Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58
अर्थ माझा वेगळा
नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.
जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.
तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिनाने न जेवण्याचा पण केला पण
रिनाने न जेवण्याचा पण केला पण आईच्या मायेपुढे तिचा नाईलाज झाला. लग्नात पण ठेवण्याचा तिने निश्चय केला.
कुत्रा मागे लागला म्हणून
कुत्रा मागे लागला म्हणून त्याने सायकल जोरात मारली पण मध्येच सायकलचा कुत्रा तुटला...
ते हातातलं आलं ठेव तिकडे
ते हातातलं आलं ठेव तिकडे बाजूला आणि पाणी आलं का ते पाहा आधी.
तो होता कावळा विचार करीत होता
तो होता कावळा विचार करीत होता का वळा? पण मार्गात दिसला सुवर्ण वळा म्हणे आले भाग्य फळा!
पाकातल्या पूर्या तयार
पाकातल्या पूर्या तयार झाल्यावर, पाक सिद्ध असल्याची घोषणा करण्यात आली.
घाटातून गाडी हळू चालवावी.
घाटातून गाडी हळू चालवावी.
कळशीचा घाट सुंदर आहे.
रवि ने रविवार बाजारातून रवि
रवि ने रविवार बाजारातून रवि आणली
गौरी गाईला पाडा झाला.
गौरी गाईला पाडा झाला.
आंबे पिकले . आता पाडा.
फुले काकूंनी अबोलीची फुले
फुले काकूंनी अबोलीची फुले माळली!
नदीकडे कडेवरी घागर घेऊन जात
नदीकडे कडेवरी घागर घेऊन जात असता मार्गात हातातील कडे कुठे तरी पडले!
थंडी वाजतेय तर रग घे.
थंडी वाजतेय तर रग घे.
एवढे वृद्ध झाले तरी रग कमी होत नाही.
आईला आलेला राग तिने सर्व राग
आईला आलेला राग तिने सर्व राग गाऊन घालवला.
सुमनने सुमनाने सुमने घेऊन
सुमनने सुमनाने सुमने घेऊन देवाचरणी वाहिली
गुलाबजामने भरलेले पात्र बघून
गुलाबजामने भरलेले पात्र बघून , झकोबाच्या तोंडाला पाणी सुटले.
नाटकातील नारदाचे पात्र छान काम करत होते.
कोणत्याही पक्षाचा असला तरी
कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला 'पक्ष' करावाच लागतो. .
कणकिचे पिठ मळता मळता ती
कणकिचे पिठ मळता मळता ती शक्तीपिठं आठवत होती.
पक्ष्यांनी पक्ष स्थापून
कावळ्या सारख्या पक्ष्यांनी पक्ष स्थापून ऐन पक्ष पंधरवड्यात पक्षपाती पणा करणे योग्य नव्हे!
कबुरतांची पिसं फारच पसरलेत.
कबुरतांची पिसं फारच पसरलेत.
सुभाषला विहिर खोदण्याचं पिसं लागलय!
नुपुराच्या पायातील नुपूर
नुपुराच्या पायातील नुपूर झंकारत होते.
एक झाप विणलं नाही म्हणून काही
एक झाप विणलं नाही म्हणून काही एवढ झापायला नको.
नाडी तपासता तपासता ,
नाडी तपासता तपासता , डॉक्टरांच लक्ष निखिलच्या पायजम्याच्या लोंबणार्या नाडीकडे गेलं.
वराची वरात आली आणि वरच्या
वराची वरात आली आणि वरच्या मंडळींची गडबड झाली वरवर ते शांत दाखवत होते पण आतून जीव वरखाली होत होता!
त्या माठाला एक चिर पडलेय.
त्या माठाला एक चिर पडलेय.
लवकर भाजी चीर.
कृष्णा, मस्त जमलेत वाक्य.
कृष्णा, मस्त जमलेत वाक्य.
नांगराचा फाळ मोडल्याने ऐन
नांगराचा फाळ मोडल्याने ऐन मशागतीच्या वेळी खर्चाचा फाळ लागला!
पत्रावळीवर जेवण वाढून तिने
पत्रावळीवर जेवण वाढून तिने पत्राची घडी करून ठेवली, आणि गळणार्या पत्र्याकडे पाहू लागली.
कृष्णा, मस्त जमलेत वाक्य.
कृष्णा, मस्त जमलेत वाक्य. Happy>>
तुम्हा सर्वांची वाक्ये वाचता वाचता काही वाक्ये वेचिली!
विनयने, विनय जागृत ठेवून
विनयने, विनय जागृत ठेवून वर्तन केले.
वाचाल तर वाचाल , अस म्हणताना
वाचाल तर वाचाल , अस म्हणताना त्यांची वाचा बंद झाली.
कटाची आमटी बनवायच्या कटात
कटाची आमटी बनवायच्या कटात पुरणाचा मह्त्वाचा हात!
Pages