१ मोठी कैरी
१ मध्यम कांदा
गूळ किसून १ ते दीड वाटी - कैरीच्या आंबटपणावर अवलंबून
तिखट
मीठ
कढिपत्ता
नेहमीचे फोडणीचे साहित्य.
ही चटणी तशी साधीच आहे. (त्या ह्या म्हणतील उद्या वरण भाताची पण रेसिपी टाकाल तुम्ही. ) पण माझी फेवरेट आणि आमच्या (आंब्याचा शिरा फेम) आईची अशीच एक पॉप्युलर रेसिपी आहे ही. हल्ली हल्ली मला बरोब्बर तिच्यासारखी टेस्ट जमायला लागली आहे
एखादे दिवशी बोरिंग बेचव भाजी असली तरी या चटपटीत चटणीमुळे एकदम तोंडाला चव येते.
तर कैरी सालं काढून किसून घ्यायची. कांदा पण किसून घ्यायचा. मी कधी कधी चॉपर मधे करते दोन्ही. पण किसलेल्याचं टेक्स्चर जास्त आवडतं मला. कैरीच्या किसाचे चे प्रमाण कांद्याच्या साधारण दीडपट असलं पाहिजे.
जिरे, मोहरी हिंग, हळद कढिपत्ता घालून फोडणी करा. त्यात कैरी आणि कांद्याचा कीस एकत्रच घाला. कांद्याच्या किसाचा जरा कच्चट वास जाईपर्यन्त हे मिश्रण मंद आचेवर परतत रहा. तेल सुटायला लागेल. मग किसलेला गूळ, तिखट मीठ घाला. गूळ विरघळेपर्यन्त थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. चटणी तयार!
या चटणीला मस्त लाल चकचकीत रंग येतो. चवीला फार तिखट नसते. आंबट गोड चव असते. पोळी, मेथी पराठे, साध्या ब्रेड च्या स्लाइस ला लावून किंवा साध्या मुगाच्या खिचडीसोबत साइड डिश म्हणून पण भारी लागते. दोनेक दिवस फ्रीजबाहेर पण व्यवस्थित राहते. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त टिकत नाही पण टिकलीच तर दुसर्या दिवसानंतर फ्रीज मधे ठेवते मी.
मस्त ! कैरी आणली की करणार
मस्त ! कैरी आणली की करणार लगेच
कैर्या आल्या की पाहील करून.
कैर्या आल्या की पाहील करून. रेस्पी मस्त वाटतेय.
वा, मस्त.
वा, मस्त.
वा वा, तोंपासु!
वा वा, तोंपासु!
मस्तच आहे रेसिपी . आणि चटणी
मस्तच आहे रेसिपी . आणि चटणी असली वाटा घाटा नाहीये . कधी कधी मिक्सर मध्ये वाटायचा सुदधा कंटाळा येतो .
मस्त!
मस्त!
अरे वा, मस्तच!
अरे वा, मस्तच!
आम्ही अशीच करतो पण कच्ची; ती अर्थातच टिकत नाही फार. आणि त्याला टक्कू/चटका वगैरे गोंडस/चटकदार नाव आहे.
छान आहे रेसीपी. करणारच! आता
छान आहे रेसीपी. करणारच! आता चांगल्या आंबट कैर्या यायला सुरुवात होईल.
मस्त दिसतेय चटणी. तिखट घातलं
मस्त दिसतेय चटणी. तिखट घातलं तर तिखट होइल ना.
हो मीही जरा जास्त घालते तिखट,
हो मीही जरा जास्त घालते तिखट, पण चव तिखट पेक्षा आंबटगोड कडे झुकणारी असते. तरी तुम्ही गूळ कमी तिखट जास्त वगैरे प्रयोग करून पाहू शकता.
सही वाटत्येय.
सही वाटत्येय.
>>तिखट घातलं तर तिखट होइल ना.>>
मस्त कैरी मिळाली की करुन
मस्त कैरी मिळाली की करुन बघणार.
छान आहे रेसीपी कैरीच्या सर्व
छान आहे रेसीपी कैरीच्या सर्व रेसिपी आवडतात करून बघणार
मस्तच. मी कच्ची चट्णी करते
मस्तच. मी कच्ची चट्णी करते शेंगदाणे भाजलेले घालून. आता अशी करून बघेन. ही आणि दोन पोळ्या ब्रेफाच झाला की मस्त पैकी. सीझनच्या आधी टाकलीत ते बरे केलेत. मला छुंदा पण आवड्तो पण आपली मराठी चटणी असताना वो कायको करना.
मी कढीपत्ता वापरायचं सोडले.
आता ही कऊन पहायला हवी!शिजलेला
आता ही कऊन पहायला हवी!शिजलेला टक्कू!
अमा- कढिपत्ता वापरायचे का
अमा- कढिपत्ता वापरायचे का सोडले? म्हणजे आवड की हेल्थ रीझन्स - अॅलर्जी वगैरे? सहज कुतुहल म्हणून विचारतेय.
मस्त दिसतेय आणि मस्त वाटतेय.
मस्त दिसतेय आणि मस्त वाटतेय.
मी शिजवत नाही, कच्चीच ठेवते.
मी शिजवत नाही, कच्चीच ठेवते. सोलापूरी पद्धत.
https://www.maayboli.com/node/33563 इथं आहे.
आता चांगल्या आंबट कैर्या >
आता चांगल्या आंबट कैर्या >> नशीबवान आहात. आमच्या राज्यात आंबट कैर्या विकण्यावर कायद्याने बंदी आहे बहुतेक. छोट्या, मोठ्या, फिकट रंगाच्या, गडद हिरव्या, लालसर सर्व प्रकारच्या कैर्या आणून पाहिल्या. एकदाही व्यवस्थित आंबट असलेली कैरी मिळालेली नाहि. न्यू जर्सी आणि क्वीन्स मधल्या दुकानातून आणलेल्या कैर्या पण तशाच !
तरी एकदा करुन पहाणार ही रेसिपी.
दुकानातून तुमच्या घरी
दुकानातून तुमच्या घरी पोचेस्तोवर पिकत असतील - बराच पल्ला आहे ना!
मेधा, ह्या चांगल्या आंबट
मेधा, ह्या चांगल्या आंबट कैर्या आमच्या इंग्रोमधेच मिळतात. ते सुद्धा वेळेवर तिथे पोचलं तर! लागतो मटका कधी कधी!
या रेसिपी ने २,३ वेळा केली
या रेसिपी ने २,३ वेळा केली चटणी..अप्रतिम taste आली .खूप आवडली घरी सगळ्यांना..thank you मैत्रेयी:) अल्पनाचा सखुबत्ता जरा माग पडला यावेळी
तुमची गवार बेसन कोफ्ते भाजी पण जाम famous आहे आमच्याकडे..गवार ला एकदम वेगळंच glamour मिळालं:)
मी आज या पद्धतीने चटणी केली
मी आज या पद्धतीने चटणी केली , छान आहे चव !!! ,
अरे वा थॅन्क्स. मी पण काल
अरे वा थॅन्क्स. मी पण काल केली आहे ही चटणी. दर सीझन मधे २-३ वेळा होतेच.
काहींनी मागे फीडबॅक दिला होता की कांद्याचा वास नीटसा गेला नाही आणि कच्चट राहिला असे. तर कांदा तेलात आधी घालून जरा परतून मग कैरी घातली तर काम सोपे होते. कैरी लगेच शिजते तशी. ही सुधारणा करायची होती पण आता संपादन नाही करता येत.
चांगली रेसिपी आहे. करुन बघेन.
चांगली रेसिपी आहे. करुन बघेन.
मैत्रेयी आणी दिपांजली भगिनी हे कळलं (आंबा शिरा)