पेपर क्विलिंग रोझ
लेखमालिकेच्या भागास थोडा उशीर झाला. वेळात वेळ काढून जमेल तसे भाग टाकते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे..
पेपर क्विलिंग रोज बनवताना तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात नीटसे जमणार नाही पण 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर नक्कीच छानसं गुलाब बनवता येईल..
1. 10mm क्विलिंग स्ट्रिप घ्या आणि त्याचे टोक स्लोट्टेड निडल मध्ये इन्सर्ट करा.. पेपर 2-3 राऊंड रोल करा.
2. आता कागद 90 ° खालच्या दिशेने वळवा जेणेकरुन तो निडल ला समांतर असेल.
3. रोल करणे सुरू ठेवा मात्र हे करताना काळजी घ्या की कागदाचा बेस खालून घट्ट पाने गुंडाळला जाईल व वरील भाग खुला राहील.
4. 2-3 रोल करून झाल्यावर (स्टेप 2 मध्ये) पेपर पुन्हा टूलला लंब असावा. कागद पुन्हा 90 ° गुंडाळा.
5. हे सर्व करताना काळजी घ्या की पेपर चा बेस घट्टपणे गुंडाळला जाईल व वरील भाग लूज राहील.
6. कागद संपेपर्यंत फोल्ड आणि रोल या स्टेप रिपीट करत राहा.
7. तयार झालेला गुलाब टूल वरून काढा न गरज वाटल्यास फोल्ड रिअडजस्ट करा. शेवटचे लूज टोक गुलाबाच्या तळाशी चिकटवा.
(पुढील भागात कशावर tutorial बघायला आवडेल नक्की सजेस्ट करा)
( मी हे सर्व क्विलिंग बनवताना स्टेप बाय स्टेप फोटो काढणे राहूनच जाते तर कधी काढणे शक्य होत नाही त्यामुळे फोटो गूगल वरून घेतले आहेत)
पेपर क्विलिंग- 4 (गुलाब)
Submitted by jui.k on 2 February, 2018 - 00:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारी आहे. वेळखाऊ (पण सुंदर )
भारी आहे. वेळखाऊ (पण सुंदर ) कला असावी वाटते.
सुंदर ....
सुंदर ....
धन्यवाद mr.pandit आणि plooma
धन्यवाद mr.pandit आणि plooma![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा, सुंदर!
वा, सुंदर!
सुंदर.
सुंदर.
सुंदर
सुंदर
किती गोड !!! मधलं तर कुडी
किती गोड !!! मधलं तर कुडी सारखं कानात घालावसं वाटतयं .
धन्यवाद जागू-प्राजक्ता-...,
धन्यवाद जागू-प्राजक्ता-..., मनस्विता, गार्गी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोड !!! मधलं तर कुडी
किती गोड !!! मधलं तर कुडी सारखं कानात घालावसं वाटतयं .
Submitted by भुईकमळ on 3 February, 2018 - 12:59>>>>>>>> थँक्स भुईकमळ
याचे कानातले बनवू शकतो आपण..
(No subject)
आहा !!!अगदी सुंदर कर्णफुले .
आहा !!!अगदी सुंदर कर्णफुले ...तुझे हात जादूगार आहेत.
आहा !!!अगदी सुंदर कर्णफुले ..
आहा !!!अगदी सुंदर कर्णफुले ...तुझे हात जादूगार आहेत.
नवीन Submitted by भुईकमळ on 3 February, 2018 - 17:01>>>>>> अहो ते कानातले मी नाही बनवले आंतरजालावरून घेतला आहे फोटो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी बनवलेल्या वस्तूंचे दुसरे
मी बनवलेल्या वस्तूंचे दुसरे धागे आहेत.. इथे स्टेप बाय स्टेप फोटो द्यायला मी मी बनवताना काढायला विसरते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फारच छान गं जुई
फारच छान गं जुई
थॅंक्यु टीना
थॅंक्यु टीना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहेत गुलाब.
छान आहेत गुलाब.
कानातले खूप आवडले.