Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58
अर्थ माझा वेगळा
नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.
जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.
तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गजराजाने गंजलेले गज सोडेने
गजराजाने गंजलेले गज सोडेने वाकवले.
दशमी बरोबर घेऊन ती दशमी दिवशी
दशमी बरोबर घेऊन ती दशमी दिवशी पंढरपूरला निघाली
काथ्या च्या दशा गोळा करून
काथ्या च्या दशा गोळा करून बनविलेल्या त्याच्या कपड्यांची अक्षरशः दशा झाली होती!
धो धो पावसात ओला होऊ नये
धो धो पावसात ओला होऊ नये म्हणून 'ओला' करून तो घरी आला!
सर्दी होऊ नये म्हणून घरी आल्या आल्या आल्याचा चहा घेतला!
हे का? तेका? विचारण्याचा हेका
हे का? तेका? विचारण्याचा हेका त्याने सोडला नाही.
शीवाचे मंदिर गावाच्या
शीवाचे मंदिर गावाच्या शीवेच्या बाहेर आहे.
एक दीन मुलगा दिन भर उपाशी
एक दीन मुलगा दिन भर उपाशी होता.
घोड्यावरील त्या स्वाराने
घोड्यावरील त्या स्वाराने बंदूक ताणून क्षणार्धात घोडा ओढला!
गव्हाची आरोळी खाऊन त्याने
गव्हाची आरोळी खाऊन त्याने आरोळी ठोकली!
जगभर पाणी घेऊन जगभर फिरयाला
जगभर पाणी घेऊन जगभर फिरयाला जगायला तर हवे!
त्या सागराच्या गाजाने पहिलाच
त्या सागराच्या गाजाने पहिलाच दिवस गाजविला!
सदर्याचे काजं शिवायचं काज
सदर्याचे काजं शिवायचं काज त्याला रोज करावे लागे!
आता जर तर नको जरतारी वस्त्रे
आता जर तर नको जरतारी वस्त्रे हवी तर थोडी जर तरी हवी ना! जर जरच नसेल तर जरतारी वस्त्र जरा तरी बनविता येईल का!
जरा जर्जर झालेल्या त्याला
जरा जर्जर झालेल्या त्याला बसल्या जागेवर जराही हलता येत नव्हते! असे जरी असले तरी बसल्या जागी जरासे काम तो करायचाच!
अनेक वचनांत सांगितले आहे की
अनेक वचनांत सांगितले आहे की दिले वचन मोडून नये!
कानन काननात काटक्या आणयला
कानन काननात काटक्या आणयला गेली.
झर्याचे पाणी कसे खळ- खळ
झर्याचे पाणी कसे खळ- खळ वहातेय
खळ लावून दाबून चिकटवा तो कागद आता
_/\_सर्वांनाच. एकाचढी एक.
_/\_सर्वांनाच. एकाचढी एक.
कृष्णा, मस्त वाक्ये सुचताहेत
कृष्णा, मस्त वाक्ये सुचताहेत तुम्हाला...
तुमच्या उपमा वाचायच्या नादात माझा उपमा करपला.
_/\_सर्वांनाच. एकाचढी एक.>>>>
_/\_सर्वांनाच. एकाचढी एक.>>>> +१.
तारा तारा गोळा करून एकतारा
कृष्णा, मस्त वाक्ये सुचताहेत तुम्हाला...>>>> धन्यवाद!!
ती तारा 'तारा' गोळा करून एकतारा बनवीत असे
भरत आले जहाज !
भरत आले जहाज !
गळ्यात काळी पोत, कानात कुड्या
गळ्यात काळी पोत, कानात कुड्या, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर रूपयाएवढे कुंकू, हेच काय ते तिचे अलंकार
साडी हातात घेताक्षणी तिचा तलम पोत जाणवला
रात्र चढत होती, पोत वार्याने फरफरत होता आणि गोंधळी बेभान होऊन नाचत होता.
पावसाळ्याआधी जमीन, भिंती, पडवी पोतायला हवी होती
पोतराज, पिंगळा, वासुदेव हल्ली खेड्यातही कमीच दिसतात
तिच्या आवाजाचा पोत त्या गाण्यासाठी अगदी योग्य होता
पोतभर चुरमुरे बघता बघता फस्त झाले
@कृष्णा --- सायकलचा कुत्रा आणि गव्हाची आरोळी म्हणजे काय? नाही माहीत.
वाह! मस्त लिहितायत सगळे..
वाह! मस्त लिहितायत सगळे..
कृष्णा तुला जास्ती मार्क
स्वप्नांनाही भिजविले
स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री
स्वप्नांनाही भिजविले
स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री
पुस्तकात वाचून कोणीही शिकवेल,
पुस्तकात वाचून कोणीही शिकवेल, पुस्तकावाचून शिकवता आले पाहिजे
कृष्णा तुला जास्ती मार्क
कृष्णा तुला जास्ती मार्क Happy>>>
दक्षिणाने दक्षिण हस्ते मार्कांची दक्षिणा दिली त्यामुळे कृतकृत्य झालो!
कृष्णा दक्षिणा
कृष्णा दक्षिणा
Pages