आठवणींचा कप्पा म्हणजे...

Submitted by सत्यजित... on 14 March, 2018 - 18:12

पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!

काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!

ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!

जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!

मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतीम

काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती! >>>> ह्या ओळी जास्त आवडल्या

मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!
वाह!! फार सुंदर!! Happy

ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!
जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती! >>> अप्रतिमच Happy

एकदम जबरदस्त!!

<<<
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!
...
जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!

मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!
>>>> हे विशेष आवडले आणि माझ्या आठवणींचा कप्पापण जरासा उघडला.