मागच्या भागात:बरोब्बर दहा वाजता महंत आणि संजनाचा भाऊ समीर गाडी घेऊन आले. महंत आज सोवळं नेसून त्यावर कुर्ता घालून आलेले.त्यांचा चेहेरा अतिशय प्रसन्न दिसत होता. आल्यावर त्यांनी सगळ्यांना चंदनाचा टिळा लावला आणि एकेक आभिमंत्रीत केलेला धागा मनगटात बांधला.समीरने महंतांची परवानगी घेऊन गाडी चालवायला सुरूवात केली. प्रवासाला सुरूवात झाली.
इथून पुढे...
====================================
प्रवासाला सुरूवात झाली. समीर शांतपणे गाडी चालवत होता. समिधा आणि संजना मनातून जरा घाबरल्या होत्या. पण त्या तसं दाखवत नव्हत्या. हेडफोनवरची गाणी ऐकताऐकता त्या कधी झोप लागली हे त्यांच त्यांनाच कळलं नाही. या सगळ्यात महंत मात्र शांतचित्ताने विचार करत होते. तिथे गेल्यावर नक्की कोणता विधी करायचा हे ठरवत होते. रोहनशी आपणच संवाद साधायचा की समिधासमोर रोहनला बोलतं करायचं हे त्यांच ठरत नव्हतं. शेवटी बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी योजना ठरवली. तासाभराने सगळेजण जेवायला थांबले. जेवताना महंतांनी बोलायला सुरूवात केली. समीर समिधा आणि संजना लक्ष देऊन ऐकू लागले.
महंत म्हणाले;
काल रात्रीच मी तुम्हाला सांगितलं की रोहन हा पुण्यात्मा आहे. त्याला आपण आवाहन करून बोलवणार आहोत. पण सध्या तो जिथे आहे तिथे अनेक दुष्ट शक्तींचा सुष्ट शक्तींपेक्षा जास्त प्रभाव आहे. त्यामुळे आपल्याला काही विशेष काळजी घ्यावी लागेल. तिथे रोहनला बोलवून मी एकटाच त्याच्याशी संवाद साधणार आहे. याला कारण की त्या दुनियेचा दरवाजा उघडल्यावर रोहनबरोबर काही दुष्ट शक्तीही येऊ शकतात. त्यांच्याशी संघर्ष करून त्यांना परत पाठवण्यासाठीची शक्ती माझ्या इतक्या वर्षांच्या साधनेमुळे मला मिळाली आहे. पण तुमच्याजवळ ती नसल्याने तुमच्या जीवाला याचा धोका होऊ शकतो. तिथे गेल्यावर आपण एकमेकांशी कमीच बोलणार आहोत. तुम्हीही आतिशय कमी बोलायचे आहे. आणि शक्यतो मनात कुठलाही विचार न आणण्याचा प्रयत्न करा. हवं तर दत्तगुरूंच नामस्मरण करा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका नाहीतर त्यांचा तुमच्या मनावर प्रभाव वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही विनाकारण स्वतःवर संकट ओढवून घ्याल.
संध्याकाळी सात वाजता आपल्याला विधी सुरू करायचे आहेत. समिधा तुला स्वप्नात दिसणार्या ठिकाणी आम्हाला घेऊन जायची जबाबदारी तुझी. त्यामुळे गाव आल्यावर समीरला रस्ता तु सांगशील. समीर आता तुला गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी लागेल.कारण त्या शक्तींचा आवाका कितपत आहे हे आपल्याला ठाऊक नाही त्यामुळे त्यांनी आपल्या कामात अडथळे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता त्यांच सुरूवातीचं सावज तू असू शकतोस कारण गाडी तू चालवतो आहेस. आता हे सगळ्यात महत्त्वाचं , तिथे विधींना सुरूवात झाली की तुम्हाला काही दृष्य दिसायला लागतील.ती सत्य नसून तो तुम्हाला फसवून आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी निर्माण केलेला आभास असेल. यात समिधाशी संबंधित व्यक्तीकडून अन्याय झाल्यामुळे तिला जास्त धोका आहे. त्यामुळ तिथे गेल्यावर संजना~ समिधा~ समीर अशा क्रमाने तिघंही एकमेकांचे हात पकडून बसा आणि लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीत कोणालाही रिंगणाबाहेर जायला देऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या आपण त्या शक्तींशी संघर्ष न करता त्यांना समजवणार आहोत. रोहनवर अन्याय केलेल्या व्यक्तीला शोधून त्याची माफी मागायला लावणार आहोत. आणि त्याची राहिलेली इच्छा जाणून घेऊन ती पूर्ण करता येईल का हे बघायचं आहे. तेव्हा आता आपण पूर्णपणे सज्ज आहोत. एवढं बोलून महंत थांबले.
सगळ्यांनी जेवण उरकलं आणि पुन्हा गाडीत येऊन बसले. खिशातून चावी काढताना समीरच्या हातात कसलीतरी पुडी लागली. मग त्याला आठवलं की इथे येताना त्याच्या आज्जीने त्याला काळजी म्हणून गाणगापूरची रक्षा पुडीत बांधून दिली होती. समीरने महंतांना हे सांगितल्यावर ते जरा हसले आणि म्हणाले , तरीच आतापर्यंतचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. त्यानी त्यातली थोडी रक्षा घेऊन तीन बारीक पुड्यां बांधली आणि त्याला दोरा बांधून तिघांनाही ते गळ्यात घालायला लावलं. हळूहळू प्रवास संपत आला. गावात आल्यावर समीधाने समीरला रस्ता दाखवायला सुरूवात केली. शेवटी एकदाचे ते त्या कड्यापाशी पोहोचले. महंतानी थोडं अंतर आधीच समीरला गाडी थांबवायला लावली. सगळेजण उतरले आणि कड्यापर्यंत चालत गेले. आता काय होणार याची तीघांनाही उत्सुकता वाटत होती आणि तितकीच भीतीही. कड्यावर एके ठिकाणी महंतांना फारच प्रबळ संकेत मिळू लागले. महंतांनी तिथेच विधी करायचं ठरवलं. सगळ्यात आधी त्यांनी त्यांच्याकडच्या छोट्या झाडूने संपूर्ण भाग स्वच्छ करायला सुरूवात केली. संजना आणि समिधाही त्यांनी न सांगता मदत करू लागल्या. महंतांना याचं आश्चर्य वाटलं आणि ते जरा हसले. मग त्यांनी गोमूत्र शिंपडून त्या भागाचं शुद्धीकरण करून घेतलं. नंतर त्यांनी कुंकवाने एक रिंगण आखून घेतलं. समीर, समिधा आणि संजना तिघांनाही त्याच्या आत बसायला लावलं. महंतांनी पूजेला सुरूवात केली. महंतांच मंत्रपठण सुरू होतं. रिंगणात तिघेही एकमेकांचे हात हातात घेऊन बसले होते. रिंगणाबाहेर काहीतरी संघर्ष सुरू आहे हे त्यांना जाणवत होतं. आतलं आणि बाहेरचं वातावरण यात कमालीचा फरक होता. हळूहळू महंतांच्या मंत्रांचा स्वर वाढू लागला. त्यांच्या आवाजाला एक विलक्षण धार आली होती.अचानक महंत शांत झाले आणि ध्यानात मग्न झाले. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे रोहन आला होता.महंतांनी त्याला संपूर्ण घटना विचारली. त्याने महंतांना सगळा प्रसंग सांगितला आणि आपली इच्छादेखिल सांगितली.ती पूर्ण करण शक्य होतं .महंतांनी त्याला तसं आश्वासन दिलं.त्यांच्या चेहेर्यावर समाधानाचं हास्य पसरलं. आता पुन्हा काही विधी करून ते रोहनला पुन्हा त्याच्या जगात पाठवत होते. तितक्यात संजनाला एक सावली महंतांवर शस्त्राने वार करताना दिसली. यापासून अनभिज्ञ असलेले महंत त्या अनपेक्षित वाराने रक्ताच्या थारोळ्यात कोसळले...
क्रमशः
--- आदिसिद्धी
भारीच जमलाय हा भाग .
भारीच जमलाय हा भाग . आत्म्याच्या आवाहनाचं वर्णन अगदी समर्पक आणि उत्कृष्ट शब्दांत केलं आहेस. पुढच्या भागात काय होईल याची उत्सुकता वाटतेय. पुलेशु.
धन्यवाद द्वादशांगुला...काही
धन्यवाद द्वादशांगुला...काही चुका असतील तर सांग गं..
अगं चुका मलातर नाही सापडल्या.
अगं चुका मलातर नाही सापडल्या. अमानवीय लिखाणात तुझा हातखंडा आहे असंच वाटतं वाचून. भारी जमलंय लिखाण.
हो फक्त जमल्यास नीट पॅरा कर. पॅरादरम्यान एक ओळ सोड. कारण त्यामुळे लिखाण उत्सुकतापूर्ण आणि आकर्षक वाटण्यास मदत होते आणि वाचणार्यांकडून ओळ नि ओळ वाचली जाते. अन्यथा एखादी ओळ तरी स्किप होतेच. एक वाचनसुलभता म्हणून. बाकी काही नाही. लिखाणाची मात्र दादच द्यावी लागेल.
ए काहीही काय...तुझा या
ए काहीही हं...तुझा या शास्त्राचा गाढा अभ्यास आहे.जितकं डिटेल तू ब्युटी पार्लरमध्ये लिहीलयस त्यावरून कळतं. माझं इतकं काही वाचन नाही गं याचं. माझा पहिलं वहिलं अमानवीय लेखन हेच आहे. ब्लडी मेरी भयकथा नव्हतीच.. ती कुठल्या सदरात मोडते हेच मला अजून कळलं नाहीये
ब्लडी मेरी भयकथा नव्हतीच.. ती
ब्लडी मेरी भयकथा नव्हतीच.. ती कुठल्या सदरात मोडते हेच मला अजून कळलं नाहीये >>>>>>>> ती अंधश्रद्धा निर्मूलनपर सदरात काढू शकतेस.......
ओके करते लगेच. गोपाळकाला होतो
ओके करते लगेच. गोपाळकाला होतो नाहीतर वाचताना.
केलं गं बघ . दिसतय का बरं आता ?
हो छान . आणि माझं ऐकण्याबद्दल
हो छान . आणि माझं ऐकण्याबद्दल धन्यवाद.....
हायला ह्या धाग्यावर तर खरंच
हायला ह्या धाग्यावर तर खरंच भुताटकी आहे.... एकाच व्यक्तीचे दोन डुआयडी एकमेकांशी बोलत आहेत.
पळा पळा जोरात पळा इथून
छान सिद्धी ! मी वाचला हा भाग
छान सिद्धी ! मी वाचला हा भाग सकाळीच प्रतितिपीवर..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
रच्चाकने, मलाही आधी आदिसिद्धी हा ऋ चा ड्यू आयडी वाटला होता पण तसं नाही हे कालपरवा मला दुसर्या संकेतस्थळावर कन्फर्म झालं !
आदिसिद्धी आणि द्वादशांगुला हे दोनही ओरिजिनल (बाल) आयडी आहेत हे नक्की ! लेखन करताना त्यांच्याकडून नकळत होणाऱ्या गडबडीवरूनही हे जाणवतं.
5~3~2
5~3~2
5~3~2
.डबल पोस्ट
पाफा, का हसताय
पाफा, का हसताय
आनंद खूप खूप धन्यवाद..
आनंद खूप खूप धन्यवाद...संपूर्ण पोस्टबद्दल...
हायला ह्या धाग्यावर तर खरंच
हायला ह्या धाग्यावर तर खरंच भुताटकी आहे.... एकाच व्यक्तीचे दोन डुआयडी एकमेकांशी बोलत आहेत.
पळा पळा जोरात पळा इथून>>>>>>
चालू द्या तुमचं.... माझ्यातर्फे 21 तोफांची सलामी तुम्हाला या माबोराज्यात येऊन केलेल्या नविन अविष्काराबद्दल.....मला मजा येते आहे... आता तुम्ही रिंगण(धागा) सोडून पळाला आहात...त्यामुळे महंत तुम्हाला वाचवू शकत नाहीत..लवकर रामनामाचा जप सुरू करा ..तर वाचायची शक्यता
आहे.... जोक होता हं रागावू नका.....
5~3~2 याचा अर्थ नाही कळला
5~3~2
याचा अर्थ नाही कळला
आदिसिद्धी ताई, ते प्रतिसादात
आदिसिद्धी ताई, ते प्रतिसादात तिंब तिंब टाकायची इष्टाईल ऋ दादाची आहे (इति च्रप्स). उगीच लोकांचा गैरसमज व्हायचा..जोकिंग हं!
आता विषयावर...तीनही भाग वाचले. छानच जमलेत. असेच लिहीत रहा. पुलेशु.
अरे हो अजबदादा..त्या डयु
अरे हो अजबदादा..त्या डयु आयच्या धाग्यावर होतं हे... म्हणजे हे हि गृहीतक आहे अजून..मागे कोणीतरी सुटसुटीत दिसावं म्हणून काहीतरि करायला सांगितलेलं... हे त्या टिंबांमागचं प्रयोजन...गंमतच आहे एकेक...आणि धन्यवाद .
नवीन Submitted by आदिसिद्धी
नवीन Submitted by आदिसिद्धी on 12 April, 2018 - 23:39
&&बाणअचूकनिषाण्यावरबसलाआहे&&&&
अरे मस्त जमतेय कथा!!!
अरे मस्त जमतेय कथा!!!
काही चुका नाहीत काळजी नसावी.
धन्यवाद गुगु. पुढचा भाग टाकते
धन्यवाद गुगु. पुढचा भाग टाकते.
&&बाणअचूकनिषाण्यावरबसलाआहे&&&
&&बाणअचूकनिषाण्यावरबसलाआहे&&&&
Submitted by तर्राट जोकर on 13 April, 2018 - 10:52 >>>>> पण चिलखत घातल्यामुळे माणूस वाचला आहे ... काळजी नसावी.... पुन्हा नेम धरलात तरी चालेल... टेन्शन नाॅट.....