सचिनने श्रीलंकेविरुद्ध मारलेल्या शतकापेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या शतकाचे आपल्याला किंचित जास्त कौतुक असते. आणि झिम्बाब्वे वा बांग्लादेशसोबत मारलेले शतक तर गिणतीतही नसते. कारण प्रतिस्पर्धी जितका तुल्यबळ, तितकी त्याला मात देण्यातली मजा भारी असते.
बस्स याच धर्तीवर म्हणायचे झाल्यास पिक्चरमध्ये हिरोची हिरोगिरी तेव्हाच उठून दिसते जेव्हा व्हिल्लन ताकदवर असतो. तो म्हणजे अस्सा पॉवरबाज माणूस असेल तरच त्याला धोपटून हिरो हा सुपरहिरो बनतो. नाहीतरी गल्लीतल्या शेमड्या पोरांना तर आपणही मारतो. त्यात हिरोगिरी ती काय
पण वर दिलेल्या क्रिकेटच्या उदाहरणात ती एक मॅच असते. त्यात ऑस्ट्रेलिया काही सचिनकडून धुलाई करून घेण्यासाठी म्हणून खेळत नसते. त्यांचा मॅकग्राथही एखाद्या सामन्यात आपल्या सचिनचा दांडका काढतोच.
पण पिक्चर मात्र सेट असतात. त्यात व्हिल्लन कितीही ताकदवर असला तरी चित्रपटातून कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून अखेरीस "हमेशा बुराई पे अच्छाई की जीत होती हैय" म्हणत हिरोच व्हिलनला धोपटतो.
पण तरीही... एक संधी असते त्या व्हिलनला जिच्यात तो हिरोला मात देऊ शकतो. आणि ती म्हणजे अदाकारी ! जिच्या जीवावर व्हिलन आपले कॅरेक्टर हिरोच्याही वर उचलून धरतो. आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना लोकांच्या तोंडावर हिरोऐवजी व्हिलनचेच नाव असते.
पद्मावतीच्या निमित्ताने हल्ली हिच चर्चा कानावर पडतेय. कोण तो रणवीर सिंग त्याने शाहीद कपूरला खाल्लाय. म्हणजे झाकोळून टाकलेय. हे चित्रपटाच्या ट्रेलरलाच जाणवलेले. कदाचित त्याने खिलजीचे कॅरेक्टर हिरोपेक्षा भारी केले म्हणूनच काही लोकांच्या भावना जास्त दुखावल्या असतील. पण समजा कास्टींग उलट झाली असती तर... तरीही हे असे झाले असते का? म्हणजे शाहीदने खिलजी साकारला असता तर त्याने रणवीरसिंग सारखी धमाल उडवली असती का?
तर याचे उत्तर "नाही" असे आहे. याचाच अर्थ ही रणवीरची स्वत:ची कमाल आहे जे त्याने व्हिलनच्या भुमिकेतही धमाल उडवली. बस्स अश्याच "फटा पोस्टर निकला हिरो" टाईप्स बॉलीवूडी चित्रपटांमध्येही आपल्या अदाकारीने पडदा फाडून धुमाकूळ घालणार्या व्हिल्लन लोकांच्या प्रतिभेला सलाम करायला हा धागा.
माझ्यापुरते सांगायचे झाल्यास हिरोला खाऊन टाकणारा हिरो म्हणून डर चित्रपटातील शाहरूख खान हा माझा बेंच मार्क आहे. कारण त्याची भुमिका दिग्दर्शकाने मोठी केली नव्हती. उलट हिरो म्हणून त्यावेळचा सर्वात भारी अॅक्शन हिरो सनी देओल होता. त्यात त्याला नेव्हीचा शूरवीर ऑफिसरही दाखवला होता. त्याची एंट्रीही एका अॅक्शन सीननेच होती. याऊलट व्हिलन म्हणून तुलनेत नवखा शाहरूख घेतला होता. त्याचे व्यक्तीमत्वही अगदीच लेचेपेचे अन दुबळे दाखवले होते. तरीही त्याने जो इम्पॅक्ट साधला आणि लोकांच्या मनावर आपल्या त्या कॅरेक्टरचा ठसा उमटवला त्याला तोड नाही. अगदी आजही डर कोणाचा म्हटले तर शाहरूख खानचा हेच डोक्यात येते.
त्यामानाने माधुरीला स्त्रीप्रधान अंजाममध्ये खाणे त्याच्यासाठी सोपा ब्रेकफास्ट होता. जो बाझीगर चित्रपटात ईतकी दुष्कर्मे करूनही अखेरीस हिरो असल्याच्या थाटात मरतो आणि लोकांची सहानुभुतीही मिळवतो तो काहीही करू शकतो. लोकांच्या मनात किळस उत्पन्न न करता, कोणतेही वाह्यात चाळे न करता, ताकदीच्या नकारात्मक भुमिका साकारणे आणि हिरोला खाऊन टाकणे हे शाहरूखच करू जाणे
काही भुमिका अश्या असतात की ज्यात व्हिलन भारी वाटावा अशी दिग्दर्शकाचीच इच्छा असते. लेटेस्ट उदाहरण म्हणजे फास्टर फेणे. त्यात कोवळ्या अमेय वाघ पेक्षा गिरीश कुलकर्णी ड्यांजर वाटावा अशी पटकथेचीच मागणी होती. जसे या पद्मावतीमध्ये खिल्जी क्रूर वाटणे गरजेचे होते. पण अर्थात याने गिरीश कुलकर्णी किंवा रणवीर यांचे महत्व कमी होत नाही. उलट रणवीर देखील शाहरूखच्या पावलावर पाऊल टाकत हिरो असूनही त्या ईमेजमध्ये न अडकता नकारात्मक भुमिका करत आहे याचे कौतुकच आहे.
हे लिहिता लिहिता एक सहजच आठवले, तो आशुतोष राणा म्हणून एक नकारात्मक भुमिका साकारणारा कलाकार होता बघा. त्याने आपल्या सुरुवातीच्या दुश्मन, संघर्ष वगैरे चित्रपटात असेच व्हिलनचे कॅरेक्टर उचलून हिरोच्या वरचढ करायचे कार्य पार पाडलेले. पण नंतर तो कुठे गायब झाला ते समजलेच नाही. बॉलीवूडच्या हिरो मंडळींनी एकत्र येत त्याचा गेम तर नाही ना केला
असो, सध्याचे तापलेले वातावरण पाहता पद्मावत बघायचा योग येईल तेव्हा येईल. त्यावेळी नकारात्मक रणवीर कसा वाटला हे ईथेच जरूर लिहेन. पण तुमच्या आठवणीत असे हिरोला अदाकारीत भारी पडणारे आणि त्या चित्रपटाच्या आठवणींत व्यापून ऊरणारे व्हिलन असतील तर त्यांच्याबद्दल ईथे नक्की लिहा ... त्याने मोगॅंबो खुश होईल आणि गब्बर तुम्हाला शाबासी देईल
गब्बर
गब्बर
ते सगळं रोल वर अवलंबुन असते
ते सगळं रोल वर अवलंबुन असतं रे, पद्मावत मध्ये खिलजीचं कॅरेक्टर मेल प्रोटॅगनिस्टचं आहे, निगेटिव असलं तरी. त्यात रण्वीर सिंगचा काहि भला मोठा हात वगैरे नाहि. मला विचारशील तर त्या रोलमध्ये संजय दत्त जास्त उठुन दिसला असता...
आणि आता विषय काढलाच आहेस तर; पहेली मध्ये बच्चन साहेबांचा २-३ मिनिटांचाच रोल आहे पण त्या सीन मध्येहि त्यांनी तुझ्या शारुखला अक्षरशः बाटलीत बंद केलेला आहे...
मला विचारशील तर त्या रोलमध्ये
मला विचारशील तर त्या रोलमध्ये संजय दत्त जास्त उठुन दिसला असता...>> अगदी...यावरून आठवलं, कांचा चीना (का चीमा? ).
जयकांत शिक्रे, मोगँबो,
जयकांत शिक्रे, मोगँबो, गब्बरसारखाच चायना गेट मधला जगीरा. तसाच तो हाश्मीपटातल्या मर्डर-२ मधला पण व्हिलन खत्रूड झाला होता.
किंग जॉफ्री.
किंग जॉफ्री.
रॅमसे बोल्टन.
सर्सी.
ही तुलना गंडलेली आहे रे.
ही तुलना गंडलेली आहे रे. पद्मावत पाहिलेला नाही पण डर वगैरे पिक्चर्स मधे तो काही रूढ अर्थाने व्हिलन नाही. गब्बर, मोगॅम्बो, अमरीश पुरीचे काही रोल याप्रमाणे १००% व्हिलन रोल असूनही छाप पाडणारे रोल्स आणि शाखाचे सुरूवातीचे काही रोल्स यात खूप फरक आहे.
डर ई. मधे त्याला सहानुभूती मिळेल याची स्क्रिप्ट मधे भरपूर तजवीज आहे. उलट गब्बर, मोगॅम्बो वगैरे पाहिलेत तर त्याच्याबद्दल जराही सहानुभूती वाटेल असे काहीही त्यात नाही. तरीही तेथे अमजद ने व अमरीश पुरीने स्वतःची छाप पाडून पडदा व्यापून टाकला होता. कुर्बानी मधे अमजद व्हिलन नाही, पण फिरोज खान च्या मागे सतत लागलेला असतो त्याला पकडायला. त्याचा मिश्किल wise cracker इन्स्पेक्टर फिरोज खान व विनोद खन्नाच्या रोलपेक्षा जास्त लक्षात राहतो.
ही तुलना गंडलेली आहे रे.>>> ऋ
ही तुलना गंडलेली आहे रे.>>> ऋ, मित्रा, इथे व्हिलनची व्याख्या काय ते पहावं लागेल. (मला माहीत नाही, तज्ञांनी प्रकाश टाकावा). माझ्या मते बाजीगर मधला शाखा, दीवार मधले अब असले हालात के मारे गुन्हेगार लोक्स व्हिलन ठरत नसावेत. फारतर नकारात्मक भूमिकेतले हिरो म्हणू शकतो आपण त्यांना.
फारेण्ड, वेलकम
फारेण्ड, वेलकम
डरचा उल्लेख झाला आणि तू नाही आलास असे होणार नव्हतेच
पण तो सहानुभुतीचा मुद्दा काही पटला नाही. म्हणजे ईरिलवंट की काय म्हणतात ते वाटले. किंबहुना सहानुभुती नसणे म्हणजे अगदी क्रूर रंगवणे हे त्या कॅरेक्तरच्या पथ्यावरच पडते नाही का.. हिरोला खाऊन टाकणे म्हणजे त्या कॅरेक्टरचा प्रभाव पडणे, मग तो नकारात्मक का असेना, याने पिक्चर खाल्ला असे वाटणे.
अजब, बाजीगरचा शाहरूख आणि
अजब, बाजीगरचा शाहरूख आणि दिवारचा बच्चन ओके. ते व्हिलन नव्हते, कोणाचा तरी बदला घेत होते असे एकवेळ म्हणू शकतो.
पण डरचा शाहरूख व्हिलन नव्हता हे पटत नाही. म्हणजे उद्या तुमच्या आमच्यासारखा कोणीही प्रेम मिळवायला प्रेयसीच्या नवर्याचा खून करेल यात फार काही व्हिल्लनगिरी नाही बस्स थोडेसे नकारात्मक आहे ईतकेच. असे म्हणायचे आहे का? आणि नकारात्मक म्हणजे नि काय? व्हिलनचे सौम्य वर्जन आहे का? मलाही प्रकाश टाकणार्या तज्ञांकडून जाणून घ्यायला आवडेल
संजय दत्त... खिलजी..., मलाही
संजय दत्त... खिलजी..., मलाही तो कांचा चीना आठवला.. अत्याचार होता नुसता ईरीटेटींग व्हिलन
मलाही बघायचाय पद्मावत. सध्या
मलाही बघायचाय पद्मावत. सध्या तापलेलं वातावरण पाहता योग येईल वाटत नाही.
बाकी रणवीर सिंगची भूमिका तुफान झालेली वाटतेय. बरीच मेहनत घेतलेली दिसतेय त्याने.
बाकी व्हिलनही तगडा आणि खुंखार
बाकी व्हिलनही तगडा आणि खुंखार दाखवायला हवा ना,!! त्यची भूमिका आणि एकंदर रंगवलेलं पात्र पाहता रणवीरच सूट होतोय. शाहिदमुळे तर खिलजीची पावभाजी झाली असती. बाकी मी बघणार आहे ती रणवीर साठीच.
<<<अजब, बाजीगरचा शाहरूख आणि
<<<अजब, बाजीगरचा शाहरूख आणि दिवारचा बच्चन ओके. ते व्हिलन नव्हते, कोणाचा तरी बदला घेत होते असे एकवेळ म्हणू शकतो.
पण डरचा शाहरूख व्हिलन नव्हता हे पटत नाही.>>> अरे डरच्या शाखाबद्दल काहीच नाही म्हणालो मी, तो रोल आणि अंजामचा पण मला तरी व्हिलनचाच वाटतो...
<<<आणि नकारात्मक म्हणजे नि काय? व्हिलनचे सौम्य वर्जन आहे का?>>> तसंच काहीसं, हे म्हणजे लेखक-दिग्दर्शकाच्या नजरेतून दाखवलेला एक असा सामान्य अथवा महान माणूस, ज्याला असल्या काड्या करण्यावाचून परिस्थितीने व समाजाने काही पर्यायच ठेवलेला नाही. तो त्याची सर्व पापकर्मे (जसा बहुतांश नोकरदार माणूस ऑफिसमधे कामे करतो तसा) आवडीने न करता मजबूरी ने करतो. बाकी प्रकाश टाकायला तज्ञ येतीलच अशी अपेक्षा
आपल्याकडे बर्याचदा साचेबद्ध
आपल्याकडे बर्याचदा साचेबद्ध चित्रपट बनतात त्यामूळे हे हिरो कोण आणि व्हिलन कोण असे प्रश्न पडतात. खरा प्रश्न असतो तो कथेचा नायक (Protagonist) कोण?
Protagonist, doesn't mean the "good guy"; it means the "first actor", the character whose fate, whether success or defeat, is the central interest of the story. It's a structural role, not an ethical one.
त्यामुळे डर किंवा बाजीगरमधे नकारात्मक पात्रे साकारणारा शाहरूख हाच Protagonist आहे. कारण कथा त्याच्याभोवती आणि त्याच्या कारवायांभोवती फिरते. त्यामुळे ते चित्रपट बाद.
नवीन Submitted by थॉर माणूस>>
नवीन Submitted by थॉर माणूस>> प्रकाश टाकल्याबद्दल धन्स, थॉर माणूस.
त्यामुळे डर किंवा बाजीगरमधे
त्यामुळे डर किंवा बाजीगरमधे नकारात्मक पात्रे साकारणारा शाहरूख हाच Protagonist आहे. कारण कथा त्याच्याभोवती आणि त्याच्या कारवायांभोवती फिरते. त्यामुळे ते चित्रपट बाद. Happy
>>>>
बाजीगरबाबत मान्य
डरबाबत अमान्य
अमान्य यासाठी कारण तसा दिग्दर्शकाचा खुला हेतू नव्हता. सनी आणि जुहीच्या प्रेमकहाणीत आलेले एक झेंगाट यामध्ये अॅक्शन हिरो सनी आणि स्वप्नसुंदरी जुहीची प्रेमकहाणीच सेंटरला होती. पण अंतिमत: जे झाले ते चित्रपट बनवताना त्याच्या लक्षातही आले नसावे, कदाचित निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात जाणवले असावे की शाहरूखने ईस फिल्म मे अपना कद सनी से उंचा किया है.. याला म्हणतात अदाकारी, आणि जेव्हा दिग्दर्शकाचा मूळ हेतू व्हिलन भावखाऊ बनवणे असा नसतो तेव्हा त्याचे श्रेय त्या कलाकाराला जायलाच हवे.
बाकी तो Protagonist चा मुद्दा पटला.
१: चित्रपटाचे नावः Darr: A
१: चित्रपटाचे नावः Darr: A Violent Love Story (नावातच हिंसा आणि भिती आहे, Protagonist च्या कारवायांमूळे कथेत निर्माण होणारी अवस्था)
२: चित्रपटाची कथा: चित्रपटाची कथा शाहरूखचे जुहीबद्दलचे obsession आणि त्यामुळे तो जे काही करतोय ते फॉलो करते, याऊलट जूही-सनी प्रेमकथा बॅकड्रॉपला आहे. जुही आणि सनीची प्रेमकथा अशी फुलत नाही. सनी तीचा प्रियकर आहे हे एस्टाब्लीश्ड आहे, त्यांचे लग्न होणार हे देखील ठरलेलं आहे, कथा ते फॉलो करण्यात वेळ घालवत नाही. कथा शाहरूख काय करतोय त्याला अधीक फूटेज देते.
३. सुरूवात आणि शेवटः चित्रपटाची सुरूवात आणि शेवट कथा काय फॉलो करत आहे हे दर्शवू शकते. चित्रपटाचा शेवट शाहरूखचे पात्र संपल्यावर होतो तर चित्रपटाची सुरूवात शाहरूख हा जूहीच्या मागावर आहे हे एस्टाब्लिश करते.
डरमधे शाहरूख व्हिलन आहे का? तर हो तो व्हिलन आहे. पण तोच Protagonist पण आहे. आपण शाहरूखच्या पात्राला फॉलो करतो. त्याच्या कारवाया पहातो आणि त्याच्या मृत्यूनंतर कथा बीज संपते.
खरंतर डरने आपल्या चित्रपटांच्या टिपीकल हीरो वि. व्हिलन च्या साचेबद्ध व्याख्या जरा बॉर्डरलाईनवर आणल्या होत्या. उत्तम प्रयत्न होता तो आणि जमलादेखील चांगला होता.
बॅटमॅन - जोकर - हिथ लेजर
बॅटमॅन - जोकर - हिथ लेजर
रावण - राम - विक्रम
नोटोरिअस - अलेक्झांडर सबास्तीअन - क्लाउडे रेन्स
ही तुलना गंडलेली आहे रे>>
ही तुलना गंडलेली आहे रे>> Protagonist, व्हिलन हे. सगळं ठिक आहे. पण अँटी हिरो नावाचा एक प्रकार असतो. शाखा ने करिअर च्या सुरुवातीला जे काही केले आहे ते याच प्रकारात येते.
An antihero, or antiheroine, is a protagonist in a story who lacks conventional heroic qualities and attributes such as idealism, courage, and morality.[1][2][3][4][5] Although antiheroes may sometimes do the right thing, it is not always for the right reasons, often acting primarily out of self-interest or in ways that defy conventional ethical codes.
संदर्भ:Wikipedia
बॅटमॅन मधला जोकरचे रोल करणार
बॅटमॅन मधला जोकरचे रोल करणार हिथ लेजर, शोले मधला अमजद खान नि जंगल मधला राजपाल यादव/ सुशांत सिंग कॉम्बो हेच रुढार्थाने व्हिलन जे सिनेमा संपल्यावर पण लक्षात राहतात.
An antihero, or antiheroine,
An antihero, or antiheroine, is a protagonist in a story who lacks conventional heroic qualities and attributes such as idealism, courage, and morality.[1][2][3][4][5] Although antiheroes may sometimes do the right thing, it is not always for the right reasons, often acting primarily out of self-interest or in ways that defy conventional ethical codes. >> कोरेक्ट.
मला वाटतं स्कार्लेट ओ हारा ही आद्य अँटीहिरॉइन आहे; तसेच माझे नाव जिच्यावरून घेतले आहे ती Amy Dunne हि व्हिलन हिरोईन आहे :-P. रिक्षा https://www.maayboli.com/node/61384
धाग्याचे नाव बदलून "शाखा के
धाग्याचे नाव बदलून "शाखा के निगेटिव्ह रोल्स" असे कराल का?
कारण नावात जरी पद्मावतच्या निमित्ताने असले तरी धागा फक्त आणि फक्त शाखा भोवती फिरणार आहे. तुम्ही कितीही दुसरे हिरो आणा धागामालक तुम्हाला ओढुन परत तिथेच आणणार.
>>>Submitted by बुन्नु on 26
>>>Submitted by बुन्नु on 26 January, 2018 - 12:56
सहमत. Protagonist चे साधारण ३ प्रकार होतात
१. हिरो : हा आपला नेहमीचा गुणसंपन्न, नेकदिल वगैरे प्रकारातला नायक
२. अँटी-हिरो: अवगुणी असण्याची शक्यता. हिरोसारखा गुडी गुडी प्रकारातला नसलेला. बर्याचदा चुकीच्या मार्गाने योग्य ठिकाणी पोहोचणारा (उदा. डेक्स्टर मालिकेतला डेक्स्टर हा सायकोपॅथीक सिरीअल किलर आहे, पण त्याने स्वतःला अशा पद्धतीने घडवलंय की तो फक्त गुन्हेगार वृत्तीच्या लोकांचे खून करतो.)
३. व्हिलनसः स्वतःचे इरादे पूर्णत्वास नेण्यासाठी चांगले/वाईट असा विचार न करता हवे ते मार्ग निवडणारा. इतरांवर होऊ घातलेल्या परीणामांची पर्वा न करणारा. (उदा. वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, काही अंशी गॉडफादर२ आणि युज्वल सस्पेक्ट्स)
अँटी-हिरो आणि व्हिलनस Protagonist यांच्यात अत्यंत धुसर सीमारेषा आहे. त्यामुळे बर्याचदा त्यांच्यात थेट वर्गीकरण करणे अवघड जाते.
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, काही
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट आणि युज्वल सस्पेक्ट्स हे चित्रपट पाहिले नाहीत (गॉडफादर 2 पाहिलाय तो व्हिलन हिरोच आहे) पण
अँटी-हिरो आणि व्हिलनस Protagonist यांच्यात अत्यंत धुसर सीमारेषा आहे. त्यामुळे बर्याचदा त्यांच्यात थेट वर्गीकरण करणे अवघड जाते. >> माझे निरिक्षण असे आहे कि अँटी-हिरो(इन) त्यांच्याशी चांगलं वागणारया लोकांना (शक्यतो) त्रास देत नाहीत. व्हिलन-हिरो(इन) मात्र असा काही भेदभाव करत नाहीत.
वाईट ते चांगले (किंवा खल ते नायक )अशा काळी ते पांढरी स्केलवर मधल्या ज्या अनेक करड्या शेड्स येतात त्यात
खलनायक > व्हिलन नायक > अँटी नायक > नायक असे रँकिंग असते.
===
द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू मधली लिसबेथ पण अशीच अँटी नायिका आहे.
नाना चा वजूद बघितला आहे का?
नाना चा वजूद बघितला आहे का?
परिंदा पण बघा.
चांगला धागा आहे ऋ.
चांगला धागा आहे ऋ.
काहीतरी प्रतिसाद दिला असता मी. पण वर प्रतिसादात रणवीरच्या जागी खिलजी म्हणुन संजय दत्त फिट झाला असता हे वाचुन आवसानच गेलं.
आता काही प्रतिसाद देणार नाही मी.
ते सगळं रोल वर अवलंबुन असतं
ते सगळं रोल वर अवलंबुन असतं रे, पद्मावत मध्ये खिलजीचं कॅरेक्टर मेल प्रोटॅगनिस्टचं आहे, निगेटिव असलं तरी. त्यात रण्वीर सिंगचा काहि भला मोठा हात वगैरे नाहि
>>> हो का? मग सुबोध भावे किंवा सचिन पिळगाव चालले असते की या रोल ला.
च्रप्स
च्रप्स
मॅक्स,
नानाचा परिण्दा दरिंदा येस्स.. !
संगम मधल्या राज कपूरलाही हीरो
संगम मधल्या राज कपूरलाही हीरो म्हणायचं की व्हिलन? अँटीहीरो शब्द तेव्हा प्रचलित नव्हता.
अमिताभचा एक जुना पिक्चर फरेब
अमिताभचा एक जुना पिक्चर फरेब बहुतेक, तो तसा नवीनच असेल पण व्हिलन होता त्यात. मी लहान असताना टीव्हीवर बघितला. जबरदस्त, हिरो नवीन निश्चल असावा, नायिका योगिता बाली बहुतेक. फार आठवत नाहीये पण अमिताभ आठवतोय म्हणून इतर संदर्भ बहुतेक असं लिहिलंय. फक्त अमिताभ.
फरेब नाही परवाना. च्रप्सनी आठवण करून दिली योग्य नावाची
Pages