गुढीपाडवा काय खरे??? आणि काय खोटे ???

Submitted by ऋग्वेद. on 6 March, 2018 - 11:59

मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
अजुन बरेच काही आहे पण येथे नमुद करत नाही. पण या मेसेज मधे याचे स्पष्टीकरण नाही. याला उत्तर म्हणुन अजुन एक मेसेज फिरतोय त्यात गुढिपाडव्याचे अनेक पुरावे सांगितलेत. याबद्दल बरेच सर्च केले पण कोठेही माहिति मिळत नाही. म्हणजे खरच त्यावेळी हत्तीवरुन साखर वाटली की आत्ताचे काही रिकामटेकडे हत्तीवरुन अफवा पसरवतायेत.
काय खरे आणि काय खोटे?

Group content visibility: 
Use group defaults

च्यामायला काय वैताग आहे. दर दोन दिवसानी कुठल्याना कुठल्या धाग्यावर लोकांना ऋन्मेषबद्दलच लिहायचे असते . तु अस्सा नी तुझी मेंतॅलिटी तस्शी. धाग्याचा विषय काय लोक वहावत जातात कुठे. एकमेकांना त्याच्याकडे दुर्लक्ष करा सांगत बसतात Lol

माझ्याबद्दलही आजवर बरेच दंतकथा रचल्या गेल्या आहेत. लोकं आवडीने चघळतात आणि एकमेकांना सांगतात. कोणाला खरेखोटे करायची गरज भासत नाही. वा कोणाला मी खरा कोण कसा काय हे जाणून घेण्यात रसही नसतो << आता तु एव्हढ म्हणतोच आहेस तर सांग बरं खरा कोण आहेस तु?? तुझे २ पोरांबरोबर फोटो ही टाक, आम्ही त्याला लाईक करु. आणि तुझ्या ऑनलाईन गफ्रे चा ही... Lol

धाग्याचे नामकरण आता 'ऋन्मेष - काय खरे???, आणि काय खोटे??' असे करायला पाहिजे
>>>

मला वाटते या शीर्षकाचा नवीन धागा काढावा.
म्हणजे ज्यांना ऋन्मेषबद्दल जाणून घेण्यात रस नाही त्यांना उगाच या अवांतर पोस्टींचा त्रास नको.
आणि हो, तो धागा मी नाही काढणार. कोणीतरी पुढाकार घ्या Happy

आशुचॅम्प,
कोणताही id कितीही डोक्यात जात असेल तरी त्याची खरी आयडेंटिटी रिव्हील करणे सभ्यतेस धरून होणार नाही असे वाटते.
त्यामुळे ऋन्मेष id ची खरी ओळख तुम्ही देऊ नये असे वाटते.
या ऐवजी अनुल्लेख करायचा प्रभावी उपाय करावा असे मी सुचवेन

मला वाटते आयडी इग्नोर करण्यापेक्षा न पटलेल्या पोस्ट इग्नोर करणे जास्त योग्य राहील. कारण कसे कोणीही व्यक्ती पर्रफेक्ट नसते तसे कोणीही व्यक्ती सदासर्वदा वाह्यात नसते. मी राजकीय चर्चांच्या धाग्यावर बघतो की कित्येक आय डी एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तावातावाने भांडत असतात आणि बरेचदा त्या चिखलफेकीत पातळीही सोडली जाते. पण तेच आयडी दुसरया कुठल्या धाग्यावर छान माहिती देत असतात किंवा सुंदर कथा कविता लेख लिहित असतात. मग त्याचा आस्वाद का घेऊ नये. एखाद्या धाग्यावर माझ्यावर टिका करणारा वा माझ्या विरोधात लिहिणारा आय डी जर दुसरया एखाद्या दारूबंदीच्या विषयावर माझ्यासारखेच मत राखून असेल तर मी त्याला सपोर्टच करेन ना...
अर्थात ही माझी आयडोलॉजी झाली. कोणाला नाही पटली तर ही पोस्ट इग्नोर करू शकताच Happy

सिमबा तुम्हाला वाटते का त्याची खरी ओळख टाकली तरी तो मान्य करेल म्हणून, हा नंबर माझा नाही पासून हा फोटोच माझा नाही पर्यंत वाट्टेल त्या थापा मारण्यात तो पटाईत आहे
हा सूर्य नाहीच आणि तो जयद्रथ पण नाही सगळे मनाचे खेळ असल्याचे सांगेल.
मी त्याच्या धाग्यावर जाणे केव्हाच बंद केले आहे पण जिथे तिथे त्याचे असले धागा वाहवत नेण्याचे प्रकार डोक्यात जातात
दुर्लक्ष करा म्हणणारे ठीक आहे आणि होईल तितका ते करतोच कधीतरी वैताग होतो आणि तो बोलून दाखवला जातो
तेही करू नये का
म्हणजे एका आयडीने वाट्टेल तसे वागावे आणि आपण तो वेइतग व्यक्तही करायचा नाही असे का

11_0.JPG
ह्यातलं शवेटचं वाक्य वाचा आणि ठरवा तुमचा वेळ एखद्या डुकराला मजा देण्यात तर वाया घालवत नाहीत ना..
enough said

१००

आणि होईल तितका ते करतोच कधीतरी वैताग होतो आणि तो बोलून दाखवला जातो
तेही करू नये का>>>>>
तुझा त्रागा समजतो मला,
पण वरती सायो ने बोलून दाखवले, काय परिणाम झाला, अजुन 2 3 मी- मी वाल्या पोस्टीं आल्या,
त्यापेक्षा पोस्ट जम्प करणे उत्तम,
इग्नोरस्त्रा च्या प्रयोगाने आद्य ट्रोल सम्राट लिंम्बु तिंबुंपन अस्वस्थ होत असे, तर याची काय बात.

त्याच्या कोणत्याच पोस्ट ची दखल न घेणे उत्तम. अगदीच एखादी तर व्हॅल्यू ऍड करणारी पोस्ट असेल तर गोष्ट वेगळी, पण तशी वेळ फारच अपवादात्मक येईल.

असो,

इथे प्रतिसाद देणार्‍यांचा त्रागा समजु शकतो. हा आयडी केवळ आणि केवळ उपद्रव करण्यासाठीच तयार केलेला आहे.
सुरुवातीला काही धाग्यांवर त्याच्या विशिष्ट शैलीत लिहिलेले लेख वाचायला आवडायचे, त्यामुळे लोक प्रतिसाद, कौतुक करायचे.
पण आता लिखाणातला तो चार्म ही गेला आहे.
तेच तेच कोलांट्या उड्या मारणे, काही विचारले की बगल देणे, गिरे भी तो टांग उपर याचा सर्वांनाच कंटाळा आला आहे.

कुठल्याशा गोष्टीत एक राक्षस असतो, त्याला जितके गुद्दे माराल तितका तो मोठा होत जात असतो. तसेच या माणसाचे आहे, जितके प्रतिसाद द्याल तितकाच त्याला आनंद, मजा वगैरे वाटत जाईल.
लोकांचे लक्ष वेधुन घेणे हा एकच त्याचा उद्देश आहे. तीच त्याची ताकद आहे. तेव्हा लक्षच देऊ नये अश्या व्यक्तीकडे.
कोणी नवखा जर त्याच्या जाळ्यात प्रतिसाद देऊन अडकणार असेल तर त्याला तिथेच स्पष्टपणे सांगायला पहिजे, याउपरही तो नवखा आयडी (किंवा डु आयडी) प्रतिसाद देत राहिला तर त्यांना तुझ्या गळा माझ्या गळा खेळत राहु द्या.

असो, पोस्ट टायपेपर्यंत याच अर्थाची सिंबाची पोस्ट आली सुद्धा!

राहुल , समर्पक पोस्ट,
>>>>>>> लिखाणातला तो चार्म ही गेला आहे.
तेच तेच कोलांट्या उड्या मारणे, काही विचारले की बगल देणे, गिरे भी तो टांग उपर याचा सर्वांनाच कंटाळा आला आहे.>>>>>>>
+1

सिंम्बा, राहुल, प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी जरूर आत्मपरीक्षण करेन. आणि आपल्याला माझ्या लिखाणात दिसलेला चार्म पुन्हा कसा मिळवता येईल याचा जरून प्रयत्न करेन.

अर्रर्रर्र...इथे अजून तेच आख्यान चालू आहे होय! हा धागाही रसपंच्या कभी हाँ, कभी ना या व्हर्जीनल धाग्याच्या वाटेने जाणार वाटतंय... Uhoh

मी काय म्हणतो, इग्नोर करा ना राव.. कशाला मनस्ताप मनाला?
मायबोली आहे का रुन्मेषबोली?
बादवे - आपल्याला आवडतात रूनमेश च्या कंमेंट्स आणि लेख... अजून येऊ देत रे.

मायबोली आहे का रुन्मेषबोली?
बादवे - आपल्याला आवडतात रूनमेश च्या कंमेंट्स आणि लेख... अजून येऊ देत रे.<
>सहमत, लिहणाऱ्याला प्रेरणा दिली पाहिजे

काहीतरीच आहे , वाटलं गुडीपाडव्या बद्दल काही माहिती असेल पण इथं तर भलतंच काही सुरू आहे

अहो पण आधीच एक गफ्रे आहे की !!!
नवीन Submitted by महेश on 9 March, 2018 - <<
>>सभ्यता हा शब्द तुम्हाला कुणी शिकवला नाही वाटते.

किती लवकर समजायला लागलेय लोकांना
अनामिक १
वय - ३ आठवडे ४ दिवस....
Submitted by आशुचँप on 9 March, 2018 -
>> हो की इच्छा असली की मार्ग सापडतो. नुसत्या उचापती उकरून काढायची सवय असली की हे असं होतं

Pages