पीआयओ, ओसीआय आणि बरंच काही

Submitted by सशल on 3 January, 2018 - 13:22

फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्‍यांनां भोगाव्या लागणार्‍या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?

सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.

- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!

* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक

क्रमशः

(बरेच दिवसांनंतर नविन लेखनाचा धागा चालू करत आहे. तेव्हा बर्‍याच चुका झाल्या असतील विषय, शब्दखुणा इत्यादी. किंवा काही राहून गेले असेल. सल्ले मिळताच चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेन.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवळजवळ गेल्या १२ वर्षांपासुन ओसीआय मिळवण्याची सोय असतानाहि (इवन पीआयओ टु ओसीआय क्न्वर्जन) लोकांनी फक्त पीआयओच का घेउन ठेवलं?.. >> संपूर्ण चुकीची माहिती. भारताबाहेर जन्म झालेल्यांना दोन वर्षांपूर्वी पर्यंत pio च मिळायचं. एकदा pio चे सव्यापसव्य केल्यावर जो पर्यंत pio वर प्रवास करणे बॅन करत नाहीत तो पर्यंत pio to oci हौशीने करावं म्हणताय Lol

ओसीआय हे केवळ अन्यत्र सिटीझनशिप घेतलेल्या किंवा असलेल्या लोकांकरता होतं गेल्या काही वर्षांपर्यंत. आणि मी आधी म्हंटलं तसं एका तरी पालकाचं ओसीआय असल्याशिवाय मुलांचं ओसीआय होणं शक्य नव्हतं.

मी आधी म्हंटलं तसं एका तरी पालकाचं ओसीआय असल्याशिवाय मुलांचं ओसीआय होणं शक्य नव्हतं. >> मीही हे वाचल्याचे आठवते पण त्या आधी काहि कालावधी करता दोन्ही options मिळत होते.

रेन थांबल्यावर, पुलावरून पलिकडे जावून वडा-पाव घ्यावा लागू शकतो. पुढच्या स्टेशन वर घ्यायच्या वडा-पाव चं कूपन अलिकडच्या स्टेशन वर घ्यावं लागू शकतं. ह्या स्टेशन वर फक्त पाव मिळेल, तो दाखवून पुढच्या स्टेशन वर वडा घ्यावा आणी दोन्ही दाखवून परत येऊन ट्रेन च्या दारात चटणी मिळेल अशी काहीतरी सिस्टीम असू शकते. >> हाहाहाहा .......

>>भारताबाहेर जन्म झालेल्यांना दोन वर्षांपूर्वी पर्यंत pio च मिळायचं. <<
>>आऊट ऑफ इंडिया जन्म असेल तर ओ सी आय शक्यच न्हवत.<<

संपुर्ण चूकिची माहिती. माझ्याघरीच २ भारताबाहेर जन्मलेल्या ओसीआयची (नेव्हर अ‍ॅप्लाय्ड फॉर पीआयओ) उदाहरणं आहेत... Happy

हे नियम गेल्या १५-२० वर्षात अनेक वेळा बदललेले असू शकतात त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव असू शकतो.

आणि हे नियम या पुढे ही सतत बदलत रहाणे यात काहीही बदल संभवत नाही.

त्यामुळे कमी अधिक मनस्ताप प्रत्येकाच्या वाट्याला येणे हे काही कधी टळणार नाही

>>आणि हे नियम या पुढे ही सतत बदलत रहाणे यात काहीही बदल संभवत नाही.
त्यामुळे कमी अधिक मनस्ताप प्रत्येकाच्या वाट्याला येणे हे काही कधी टळणार नाही<<

बरोबर. म्हणुन जात्यात आणि सुपात असलेल्या सगळ्यांनी लवकरात लवकर ओसीआय करुन घ्यावं यातंच शहाणपणा आहे...

भारताबाहेर जन्म झालेल्यांना दोन वर्षांपूर्वी पर्यंत pio च मिळायचं. एकदा pio चे सव्यापसव्य केल्यावर जो पर्यंत pio वर प्रवास करणे बॅन करत नाहीत तो पर्यंत pio to oci हौशीने करावं म्हणताय>>>
आऊट ऑफ इंडिया जन्म असेल तर ओ सी आय शक्यच न्हवत.>>>
आम्ही आमच्या दोघांचं आणि लेकीचं २००७ मधेच ओ सी आय घेतलं. तेव्हा नविन असल्यानं की काय कोणजाणे फार लवकर काम झालं. तिचं २००१ मधे पी आय ओ केलं होतं.
मात्र २०१४ च्या भारत वारीत लेकीचा नविन पासपोर्ट होता, त्यावर ओ सी आय चा शिक्का नव्हता, अ‍ॅक्चुअल ओ सी आय कार्ड बरोबर होतं पण शिक्का असलेला जुना पासपोर्ट बरोबर नव्हता म्हणून अ‍ॅमस्टरडॅमला बोर्ड करू दिलं नाही. तिथून अ‍ॅमस्टर्डॅमच्या कॉन्स्युलेटमधे जाऊन सहा महिन्याचा व्हिसा घेऊन एक दिवस तिथे घालवून एक दिवसानं उशीरा भारतात पोचलो होतो. अतिशय मनस्ताप झाला होता. व्हिसाला $३५० (सहा महिन्यांच्या) द्यावे लागले होते. मेधा म्हणते तसं आम्ही आहोत तोवर हा उपद्याप करू. आमच्या मागं व्हिसाला तरी अ‍ॅप्लाय करतील की नाही कोणजाणे.

>>पण शिक्का असलेला जुना पासपोर्ट बरोबर नव्हता म्हणून अ‍ॅमस्टरडॅमला बोर्ड करू दिलं नाही. <<

हा एक शेख चिल्ली नियम आहे (माझ्या मते). त्या ओसीआय कार्डवर मारे ऐटित लाइफलाँग वॅलिडिटी लिहिलेलं आहे पण (नव्या/जुन्या) पास्पोर्ट वर स्टँप्ड विजा नसला तर त्याची वैधता मात्र शून्य...

हाहाहा!!! Sovereign Republic of India ने त्यांचे नियम कसे बनवावेत हे अभारतीय (म्हणजे भारताचे नागरिक नसलेले) सांगणार त्यांना. टिपिकल फर्स्ट वर्ल्ड चे प्रॉब्लेम.

बोका, ते नियम अभारतीय लोकांसाठीच बनवले आहेत. तेव्हा अभारतीय लोकच ह्या विषयावर बोलणार. भारतीय लोकांनी, भारतीय अनागोंदीवर चालवलेले भारतीय धागे पण चिक्कार आहेत मायबोलीवर.

ओसीआय कार्ड फक्त भारतातच "रेकग्नाइज" होते. व्हिसा म्हणून ते इतर देशांतील लोकांना समजत नाही. प्रवास करताना फक्त पासपोर्ट वर "U" व्हिसा आहे का नाही हे पाहतात. तो नसला तर अडवतात.

फा, पासपोर्ट बदलल्यावर त्यावर एन्डोर्सची प्रोसेस न करता (कारण आता पीआयओ स्कीम नाही तर एन्डोर्स पण नाही करत जा... असं उत्तर फोन वर ऐकून) पीआयओ कार्ड दाखवून गेल्या दोन वेळा भारत प्रवास बिनबोभाट पार पडला. जाताना युनायटेडचे त्यांच्या टिकेटिंग स्टाफला दिलेले रूल बघायला मिळाले तर त्यावर oci pio कार्ड असेल तर प्रवास करू द्या अस दिसलं.
सगळा भोंगळपणा आहे नुसता. तुम्हाला जो माणूस भेटेल त्याच्या मनावर अवलंबून.

ट्रेन थांबल्यावर, पुलावरून पलिकडे जावून वडा-पाव घ्यावा लागू शकतो. पुढच्या स्टेशन वर घ्यायच्या वडा-पाव चं कूपन अलिकडच्या स्टेशन वर घ्यावं लागू शकतं. ह्या स्टेशन वर फक्त पाव मिळेल, तो दाखवून पुढच्या स्टेशन वर वडा घ्यावा आणी दोन्ही दाखवून परत येऊन ट्रेन च्या दारात चटणी मिळेल अशी काहीतरी सिस्टीम असू शकते. >>> Lol
सध्याची परिस्थिती म्हणजे 'अलीकडच्या स्टेशनमधे दिलेल्या पावात पुढील स्टेशनवरचा वडा मावत नाही म्हणून आर्डर कॅन्सल, आता रिफंड हवा असल्यास २ स्टेशने मागे जावून घ्या' अशी आहे Happy

“सध्याची परिस्थिती म्हणजे 'अलीकडच्या स्टेशनमधे दिलेल्या पावात पुढील स्टेशनवरचा वडा मावत नाही म्हणून आर्डर कॅन्सल, आता रिफंड हवा असल्यास २ स्टेशने मागे जावून घ्या' अशी आहे” Happy Happy व्वा, क्या बात है!

>>सध्याची परिस्थिती म्हणजे 'अलीकडच्या स्टेशनमधे दिलेल्या पावात पुढील स्टेशनवरचा वडा मावत नाही म्हणून आर्डर कॅन्सल, आता रिफंड हवा असल्यास २ स्टेशने मागे जावून घ्या' अशी आहे>> Lol फेरफटका ह्यांचीही वडापाव पोस्ट भारी.

जे जन्माने भारतीय असताना, जाणतेपणी, स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व सोडले आणि इतर देशाशी एकनिष्ठ राहू अशी शपथ घेतली आहे, ज्यांची पुढची पीढी जन्माने अभारतीय आहे (परत हा स्वेच्छेने घेतलेला निर्णय बहुतांश केसेस मध्ये असू शकतो) अश्या परदेशी नागरिकांसाठी भारताने त्यांची entry प्रोसेस सोपी का करावी! पहिल्यांदा परदेशात जाताना (इथे अमेरिकेत म्हणूया ) पहिला व्हिसा मिळवताना, तो दरवेळेस renew करताना, ग्रीन कार्ड मिळवताना, नागरिकत्व घेताना किती प्रोसेसेस ना सामोरे जावे लागले असणार! तेव्हा कसं काय सगळं न कंटाळता केलं गेलं असेल! भारतीय नागरिकत्व सोडलेल्या व्यक्तीने का सोडले हे भारतीय वकीलातील अधिकाऱ्यांना कसे कळणार! कित्येक गुन्हेगार, अतिरेकी (कनिष्क हल्ला) गुन्हा करुन परदेशांत पळून जातात, तिथले नागरिकत्व घेऊन सुखाने राहतात, काही वर्षांनी धूळ बसली की परत यायचा प्रयत्न करतात अश्यांसाठी पण ही प्रोसेस सोपी असावी का! कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं की तो गुन्हेगार आहे का नाही. एकदा एखाद्या ची निष्ठा दुसऱ्या देशाच्या सर्वभौमत्वाशी आहे म्हंटल्यावर काय प्रश्न! क्लिष्ट प्रोसेस हा सुद्धा एक चेकपॉइंट आहे की!
बाकी technical upgrade बद्दल मला काही कळत नाही त्यामुळे काही बोलणार नाही.

हे ललितलेखनात का आहे?
चालू घडामोडी - भारताबाहेर (की भारतात?) अशा ग्रुपमध्ये हवं.

फेफ आणि मंदार च्या पोस्टी Lol Lol Lol

सगळा भोंगळपणा आहे नुसता. तुम्हाला जो माणूस भेटेल त्याच्या मनावर अवलंबून. >>>> हा गुण तर भारतियानी फर्स्ट वर्ल्ड कडुनच घेतला आहे . सगळ तपासुन व्हिसा दिला तरी अमेरिकेत पोहोचल्यावर कारण नसताना विमानतळावर तासन तास बसवतात . त्यावेळात फोन वापरु शकत नाही की खायला बाहेर जाउ शकत. त्यानंतर त्या माणसाला सोडुन देतात तो पर्यन्त connecting flight निघुन गेलेली असते. मग airline कंपनीशी वाद घालायचा. work permit असले तरी व्हिसा नाही त्यामुळे जर भारतात परतले तर व्हिसा मिळण्यास प्रॉब्लेम.
युरोप चा व्हिसा घेतला तर ज्या दिवशी जायचे confirm तिकिट आहे त्या दिवसा पर्यन्त मिळतो . जर त्या दिवशीचे विमान रद्द झाले तर illegal stay होतो. आजुन बर्याच देशाचे अनुभव आहेत पण वेळेअभावी लिहित नाही.

आपला देश सोडुन परदेशात जायचे असल्यास त्रास हा होणारच त्याला ईलाज नाही.

आता चाल्लयं ना वडापाव बद्दल , तो भारताबाहेर काय की भारतात काय सारखाच लागतो. चालू दे ना लळित.

दुसर्‍या देशाच्या सार्वभौमत्त्वाशी निष्ठा असणार्‍या कटरिना, आलिया, दिपिका कशा काय येऊ देतात देशात?

मला काही वाद घालायचा नाही.
कटरिना, आलिया, दिपिका ह्यांनी योग्य ती कागदपत्र देऊन, त्यांचा उदरनिर्वाह भारतात आहे हे कळल्यामुळे न कंटाळता क्लिष्ट प्रोसेस करुन, hopefully योग्य त्या व्हिसा वर भारतात प्रवेश घेऊन राहत असतील. काही बेकायदेशीर असेल तर hopefully Income टॅक्स, ED, EA पैकी कोणाच्या लक्ष्यात येईलच. त्यांच्या प्रतिस्पर्धी पण आहेत की लक्षात आणून द्यायला.

अमेरिकन प्रोसेसची लक्तरे काढायला एका पायावर तयार आहोत हो. फक्त इथे विषय भारताचा आहे, तर त्यातले फ्लॉ काढुया ना!
'ग्रीन कार्ड एक्सटेंशन बंद' असा धागा काढा. तो पण हॉट टॉपिक आहे, तिकडे पण येऊ बोलायला.

आणि शिपिंगचे दोनदा पैसे घेऊन, नाव कसं लिहिलं पाहिजे ह्याची चुकीची माहिती देऊन मग एकदा affidavite आणि मग ते रिजेकट करून सगळे पैसे भरून प$रत अर्ज करायला लाऊन भारतात व्हेटिंग करतात का?

राजसी, भारतावरचं प्रेम फक्त भारतात राहून किंवा भारतीय नागरिकत्वाचं डॉक्युमेन्ट असण्याने सिद्ध होतं अशी ठाम समजूत असेल तर अधिक सांगणे नलगे.

भारतीय सरकार ने लागू केलेले नियम मानले पाहिजेत, पाळले पाहिजेत असं मनापासून वाटतं. पण नक्की नियम काय आणि ते कसे पाळता येतील हेच जर त्यांनां नीट सांगता येत नसेल, त्याची अंमलबजावणी करता येत नसेल तर लोक तक्रारीचा सूर लावणारच.

शेवटी कायदा, नियम कायम पाळणार्‍या लोकांनां जर एव्हढा त्रास होत असेल तर त्याबाबतीत योग्य ते उपाय करणं ह्याने देशाचं, सरकारचं, देशावर प्रेम असणार्‍या अन्य देशातल्या नागरिकांचं वगैरे वगैरे सगळ्यांचंच भलं होईल असं मला वाटतं. वरचे सगळे अनुभव वाचता त्रास झालेल्या लोकांचं प्रमाण मला तरी सबस्टँशियल वाटत आहे. वर एक दोन जणांनीं लिहीलंच आहे जर हे सर्व एव्हढं त्रासाचं असणार असेल तर आमच्यामागे आमची मुलं अजिबात ह्या वाटेला जाणार नाहीत. हे अलार्मिंग नाही का?

Pages