Submitted by सत्यजित... on 11 April, 2018 - 19:18
चांदण्या रात्रीस पडली..'भूल' आहे ती...
रातराणीचे सुगंधी फूल आहे ती!
वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते...
मोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती!
आजही,प्राजक्त आला हातघाईवर!
मंद वाऱ्याने दिलेली हूल आहे ती!
आणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...
केस सावरण्यातही मश्गूल आहे ती!
ती म्हणाली..शेवटी,निर्माल्य होवू दे...
मी विठूला वाहिलेले फूल आहे ती!
================================
ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्
लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती!
येथल्या प्रत्येक स्त्रीचे कर्ज जाणूया...
की,जिवांना सांधणारा पूल आहे ती!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा ! सुरेख.. आवडली..
अरे व्वा ! सुरेख..
आवडली..
सुरेख...
सुरेख...
शेवटचे दोन विशेष आवडले....
सत्यजित, छान लिहलयं!
सत्यजित, छान लिहलयं!
केवळ अप्रतिम .....
केवळ अप्रतिम .....
वाह..मस्त लिहिलय...
वाह..मस्त लिहिलय...
ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्
लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती!>>> मस्त!
आणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...
केस सावरण्यातही मश्गूल आहे ती!>> पहिली ओळ वाचताना काहीतरी खटकतेय...
चू. भू. द्या. घ्या.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
>>>पहिली ओळ वाचताना काहीतरी खटकतेय...>>>पुन्हा तपासून पाहिले,ओळ वृत्ता बरहुकुम आहे. राबताही सहज लक्षात यावा,असाच वाटतो आहे!
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत
वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते...
मोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती! .....मस्त !!!
>>>>मंद वाऱ्याने दिलेली हूल
>>>>मंद वाऱ्याने दिलेली हूल आहे ती!
जिओ!!
"ती निखारेही तिच्या पोटात
"ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्
लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती!>>> मस्त!"
सहमत. खरोखर मस्त.