पुण्यात मायबोली गटग

Submitted by अजय on 17 January, 2018 - 09:59
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस , डीपी रोड म्हात्रे पुलाजवळ , पुणे

आम्ही काही मायबोलीकर शनिवारी (२० जानेवारी, २०१८) सकाळी ९ वाजता भेटणार आहोत. इतर कुणाला यायला जमणार असेल तर दुधात साखर. शक्य असेल तर भेटूच.

माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 20, 2018 - 09:00 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कोणाशी वाद घालतोय त्या id ला चेहरा मिळाल्याने, वाद घालण्यात मजा येईल <<

अगदिच तुरळक उपस्थिती होती होय, आम्हाला वाटलं इथे धमक्या देणारे कागदी वाघ समोरासमोर यायची हि सुवर्णसंधी दवडणार नाहित... Lol

रच्याकने, सिम्बा मी तुम्हाला अड्डा मेंबर या भुमिकेतून ओळखत नव्हतो. अड्डा म्हटले की मला माबोचे गोपु देशपांडे (आरारा)*, साने गुरुजी (मयेकर), ममता बॅनर्जी (साती) आणि "जगातील कामगारांनो एक व्हा. चाळ नं५च्या गच्चीवर आज रात्री जाहीर सभा" म्हणत ओरडणारे प्रदीपका/राहुलका/उदयन वगैरे शिशुपाल आठवतात.

* गोपु देशपांडे संदर्भः मटामध्ये अशोक जैन कानोकानी नावाचे विनोदी सदर चालवीत. ते ठणठणपाळचे सक्सेसर म्हणता येईल. त्यात गोपुंच्या नाटकांसंदर्भात त्याने लिहिले होते की "गोपुंची नाटके इतकी जहाल डावी असत की साम्यवादी सोविएत युनिअनमध्येदेखील ती भुमिगत नाट्यचळवळीत करावी लागत."

मनीष, अल्पना , विकु
>>>
ते कार्डहोल्डर आहेत हे माहिती आहे.

पण ते कोण नाहीत, तिघेही आमचे दोस्त आहेत Proud

हाय! मी या पहिल्याच अश्या गटगला स्वतःहून गेले होते याचं मला अजूनही अप्रूप वाटतंय. आणि समाधानही. खरंतर वेबमास्तरांना एकदा प्रत्यक्ष भेटावं अशी इच्छा होतीच. आणि बाकीही खूप लोकं भेटतील असं वाटून नेटानं गेले. साजिरा आणि हिम्सकूल सोडून कुणालाही भेटलेले नव्हते या आधी. अर्थात सिम्बाशी 'कासव' च्या प्रिमियर च्या वेळी ओ़ळख झालेली. बाकी सगळे या निमित्ताने पहिल्यांदाच भेटले. फार मजा आली. अजयशी आमच्या 'स्पोकन इंग्लिश' ग्रूप बद्दल छान गप्पा झाल्या. मायबोलीवरले दिग्गज प्रत्यक्ष भेटल्यागत भारी वाटलं मला! अजून जरा वेळ थांबता आले असते तर मजा आली असती. पुन्हा सर्वांना भेटायला आवडेल.
(इथूनच जात होते म्हणून आले- असं म्हणाले त्या दिवशी ते काही तितकंसं खरं नाही. माझीच प्रामाणिक खाज होती. म्हणून आले खरंतर. Happy )

आम्हीच त्यांना आधीपासून प्लांट करून ठेवलं होतं तुमच्या गोटात.
>>>
आमचा गोट?? तुम्हाला अड्डा आहे, काहींना कट्टा आहे. आम्हाला कुठला गोट अन घाट. आम्ही सडेच.

तेंचा आयडी लंगोटात होता तेव्हा पासून ते मित्र आहेत, गोटात प्लांट करायचा प्रश्नच येत नाही. कट्टे अड्डे यायच्या आधी सगळा वावर सपाट होता. पोरं लंगोटात पण खेळायची, मारामार्‍या करायची.

अशा गेट टू गेदर ची जाहीरात फेसबुक वर पण करत जा. सदस्य नसलेले लोक मायबोली पाहतातच. पण रोजच पाहतील असे नाही. फेसबुक मात्र रोज आणी दसादर्वदा चालू असते. त्यामुळे आमच्यासारख्या अनेकांना माहिती होईल. रविवार नसेल तर मल्टीस्पाईस काय हाकेच्या अंतरावर आहे मंगेशकर पासून.

Pages