स्पेस एक्स आणि मंगळ

Submitted by टवणे सर on 6 February, 2018 - 23:46

स्पेस एक्स या इऑन मस्कच्या कंपनीने आज फाल्कन हेवी हे अवाढव्य यान आज अंतराळात फेकले. त्याची दोन साइड बूस्टर रॉकेट सिन्क्रोनाइज्ड डाइवर्ससारखी भूतलावर अप-राइट लँड झाली. मस्कची स्वतःची टेस्ला रोडस्टर या यानाच्या पेलोडमध्ये होती जिचे अंतराळात पृथ्वीच्याभोवती भ्रमण करतानाचे विड्डिओ केवळ अवर्णनीय.

स्पेस एक्स व मस्कच्या संपूर्ण चमूचे प्रचंड अभिनंदन.

इथे विडिओ बघू शकाल
https://youtu.be/sB_nEtZxPog

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त आहे हा व्हिडीओ! ते शेवटचे प्रीसीजन लॅण्डिंग तर महान!

एका ठिकाणी तो बोलणारा म्हणतो: "....it is going to slow down for reentry from way above the speed of sound to just over the speed of sound"!!!

हे पाहुन खुप बर वाटल कि स्पेस एक्स ला आजुन कोणी तरी फोलो करतय ते..
कालच प्रक्षेपण खुपच मस्त होत..
माझा हा जुना धागा..या विषयावर..

https://www.maayboli.com/node/61454

ते लँडिंग बघून मला असे वाटले की लाँच चाच व्हिडिओ रिवाइंड करून पहात आहोत Happy अनबिलिव्हेबल. असे फर्स्ट स्टेज रॉकेट (रिलायबली) रीयूज करता आले तर माइलस्टोन अचिवमेन्ट ठरेल ही.

कालचं प्रक्षेपण अशक्य भारी होतं. साईड बूस्टरचं रियुज साठी केनेडी स्पेस सेंटरला लँडिंग कसं होणार याचा अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ स्पेसएक्सने आधी रिलीज केलेला, तो आणि रिअल लँडिंग... प्रिसिजन!! .
ते रॉकेट नीट न उडतं तर लॉन्च पॅडचं नुकसान होउन ९ ते १२ महिने पुढच्या मिशनला डीले होईल अशा न्यूज वाचत होतो. मस्कने परवाच्या मुलाखतीत एकदम टोन डाऊन अ‍ॅप्रोच ठेवलेला.
अभिनंदन Happy
मिडल बूस्टर अटलांटिक मध्ये ड्रोन ओशन लँडिंग पॅडवर दुर्दैवाने लँड झालं नाही. पण तीन पैकी २ ही सिग्निफिकंट अचीव्ह्मेंट आहे.

स्पेक्टॅकुलर इवेंट. दोन्हि बूस्टर रॉकेट्सचा टच्डाउन अगदि हॉलिवुड सिनेमातल्या सारखा. फक्त कोर रॉकेट्स्च्या बाबतीत झालेली दुर्घटना हे एक गालबोट. अर्थात हे डेमो लाँच असल्याने त्याची तीव्रता कमी...

पुढच्न्या स्पेसेक्स लाँच मधुन जॉर्ज्या टेकचा सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये जाणार अशी बातमी आहे... Happy