Submitted by सशल on 3 January, 2018 - 13:22
फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्यांनां भोगाव्या लागणार्या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?
सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.
- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!
* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक
क्रमशः
(बरेच दिवसांनंतर नविन लेखनाचा धागा चालू करत आहे. तेव्हा बर्याच चुका झाल्या असतील विषय, शब्दखुणा इत्यादी. किंवा काही राहून गेले असेल. सल्ले मिळताच चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेन.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Types of notarizations:
Types of notarizations:
Acknowledgments.
Jurats, Verifications And Affidavits.
Oaths/Affirmations.
Copy Certification.
Signature Witnessing.
(This is obtained from a google search)
http://notary.cdn.sos.ca.gov/forms/notary-handbook-2015.pdf
काल CKGS - SF ला जाऊन OCI
काल CKGS - SF ला जाऊन OCI फॉर्मस सबमिट करून आलो.
पॉझिटिव्ह गोष्टी आधी:
ऑफिस चांगलं आहे. व्यवस्थित मोठं, शोधायला सोपं. डाऊनटाऊन मध्ये आहे.
काऊन्टर वरची बाई बोलायला चांगली होती. भोचकपणा न वाटता टिपिकल स्मॉल टॉक जसं करतात तसच करत होती.
काम करणाऱ्या लोकांना कागदपत्रांची माहिती आहे आणि काय हवं नको ते व्यवस्थित शब्दांत कम्युनिकेट करू शकतात. आम्हाला तिकडे लागलेला वेळ बघून शेवटी पोरं कुरकुर करू लागली तर त्यांना भूक लागली असेल समजून तिने तिच्याकडचं चॉकलेट स्नॅक म्हणून ऑफर केलं. विच वॉज वेरी नाईस. काल गर्दीही फार न्हवती.
मार्टिन ल्युथर किंग डे असूनही ऑफिस चालू होतं.
आता निगेटीव्ह:
१.आई वडिलांचे नाव तुमच्या शेवटच्या इंडियन पासपोर्ट मध्ये जसे होते तसेच टाका. तुम्ही पूर्वी भारतीय नागरिक असलात आणि आई वडिलांच्या पासपोर्टची काही गरज नसली आणि ते नाव फक्त नेम सेक जरी असलं तरी ते तुमच्या शेवटच्या पासपोर्टशी match झालं पाहिजे.
२. तिकडे आयत्यावेळी ते कुठलीही डॉक्युमेंट मागू शकतात सो मनात येईल ते बरोबर घेऊन जा. जवळ laptop ठेवा की हवी ती प्रिंट मेलवरून देता येईल. माझ्या केस मध्ये शेवटचा कॅनडाचा पत्ता आणि त्याच प्रुफ, कॅनडात पहिल्यांदा land झालो तेव्हाचा व्हिसा, पहिल्यांदा land झालो तेव्हाचा landing पेपर, आणि कधीही रेफ्युजी स्टेटसला apply केलेलं नाही असं notarized affidavite, आणि govt ऑफ इंडियाच्या साईट वरचा एकाच्या केस मध्ये मिडल नेम गाळून आणि एकाच्या केस मध्ये मिडल नेम घालून नवा फॉर्म आयत्यावेळी द्यावा लागला. ही सगळी document हवी हे त्यांना आधी ही सांगता आलं असतं. प्रश्न भारंभार कागद मागण्याचा नाही तर आयत्यावेळी सांगण्याचा आहे.
ही लागणारी नवी documentची लिस्ट त्या बाईच्या क्यूबला पोस्ट ईट/ पिन केलेली होती. ही document का हवी हे ती मला समजवायला लागली, पण प्रश्न का हा नसून माहिती नसणे हा आहे सांगितल्यावर काही उत्तर न्हवते.
३. जवळ laptop बाळगा. ज्यात तुमचा फोटो, सही आणि govt ऑफ इंडिया वर अपलोड केलेल्या सगळ्या पीडीएफ असतील. जवळच्या फेडएक्स मध्ये कम्पुटर आणि प्रिंटर वापरायला मिळतं. समोर युपीएस मधली बाई नोटरी आहे. (युपीएस कडे कम्प्युटर आणि प्रिंटर नाही) तिच्या कडे standard statement लिहून affidavite करायचा फॉर्म आहे. आयत्यावेळी काम होऊन जातं.
४. CKGS कडे स्कॅनर/ प्रिंटर नाही. गर्दी नसल्याने दीड पर्यंत हे सगळं घेऊन आलात तर मी तुमचं काम करते ही कर्टसी मात्र तिने दाखवली आणि साउथ बे मधून आणखी एक ट्रीप मला करायला लागली नाही.
५ . Application मेल करणे म्हणजे टोटल लकचा मामला आहे.
६. ओसीआय सध्याच्या पासपोर्ट exp तारखे पर्यंतच मिळतं. मग ज्युरीसडीक्षन प्रमाणे रिन्युअलची प्रोसेस सोपी/ कठीण असते. न्यूयोर्कला पsरत सगळं करायला लागतं. SFला फक्त फॉर्म लागतो. सो लाईफ टाईम ला खरा अर्थ नाही असा माझा समज होतो ना होतो तोवर "पण काही एअर लाईन्स लाईफ टाईम अलाऊ करतात" अशी फारच भोंगळ माहिती तिने दिली. सो गोंधळ कायम आहे. बघू आता कधी येतंय का आणखी काही मागतायत.
ते ओरिजिनल पासपोर्ट ठेवून घेतात आणि १० दिवसांनी पाठवतात. ओसीआय झालं की घरी पाठवतात.
अमित, थँक्यु फॉर द अपडेट.
अमित, थँक्यु फॉर द अपडेट.
हे लक्षात ठेवायला हवं की हे सर्व नियम valid as of Jan 15,2018.
अगदी उद्यासुद्धा काहिही बदलू शकतं?
>>अगदी उद्यासुद्धा काहिही
>>अगदी उद्यासुद्धा काहिही बदलू शकतं?<<
होप, लाइफटाइम वॅलिडिटी रुल इज ग्रँडफादर्ड...
अगदी उद्यासुद्धा काहिही बदलू
अगदी उद्यासुद्धा काहिही बदलू शकतं? >>
कदाचित आजसुद्धा. "भारतात १६ जानेवारी सुरु झाली" असं कारण सांगतील!
"पण काही एअर लाईन्स लाईफ टाईम
"पण काही एअर लाईन्स लाईफ टाईम अलाऊ करतात" अशी फारच भोंगळ माहिती तिने दिली. >>>एअर लाईन्सचा काय संबंध??? भारत सरकारचे जे नियम आहेत ते एअर लाईन्सना बांधिल आहेत. भारत सरकारचा "लाईफ टाईम अलाउ करणे" नियम असेल तर तो एअर लाईन्सनं फॉलो करणं बांधिल आहे. भोंगळ म्हणजे किती तो भोंगळपणा, आणि तोही एका ऑफिशिएअल कडून
नुकतेच म्हणजे मागच्याच आठवड्यात नात्यातले एकजण छोट्या बाळाला घेऊन भारतात जाऊन आले. बाळाचे ओसीआय आहे. पासपोर्टवर शिक्का मारलेला नाही. लाईफटाईम कार्ड घेऊन गेले. कुठेही प्रॉब्लेम आला नाही. एअरलाईनः डेल्टा.
आता माझा अनुभव.
आता माझा अनुभव.
( माझे रायटींग स्किल्स फार चांगले नाहीत पण प्रयत्नें वाळूचे कण रगडिता..)
तर फायनली पहिल्या अॅप्लिकेशन साठीचं रिजेक्शन आणि फुकटात पीआयओ टू ओसीआय कन्व्हर्जन सत्यात उतरणार नाही हे विदारक, कडू सत्य आणि त्यावरून झालेली चीडचीड, घरचे वाद वगैरे वगैरे सगळं गिळून पुन्हा नव्याने अॅप्लिकेशनला सुरूवात केली. आता जुना अनुभव दांडगा आहे तर म्हंटलं सुरूवात करून ठेवू, एकदा रिजेक्शन पॅकेट हातात मिळालं की सगळे फ्लॉज् कळतील म्हणजे एकदम एररप्रूफ अॅप्लिकेशन बनवता येईल. ही अक्कल सूचेपर्यंत झालं असं की आम्हां नवरा बायकोच्या रिनन्सिएशन साठीचं अॅप्लिकेशन ही करायचं होतं. त्याकरता कसली वाट बघावी असं वाटत नव्हतं त्यामुळे ते आधी सुरू केलं. शिपींग ची भानगड नको म्हणून ह्यावेळी इन-पर्सन अपॉईण्टमेण्ट घेतली. ती अपॉईण्टमेण्ट घेताना वाटलं ह्यांचा दिवस रिकामा दिसत आहे. मुलाच्या नवीन अॅप्लिकेशन साठी सुद्धा एकाच दिवशी मिळेल अपॉइण्टमेण्ट. पण अंदाज चुकला. कारणमीमांसा करण्यात काही हशील नाही. तेव्हा आमची रिनन्सिएशन करता नवीन वर्षातल्या एका शुक्रवारची आणि मुलाच्या पीआयो टू ओसीआय कन्व्हर्जन करता त्याच्या पाठोपाठ येणार्या बुधवारची अपॉइण्टमेण्ट घेतली. म्हंटलं तिकडे सर्व तयारी घेऊन जाऊ, गयावया करू मग कदाचित घेतील तीनही अॅप्लिकेशन्स एका वेळी. पण मॅन प्रपोजेस् गॉड डिस्पोजेस्!
रिनन्सिएशन करता त्यांनां भारतातला व्हेरिफीएबल अॅड्रेस लागतो. म्हणजे नक्की काय हे कळायला वेळ लागला. त्याचं कारण असं की माझा जो मोस्ट करण्ट भारतीय पासपोर्ट होता (सॅन फ्रान्सिस्को मधून घेतलेला आणि सिस्टीम-प्रिण्टेड) त्यावर तेव्हाच्या महाभागांनीं भारतातला अॅड्रेस टाकून ठेवला होता; नवर्याच्या पास्पोर्ट वर मात्र शिस्तीत इकडचा. मला वाटलं माझ्याकडे व्हेरिफिएबल अॅड्रेस चं प्रूफ आहे आणि नवरा गांजला की आता त्याच्या व्हेरीफिएबल अॅड्रेस करता प्रूफ कुठून आणायचं. असो, पण काही प्रॉब्लेम आला नाही. राग, चीडचीड गिळणे आणि पैसे ओतणे (म्हणजे त्यांनीं लावलेली फी ; तसं तक्रारीला जागा नाही तिकडे ) हे केल्यावर आमची रिनन्सिएशन ची अॅप्लिकेशन्स मार्गी लागली.
त्या रिनन्सिएशन च्या अपॉइण्टमेण्ट च्या वेळी आम्ही मुलाच्या नव्या अॅप्लिकेशन ची सर्व जय्यत तयारी घेऊन गेलो होतो. आधीच्या अॅप्लिकेशनच्या वेळी सर्व नोटराइज केलं होतं पण त्यावर पेनाने मार्क्स केल्याने कळेना ते परत वापरता येईल का ते. तसंच त्यांच्या (गव्हर्नमेन्ट ऑफ इन्डिया वेबसाईट) नियमांत बसवून फोटो ची इमेज एकदा तयार केली होती तीच परत वापरावी असा शॉर्टकट विचार होता. पण त्यांनीं आधीचं अॅप्लिकेशन रिजेक्ट केलं तेव्हा सगळीकडे पेनाने मार्क्स करून ठेवले आणि परत लूज फोटो जो लागतो तो एका कागदावर चिकटवून परत पाठवला. इमेज स्कॅनिंग चं दिव्य परत करायचा आळस मग मेहेनत करून तो फोटो ओरबाडून काढला परत वापरावा म्हणून. आधी म्हंटलं तसं पेनाने मार्क केलेले नोटराइज्ड डॉक्युमेन्ट्स चालवून घेतील की नाही त्याची खात्री नव्हती. म्हणून ती एक आणखी सबस्टॅन्शियल फोडणी देऊन नविन डॉक्युमेन्ट्स तयार केली. तिकडे जाऊन गयावया केल्यावर त्यांनीं अतिशय नम्रपणे सांगितलं की आम्ही हे अॅप्लिकेशन आज अॅक्सेप्ट तर नाही करू शकणार पण चेक करून देतो म्हणजे बुधवारी परत काही प्रॉब्लेम नको. चेक केल्यावर अर्थातच कळलं ते परत एकदा चुकीचं आहे. ते कसं दुरूस्त करायचं हे ह्यावेळी मात्र पटकन कळलं (अनुभाव कामास आला). गव्हर्नमेन्ट ऑफ इन्डिया च्या वेबसाईट वरची प्रॉसेस परत करावी लागणार होती. पण आता मी त्यात अगदी तरबेज झाल्याने लग्गेच दहा मिनीटांत ते काम आटपलं घरी येऊन. ह्या महाभागांनीं परत एकदा फोटो चिकटवून ठेवलेला एका कागदावर डॉक्युमेन्ट्स चेक करताना. त्याकरता अगदी आयत्या वेळी परत थोड्या शिव्या घातल्या, परत तो ओराबडला आणि फायनल अॅप्लिकेशन तयार केलं. बुधवारी अपॉइण्टमेण्ट होती तेव्हा जाऊन धडकलो आणि एकदाचं सुपूर्त केलं त्यांच्याकडे अॅप्लिकेशन; अर्थात ह्यावेळी $२७५ रुपयांची फोडणी देऊन.
अशा तर्हेने सध्याचं स्टॅटस हे आहे की अॅप्लिकेशन प्रॉसेस होत आहे. अजून काही आठवड्यांत कळेलच गंगेत घोडं न्हालं की नाही ते. मग आम्हां उभयतांची ओसीआय अॅप्लिकेशन्स.
तर अशी ही साठा उत्तरांची इन्डियन कॉन्स्युलेट आणि सीकेजीएस् कहाणी सध्यापुरती सुफळ संपूर्ण. आय विल बी बॅक सून !
( त्यातल्या त्यात सिल्व्हर लायनींग असं की ह्या निमीत्ताने दोनदा आम्ही नवरा बायकोंनीं थोड्या वेळाकरता जीवाचं सॅन फ्रान्सिस्को करून लंच डेट्स पदरात पाडून घेतल्या आणि आमचं नातं सुदृढ करण्याचा प्रयत्न केला )
अजूनही मायनर्स चे पासपोर्ट्स रिन्यू केले की ओसीआय री-इश्यू करवून घ्यायचं की नाही ह्याबद्दल अॅम्बिग्युइटी आहे. माझ्या तोकड्या समजूतीप्रमाणे २०/२१ पर्यंत पासपोर्ट रिन्यू केल्यावर ओसीआय री-इश्यू करून घ्यायला लागेल असं त्यांचा रूल सांगतो. पण तुम्ही नशीबावर बोली लावून चान्सेस घेऊ शकता. आम्ही तेव्हा तरी हा प्रश्न स्पष्टपणे विचारून उत्तर मिळवायचा प्रयत्न केला नाही पण पीआयओ टू ओसीआय कन्व्हर्जन ला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला तेव्हा काउन्टर वरच्या बाईने " सध्या किमान ८ आठवडे लागतील, पण रिन्यू करायच्या वेळी काम पटकन होईल" अशी माहिती दिली. तेव्हा उपलब्ध माहिती आणि ह्या वरील संवादाच्या आधारावर पासपोर्ट रिन्यू केला २०/२१ पर्यंत तर ओसीआय री-इश्यू करायलाच लागेल अशी माझी समजूत झाली आहे.
सशल
सशल
पण रिन्यू करायच्या वेळी काम पटकन होईल" >> गुड. आता करायचे आहे रिन्यू.
फा, रिन्यू कुठून करतोस
सशल
फा, रिन्यू कुठून करतोस त्याप्रमाणे पटकन होईल का नाही ते ठरेल. SF ला सोपं आहे NY ला परत सगळं करायला लागतं असं त्या एजंट ने सांगितलेले. . तुमच्या राज्याला कुठलं ज्युरीस्डीक्षण असेल त्याप्रमाणे ठरेल. पण तुझे जास्त टाईज बे एरिया शी आहेत सो तुला घेतील ते इकडे .
अटलांटा किंवा डीसीला करावे
अटलांटा किंवा डीसीला करावे लागेल बहुधा. मधे मी एकदा अॅड्रेस टाकून बघितले होते.
माझ्या तोकड्या समजूतीप्रमाणे २०/२१ पर्यंत पासपोर्ट रिन्यू केल्यावर ओसीआय री-इश्यू करून घ्यायला लागेल असं त्यांचा रूल सांगतो. >>> मीही असेच वाचले आहे. २१-६० (दोन्ही साधारण. नक्की नंबर्स साइट वर मिळतील) मधल्या लोकांना री-इश्यू करावे लागणार नाही, असे.
अभिनंदन! मला वाटत होतं कि
अभिनंदन! मला वाटत होतं कि काहिच त्रुटी आढळली नाहि म्हणुन ते आधार कार्ड नंबर मागतात कि काय तुमच्याकडे....
फा, ६० नाही ५०. त्यानंतर
फा, ६० नाही ५०. त्यानंतर एकदाच फक्त रीइश्यू करून घ्यावं लागेल. मग मात्र अगदी लिटरली लाईफलाँग
राज,
पिक्चर अभी बाकी है. आमची अॅप्लिकेशन्स शिल्लक आहेत.
दरवेळी पासपोर्ट एक्स्पायर
दरवेळी पासपोर्ट एक्स्पायर झाल्यावर रिन्यू लागतं ना? अर्थात तो नियम भारत सरकार करतं आणि तेच पाळत नाहीत हा भाग वेगळा.
नाही. माझ्या समजूतीप्रमाणे
नाही. माझ्या समजूतीप्रमाणे वयाच्या २० वर्षांपर्यंत दर वेळी पासपोर्ट रिन्यू केला की रीइश्यू करवून घ्यायचं. २१-५० मध्ये रीइश्यू करायची गरज नाही आणि ५० नंतर फक्त एकदा.
आता २० ते २१ पर्यंतच्या काळात काय करायचं, नेमका २० ला रीइश्यू केलं असेल तर ५० पर्यंत चालेल का वगैरे प्रश्नांची उत्तरं माहित नाहीत.
आता २० ते २१ पर्यंतच्या काळात
आता २० ते २१ पर्यंतच्या काळात काय करायचं, नेमका २० ला रीइश्यू केलं असेल तर ५० पर्यंत चालेल का वगैरे प्रश्नांची उत्तरं माहित नाहीत. >> बाउण्डरी कंडिशन्स बद्दल आहे हे आधी लक्षात आले नाही. त्यामुळे आधी लिहीलेले बदलले (री-इश्यू ची गरज नाही वगैरे लिहीले होते).
बहुधा चालवून घेतील २० ला रीइश्यू केलेला. जर चेहरा एकदम वेगळा दिसत नसेल तर. एकदम तो इंजिनिअरिंग च्या पहिल्या दिवसाचा सिन्सीयर बच्चन व चौथ्या वर्षाचा तोंडात सिगारेट घेउन पत्ते बघणारा बच्चन वाला जोक फिरत होता तितका फरक असेल तर कदाचित री-इश्यू करा म्हणतील
दरवेळी पासपोर्ट एक्स्पायर झाल्यावर रिन्यू लागतं ना? अर्थात तो नियम भारत सरकार करतं आणि तेच पाळत नाहीत हा भाग वेगळा. >>> पाळत नाहीत असे नाही, मुलांच्या बाबतीत एन्फोर्स करत नाहीत असे पाहिले आहे. पण उद्या जर कोणी अडवले तर नियम आहे तसा. त्यामुळे "रोज मी इथून ८० च्या स्पीड ने जातोय..." आर्ग्युमेण्ट चालणार नाहीत
आता २० ते २१ पर्यंतच्या काळात
आता २० ते २१ पर्यंतच्या काळात काय करायचं, नेमका २० ला रीइश्यू केलं असेल तर ५० पर्यंत चालेल का वगैरे प्रश्नांची उत्तरं माहित नाहीत. >>> सशल, सीकेजीएस च्या साइट वर २० किंवा त्यापेक्षा लहान असेल तर री-इश्यू करावे लागेल असे लिहीले आहे. म्हणजे २० ला ही करावे लागेल.
५० बद्दल - let's cross the bridge when...
आताच मी वाचायला सुरूवात केली
आताच मी वाचायला सुरूवात केली आहे OCI कसे करायचे ते. CKGS च्या वेबसाईट वर वाचताना डोकं गरगरायला लागलंय अक्षरशः .
खरंच कठीण आहे!
हे पण आताच बघितलेhttps://www
हे पण आताच बघितले
https://www.indianeagle.com/travelbeats/oci-application-process-simplifi...
स्नेहा१, करुन टाका.
स्नेहा१, करुन टाका. टक्केटोणपे खात का होईना हातात कार्ड पडतं. हिम्मत नई हारने का!
धन्यवाद अमितव. माझी कॅटॅगरी
धन्यवाद अमितव. माझी कॅटॅगरी तसल्या लोकांची आहे ज्यांना कोणतेही फॉर्म भरायचे म्हटले की कापरे भरते
<< धन्यवाद अमितव. माझी
<< धन्यवाद अमितव. माझी कॅटॅगरी तसल्या लोकांची आहे ज्यांना कोणतेही फॉर्म भरायचे म्हटले की कापरे भरते >>
------- सतत फॉर्म भरत राहिल्यास कापरे भरण्याचे प्रमाण कमी होते....
(No subject)
कदचित अर्जन्टली इन्डिया
कदचित अर्जन्टली इन्डिया ट्रॅवेल कराव लागेल अस वाटतय, मुलाचे व्हॅलिड पिआयओ आहेत त्यावर प्रवास करता येइल का? व्हिसा ऑन अराव्हयल किति पटकन मिळतो.
मला वाटतं मार्च २०२० पर्यंत
मला वाटतं मार्च २०२० पर्यंत व्हॅलिड पीआयओ पण चालणार आहे. कन्फर्म करून घ्या. सप्टेंबर २०१९ ची डेडलाईन (परत) पुढे ढकलली आहे.
ई वीजा पटकन मिळतो. आम्ही
व्हिसा ऑन अराव्हयल किति पटकन मिळतो. >>
ई वीजा पटकन मिळतो. आम्ही शुक्रवारी दुपारी फॉर्म भरला आणि रविवारी सकाळी नऊ वाजता अप्रुव झाल्याचा ईमेल आला. पाच वर्षाच्या मिळाला. पोर्ट ऑफ एन्ट्री चे लिमिट आहे. अर्थात मुंबई त्या लिस्ट वर आहे.
धन्यवाद भोजराज,फेरफटका
धन्यवाद भोजराज,फेरफटका
मला वाटतं मार्च २०२० पर्यंत
मला वाटतं मार्च २०२० पर्यंत व्हॅलिड पीआयओ पण चालणार आहे.>> हो ३१ मार्च पर्यत मुदत वाढवली आहे, धन्यवाद
मी मधे oci + renunciation अशी
मी मधे oci + renunciation अशी अॅप्लिकेशन सुरू केली होती. काही कारणाने मधे गॅप पडली. आज काही प्रश्न विचारायला ckgs ला फोन केला होता. कळले की पुन्हा प्रोसिजर बदलली आहे. आता एका वेळी दोन्ही करता येणार नाही. आधी renunciation करायचे मग oci
Pages