हो माझं बाळ. एका ब्रह्मचारी बापाचे बाळ
खूप प्रेम आहे माझे त्याच्यावर. मी त्याला प्रेमाने लालजी बोलतो. लव अॅट फर्स्ट साईट. बघताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो. आणि आजही आहेच.
रोज सकाळी उठलो की सर्वात पहिले डोळे उघडून मी त्यालाच बघतो. माझी तयारी मग त्याच्या जोडीनेच सुरू होते. ब्रश, आंघोळ, दाढी, दूध चहा.. सारे आम्ही सोबतच उरकतो. तसेही आम्हाला एकमेकांशिवाय आहे कोण. नाही म्हणायला एक गर्लफ्रेंड आहे मला. पण ती सुद्धा अशी सतत माझ्यासोबत राहू शकत नाही. लालजीला मात्र मी ऑफिसमध्येही माझ्या सोबतच नेतो. आमच्या ऑफिसमध्ये आपल्या बाळांना आणायला परवानगी आहे हे नशीब. नाहीतर कसे राहिलो असतो आम्ही एकमेकांशिवाय. कामाच्या मध्ये दर अर्ध्या एक तासाने मला त्याच्याकडे बघितल्याशिवाय, त्याच्यासोबत खेळल्याशिवाय राहावतच नाही. ऑफिसमध्ये नाश्ता, जेवण, चहा, सारे काही आम्ही सोबतच घेतो. जेव्हा ऑफिसमध्ये एखादे फंक्शन असते तेव्हा तोच सर्वात पुढे असतो. बरेचदा मी मुद्दाम घरचा डब्बा नेत नाही. मग आम्हाला जेवायला बाहेर जाता येते. तेवढाच त्याच्यासोबत थोडा वेळ घालवता येतो. दिवसभराच्या ऑफिसच्या कामात त्याच्यासाठी म्हणून खास काढलेला एक क्वालिटी टाईम
ऑफिसमध्ये जाताना आणि ऑफिसहून येताना, ट्रेनच्या प्रवासात मी त्याला दोन हातात धरून मांडीवर बसवून खेळवतो तेव्हा सार्या नजरा माझ्यावरच रोखल्या आहेत असा भास होतो. ईतके गोंडस लेकरू आणखी कोणाचे नसावे. घरी पोहोचल्यावर मी चटकन कपडे बदलून पटकन फ्रेश होऊन घेतो. मग आमचा प्लेईंग टाईम सुरू होतो. ऑफिसमध्ये दिवसभर माझ्या सोबत असला तरी ऑफिस ते ऑफिसच. तिथे काम करावे लागते. त्याच्याशी सतत खेळता येत नाही. त्यामुळे मग दिवसभराचा कोटा संध्याकाळी पुर्ण केला जातो. जेवतानाच काय ती थोडावेळ विश्रांती. जेवणखाणे, धुनीभांडी, एखादी सिरीअल, मॅचच्या हायलाईटस वगैरे बघून झाल्या की पुन्हा तो आहे आणि मी आहे
माझ्या आईनेही कधी आमच्या नात्यावर आक्षेप नाही घेतला. पहिल्यांदा जेव्हा त्याला घरी आणले तेव्हा तो तिला ईतका आवडला नव्हता. खरे तर तिला न विचारता, तिची परवानगी न घेता असे केले हे तिला आवडले नव्हते. पण हळूहळू तिचेही त्याच्याबद्दलचे मत बदलले.
आणि आता तर रात्रीही तो माझ्या शेजारी, अगदी माझ्या कुशीतच झोपतो. झोपेत तो बेडवरून खाली पडून त्याला लागू नये म्हणून मी बेडच्या चहूबाजूने उश्यांचे कुशन ठेवतो. कारण त्याच्यासोबत खेळताना मलाच कधी झोप लागते हे समजत नाही
तर त्या दिवशी काय झालं, मी माझ्या लालजीसोबत ऑफिसला जात होतो. आम्ही रिक्षातून उतरलो. स्टेशनच्या अगदी समोरच. मी एका हाताने त्याला धरले होते, आणि एक हाताने मागच्या खिशातले पैश्याचे पाकिट काढत होतो. त्या नादात हाताची पकड थोडी ढिली झाली असावी. याचा फायदा उचलत कोणीतरी भामटा माझ्या हाताला हिसका देत लालजीला उचलून पळालाही. माझ्या काही लक्षात येईपर्यंत रिक्षात बसून फरार. भर दिवसा माझ्या डोळ्यादेखत माझे लेकरू माझ्यापासून हिरावले गेले .. मी वेड्यासारखा ओरडत रिक्षामागे पळू लागलो.. लालजी लालजी.. कुठतरी रिक्षा थांबेल.. कुठेतरी सिग्नल लागेल.. कुठेतरी ट्राफिकमध्ये सापडेल.. मी ओरडत सुसाट पळत होतो.. लालजी लालजी.. ओरडतच दचकून उठलो.. मोजून साडेतीन सेकंद लागली ते स्वप्न होते आणि हे सत्य आहे याचे भान यायला. पडल्यापडल्याच टेबल लॅंपचे बटण चालू करून कुशीत वळलो. माझंच बाळ ते, तसेच शांतपणे पहुडले होते जसे मी त्याला डोळा लागण्याआधी सोडले होते. जीवात जीव आला. अलगद त्याच्या अंगावरून एक हात फिरवला, आणि त्याला कुशीत घेत पुन्हा झोपी गेलो.
खरंच, आज अशी परिस्थिती आहे की मी एकवेळ माझ्या गर्लफ्रेंडला न भेटता काही दिवस राहू शकतो. पण माझ्या लालजीपासून फार काळ दूर राहू शकत नाही. तसेच त्याला सोडून कुठे जाऊही शकत नाही. प्रेम म्हणा, वेड म्हणा, किंवा आणखी काही. जे काही आहे ते हे असे आहे
- ऋन्मेष
ईथे माझा रुमाल !
ईथे माझा रुमाल !
हम्म.. मोबाईलप्रेम..
हम्म.. मोबाईलप्रेम..
काळजी करू नको ऋ.. हे खूप कॉमन आहे..
म्हणजे पूर्णवेळ त्यात गुंतलेले असणे, सतत सोबत असणे, चोरीला जाण्याची भीती वाटणे, हातातून पडून फुटण्याची भीती वाटणे, प्रत्येक मोकळा वेळ मोबाईल मध्ये बघण्यात जाणे इत्यादी इत्यादी..
रच्याकने.. लालजी म्हणजे मॉडेलचा रंग लाल आहे की मोबाईल कव्हरचा?
रेडमी असावा.
रेडमी असावा.
शक्य आहे केश्वि
शक्य आहे केश्वि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चुकीचे अंदाज
चुकीचे अंदाज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी मी स्वत: रेड मी रेड मी करणारा आहे हे कबूल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाकी मी स्वत: रेड मी रेड मी
बाकी मी स्वत: रेड मी रेड मी करणारा आहे हे कबूल Wink
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 7 December, 2017 - 00:06
ऋ भाऊंच्या या सवयीला १००% अनुमोदन.
मिस्टर बिन त्याचा टेडी घेऊन
मिस्टर बिन त्याचा टेडी घेऊन फिरायचा अन वेडे चाळे करायचा. अर्थात कार्टून कॅरॅक्टरच ते. घटका दोन घटका लोकांचे मनोरंजन होते.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण असा प्रकार नसावा इथे. कसेही असले तरी आपले ऋ भाऊ सुज्ञ आहेत
रेड वाईन ची बाटली !
रेड वाईन ची बाटली !
डाबर लाल तेल असणार.
डाबर लाल तेल असणार.
मेरा भी लाल !!!
Laptop?
Laptop?
मिस्टर बीन आणि त्याचा टेडी>>>
मिस्टर बीन आणि त्याचा टेडी>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ट्रेनमध्ये टेडीला मांडीवर बसवून खेळवतोय आणि लोकं माझ्याकडे विचित्र नजरेने बघताहेत असे चित्र डोळ्यासमोर आले
रेड वाईन >>> काय हे.. मी स्वत: ईथे मद्यप्राशनाला विरोध करतो. तेच मी कुठे कवटाळून बसू...
डाबर लाल तेल >>>> नाही
लॅपटॉप >>> छान .. पण चुकीच अंदाज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती आटापिटा शेवटी सगळयांचे
किती आटापिटा
शेवटी सगळयांचे अंदाज चूकीचे ठरवून ऋन्मेष नवीन तर्क मांडणार. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मोम्बाईल नाही? लॅट्पॉट पण
मोम्बाईल नाही? लॅट्पॉट पण नाही? टॅब????
बाळ आहे म्हण्तोय ना तो?? मग
बाळ आहे म्हण्तोय ना तो?? मग मोबाईल, लॅपटॉप कुठुन आलेत?
ऋन्मेषचा रुमाल असेल लाल
ऋन्मेषचा रुमाल असेल लाल रंगाचा . त्याला सारखी सर्दी होते ना
पण चोर तो शेंबडा रुमाल
पण चोर तो शेंबडा रुमाल हिसकावुन पळतोय अशी स्वप्न का पड्तील मग?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि रुमालाशी काय खेळ खेळणार?
एका ब्रह्मचारी बापाचे >>>
एका ब्रह्मचारी बापाचे >>> अविवाहित लिहायचे होते का?
रूमाल नाही वापरत तो. शिंप्या
रूमाल नाही वापरत तो. शिंप्या कडून कापडी तुकडे आणून वापरतो. पण लाल रूमाल बघून बैल शिंगावर घेईल ना.
बादवे रूमाल धुता कधी? २४ तास तुमच्या सोबत असतो ना.
अनघा +१
सस्मित
सस्मित![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
बहादुत, तू बाप कैसे बन गया?!
बहादुत, तू बाप कैसे बन गया?!!
बाळ आहे म्हण्तोय ना तो?? मग
बाळ आहे म्हण्तोय ना तो?? मग मोबाईल, लॅपटॉप कुठुन आलेत?
>>>>>
अगदी हेच माझ्या मनात आले.
म्हणजे लोकांनी ठरवूनच टाकले की याचे बाळ असूच शकत नाही. म्हणजे एक पुरुष एकट्याने बाळ सांभाळूच शकत नाही.
मुळात मी माझ्या बाळाप्रती माझ्या भावना मांडायला लेख लिहिला. पण लोकांनी त्याचे चक्क कोडे सोडवा करून टाकले. एक पुरुष म्हणून मी नक्कीच दुखावलो गेलो.
बाकी मी अविवाहीत आणि ब्रह्मचारी दोन्ही आहे. निव्वळ गार्डनमध्ये गळ्यात गळे घालून गुलूगुलू बोलल्याने कोंणाचे ब्रह्मचर्य नष्ट होत नाही.
अवांतर - हल्ली मी रुमाल वापरतच नाही. खिश्यात एक टिश्यू पेपरची फिरकीच बसवून घेतलीय. युज एन्ड थ्रो. खिश्यात एक हात घालून, खेचायचं, तोडायचं, पुसायचं, टाकायचं.. दोनचार दिवसाने गुंडाळी संपली की रिफिल करायचे.
आणि रुमालाशी काय खेळ खेळणार?
आणि रुमालाशी काय खेळ खेळणार?
>>>
रुमालपाणी म्हणून एक खेळ असतो. मध्ये रुमाल ठेवायचा. ईकडून मुलगा येणार. तिकडून एक मुलगी येणार. दोघे रुमालाभोवती घुटमळत बसणार. मग त्यांची नजरानजर होणार. मुलगी नजर लगेच काढून घेणार. पण मुलग्याची नजर अडकून राहणार. याचा फायदा घेत मुलगी रुमाल उचलून पळून जाणार... वर्षानुवर्षे हा खेळ चालू आहे आणि तुम्ही बोलता रुमालाचा खेळ कोणता..
आज फेकाफेकी डे आहे काय?
आज फेकाफेकी डे आहे काय?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कुत्रं बित्रं आहे काय?
पण आपल्याकडे म्हणजे इंडियात कुत्रं ऑफिसात आणुन देणार नाहीत. म्हणजे नसावेत. एमेन्सीत चालत असेल तर माहित नाही.
आणि कुत्रं कोण कशाला नेईल ऑफिसात. आणि चोर तरी कशाला हिसकावुन नेईल. (चोराचा पॉइंट डोक्यात फिट बसलाय माझ्या)
स्मिते..
स्मिते..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला पण पहिले लॅपीच वाटलेला. पण ऋ नाही म्हणतोय तर काय असावं बरं??
मला आधी मोबाईल वाटला होता. पण
मला आधी मोबाईल वाटला होता. पण ऋन्मेष नाही म्हणत आहेत.
वॉलेट असेल लाल रंगाचं!!
मला मोबाईलच वाटला कारण
मला मोबाईलच वाटला कारण बाळाला ऑफिसमध्ये नेणे शक्य नाही.
पिंपल्स किंवा तत्सम प्रकार
पिंपल्स किंवा तत्सम प्रकार असणार!
पिंपल्स मांडीवर घेऊन कसा
पिंपल्स मांडीवर घेऊन कसा खेळवेल तो?? आणि सस्मितच्या स्ट्राँग पाॅइंटचा विचार केला तर चोर पिंपल्स का आणि कसं काय चोरून नेऊ शकेल??![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चष्मा किंवा तत्सम की काय ?
चष्मा किंवा तत्सम की काय ?
Choramule pimple burst jhala
Choramule pimple burst jhala asel![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Contact lense asu shakel
Pages