वैद्यकीय 'मेवा'!

Submitted by अँड. हरिदास on 8 December, 2017 - 07:08

वैद्यकीय 'मेवा' !
डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात 'लेक माझी' नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने 'लेक माझी' चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी' या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय 'सेवा' करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!!doctor-new.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक मिळाल्या.
सत्य सांगण्याचा तुमचा आटापिटा समाजाला...

काय राव तुम्ही पण, शोध की लिंक. मी काय त्यांचा वकील होतो का? कारवाई झाली नसेल तर आक्षेप सांगा.. मी उत्तर देईल. जावु दया मला सपडल्या की मीच पाठवतो. पण जरा वेळ लागेल. थोड़ी इतरही काम आहेत.
आणि माझा 'आटापीटा' सुरच राहणार आहे.. मानो या ना मानो.. सत्य आम्हा मनी......

वकीलांनी घातलेल्या खोट्या केसेस, त्यांच्यामुळे सुटलेले गुंड, अ‍ॅक्सिडेंट क्लेमचे साटेलोटे करून कमवलेले करोडो यांच्याबद्दल तर मी बोलतच नाहिये. पैसे घेऊन निकाल दिले असे म्हणणारे दुष्ट आत्मेही माझ्यासोबतच गप्पा मारतात कधीकधी, किस्से सग्ळ्यांनाच सगळे ऐकून ठाऊक असतात. Wink

***

पाच महीने गर्भवती असलेल्या एका १५ वर्षाच्या मुलीवर केवळ जास्त पैसे मिळतात म्हणुन एक डॉक्टर (हा सुद्धा एमडी सर्जन वैगरे कुणी नाही ) गर्भपात करत असेल तर याचे समर्थन आपण करणार आहात का???

<<
आता फॅक्ट्स पाहू. कारण वकीलसाहेब, इथे तरी तुम्ही नैसर्गिक न्यायतत्वांच्या विरोधात बोलत आहात.

१५ वर्षांची मुलगी. !!!!!! वॉव!!

तिला गर्भवती कुणी केले?

मी पैसे न घेता फुकटात ऑपरेट करीन तिला बिचारीला. खड्ड्यात गेले तुम्ही, तुमचे एथिक्स किंवा जे काय कायदे असतील ते.

मी एमडि नाही, सर्जन आहे.

अन एम्डि सर्जन नसलेल्या वैदूंन्बद्दल मी लिहिलंच आहे, तरी तुम्ही सगळ्या "डॉक्टरांना" एकाच तागडित तोलताहात, असे दिसले. त्यांचं मी समर्थन करणार नाहीच, तरीही, त्या १५ वर्षांच्या जिवाची त्या गर्भापासून सोडवणूक करा, असे जीव तोडून सांगेन.

तुमच्या या "समाजा"तले पेडोफिलिअ‍ॅक्स, अन बिनडोकपणे गर्भपाताचा विरोध करणारे उजव्या विचारसरणीचे *शुंभ, यांना हे समजत नाही का, की या मुलीवर मातृत्व लादले जायला नको???? बच्चीकी जान ही ले लो ना! छूट जायेगी बेचारी इस जनम से... Sad Angry

**

महोदय,

वरचा लेख लिहित असताना वैद्य, हकीम, निसर्गोपचारी, मॉडर्न मेडिसिनवाले इ. बद्दल ब्लँकेट डॉक्टर शब्द न वापरता योग्य प्रकारे वैद्य, हकीम, इ. लिहिलेत, तर मला अकांडतांडव करायची गरजच नाही.

या सगळ्या बावळटांची धुणी धुवून कंटाळलो आहे मी.

दूध 'देणे' बंद केलेले आहे.

धन्यवाद.

अ] कारवाई झाली नसेल तर आक्षेप सांगा.. मी उत्तर देईल.

विरुद्ध :

ब]
१. हा जेलात गेला होता माहित नाही का आपल्याला.. आवश्यक त्या सगळ्या कायद्या खाली कारवाई झाली त्याच्यावर.. या घटने नतर तर खरी जनजागराणाला सुरवात झाली. कायदे कड़क केल्या गेले.. अनेक लोकांवर कारवाई झाली.. सरकारने लेक वाचवा मोहीम सुरु केली. राज्यात मुलींचा जन्मदर वाढला.. अनेक समाजसेवी डॉक्टर मंडळीनी स्वतः पुढाकर घेत स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमा सुरु केल्या.. आमच्या जिल्ह्यात लेक माझी अभियान हे त्यातूनच जन्माला आल.. मुंडे डॉक्टर वर झालेली कारवाई पुरेशी होती का? असा आपला रोख असेल तर सन्माननीय मोहदय.. कायदा कायद्याचीच परिसीमा ओलांडु शकत नाही.. हे आपल्या देशातील न्याय व्यवस्थेचे तत्व आहे.. कायद्याने कायद्याचे काम केल.. समाजा ने समाजाच काम केल.. अर्थात याकडे सकारात्मक दृष्टि ने बघावे लागेल..

२ एक कुणीतरी अनक्वालिफाईड वैदू स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत अनेक स्त्रियांचे खून करीत सुटला होता मागे.

तो सुद्धा जेरबंद झाला आहे..

<<

हे आपण लिहिले नसतेत, तर पुढचा टंकनप्रपंच उरलाच नसता.

जौद्या.

Wink

हो. हे विसरलोच होतो. म्हणून झोप लागत नव्हती.

"माणूस पाहून थोडे जास्त घ्या"

ही इंडियन प्रकृती दुर्दैवाने माझ्यात नाही.

करोडपती आहे त्याला एसी रूम हवी तर तिचे चार्जेस एक्स्ट्रा घेईन. पण, ऑपरेशन्/सर्जन चार्जेसमधे पै जास्त लावली नाही अन लावणारही नाही, अन केलेल्या कामात जास्त पैसे देतो म्हणून जास चांगले करीन कमी पैसे देणार्‍याला खराब काम, असे कधीच करणार नाही, हे माझं "तत्व" आहे, अन ते आजवर निभावलं आ।ए.

"माणूस पाहून थोडे जास्त घ्या"

ही इंडियन प्रकृती दुर्दैवाने माझ्यात नाही.

केलेल्या कामात जास्त पैसे देतो म्हणून जास चांगले करीन कमी पैसे देणार्‍याला खराब काम, असे कधीच करणार नाही, हे माझं "तत्व" आहे, अन ते आजवर निभावलं

>> सेम हीअर डॉक.

चित भी मेरी अन पट भी मेरी.. अस असल्यावर काय चर्चा करणार?
बीएएमएस ला काय डॉक्टर म्हणत नाही का?
एकीकडे तुम्ही तत्व मांडता.. दुसरीकडे धंदा करण्याच्या वृत्तीला समर्थन देता..

आ.रा.रा., प्रतिसादांमागची तीव्र भावना आणि कळकळ समजली. मी डॉक्टर नसूनही सहकंपना वाटली. समाजमानसिकता बदलल्याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या टळणार नाहीत. प्रशिक्षित डॉक्टरांनी कितीही नकार दिले तरी खोट्या परंपरांचा पगडा असलेले लोक कुठला तरी रानटी प्रकार वापरून आपल्याला हवे ते करून घेतीलच. आणि त्या प्रसंगी पैशापुढे, धाकापुढे, गुंडगिरीपुढे नमणारे लोक प्रशिक्षित डॉक्टर नसतील, तर कोणी दुसरे असतील पण कोणीतरी नमतीलच, मिळतीलच, येतीलच.
फक्त डॉक्टरी प्रोफेशनला इतका दोष देणे पटत नाही.

>>समाजमानसिकता बदलल्याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या टळणार नाहीत. प्रशिक्षित डॉक्टरांनी कितीही नकार दिले तरी खोट्या परंपरांचा पगडा असलेले लोक कुठला तरी रानटी प्रकार वापरून आपल्याला हवे ते करून घेतीलच.>> अतिशय सहमत.
जोवर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा वगैरे समज समाजातून दूर होत नाहीत तोवर हे सगळं चालूच रहाणार. त्याकरता नुसत्या डॉक्टरांना दोष देऊन बदल होणार नाही.

आरारा, तुमच्या प्रतिसादांमागील कळकळ समजते आहे. वाईट कामे करणारे हरामखोर भरपूर असतीलही, पण चांगलेपणाने झटत राहणारे डॉक्टरही भरपूर आहेत, असे असताना सर्व डॉक्टरांना एकाच कुंचल्याने रंगवायचा अट्टाहास समजेपलीकडचा आहे. सध्या इतकेच लिहितो.

हीरा व सायो ह्यांच्याशीही सहमत.

सर्व डॉक्टरांना एकाच कुंचल्याने रंगवायचा अट्टाहास समजेपलीकडचा आहे.
>> हे कुठे दिसले आपणास?

आमच्या जिल्ह्यात पहिली घटना लोणार इथे घडली.. यात एक अल्पवयीन मुलगी जी ५ महिन्यांची गर्भवती होती तिला गर्भपातासाठी आणण्यात आले होते. सर्व तपासन्या झाल्यावर मुलीची शाररिक क्षमता गर्भपात करन्यासारखि मुळीच नव्हती.>>
आमच्या गावात माझ्या डोळ्यांसमोर अशी घटना घडली आहे. तीही मुलगी अशीच १५-१६ वर्षांची. बलात्कार नव्हता, म्हणजे नसावा. मुलीची आई नेहमी आमच्याकडे मजुरीला येणारी. वडील नाहीत. मुलीला ३-४ महिने पाळी आली नाही म्हणून तिची आई तिला आमच्या नेहमीच्या डॉ. कडे ( एम बी बी एस, डी जी ओ) घेऊन गेली. तपासल्यावर कळलं की गरोदर आहे. सरकारमान्य गर्भपाताची मुदत उलटून गेलेली असल्यामुळे आमच्या डॉ. नी गर्भपात करायला नकार दिला. ( त्यांची चूक नाही. उद्या काही बरंवाईट झालं असतं तर त्या अडकल्या असत्या) . दुसऱ्या एका डॉ. नी ' जबाबदारी घेणार नाही' या अटीवर गर्भपात करून दिला. सुदैवाने मुलगी सुखरूप बाहेर पडली. पण या घटनेची कर्णोपकर्णी बातमी पसरल्यामुळे मुलीचं लग्न ठरेना. शेवटी एक बिजवर मिळाला. संसार चालू असावा.
यात मुलीबरोबर निम्मी चूक ज्या मुलाची होती, त्याला याची काहीही झळ लागली नाही हा सर्वात संतापजनक भाग. मुलीचा मात्र जीव धोक्यात. ( त्याचं नाव तिने सांगितलं होतं, पण त्याने हात वर केले)

अरारांच्या सर्व पोस्ट पटल्या. डॉक्टर कुठून स्वर्गातून पडत नाहीत, त्यामुळे समाजात ज्या प्रवृत्ती असतील त्यांचे प्रतिबिंब डॉ. मध्ये दिसणारच. डॉक्टर सिलेक्टिव्ह गर्भपात करारे चे नारे देत नाहीत. समाजाला हवं असेल तर तो तेच करेल. क्वालिफाईड माणूस नाही मिळाला तर वैदू इ. प्रकार घडतीलच. त्या संदर्भात अमेरिकेचे उदाहरण अगदी चपखल आहे.
सुदैवाने मला भारतात कायम उत्तम डॉ. अनुभव आला आहे. या इंडिया ट्रिप मध्ये काही ना काही कारणाने 3 4 वेगवेगळ्या डॉ./ ओपीडी कडे जाणे झाले, कुणीही अमेरिकेतून आलाय म्हणून जास्त पैसे मागितले नाहीत की टेस्ट करायला सांगितल्या नाहीत.
भारतीय मानसिकते नुसार डॉ. बॅशिंग ही वरवरची मलमपट्टी सोपी आणि सॉफ्ट टार्गेट आहे. मूळ समस्या वेगळीच आहे.

मूळ समस्या अशी आहे की समाज सुधारणेचं काम कोण अंगावर घेईल?त्यापेक्षा कुणाला तरी दोष देणं जास्त सोपं आहे. जोवर लोकांची मेंटॅलिटी बदलत नाही तोवर काहीही बदल होणं शक्य नाही.

कुठल्याही घटनेत अनेक फॅक्टर्स असतात. डॉ. अभय बंगांनी एकदा एक उदाहरण दिलं होतं. सुरुवाती-सुरुवातीच्या काळात धुवांधार पावसात त्यांच्याकडे एक आदिवासी बाई तिच्या आजारी कुपोषित बाळाला घेऊन आली होती. पण दुर्दैवाने ते बाळ वाचलं नाही. या घटनेला अनेक कारणं असू शकतात.
जर ते कुपोषित नसतं, तर ते जगू शकलं असतं.
ती बाई जर इतकी दरिद्री नसती, तर बाळाचं कुपोषण झालं नसतं.
जर इतका धुवांधार पाऊस पडत नसता, तरी ती बाई लवकर पोचू शकली असती आणि बाळ वाचू शकलं असतं.
नदीवरचा पूल अनेक दिवसांपासून भ्रष्टाचारामुळे बांधून होत नव्हता. भ्रष्टाचार नसता, तर पूल झाला असता, बाई वेळेत पोचली असती, बाळ वाचलं असतं.
शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं, की या साखळीतील सगळ्या कड्या आपण दुरुस्त करू शकत नाही, पण एक दुरुस्त केली, तरी बराच फायदा होईल Happy

खाजगी डॉक्टर हे स्वतःचे रेप्युटेशन रहावे म्हणुन एथिक्सना धरुन असतात.एकदा बदनाम झाले की संपले.
आमच्या गावातील एक डेन्टीस्ट एका युवतीचे दात स्वच्छ करत असताना त्याचे टूल पडले ते थेट तिच्या टीशर्टमध्ये गेले .साहेबांनी मुलीला तसदी दिली नाही व तिने बोभाटा केला ,विनयभंगाची केस झाली.आता त्याच्याकडे कोणच जात नाही.
असो,पण शासकीय डॉक्टर या प्राण्याविषयी कोण बोलणार आहे कि नाही.स्वतःचे क्लिनिक उघडून हे वेळ मिळाला तर सरकारी दवाखाण्यात येतात.व अत्यंत तुसडेपणे गरिबांना वागणूक देतात.यांच्या अनएथिकल वागण्याने अनेक रुग्ण दगावतात.मध्यंतरी मोतीबिंदूचे ऑपरेशन करायला सरकारी रुग्णालयात आलेल्या लोकांचे ऑपरेशन एका महीला डॉक्टरने केले,तेही कंटॅमिनेटेड टुल्स वापरुन,काही डझन लोक इन्फेक्शनने आंधळे झाले.गोरखपूरला काय झाले त्यावर धागाच आहे ऋन्मेषचा.
तर,या सरकारी डॉक्टर या प्राण्याविषयी आरारा यांचे काय म्हणने आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

वेगळे वाटते.
>>>>>>
....………ली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही>>>>
इथपर्यंत लेखाशी सहमत.

मात्र त्याच्या पुढच्या परिच्छेदात त्यांनी काय स्टँड घेतला आहे , हर मला नीटसे स्पष्ट झाले नाही.

>>>>अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. >>>>
लेखात दिलेली उदाहरणे फक्त बेकायदा गर्भपात /लिंगनिदान अशा आऊटराईट याची आहेत, लेखक असे सुचवू पाहत आहेत की (काही) डॉक्टर्स या बेकायदा प्रकारांचे समर्थन करतात? जे हे प्रकार करतात ते गुन्हेगार आहेत, त्यांना क्षणभर बाजूला ठेऊ, पण गुन्हा न करणारे डॉक्टर्स पण या प्रकाराची तरफदारी करतात असा अर्थ लेखकाच्या विधानातून काढता येतो, आणि जो निश्चितच चुकीचा संदेश देतो.
लेखात फक्त बेकायदेशीर कृत्यांबद्दल उल्लेख असल्याने माझ्या प्ररिसदात मी फक्त याच बाबीचा विचार करतो आहे, कमिशन घेणे, कर्तेल करून रुग्णास लुबाडने वगैरे आरोपांची उत्तरे देत नाहीये.

>>>>>रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम>>>>
इकडे रुग्णसेवेच्या च्या जागी वेगवेगळ्या सेवांची नावे घालून, हेच वाक्य इतर व्यवसायांना अप्लिकेबल कराल का?
क्लायंट कडून पैसे घेऊन त्याला ग्राउंड फ्लोअर वरचे पिलर कापायला सांगणारा डेकोरेटर, बिल्डिंग मधल्या इतर बिर्हाडकरूंचे प्राण जाण्यास कारण ठरतो,
तिकडे त्याला आपला व्यवसाय प्रामाणिकपणे कर असे सांगायला त्याच्या व्यवसाय बंधुवर दडपण आणतात का?

काळा पैसा दडवणे, फिरवणे यासाठी CA मदत करतात त्या विरुद्ध इतर CA या व्यवसाय बंधुवर दडपण आणतात का?

पैसे खाऊन चुकीचे डिझाईन पास करणारे PWD ऑफिसर्स, नियमबाह्य ठिकाणी बांधकामास अनुमती देणारे ऑफिसर्स यावर त्यांचे व्यवसाय बंधू बहिष्कार टाकतात का?

मग सगळ्याच "सेवा"व्यवसायातील काही माणसे आपापल्या व्यवसायनिष्ठतेशी प्रतारणा करत असताना एकट्या डॉक्टरांना मोरल हाय ग्राउंड घ्यायला लावणे, आणि तसे नाही घेतले तर त्यांची या बेकायदा कृत्याला संमती आहे असा प्रचार करणे पूर्ण: चुकीचे वाटते.

गेला बाजार , ऑन कॅमेरा गुन्हा केलेल्या माणसाचे वकीलपत्र तुमचे व्यवसायबंधू घेतातच ना? वर गुन्हेगाराला येन केन प्रकारेण सोडवतोच म्हणून जास्त फी देखील आकारतात ना? बार कौन्सिल अशा वकिलांची डिग्री रद्द करते का?

वर तुम्ही जी उदाहरणे दिलीत मुंडे, वैदू etc त्यांना कोर्टात रिप्रेसेंट वकिलानेच केले की वकिलांनी त्यांच्यावर समाज नासावण्याचा प्रयत्न केला म्हणून बहिष्कार टाकला?
निर्भया? कोपर्डी? टाकला बहिष्कार? मग डॉक्टर समुदायाने बेकायदाकृत्ये करणाऱ्या लोकांचा विरोध करावा , हा सल्ला देण्याआधी, वकील लोकांनी बेकायदेशीर लोकांच्या केस लढू नयेत, असा विचार केलात तर बेकायदेशीर कृत्ये करणार्यांना जामीन मिळणार नाहीत/ त्यांना फास्ट ट्रॅक कठोर शिक्षा होईल (कारण त्यांचे वकील
नसल्याने कायद्याच्या पळवाट शोधणे, केस डिले करणे वगैरे प्रकार होणार नाहीत)

आणि जर " गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष असतो" या तत्वावर आपला विश्वास असेल तर डॉक्टरांनी पकडले गेलेल्या लोकांचा निषेध करावा(थोडक्यात निर्दोष लोकांचा निषेध करा) असे तुम्ही कसे सांगून शकता?

आणि गुन्हा सिद्ध झालेल्या लोकांचा निषेध करा असे म्हणणे असेल तर, गुन्हा सिद्ध झाला म्हणजेच सबळ पुरावा होता, हा सबळ पुरावा समोर दिसत असताना तुमचा व्यवसाय बंधू माझा अशील निर्दोष आहे असे म्हणत उभा राहतो तर त्याचा निषेध तुम्ही करता का?

<<डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. >>
------ डॉक्टरान्ना देव मानणे अत्यन्त चुकीचे आहेत. ते तुमच्या माझ्या सरखेच मानव आहेत, काहीच फरक नाही.

<< त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. >>
------ डोळे बन्द करुन विश्वास ठेवा असे करणे आत्मघातकी आहे. डॉक्टरान्ना प्रश्न विचारा, शन्का विचारा, शन्केचे निरसन करवुन घ्या. पण निव्वळ डॉक्टर आहे म्हणुन विश्वास ठेवणे मला मान्य नाही.

<< अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. >>
------ असे कुठले क्षेत्र आहे ज्यात अप-प्रवृत्ती नाही आहे? मग वैद्यकीय क्षेत्र त्याला अपवाद कसा असेल?

<< या सरकारी डॉक्टर या प्राण्याविषयी आरारा यांचे काय म्हणने आहे हे जाणुन घ्यायला आवडेल. >>
------- प्रत्येक क्षेत्रात चान्गले-वाईट लोक आहेतच. काही तत्वाला धरुन रहातात, तर त्यान्च्या पैकीच काही लोक स्वार्थासाठी मनमानेल तसे तत्वान्ना तिलान्जली देतात. सरसकट सर्व सरकारी डॉक्टरान्ना एकाच मापात तोलणे अयोग्य ठरेल.

जे डॉक्टर चुकीचे काम करत असतील त्या निवडक सरकारी (किव्वा खासगी) डॉक्टर लोकान्चे, त्यान्च्या अनैतिक, अयोग्य कृतीन्चे समर्थन कुठल्याच काळात आरारा करणार नाहीत असे त्यान्चे लिखाण वाचुन माझे मत बनले आहे.

धागालेखकाने स्पष्टपणे 'काही -चुकीचे वागणारे- डॉक्टर्स' असं लिहिलं आहे लिहिताना तरी 'सर्वच डॉक्टरांचे सरसकट बॅशिंग' चा आरोप करून लेखकाचेच बॅशिंग सुरु आहे. काय म्हणावे या प्रकारला?

आरारा एक डॉक्टर म्हणून आपली बाजू मांडत आहेतच. पण इतरांनी तरी तटस्थपणे वाचून बघावे.

वैद्यकीय पेशातल्या दुष्प्रवृत्ती यावर बोलूच नये असे काही आहे का? तिथे 'दुसरे तरी कुठे काय नीतिमत्ता दाखवतात' ही व्हॉट अबाऊटरी का?

'एखाद्या' डॉक्टरच्या हव्यासामुळे, निष्काळजीपणामुळे मला जन्माचा त्रास होत असेल तर मी तो गुपचूप सहन करावा अशे काही अपेक्षा आहे का? इतर 100 डॉक्टर चांगले आहेत म्हणूम त्या एका नालायकबद्दल एक चकार शब्दही काढू नये? तो एक शब्द काढला तर सरसकट डॉक्टर बॅशिंग करतात म्हणून आरोप करायचे हे काही नीट नव्हे.

जसे आरारा म्हणाले की पेशंट ला रोग डॉक्टर देत नाही तसेच मीही म्हणतो की पेशंट स्वतःहून आजारी पडायला फार उत्सुक नसतो.

कोणाच्याही अडचणींचा गैरफायदा घेण्याचा कोणत्याही व्यवसायातल्या नोकरीतल्या लोकांना मुभा नाही. त्या बाबतीत शिव्या देतांना कोणी कोणाचा भेदभाव करत नाही. सगळ्याच व्यवसायातल्या सगळ्यांनाच शिव्या पडतात. कधी कधी मार ही पडतो. सरकारी अधिकाऱ्यापासून ते हॉटेल व्यावसायिक पर्यन्त, नेत्यांपासून पोलिसांपर्यंत सगळ्यांनाच कधी न कधी मार पडलेला आहे आणि पडत असतोच. तेव्हा डॉक्टरांनी केवळ आपल्यावरच नाहक अन्याय होतो म्हणू चित्र रंगवणे अयोग्य आहे.

डॉक्टर व्यवसायाच्या समस्या आहेतच, त्या कोणीच नाकारत नाही. कोणत्या व्यवसायात समस्या नाही. मागे सोनारांचा संप झालेला तेव्हा एक सोनाराची दर्दभरी दास्तान व्हाट्सअप मधूम फिरत होती, कि कसे सोनार भयंकर त्रास सहन करून व्यवसाय करतायत, अरे काय हे? कोण खनपटीला बंदूक लावून करवून घेतं का तुमच्याकडून तुमचे व्यवसाय? तुमच्या खुशीने तुम्ही असतात त्यात? सोनारानेही समाजावर उपकार केल्यासारखे आपले गार्हाणे मांडावे ह्यापेक्षा मोठा विनोद काय?

डॉक्टर पेशात इतका भयंकर त्रास असेल व इतकी भयावह परिस्थिती असेल जशी आरारा इथे मांडतायत तर अशा व्यवसायांत पडण्यासाठी जे लाखोंच्या संख्येने मुले येत आहेत त्यांना परावृत्त करण्यासाठी प्रबोधन हाती घेतले पाहिजे. जर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे, तणाव आहे, गुंड त्रास देतात, सरकार वसुली करतं, गुलाम समजतं, खण्डनी उकळतात, कमाई अजिबात नाही, वरून लोक रोज धरून प्रत्येक डॉक्टरला उगाचच मारहाण करतात वगैरे असेल तर कशाला हे प्रोफेशन? काही देशात लष्करी भरतीसारखे असते तसे कम्पलसरी तर नाहीये ना आपल्याकडे?

सामाजिक आरोग्य व्यवस्थेचे काय ते सरकार बघून घेईन ना? आणतील चायनातुन डॉक्टर...

(सॉरी आरारा, पण हे 'तुमच्या' विरुद्ध लिहायचे म्हणून नाही.)

वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही.
नका ना जाऊ अशा डॉक्टरांकडे. सरकारी आरोग्यसेवेचा पर्याय आहे की तुमच्याकडे.

नका ना जाऊ अशा डॉक्टरांकडे. सरकारी आरोग्यसेवेचा पर्याय आहे की तुमच्याकडे.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 11 December, 2017 - 13:23

>> "कॅश नाहीये तर पेटीएम, भीम वापरा" असेच की ना?

खाजगी आ व्यवस्था आणि सरकारी आ व्यवस्था यातली तुलना आपण नक्की कोणत्या आधारांवर, निकषांवर केली आहे मार्मिक जी?

अशा डॉक्टरांकडे (विरुद्ध) सरकारी आरोग्यसेवेचा पर्याय
>> हे तुम्हीच लिहिले आहे. तेव्हा तुम्हीच ते स्पष्ट केलेले बरे. नाही का?

खाजगी आरोग्य सेवा महाग अथवा विश्वासार्ह वाटत नसल्यास सरकारी आरोग्यसेवा घ्यायला काय अडचण आहे?

खाजगी सेवा महाग आहे ह्याच्यावर कोणाचा आक्षेप आहे का? मला तर दिसत नाहीये.
खाजगी सेवा विश्वासार्ह नाही पण सरकारी आरोग्यसेवा विश्वासार्ह आहे अशी काही परिस्थिती खरेच आहे का?

----------------------

१. आरोग्यव्यवस्था महाग की स्वस्त हा तुलनेचा मुद्दा नाहीये. मुळात डॉक्टर-हॉस्पिटलं नाव कमावतात ती रिजल्ट्स देतात म्हणून. खूप पैसे घेतात म्हणून नाही. तेव्हा महाग की स्वस्त हा मुद्दा बाद ठरतो. पण 'काही' डॉक्टरांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले की बचावासाठी उगाचच कुठूनतरी हा किंमतीचा अनावश्यक मुद्दा उचलून आणला जातो. मग पुढच्या सगळ्या वादावादीची कोरिओग्राफी. ते आता तोंडपाठ आहे माझ्या. Happy तुम्ही माझा मिपावरचा धागा वाचलेला आहेच.

२. विश्वास हा मुद्दा तुलनेसाठी योग्य नाहीच. सरकारी आरोग्यसेवा अपुरी आहे. ससुन, नायर, केईम आणि थोड्या मोठ्या शहरातले काही सरकारी हॉस्पिटलं म्हणजे राज्यातली सर्वच व्यवस्था उत्तम आहे असे नाही.

खाजगी रुग्णालयात लोक आरोग्यसेवा + कम्फर्ट यासाठी जातात. दोन्हीसाठी डॉक्टर-हॉस्पिटल मागेल ते पैसे भरायला तयार असतात."कम्फर्टसाठी रुग्ण जास्त पैसे मोजायला तयार आहे म्हणून त्याला आरोग्यसेवेत फसवले तरी ते योग्यच आहे, नाही तरी तसे या जगात कोण प्रामाणिक आहे?" ही विचारसरणी योग्य ठरवली जाते आहे असे नाही वाटत?

Pages