Submitted by सशल on 3 January, 2018 - 13:22
फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्यांनां भोगाव्या लागणार्या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?
सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.
- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!
* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक
क्रमशः
(बरेच दिवसांनंतर नविन लेखनाचा धागा चालू करत आहे. तेव्हा बर्याच चुका झाल्या असतील विषय, शब्दखुणा इत्यादी. किंवा काही राहून गेले असेल. सल्ले मिळताच चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेन.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेरफटका, मंदार ह्यांच्या
फेरफटका, मंदार ह्यांच्या पोस्ट्स
"मन आहे तर मनःस्ताप होणारच" हे ही आवडलं
I think Rajsi is confused.
I think Rajsi is confused. The topic is not to complain about the process but there is no clarity about how to follow the process and unnecessary and stupid steps in the process.
Even the process to apply US visa is also complicated and time consuming (B1/B2 my experience level) than Schengen but that is a separate issue.
ओसीआय कार्ड फक्त भारतातच
ओसीआय कार्ड फक्त भारतातच "रेकग्नाइज" होते. व्हिसा म्हणून ते इतर देशांतील लोकांना समजत नाही. प्रवास करताना फक्त पासपोर्ट वर "U" व्हिसा आहे का नाही हे पाहतात. तो नसला तर अडवतात.
>>>
अरे हे बरोबर आहे का? माझी बायको एकटीच मुलाला घेऊन भारतात येणार आहे फेब्रुवारीत. मुलाच्या पासपोर्टमध्ये भारताचा विसा नाहिये, आम्ही फक्त ओसीआय कार्डच घेतले आहे.
नेटवर बघितल्यानुसार यु विसा स्टँप आता पासपोर्टमध्ये मारत नाहीत. मुलाच्या पासपोर्टमध्येही तो नाहिये. फक्त ओसीआय कार्डच मिळाले.
भारतावरच्या प्रेमाचा कुठे
Edited
जवळजवळ गेल्या १२ वर्षांपासुन
जवळजवळ गेल्या १२ वर्षांपासुन ओसीआय मिळवण्याची सोय असतानाहि (इवन पीआयओ टु ओसीआय क्न्वर्जन) लोकांनी फक्त पीआयओच का घेउन ठेवलं?.. >>
आम्हा दोघांची सिटिझन्शिप वेगवेगळ्या वेळी झाली . दोन्ही वेळेस पी आय ओच अवेलेबल होते. मी ते अप्लाय केलं. नवर्याला तातडीने प्रवास करायचा होता. कंपनीच्या ट्रेव्हेल डिपार्टमेंटने व्हिसा लवकर होईल तोच घ्या म्हटलं म्हणून त्याने तो घेतला. तो संपला तेंव्हा ओ सि आय अव्हेलेबल होते . त्याने ते घेतले.
थोरली पहिल्यांदा भारतात गेली तेंव्हा ओसीआय किंवा पी आय ओ दोन्ही अव्हेलेबल नव्हतं. तिचा व्हिसा घेतला होता. तो संपल्यावर ओ सी आय अप्लाय केलेलं तिचासाठी. तो वेगळाच मनस्ताप होता. माझं १० वी १२ वी चं मार्क लिस्ट मागितले नाहीत एवढंच.
बार्क्याला घेऊन जाताना त्याचं पी आय ओ केलेलं - बहुतेक तेंव्हापण ओसीआय अव्हेलेबल नव्हतं तेंव्हा.
आता बदलायची घाई कारण पुढ्या वर्षी पासून पी आय ओ चालणार नाहीये म्हणे.
---------------
भारतात राहून परदेशाला, परदेशी संस्कृतीला नावं ठेवणार्यांंनी इतरांना भारतीय वकिलातीचा प्रोसेस किती कटकटीचा आहे म्हणू नये अशी अपेक्षा करावी म्हणजे गंमत आहे
-----------------
फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम आहेच. जे फर्स्ट वर्ल्ड मधे राहतात, त्यांना तेच प्रॉब्लेम येणार. थर्ड वर्ल्ड मधले प्रॉब्लेम तेव्हडे खरे आणि त्याचीच चर्चा व्हावी असे कुठे लिहिले आहे ?
----------------------------
उगा टेररिस्टना रोखणे वगैरे म्हणू नका. ताज वरच्या हल्ल्यातले लोक आलेच ना . स्ट्रटीजिक व्हिजन नाही, कस्टमर सर्व्हिस नाही. जो काही किचकट प्रोसेस असेल त्याचं कंसिस्टंट इम्प्लीमेंटेशन नाही. या बद्दल तक्रारी आहेत. शिवाय अगदी टॅक्टिकल लेवल वर ऑनलाइन सिस्टम अतिशय बेकार आहे हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन . इन्फी, एच्सीएल ,कॉग्निझंट आणि इतर शेकडो कंपनया कितीतरी चांगले चांगले प्रो़जेक्ट्स करत असतात, असे असताना यांची सिस्टम मात्र १९९० सालातल्या सारखी चालते हे वैतागवाणे आहे. भरपूर पैसे घेउन फॉर प्रॉफिट बिझनेस चालवाताना कस्टमर एक्स्पिरियंस इतका टुकार कसा काय देऊ शकतात ?
जाणतेपणी, स्वेच्छेने भारतीय
जाणतेपणी, स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व सोडले आणि इतर देशाशी एकनिष्ठ राहू अशी शपथ घेतली आहे, ज्यांची पुढची पीढी जन्माने अभारतीय आहे अश्या परदेशी नागरिकांसाठी भारताने त्यांची entry प्रोसेस सोपी का करावी! >>> हे काहीच्या काही आहे! आंतरराष्ट्रीय संकेत पाळणारा एक क्ष देश आहे . त्या देशात "परदेशी" नागरिकांना यायला जायला कायद्याने परवानगी आहे. परदेशी नागरीक ही कायद्याला/नियमांना धरूनच येऊ इच्छित आहेत. मग या येण्याच्या प्रोसेस मधे ग्लिचेस किंवा इन्कन्सिस्टन्सीज असतील तर ते तक्रार करणारच ना!! नोट - प्रोसेस क्लिष्ट असणे वेगळे आणि प्रोसेस कसिस्टन्ट नसणे , ४ लोकांचे ४ वेगळे इन्टरप्रिटेशन असणे हे वेगळे!!
लोकसंख्येचा , साधनसंपत्ती च्या प्रश्नांचा इथे या बाफच्या विषयाशी काय संबंध आहे?
बाकी,
सुसूत्रता नसणे ही सुध्दा एक प्रोसेस नाही का, अयोग्य माणसाला देशात येणं सोपं होऊ नये म्हणून>> हे महान लॉजिक आहे. CKGS सुद्धा हसतील हे वाचून
वडापाव बद्दल - लहानपणी
वडापाव बद्दल - लहानपणी आसपासची सर्व इन लोको पॅरेंटिस मंडळी नीट शिकलं वाचलं नाही तर वडापावची किंवा भजी विकायची गाडी लावावी लागेल अशी धमकी देत असायची . त्यामुळे ते लिहिलं. भारी वडापाव बनवून विकणारे कदाचित कॉक्स अॅण्ड किंग्ज च्या सिस्टम डेव्लपर पेक्षा जास्त सक्सेसफुल आणि सॅटिसफाइड असतील. त्यांच्याबद्दल अनादर नाहीच .
माझं म्हणणं आहे, सुसूत्रता
माझं म्हणणं आहे, सुसूत्रता नसणे ही सुध्दा एक प्रोसेस नाही का, अयोग्य माणसाला देशात येणं सोपं होऊ नये म्हणून. >> हे वाचून " वडापाव आणायला जावे तर आधी मागच्या स्टेशनवर जाऊन पावाला जर्मन मधे नि वड्याला स्वाहिलीमधे काय म्हणतात ते देवनागरीमधे लिहून आणा" ह्याला व्हेटींग प्रोसेस म्हणतात हे कळले.
मी काही भारतीय वकीलात /
Edited
26/11चे अतिरेकी बिन-परमिट
Edited
व्हिसा देताना गुन्हेगार आहेत
व्हिसा देताना गुन्हेगार आहेत की नाहीत हे कसं ओळखायचं? म्हणजे पाकिस्तानातून आलेला टेररिस्ट व्हिसा काढताना प्रामाणिकपणे ‘मी टेररिस्ट आहे आणि भारतात जाऊन हल्ला करायचा आहे म्हणून व्हिसा हवा आहे.’ असं सांगणार का?
२६/११ च्या हल्ल्यात पळून गेलेले अतिरेकी पुन्हा येऊ शकतातच, जसे पहिल्यांदा आले.
>>सुसूत्रता नसणे ही सुध्दा एक
>>सुसूत्रता नसणे ही सुध्दा एक प्रोसेस नाही का, अयोग्य माणसाला देशात येणं सोपं होऊ नये म्हणून. <<
लिटल्फिंगरच्या "केऑस इज ए लॅडर...." या वाक्याचा अर्थ मला आज समजला...
शकले म्हणून, आता सर्व पळून
शकले म्हणून, आता सर्व पळून गेलेल्या गुन्हेगारांना व्हिसा द्यावा म्हणता! >> उगा विपर्यास करू नका आमच्या चिडचिडीचा. पळून गेलेल्यांना पकडू शकेल अशी कोणतीही स्टेप नाही. कुठल्याही देशातले बॅक ग्राउंड चेक, पोलिस क्लियरंस , क्रेडिट रीपोर्ट मागत नाहीत . ज्या देशात राहताय तिथे पोटा पाण्याचा व्यवसाय काय या बद्दल एक कंपनी नाव आणि अॅड्रेस भरावा लागतो. ( तिथे सुद्धा सेकंड लाईन ऑफ अॅड्रेस मँडेटरी आहे &^&%&^&)
काही भारतीय वकीलात / परराष्ट्र खाते / सरकार ची प्रवक्ता नाही. >> मग एवढा कळवळा कशाला - त्यांची सिस्टम किचकट आणि इन्कन्सिस्टंट आहे म्ह्टल्यावर ? फर्स्ट वर्ल्ड मधले , परदेशात राहणारे यांनी टुकार सिस्टमला टुकार म्हणूच नये अशी अपेक्षा का ?
अमेरिकन व्हिसा, ग्रीन कार्ड, सिटीझनशिप या विषयांना वाहिलेल्या वेबसाइट्स लोकांच्या कुरबुरींनी भरभरून वहात असतात .
इथे सुद्धा एच ४ - इएडी बद्दल चर्चा होतच आहे. तशीच पी आय ओ आणि ओ सि आय बद्दल झाली तर काय बिघडलं.
गुन्हेगार काय असं व्हिसा
गुन्हेगार काय असं व्हिसा मागून येत असतील काय? जिथे ढिसाळ कारभार असणार्या चौकी आहेत तिथून पायी पायी पलिकडे जाणार...
सरहद इंसानो के लिए है बोलो तुमने और मैंने क्या पाया इंसान होके...
(No subject)
https://youtu.be/iMDTcMD6pOw
राजसी, तुम्ही तुमच्या पोस्ट्स
राजसी, तुम्ही तुमच्या पोस्ट्स एडिट केल्या आहेत. हा बीबी अजूनही वाचत असल्यासः
>> जे जन्माने भारतीय असताना, जाणतेपणी, स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व सोडले आणि इतर देशाशी एकनिष्ठ राहू अशी शपथ घेतली आहे, ज्यांची पुढची पीढी जन्माने अभारतीय आहे (परत हा स्वेच्छेने घेतलेला निर्णय बहुतांश केसेस मध्ये असू शकतो) अश्या परदेशी नागरिकांसाठी भारताने त्यांची entry प्रोसेस सोपी का करावी!
हे तुम्ही लिहीलंत त्यावरून असं वाटलं की आम्ही भारतीय नागरिकत्व सोडलं किंवा भारताबाहेर मुलं जन्माला घालून त्यांनां अभारतीय केलं ह्यावरून तुम्ही आमची एकनिष्ठता आणि पर्यायाने प्रेम (कारण एकनिष्ठता ही सध्या एका डॉक्युमेन्ट ने डिफाईन होत आहे) जज्ज करत आहात असं वाटून मी भारतप्रेमाचा उल्लेख केला. असो.
अरे हे बरोबर आहे का? माझी
अरे हे बरोबर आहे का? माझी बायको एकटीच मुलाला घेऊन भारतात येणार आहे फेब्रुवारीत. मुलाच्या पासपोर्टमध्ये भारताचा विसा नाहिये, आम्ही फक्त ओसीआय कार्डच घेतले आहे. नेटवर बघितल्यानुसार यु विसा स्टँप आता पासपोर्टमध्ये मारत नाहीत. मुलाच्या पासपोर्टमध्येही तो नाहिये. फक्त ओसीआय कार्डच मिळाले. >>>>>
बरोबर आहे. आत्ताच नात्यातले एक कुटूंब लहान बाळाला घेऊन (बाळाच्या) ओ सी आय वर भारतात गेले आहे. काही प्रॉब्लेम आला नाही. सध्या पासपोर्टवर शिक्के मारणं रद्द केलेलं आहे. त्यामुळे बाळाचा अमेरीकन पासपोर्ट आणि ओ सी आय वर प्रवास करता येईल.
सशल, मी पोस्ट्स edit केल्या
सशल, मी पोस्ट्स edit केल्या कारण इथे बहुतेक सगळ्यांना परदेशी लोकांना भारतात प्रवास करताना येणाऱ्या अडचणी सांगायच्या आहेत. इथे कोणालाच उपाय माहीत नाहीत आणि अडचणी सोडवणार पण इथे बहुतेक कोणी नसेल. मला वाटत नाही की ह्या अडचणीचे निराकरण करु शकणारा कोणी ही site वाचत असेल. I deleted the posts(which I still could) as they weren't really helpful, useful at all.
परदेशी लोकांना {त्यात तुम्ही(POI, OCI) पण आलात} , भारतात प्रवास करणे सोपे नाही. Tourism च्या दृष्टीने भारताला अजून बराच पल्ला गाठायचाय. भारतात सरकारी कामात काय आणि कश्या अडचणी आहेत ते माहीत असणाऱ्या लोकांनी भारताला नावं ठेवू नयेत असं मला वाटलं म्हणून मी भारताच्या बाजूने (? माझा काही role, संबंध नसताना)तथाकथित मतं (benefit of doubt) दिली. परन्तु माझी पण गल्लत (तुम्हाला भारतीय समजण्यात) झाली कारण मी एक भारतीय म्हणून परदेशी लोकांना काय काय अडचणी येतात हे फक्त वाचायला पाहिजे होते. My views /thoughts were irrelevent here and this was not the forum for that.
बाकी, भारतात इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करायला खरंच हरकत नाही. अजूनही भारतात पैसा टाकला की काम होतात.
भारतात सरकारी कामात काय आणि
भारतात सरकारी कामात काय आणि कश्या अडचणी आहेत ते माहीत असणाऱ्या लोकांनी भारताला नावं ठेवू नयेत असं मला वाटलं म्हणून मी भारताच्या बाजूने >>> भारतीय बाजूने मतं मांडायची तर मग तुम्हीच सोल्यूशन सुचवा. अशी सिस्टीम का आहे याबद्दल कारणं लिहा. कारणं कळली तर आमची चिडचिड/मनस्ताप कमी होईल. हे उपरोधिकपणे न लिहीता अत्यंत सिन्सीअरली लिहीलं आहे.
वर मेधानं काही उपाय सुचवले आहेत. करता येतील का?
सार्काझम?
राजसी, सार्काझम?
आता जरी अमेरिकेत रहात असलो आणि इकडचं नागरीकत्व घेतलेलं असलं तरी जन्माने भारतीय वंशाचे आहोत. भारतात मूळं आहेत म्हणून प्रेम आहे. पुढच्या पिढीतंही ते प्रेम टिकून रहावं अशी इच्छा आहे.
ओसीआय, पी आय ओ इत्यादी चे नियम क्लिष्ट वाटतात आणि भारतात पैसे ओतले की कसलंही काम करून घेता येतं म्हणून तो मार्ग स्वेआकारावा असं सूचवताय का?
सोल्यूशन नाही दिले तरी चालेल
सोल्यूशन नाही दिले तरी चालेल पण निदान "अजूनही भारतात पैसा टाकला की काम होतात." हे असं सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) तरी नको!!
>> तिथे सुद्धा सेकंड लाईन ऑफ
>> तिथे सुद्धा सेकंड लाईन ऑफ अॅड्रेस मँडेटरी आहे &^&%&^&)
मेधा, अगदी अगदी. कुठेही रिक्वायर्ड फील्ड आणि ऑप्शनल फील्ड ह्याबद्दल क्लीअर इन्डिकेशन नाही. ते आपण "लिव्ह अँड लर्न" बेसिस वर शोधून काढायचं.
रिनन्सिएशन च्या फॉर्म वर भारतातला "व्हेरिफिएबल" अॅड्रेस मागितला आहे. जर भारताचे रेसिडन्ट्स नाही आहोत, आता नागरिकत्व सोडत आहोत तर व्हेरिफिएबल अॅड्रेस म्हणजे काय? तो का लागतो. त्याचं प्रूफ मागितलं (ओरिजीनल आणि/किंवा नोटराइज्ड) तर ते कुठून आणायचं?
>>त्यामुळे बाळाचा अमेरीकन
>>त्यामुळे बाळाचा अमेरीकन पासपोर्ट आणि ओ सी आय वर प्रवास करता येईल.<<
हा नियम फक्त नविन ओसिआय्ला लागु कि प्रिडेटेड आहे. मध्ये काहि तरी नविन पास्पोर्टवर ओसिआय स्टँप असणं मँडेटोरी केलें होतं...
कॉक्स अॅण्ड किंग्ज पूर्णपणे
कॉक्स अॅण्ड किंग्ज पूर्णपणे प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे. आधी च्या बी एल एस की अशाच कुठल्यातरी प्रायव्हेट कंपनीने पूर्ण गलथान कारभार केला २-३ वर्षे. आता कॉक्स अॅण्ड किंग्ज पण तेच करतात . यात सरकारी गलथान पणा आणि लाचलुचपत याचा काय संबंध ?
तिथे सुद्धा सेकंड लाईन ऑफ अ
तिथे सुद्धा सेकंड लाईन ऑफ अॅड्रेस मँडेटरी आहे &^&%&^&) >> अगदी अगदी. तीन पत्ती ... आपलं लायनी नसतील तर तो पत्ता कसला असं पा.फा. म्हणेल.
झिप वरून गावाचं नाव ओळखतात! यावरून झालेला आनंद त्या मँडेटरी फील्डने कचऱ्यात घातला.
अरे हे बरोबर आहे का? माझी
अरे हे बरोबर आहे का? माझी बायको एकटीच मुलाला घेऊन भारतात येणार आहे फेब्रुवारीत. मुलाच्या पासपोर्टमध्ये भारताचा विसा नाहिये, आम्ही फक्त ओसीआय कार्डच घेतले आहे. >> टण्या हे अंजली म्हणते तसे बदललेले दिसते. मी घेतले तेव्हा तो शिक्का महत्त्वाचा आहे असे फोरम्स मधे वाचले होते आणि आमचा अनुभव तसाच आहे की तो शिक्का आधी बघतात. ते कार्ड बघितल्याचे मला आठवतच नाही इतक्या ट्रिप्स मधे.
हे नियम सतत बदलत आहेत.
हा नियम फक्त नविन ओसिआय्ला
हा नियम फक्त नविन ओसिआय्ला लागु कि प्रिडेटेड आहे. मध्ये काहि तरी नविन पास्पोर्टवर ओसिआय स्टँप असणं मँडेटोरी केलें होतं... >>>
हाच प्रश्न आता मलाही आहे. कारण आत्तपर्यंत असे सांगत की पासपोर्ट बदलला, की नवीन पासपोर्ट वर तो "यू" स्टॅम्प किंवा एण्डोर्समेण्ट करून घ्या. लहान मुलांच्या बाबतीत मुळातच ते एन्फोर्स करत नसावेत, जर जुना पासपोर्ट बरोबर असेल तर. कारण आत्तापर्यंत कधी आम्ही एण्डोर्समेण्ट केलेली नाही आणि कधी त्याबद्दल अडचण आलेली नाही. ही चर्चा वाचून ते आठवल्याने मी एण्डॉर्समेण्ट करून घेणार होतो पण जर आता स्टॅम्पच करत नसतील पासपोर्ट वर तर त्याची गरज नाही असे दिसते. चेक करतो एम्बसीकडे.
आत्तापर्यंत आम्ही यू स्टॅम्प वाला पासपोर्ट आणि पुढचे सगळे पासपोर्ट बरोबर घेउन जातो.
आता पासपोर्ट वर शिक्का मारत
आता पासपोर्ट वर शिक्का मारत नाहीत. ओसीआय कार्ड (बुकलेट) आणी पासपोर्ट बरोबर लागतं.
ओके फेफ. म्हणजे बुकलेट, मूळ
ओके फेफ. म्हणजे बुकलेट, मूळ पासपोर्ट १०-१२ वर्षांपूर्वीचा असेल (शिक्का वाला), तर तो पासपोर्ट आणि पुढचे आत्तापर्यंतचे सर्व पासपोर्ट बरोबर घेउन जाणे हा सेफ पर्याय दिसतो.
"आत्तापर्यंत आम्ही यू स्टॅम्प
"आत्तापर्यंत आम्ही यू स्टॅम्प वाला पासपोर्ट आणि पुढचे सगळे पासपोर्ट बरोबर घेउन जातो." - बेटर सेफ दॅन सॉरी. मागे एकदा, नवीन पासपोर्ट (भारतीय) असताना आणी त्यात जुन्या पासपोर्ट चा सगळा रेफरन्स असताना, इमिग्रेशन वाल्याने अडवून ठेवलं होतं. मग त्याने बर्याच वेळाने कुठल्या तरी अनुभवी माणसाला बोलावल्यावर, त्याने, 'हे काय, इथे आहे ना सगळं' वगैरे सांगितल्यावर मग सोडलं.
Pages