गणेशोत्सव २००८ पूर्वतयारी

Submitted by संयोजक on 21 July, 2008 - 02:12

मायबोलीकरानो
२००८ सालचा गणेशोत्सव जवळ आला आहे. तेव्हा यंदा कोण कोण संयोजन समितीत भाग घ्यायला तयार आहेत ते इथे लिहा अथवा sanyojak या ID ला संपर्क करून कळवा.

तसेच यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सुचनाही इथे लिहा.

काही आयडियाच्या कल्पना देत आहे ..
अ - निबंध स्पर्धा -
काही विषय
१. भारत देशाला विकसित देश बनविण्यासाठी आपण काय करू शकतो?
२. ग्लोबल वार्मिंग - आपण काय काय करू शकतो?

ब - फोटोवरून 'कोणी कोणास काय म्हटले' स्पर्धा - ही स्पर्धा दोन वर्षापूर्वी होती.

क - व्यंगचित्र स्पर्धा -
विषय
१. मराठी अमरठी वाद
२. परदेशात मराठी साहित्य संमेल्लन
३. क्रिकेटचे कमर्शियलायझेशन

ड - स्पिन द यार्न मध्ये यावेळी एक एकता कपूरच्या सिरियलसारखी सास बहूची कहाणीच घेऊ या. नाव असू शकते - "काहीच्या काही कहाणी घराघरातल्या घरघरीची"

इ - एखाद्या विषयावर छायाचित्र स्पर्धाही ठेऊ शकतो.

आत्तापुरते इतकेच...

कुठे असतो मायबोलीचा गणेसोत्सव ?

इथेच इथेच असतो मायबोलीचा गणेशोत्सव.. Online.. वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्या निमित्ताने...
==================
डिंग डाँग डिंग

ऑनलाइन गणेशोत्सव... छान आहे... माझ्या पी.सी. चा उन्दीर आताच उत्तेजीत झाला आहे..........

असे होय...मग मला संगणकाच्या पडद्याला फिट्ट होइल अशी जास्वंदाची माळ आणि दुर्वा आणायला पाहिजेत Uhoh
.
माझ्या पी.सी. चा उन्दीर आताच उत्तेजीत झाला आहे >>>> Lol

संयोजन समिती,
काही मदत लागली तर हक्काने सांगा.

२००१ पासुन साजरा होत असलेला हा एकमेव Online गणेशोत्सव आहे. आधीचे उत्सव या दुव्यावर वाचायला मिळतील.

रोजच्या प्रसादाचे पदार्थ, त्यांच्या कॄतींची स्पर्धा घेता येईल.
परदेशात गणेशोत्सव या विषयावर पण निबंध/वाद विवाद स्पर्धा घेता येइल.
नव्या आरत्यांची स्पर्धा घेता येइल
गणेशोत्सवाचे विसरत चाललेले सामाजिक उद्देश या वर निबंध घेता येतील.

सोसायटीच्या कार्यक्रमासारखे दहा दिवस दहा मायबोलीकरांचे ऑनलाइन कार्यक्रम ठेवता येतील
विडंबन /नकला,
गायन,
कथाकथन,
नाट्य छटा,
ला ला मा वे वाल्या अ वि मंचे 'क्लीनिंग लेडी ला वळण लावणे ' किंवा तत्सम विषयांवर परिसंवाद ,
नक्षत्रांचे देणे सदृश्य कवि/कवितांची ओळ्ख-रसग्रहण इत्यादि.

दर दिवशीएक एक कार्यक्रम प्रसारित करायचा.

अहो संयोजक, तुम्हाला emails मिळ्त नाहीत का????

बाकी काहीही असु दे, पण ते एक STY होनेकोच मंगताय
 
 
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

१) प्रवास वर्णन स्पर्धा घेता येईल.
२) काव्यस्पर्धा घेता येईल.
३) चित्रपट परिक्षण स्पर्धा घेता येईल.
४) पुस्तक परिक्षण स्पर्धा घेता येईल.
५) 'स्मरणातला गणेशोत्सव' ह्यावर लिहिता येईल.
६) आपल्या शहरात, सोसायटीत, नगरात, घरात, चाळीत, वाड्यात बसलेल्या गणपतीवर, त्याच्या सजावटीवर लिहिता येईल.
७) 'मी पाहीलेले गणपतीचे मंदीर' ह्यावर लिहिता येईल.

परत परत त्याच त्या स्पर्धा शक्यतोवर घेऊ नये असे मला वाटते.

काहि मदत हवि असल्यास सान्गा

...गणपती व गौरीची प्रतिष्टापना व विसर्जन शास्त्रोक्त पणे कसे करावे ? याची
माहिती द्यावी.

काही मदत हवी असल्यास जरूर सांगा. मला मदत करायला खूप आवडेल. Happy

जरा माहिति हवि होति.....गणपति प्रतिस्टापने विशयि कोणि देउ शकेल का?
पहिल्यान्दाच बसविते आहे मि ..

मला देखील संयोजन समिती आणि स्पर्धा दोन्हीतही भाग घ्यायला आवडेलं...
कृपया या नवीन माबोकरला मार्गदर्शन करावे..

पा़ककला स्पर्धे मध्ये फोटो हवाच. ते बघूनच मजा येते. ती नुसती dry recipe बोर आहे. जी कुठली कृती जो कोणी टाकेल तो फोटो पण टाकेल. म्हणजेच मजा येइल की tried n tested recipe कशी दिसते ते.

मला आवडेल संयोजक समितित सहभागि व्हायला. त्या व्यतिरिक्तहि काहि मदत हवि असल्यास अवश्य सांगा.

आतापर्यंत खालील मायबोलीकरांनी संयोजक मंडळात काम करायची तयारी दाखवली आहे. आपले संयोजक मंडळात स्वागत आहे.

मुख्य संयोजक - runi
संयोजक मंडळ - adm, prachi.unhale, dafodils23, dgirish, marhatmoli

अजुन कोण कोण यंदा काम करायला तयार आहे ते ईथे कळवा.

मी तयार आहे काम करायला. मला मिळेल का संधी?
-अनिता

अनिता
हो, तुमचं नाव संयोजक मंडळात टाकलं आहे.

गणपतीला गार्‍हाणे घालण्याची स्पर्धा घेणे कसे काय वाटते? म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे आपापल्या परीने कसे गार्‍हाणे घालतील अश्या प्रकारे ! त्यात मायबोली करांचे गार्‍हाणे सुध्दा चालु शकतील.
आणि एक २०१२ साली पृथ्वीचा अंत असल्याबद्दल चर्चा चालु आहे त्या विषयावर कथाही लिहू शकता येतील. आपापल्या परीने आणि आपापल्या पध्दतीने. उदा. विनोदी, गंभीर, प्रेमकथा, चिंतनपर कथा, आणि अर्थात भयगुढ कथा सुध्दा Lol !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

आयला, इथे पण आलाच का २०१२.. Lol

सगळे मा.बो.कर खुप एक्साइट आहेत २०१२ बद्दल ....
थँक्स टु भुमिकाज्जी Biggrin
****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...

संधीचा फायदा सर्वांना ! Lol मी का सोडेन ? Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

२०१२ बाबत आणखी काही लिन्क आहेत का?

-==================--------------------------

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!

मला आवदेल समितित भाग घ्यायला, कामाचे स्वरुप कलेल का?