचार केलास का? त्या एकामुळे तुझा अख्खा प्लॅन डब्ब्यात जाईल हे कळतय का तुला?"...राजेशची ट्यूब पेटली.."अरे खरंच की मी त्याला कसं सोडलं....अरे पण तो आपल्यापेक्षा भारीये...त्याचा बंदोबस्त कसा करायचा सोहम?"...विचार करतो असं सांगून सोहम तिथून निघून गेला.
दिवसभर राजेशने सगळी कामं केली. तरीही आपण करतोय ते बरोबर करतोय का? यासाठी त्याचं मन त्याला खात होतं. कुठेतरी अजूनही विचार सुरू होता. रात्री घरी येताना सोहमचा त्याला फोन आला.. गाडी चालवत असल्यामुळे त्याने घेतला नाही. घरी गेल्यावर त्याने काॅल करून विचारलं. सोहम म्हणाला "माध्यमाचा बंदोबस्त मी केलाय...त्याला तोडीस तोड माणूस माहितीये मला. उद्या कड्यापाशी साडे अकराला भेट. तिथनं जाऊया"....
क्रमशः
---- आदिसिद्धी
हाही मस्त जमलाय भाग. पुभाप्र.
हाही मस्त जमलाय भाग. पुभाप्र.
एक सजेस्ट करू का, सोहम आणि राजेशच्या तोंडच्या वाक्यांना दुहेरी अवतरणचिन्हात घाल. वाचनाची सुलभता, बाकी काही नाही. लिखाण मस्त जमलंय.
ओके करते दुरूस्त...
ओके करते दुरूस्त...
केलं ग दुरूस्त...सांगितल्याबद्दल धन्यवाद..
अरे वा हाहि भाग छान जमलाय
अरे वा हाहि भाग छान जमलाय उत्सुकता लागुन रायलीन पुढील भागाची
छान !
छान !
धन्यवाद आनंद दादा आणि अधांतरी
धन्यवाद आनंद दादा आणि अधांतरी जी..
मस्त रंगवतेस. आवडलं
मस्त रंगवतेस. आवडलं
सगळे भाग छान . पु भा प्र
सगळे भाग छान . पु भा प्र
धन्यवाद गुगु आणि किल्ली.
धन्यवाद गुगु आणि किल्ली.
राजेश जर खरंच इतका
राजेश जर खरंच इतका पाताळयंत्री असेल तर स्वतः केलेला गुन्हा कधी दुसर्याला सांगणार नाही.
ते पण आपल्या एका एम्पॉयीला
तो फक्त एक कारखान्यात पोस्ट
तो फक्त एक कारखान्यात पोस्ट म्हणून मॅनेजर होता. प्रत्यक्षात सोहम त्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्मांचा सोबती होता सुरूवातीपासूनच. त्यामुळे पहिली मदत तो त्याच्याचकडनं घेणार. हेल्प साठी कन्फेशन देणं भागच होतं.
हेल्प साठी कन्फेशन देणं भागच
हेल्प साठी कन्फेशन देणं भागच होतं.>>गरजेचं नाही. दुसरी काही कथा बनवून सांगू शकतो.
सुरुवातीपासूनाचा भागीदार होता, तर मग रोहनला मारायचा प्लॅन त्याला सोबत घेवूनच केला गेला असता ना!
ते प्रकरण त्याने दाबून
ते प्रकरण त्याने दाबून टाकलेलं...त्याला कोणाचाही सहभाग नकोच होता ... पण अचानक उघडीस आलं....त्यामुळे ठोस उपाय करण्यासाठी खरं सांगणं भागच होतं.....ऑलरेडी इतक्या जणांना कळलेलं...त्यात मदत मिळत असेल तर अजून एकाला सांगण काय वाईट...
ओके. समहाऊ मला तरी नाही पटल.
ओके.
समहाऊ मला तरी नाही पटल.