मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वद जाऊ कुणाला शरण हे पद गायले पण तत्पूर्वी माझ्या गुरूंचे पदस्पर्श करायला विसरले नाहे.

मी तिच्याप्रती माझे कर्तव्य विसरले नव्हते म्हणूनच गरज असलेल्या कागदपत्रांच्या प्रती काढून तिच्या हवाली केल्या.

मायाबाईंनी सावत्र पोरांवर खोटी माया दाखवून त्यांच्या बापाचा विश्वास सम्पादन केला आणि सर्व माया स्वतःच्या नावावर करून घेतली.

शोभा एका शब्दाचे अनेक अर्थ हवेत. तुझ्या वाक्यात सेम अर्थ आहे सर्व शब्दांचा.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

लग्नाची गाठ स्वर्गात बांधलेली असते.
काल अचानक रस्त्यात बरेच दिवसानी गाठ पडली.
सुतळीची गाठ घट्ट बसली आहे.
घरातुन उशीरा निघुन सुद्धा त्याने पळत पळत तिला गाठले

मला घाटातुन जाताना बस लागते पण अत्ता मला उचकी लागली आणि त्याच वेळी मुलगी पडुन तिच्या गुढग्याला मार लागला.

तिने मान मोडून, सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान

अर्थाचा विचार करता करता मी अर्थाचा अर्थच विसरले. >> हे वाक्य >>>>>>>>>>>>>
ह्यात एक अर्थ म्हणजे पैसे आणि एक म्हणजे मीनींग असे आहे ना ?

तुम्ही दोघी जावा ईडोनेशियातिल जावा बेट बघायला जावा. पण जाताना संगणात जावा उपडेट करायला विसरु नका नाहितर कंप्युटर मध्ये वायरस जाईल.

चांगला उपक्रम.
तिने कुकर लावला
त्याने काडी लावली
काय कटकट लावली आहे राव?
कडी लावा आतली!
चिरंजीवां नी चांगले दिवे लावलेत परीक्षेत

द्रौपदी चीर हरण
काकडीवर एक तिरकी चीर देऊन त्यात तिखट मीठ भरा

अहो काका, त्या पिशवीत समुद्रातील हलवा आहे, संक्रांतीतला हलवा नाही , पिशवी जरा हळू हलवा,

द्रौपदी चीर हरण >> याचा अर्थ काय आहे? हे माझ्या डोळ्यासमोर द्रौपदी विळीवर मेथी चिरायला बसल्येय आणि सिंबा तिला ते झालं की हातासरशी हे हरिण पण चिरायला सांगतोय असं द्रुश्य आलं.

चिरकालिन असली तरी रांवाउका थोडंच चुकलय द्रौपदीला! वस्त्रहरणा नंतर रात्रीच्या जेवणाची तयारी करयला बसली आपली हरिण चिरत. त्या हरणाची (पन इंटेंडेड) आर्त चिरकी किंकाळी मात्र आसमंतात विरुन गेली!

Pages