भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हाताला आत्यंतिक वेदना जाणवली तसे त्यांनी पाहिलं तर त्याचे दोन्ही हात खांद्यापासून पंज्यापर्यंत पुर्ण रक्ताळले होते. काही क्षणांनंतर आपोआप ते रक्त नाहीसे झाले आणि दोन्ही हातावर एक विचित्र चिन्हे असलेली नक्षी उमटली होती. त्या नक्षीला काहीतरी अर्थ असावा इतपत ती सुबक होती पण त्यावरचे आकार आणि एकंदरीत प्रकारावरून ती काहीतरी अमानवीय प्रकारचा खेळ असावा अशी उमटली होती हातांची अशी अवस्था बघून तो मनातल्या मनात आक्रोश करायला लागला.
एका भयाण नाट्याची सुरुवात झाली होती आणि कमकुवत मनाचा मयूर खुर्चीचा पहिला बळी ठरला होता!!
दुसऱ्या दिवशी सकाळी मयूरने झालेला प्रकार इतरांना सांगितला. त्याची हकीकत ऐकून सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले.
मिलींद: "तुझ्या हातावर डिझाईन उमटली होती? ही ही.. काहीही सांगतो का बे "
मयूर: "खरंच सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. भयानक आहे ही जागा! ती खुर्ची भारलेली आहे. आपल्याला धोका आहे गाईझ, जाऊया आपण इथून."
शैलेश: "दाखव मग ती नक्षी. बघु तुझे हात."
मयूर ने हात दाखवले, पण रात्री घडलेल्या प्रकारचे कोणतेही चिन्ह नव्हते.
शैलेश: “हे बघ काहीच नाहीये. तुला भास झाला असेल किंवा स्वप्न पडलं असेल. लोकांचं ऐकून ऐकून मनावर परिणाम करून घेतला आहेस तू पोरा! सांगितलं होतं लक्ष देऊ नकोस म्हणून”.
मिलींद: “मी तुझी स्क्रीन पाहिली होती. किती रहस्यकथा वाचशील मायबोलीवर? भुतांच्या कथा वाचतोस,त्यावर विचार करतोस. असे भास होणारच मग! सध्या ब्युटी पार्लर नावाची भयकथा वाचत आहेस ना. ब्युटी पार्लरमध्ये मेहंदी वाली ची entry झाली की काय? तिनेच उमटवली असेल ही नक्षी!! ही ही..”
मयूर: “हो मी वाचतो भयकथा. तुझ्या माहितीसाठी सांगतो, ब्युटी पार्लर रहस्यकथा एकदम उत्तम चालु आहे. मेहंदी, मेकअप असं काही नाही त्यात, कथेच्या नावावर जाऊ नको. लेखिकेने कथेत खरा भयरस ओतलेला आहे. पण तुला काय कळतं त्यातलं. गप्प बैस. तू म्हणतोस तस काही नसतं रे. माझ्या वाचनाचा काहीही संबंध नाहीये. विषय भरकटवू नकोस. मी सांगतो ते खरं आहे.”
शैलेश:”ठीक आहे. खरं असेलही. तुझा हात सुद्धा नीट आहे. काहीच खुणा नाहीयेत. म्हणून आम्ही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू शकत नाही. एक काम करूया. आज रात्री सगळे जागे राहूया. आज काही नाही घडलं तर उद्या, परवा, संपूर्ण आठवडा बघू काय होतं ते. काही घडलंच नाही तर उत्तम. तू म्हणतोस ते खरं असेल आणि काही विचित्र घडलंच तर उपाय शोधू.”
मयूर: “उपाय वगैरे काही नाही. ही जागा सोडायची. बास!”
सगळे कामाला गेले. आजचा दिवस नेहमीप्रमाणे पार पडला. सोमवार असल्यामुळे कामाचा डोंगर होता. त्यामुळे सकाळचं संभाषण बऱ्यापैकी विसरल्यासारखं झालं होतं. कंपू घरी परतला. रात्रीची जेवणे पार पडली. जरा पाय मोकळे करून येऊ आणि थोडं फिरून येऊ असा विचार करून कंपू भटकायला सज्ज झाला. किनारा जणू त्यांना साद घालत होता. समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवून सगळे रूमवर परातले. आराम करण्यासाठी सगळे आडवे झाले. मयूरने आज जागी राहायचं आहे ह्या गोष्टीची आठवण करून दिली तसे सगळे उठले आणि पत्ते खेळायला बसले.
वास्तवीक पाहता सगळे थकले होते. पण मयूर च्या अनुभवाची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे होते. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती आणि दडपण होते. कोणी वरकरणी घाबरल्याचे दाखवत नव्हते. इतक्यात वीज गेली. मेणबत्त्या लावून सगळीकडे कामापुरता प्रकाश करण्यात आला. जशी रात्र चढत गेली तसा काळोख जास्तच भयावह जाणवत होता. मेणबत्त्या असूनही तो प्रकाश केविलवाणा वाटत होता. पोरांनी चहा पिऊन डोळ्यांची झापड कशीबशी उघडी ठेवली होती. आता तर वारा पडला होता. वातावरण कोंदट झालं होतं. हळू हळू धूर सगळीकडे पसरू लागला. कालच्या घटनेप्रमाणे एक वाजता बरोबर घड्याळाचा टोला ऐकू आला. मयूर चे बोलणे खरे आहे ह्यावर बाकी दोघांचा विश्वास आता बसू लागला होता. एका अभद्र सावटाने घर भारून टाकलं होतं. कालचीच घटना आज पुन्हा जशीच्या तशी घडत होती. फरक इतकाच की आज कंपूतील प्रत्येक जण घाबरला होता आणि मयूर च्या रक्ताळलेल्या हातावरची ती रहस्यपूर्ण नक्षी पाहत होता. मिलींदने त्या परिस्थितीत हिम्मतीने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. त्या पवित्र शब्दांमुळे ते अमंगल सावट मावळलं. पण मयूरच्या हातावरची नक्षी मात्र तशीच राहिली. सगळे सुन्न झाल्यामुळे शांत बसून राहिले होते. त्या नक्षी चा अर्थ आणि त्याचं काय करावं हे समजत नव्हतं. शैलेशने त्या नक्षीचा फोटो मोबाईलमध्ये काढला. कोणालातरी त्याचा अर्थ विचारावा म्हणून त्याने असे केले. पहाट झाली. सूर्याचा पहिला किरण धरतीवर पडताच मयूरच्या हातावरची नक्षी आपोआप गायब झाली.
जागरणामुळे सगळ्यांनाच थकवा जाणवत होता. शिवाय त्या प्रसंगाचा मानसिक ताण होताच. पण कामावर जाणे भाग होते. आवरून कंपू घराबाहेर पडला आणि कामावर सगळे रुजू झाले. कंपनीतील काम संपल्यानंतर शैलेशने गावात जाऊन कोणालातरी विचारावे ह्या हेतूने मोबाइलला मधली photo gallary उघडली. तो folder बघताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जे पाहिले ते अविश्वसनीय होते....................................................
--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
(क्रमशः )
तळटीप:
@द्वादशांगुला: तुमच्या कथेचा उल्लेख केला आहे. हलके घ्या!
funny observation: आपल्या दोघींच्या कथांचे भाग एकाच दिवशी किंवा असेच मागेपुढे पोस्ट होतात असं निरीक्षण आहे.
हा भाग भारी जमलाय.......
हा भाग भारी जमलाय....... पुढील खुर्चीच्या प्रतिक्षेत..:)
आणि माझ्या ब्युटी पार्लरचा उल्लेख अचूक जागी केलाय हो... आवडला....
mast
mast
धन्यवाद!!
धन्यवाद!!
पुढील खुर्चीच्या प्रतिक्षेत..:)>>>>>>>>>>>>>>>>>ती खुर्ची जुईच्या पार्लर मध्ये अडकली आहे. येईल लवकरच.
आणि हो कथेत अशा प्रकारचा संबंध हा निव्वळ योगायोग आहे.
कथा चांगली सुरु आहे.
कथा चांगली सुरु आहे.
टीपीकल भूतकथा आहे पण सादरीकरण जमतंय.
ब्युटी पार्लर कथेचा उल्लेख म्ह्णजे झी वाले आपल्याच एका सिरीयलमधे दुसर्या सिरीयलची / सिनेमाची जाहिरात करतात तसं झालं.
मस्त पुढील भाग लवकर टाका
मस्त पुढील भाग लवकर टाका
धन्यवाद सस्मित !
धन्यवाद सस्मित !
ब्युटी पार्लर कथेचा उल्लेख म्ह्णजे झी वाले आपल्याच एका सिरीयलमधे दुसर्या सिरीयलची / सिनेमाची जाहिरात करतात तसं झालं.>>>>>>
हो. खरं आहे तुमचं. पण का कोण जाणे मला स्वतःच्या कथेतील नक्षीची संकल्पना जुईच्या पार्लरशी मिळतीजुळती वाटली. त्यामुळे एक सहज उल्लेख टाकला आहे.
छान चाललीय ही पण कथा. भारी
छान चाललीय ही पण कथा. भारी आहे !
दोन दोन अमानवीय शक्ती !
जुई, तुझ्या ब्युटीपार्लर मध्ये बसण्यासाठी किल्ली यांची खुर्ची घेऊन जा..
धन्यवाद आनंद, रानजाई,
धन्यवाद आनंद, रानजाई, वनश्री
दोन दोन अमानवीय शक्ती ! >>>
जुई, तुझ्या ब्युटीपार्लर
जुई, तुझ्या ब्युटीपार्लर मध्ये बसण्यासाठी किल्ली यांची खुर्ची घेऊन जा.. Lol>>>>> हो नक्कीच.
भारी चाललीय कथा, वातावरण
भारी चाललीय कथा, वातावरण निर्मिती छान झालीय, पुढचे भाग लवकर टाका
छान भाग.
छान भाग.
जाहिरात करण्याचा प्रसंग पण जमलाय.
धन्यवाद अंकु, ज्वाला
धन्यवाद अंकु, ज्वाला