हो !! मला मिळालेला नकार ...
लग्नाचाच नकार !!
मी ऋन्मेष.
आडनाव नाही सांगत, त्याने जात कळते.
राहायला दक्षिण मुंबई, कामाला एमेनसी. एक गर्लफ्रेंड आहे, लग्न तिच्याशीच करायचे आहे.
हे जरी तुम्हाला माहीत असले तरी गेले काही दिवस लाईफमध्ये टेंशनच चालू आहे.
गर्लफ्रेंडबाबत एवढ्यात घरी कळवले नसल्याने आणि पुरेसे वय झाले असल्याने घरच्यांनी आपले कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली आहे.
म्हणजे माझ्यासाठी मुलगी शोधायला घेतली आहे.
माझे आईबाबा अजून डिजिटल पॅरेंटस झाले नसल्याने त्यांचे शोधकाम पारंपारीक पद्धतीनेच चालू झालेय. जातीमध्ये आणि नात्यामध्ये काही मुली सांगून येत आहेत. तर काही मुलींना मी सांगितलो जात आहे.
उगाचच कांदेपोहेच्या सतरा पंगती उठायला नकोत म्हणून फोटो आणि बायोडाटा बघूनच मुली शॉर्टलिस्ट केल्या जात आहेत. खरे तर आतापर्यंत एकच मुलगी कशीबशी सर्वानुमते शॉर्टलिस्ट झाली होती. आणि नेमके तिनेच मला नकार दिला आहे.
तर झाले असे ........
........................
"उद्या मला बघायला मुलगी येणार आहे." एका रम्य संध्याकाळी गार्डनमध्ये पडल्यापडल्या हातात तिचा पाय घेत मी म्हणालो.
"बघायला? का? तू काय राष्ट्रीय पक्षी मोर आहेस का?" ईति गर्लफ्रेंड ... बहुतेक मला काय म्हणायचे होते हे तिच्यापर्यंत नेमके पोहोचले नव्हते.
"अग्ग लग्नासाठी बघायला येणार आहे"
"काय???"
"हो .."
"नालाय्यक !!!!!"
आणि मी तिचा पाय आणखी घट्ट पकडला. नालायक म्हणजे फारच चिडली असावी, ही तिची हाय्येस्ट लेव्हल ऑफ शिवी होती. याआधी फक्त दोनदाच दिली होती. एकदा जेव्हा माझ्या खिशात तिला सिगारेटचे पाकीट सापडले होते तेव्हा आणि दुसर्यांदा जेव्हा माझ्या गॅलरीत तिने तिच्या मैत्रीणीचा फोटो पाहिला होता तेव्हा. दोन्ही वेळा वेळीच गैरसमज दूर केले होते. यावेळी मात्र खरोखरच मला मुलगी बघायला येणार होती. आणि मुलगी मला बघणार म्हणजे मी सुद्धा तिला बघणार एवढे सायन्स तर तिच्याही शाळेत शिकवले होते. तसेच मी एखादी मुलगी बघितली की बघतच राहतो एवढे तर ती देखील मला ओळखून होती. त्यामुळे तिचा राग योग्यच होता.
"येतो मी. उद्याच तिला नकार कळवतो. नाहीतर तिचाच नकार मिळेल असे काहीतरी करतो. आता परवाच भेटू" असे बोलून मी तिचा पाय सोडला आणि तोच हात डोक्याला लावत तिथून काढता पाय घेतला.
तिचाच नकार मिळेल असे काहीतरी करतो असे म्हटले खरे.... पण ते शक्य नव्हते. मुलगी नात्यातूनच सांगून आलेली. लग्नाला नकार देताना तिने जर ते कारण घरी सांगितले असते तर फिरून पुन्हा माझ्याच अंगाशी आले असते. त्यामुळे असे काहीतरी कारण शोधणे गरजेचे होते जे तिने मला नकार देण्यास पुरेसे ठरावे पण त्याचवेळी जगाला मात्र ते क्षुल्लक वाटावे. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची नव्हती पण वाजवायची होती. गाजराची पुंगी वाजवायचीही होती आणि खायचीही होती. लग्नाचा लाडू खायचा होता पण उद्याचे कांदेपोहे मात्र पचवायचे नव्हते. एखाद्या फिल्मी सिच्युएशनला साजेसा असा तो दिवस उजाडला.
मुलीचे पहिले दर्शन होताच मी तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. मुलीच्या सौंदर्यात खोट काढावी अशी एकही गोष्ट नव्हती. पायाचे अंगठेही अगदी छान कळीदार नाजूक होते. एखाद्या सुंदर मुलीला अश्याप्रकारे न्याहाळण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. याआधी जिथे जिथे सौंदर्य आढळेल तिथे तिथे नजर खिळून राहायची. आता पळून जात होती. मुलगी धनुष्याची कमान ताणल्यासारखी गोड हसत होती आणि माझ्या कपाळावर तलवारीचे वार केल्यासारखे आठ्यांचे जाळे पसरत होते.
पंधरा मिनिटांच्या कौटुंबिक गावगप्पांनंतर आम्हाला एकांतात जायची संधी मिळाली,
आणि भीतभीतच मी तिला वेगळे काहीच न सुचल्याने पहिलाच प्रश्न विचारला, "तू किंवा तुमच्या घरचे कोणी मायबोलीवर आहे का ग्ग?"
"काय आहे हे मायबोली?"
"........" मी शांतच.
"व्हॉटसप फेसबूकसारखे अॅप आहे का?" तिचे तर्क लढवणे सुरू झाले.
झाली पंचाईत, उगाच काय आहे हे शोधायला गेली तर जमले माझे लग्न. तसे लग्न करायचे नव्हतेच. पण तिने लग्नाला नकार द्यायचे हे कारण घरी समजले असते तर सर्वात पहिले माझा लॅपटॉप फुटला असता आणि त्यानंतर ईंटरनेट कटला असता.
"अग्ग नाही ग्ग, मी विचारले तुमच्या घरी मायबोलीमध्ये, म्हणजे मराठी मध्ये बोलतात का?" मी सारवासारव मोडमध्ये.
"अय्या, घरी कश्याला ईंग्लिश फाडू?" तिची अय्या बोलायची स्टाईल सेम माझ्यासारखीच होती. आमचे खूप जमणार असे पहिल्यांदाच वाटले. पण लगेच स्वत:ला सावरले. आपल्यासाठी ही भेट फक्त औपचारीकता आहे आणि आपली एक गर्लफ्रेंड आहे याची मनाला आठवण करून दिली.
ती पुढे म्हणाली, "आईला मॉम नाही तर मम्मी बोलणारे आहोत आम्ही. घरी फक्त मराठीतच" .. तिचे हे मातृभाषा आणि मम्मी द आईवरचे प्रेम बघून माझे आईज पाणावले.
"मी घरीही मराठी आणि बाहेरही मराठीच. मला ईंग्लिश नाही जमत" तिचा नकार मिळवण्यासाठीचा मी माझा पहिला पत्ता फेकला.
पण ती ढिम्मच!
"तुला जमते का चांगले ईंग्लिश?" मी विषय पुढे वाढवला.
"हो तर, म्हणजे काय. मी फादर डिसोझाची आहे"
"पण तुझे फादर तर.. म्हणजे तू तर.. हनमंतरावकाकांची मुलगी आहेस ना?" मी कळून सवरून आगाऊपणा करू लागलो.
"ए स्टुssपिड, माझ्या स्कूलचे नाव आहे ते"
"ओह, सॉरी. पण मला ईंग्लिश जमत नाही हे तुमच्या फादर डिसोझांना चालेल का?"
"हा हा, यू आर सो फनी. पण फादर नाहीयेत आता. फादर डिसोझा म्हणजे ग्रेट माणूस होते, असे फादर मिळायला नशीब लागते, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त ......." पुढे जवळपास दहा पंधरा मिनिटे फादर कौतुक सोहळा चालू होता. तो का चालू होता, त्याचा माझ्याशी काय संबंध, आमच्या आजच्या भेटीशी त्याचे काय घेणेदेने, काहीच समजत नव्हते.
"बाय द वे, तू कोणत्या शाळेत होतास?"
"मीss.. मी संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय, मराठी माध्यम.. गाडगेबाबा हे ग्रॅण्डफादर होते. ते सुद्धा आता नाहीयेत. थोडेसे गूगल केले तर समजेल त्यांच्याबद्दल... पण ते सोड, तू सांग ना. मला नाही जमत ईंग्लिश, तुला चालेल का?"
"मी शिकवेन ना... आई विल टिच यू" ... फादर कन्या आताच शिकवायला सुरुवात करतेय की काय असे वाटले. माझा पहिला ईंग्लिशचा वार खाली गेला होता.
प्रेम केलंय, लग्न पण
प्रेम केलंय, लग्न पण तिच्याशीच करायचं आहे तर घरी तोंड उचकटुन सांगायची हिंमत करायची.
मग असे नकार होकार बघाबघी करावी लागत नाही.
आडनाव नाही सांगत, त्याने जात
आडनाव नाही सांगत, त्याने जात कळते. >>>
सस्मित हो कबूल आहे. पण एक वेळ
सस्मित हो कबूल आहे. पण एक वेळ असते ना. तोपर्यंत किल्ला लढवावाच लागतो. लोकांचे आरोप मान अपमान झेलावेच लागतात
आडनाव नाही सांगत, त्याने जात
आडनाव नाही सांगत, त्याने जात कळते. >>> जात कळली तर फरक काय पडतो?
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी....
@पवनपरी, आडनाव कुठून आणायचं?
@पवनपरी, आडनाव कुठून आणायचं?
मला पुन्हा हसायला नका लावू हो..
लेखाच्या सुरूवातीलाच ते वाक्य वाचून माझी हसून हसून पुरेवाट झालीय..
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.... >>>> मराठी असणे आले बघा यातही
असो, या विषयावर पुन्हा कधीतरी. पण धर्म पंथ जात न मानणे, तसेच न लावणे, न मिरवणे हेच उत्तम.
अवांतर - आपातर्यंत सांगून आलेली सारी स्थळे जातीतील वा त्या आसपासचीच आहेत. आणनारे मराठी लोकंच आहेत. त्यामुळे आपण म्हणता त्या श्लोकाला काही अर्थ नाही. तसे असले पाहिजे नक्कीच, तो आदर्शवाद आहे. पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाहीये.
राहुल हसण्यासारखं काय आहे?
राहुल हसण्यासारखं काय आहे?
असो, मी सर्वधर्मसमभाव मानणार्यांपैकी आहे. ते मराठी गाण्यात आहे म्हणून तसंच लिहिलं.
राहुल हसण्यासारखं काय आहे? >>
राहुल हसण्यासारखं काय आहे? >>>
माझ्या एका आवडत्या लेखकाच्या कथेतलं वाक्य आहे ते!
खूप दिवसांनी मजा आली वाचून
खूप दिवसांनी मजा आली वाचून ऋन्मेषदा!
पुभाप्र.
ऋ कन्फर्म कर. नाहीतर नक्कीच
ऋ कन्फर्म कर. नाहीतर नक्कीच ड्युआडी निघायची माबोवरची.
"बाय द वे, तू कोणत्या शाळेत
"बाय द वे, तू कोणत्या शाळेत होतास?"
"मीss.. मी संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय, मराठी माध्यम.
>>> ही कोणती शाळा, महाविद्यालय म्हणजे कॉलेज ना?
च्रप्स, ते फक्त तिला
च्रप्स, ते फक्त तिला सांगण्यासाठी बोललेलं.. तिच्या लक्षातच आलं नसेल.. मग तेच येथे लिहीलंय, महाविद्यालय!
हि नुसती प्रस्तावना? पिक्चर
हि नुसती प्रस्तावना? पिक्चर अभी बाकि है क्या दोस्त?..
हो हि अशीच प्रस्तावना आहे.
हो हि अशीच प्रस्तावना आहे. खरे तर धागा काढायला पाल्हाळ काहीतरी लावायचे म्हणून लिहिलेय. दोनचार मनाचे संवाद टाकून. शाळेचे नाव सुद्धा तसलेच. खरे तर मला जो नकार मिळाला आहे तो ज्या कारणासाठी मिळाला आहे त्यावर धागा काढायचा होता.. आय मीन काढायचा आहे.. पण हे लिहिलेले अगदीच मिस्टर बीनमध्ये टाकायला नको म्हणून यावर एक धागा काढला. पुढच्या धाग्यात सरळ त्या कारणालाच हात घालतो. माझ्यासारख्या मुलांना अश्या क्षुल्लक कारणासाठी नकार देणारया तमाम मुलींना मला मायबोलीच्या माध्यमातून जाबच विचारायचा आहे
पण ऋ,नकारच अपेक्षित होता ना!
पण ऋ,नकारच अपेक्षित होता ना! मग काय फरक पडतो... तिला दुसरी काही खोट दिसली नसेल मग काहीतरी क्षुल्लक कारण केलं असावं पुढे आता ते तर पुढच्याच धाग्यात कळेल म्हणा..
क्षुल्लक नाहीये खरे तर .. पण
क्षुल्लक नाहीये खरे तर .. पण या कारणासाठी कोणत्या मुलाने आजवर मुलीला नकार दिला नसेल म्हणून क्षुल्लक बोललो. खरे तर चुकलाच तो शब्द.
बाकी मला नकारच हवा होता, पण तो असा माझा स्वाभिमान दुखावून नाही.
हे नकाराचे तुमच्या द्रुष्टीने
हे नकाराचे तुमच्या द्रुष्टीने शुल्लक असे कारण तुम्ही ईथे दिले आणि तुमच्या करंट गर्ल फ्रेन्ड ने ते ईथे वाचले तर??
सस्मित म्हणते तस हे सगळ करायलाच नको होत...
पण या कारणासाठी कोणत्या
पण या कारणासाठी कोणत्या मुलाने आजवर मुलीला नकार दिला नसेल म्हणून क्षुल्लक बोललो. >>> इथे 'कोणत्या मुलीने आजवर मुलाला' असे पहिजे ना ऋ भाऊ?
ऋ साहेब घरी सांगून टाका. आपण
ऋ साहेब घरी सांगून टाका. आपण लग्न ठरवलेलं असताना असं कांदे पोहे प्रोग्रॅम करत बसणं योग्य नाही.
ती पुढे म्हणाली, "आईला मॉम नाही तर मम्मी बोलणारे आहोत आम्ही. घरी फक्त मराठीतच" .. तिचे हे मातृभाषा आणि मम्मी द आईवरचे प्रेम बघून माझे आईज पाणावले. >>>
"पण तुझे फादर तर.. म्हणजे तू तर.. हनमंतरावकाकांची मुलगी आहेस ना?" मी कळून सवरून आगाऊपणा करू लागलो. >>>
हे पंचेस भारी, खुसखुशीत.
अन्जू, अदिती हो, सहमत आहे. हा
अन्जू, अदिती हो, सहमत आहे. हा पहिला आणि शेवटचाच असेल. मला कल्पना नसताना ठरवला गेलेला. अचानक गर्लफ्रेंडबद्दल सांगू शकत नाही. पण आता सांगायची वेळ आली आहे हे मान्य.
अजब ते योग्यच लिहिले आहे. या कारणासाठी म्हटले तर मुलेही नकार देऊ शकतात पण ते शक्यतो देत नाहीत. त्याच कारणासाठी मुली मात्र आजही नकार देतात हे चित्र आता स्त्री-पुरुष समानतेच्या काळात तरी बदलायला हवे.
हल्ली पालक मोस्टली विचारतात
हल्ली पालक मोस्टली विचारतात मुलांना की तू कुठे ठरवलं आहेस का, असेल तर सांग. नाहीतर स्थळे बघायला सुरुवात करूया.
हो खरंय, पण आंतरजातीय
हो खरंय, पण आंतरजातीय उच्चनीचची भानगड असल्याने पाल्य लगेच धजावत नाहीये ईतकेच. वेळ पडली तर ब्याग उचलून दोघांनाही घराबाहेर पडता यायला हवे ना
(No subject)
अरे पण त्या फ्रीजच्या
अरे पण त्या फ्रीजच्या धाग्यावर तू म्हणाला होतास की फ्रीज खरेदी गफ्रे आणि घरच्यांच्या संमतीने झाली. म्हणजे घरी माहीती असलेली "ती" वेगळी होती का?
ती पुढे म्हणाली, "आईला मॉम
ती पुढे म्हणाली, "आईला मॉम नाही तर मम्मी बोलणारे आहोत आम्ही. घरी फक्त मराठीतच" .. तिचे हे मातृभाषा आणि मम्मी द आईवरचे प्रेम बघून माझे आईज पाणावले. >>> Lol
ऋ साहेब घरी सांगून टाका. आपण
ऋ साहेब घरी सांगून टाका. आपण लग्न ठरवलेलं असताना असं कांदे पोहे प्रोग्रॅम करत बसणं योग्य नाही. >> +१
मला तर ही भिती वाटतेय, पुन्हा
मला तर ही भिती वाटतेय, ऋ चं लग्न झाल्यानंतर पुन्हा हे आजपर्यंत आलेले सगळे धागे रिपीट होणार...
घरी सांगुन टाक लवकर ऋन्मेष!
घरी सांगुन टाक लवकर ऋन्मेष!
मी मुर्खपणा केला व ३२ वर्षाचा घोडनवरा आहे आज .बेस्ट लक
पाथ,
पाथ,
अहो सध्या माबोवर गफ्रेंड गफ्रेंड करतो ती एकच आहे हो. ती सुद्धा हिच होती. फ्रिज तिच्याच पसंतीने घेतला आहे. पण हे घरी माहीत नाही.
अक्कल,
तुमच्या ट्रॅजेडीबद्दल खेद आहे. पण 32 वय हे फार आहे समजू नका. तुमची एवढे थांबायची ईच्छा नसताना 32 झाले म्हणून तुम्हाला फार वाटत आहेत. अन्यथा ठरवून 35 पर्यंत लग्न न करणारे कैक असतात.
आणि देवाने आपल्याला 32 दात दिलेय याचे काहीतरी लॉजिक असेल. 32 वर्षे 32 दात दाखवत आपण हसत आनंदात राहावे अशी त्याचीही ईच्छा असेलच
३२ मुलाचे वय म्हणजे फार नाही.
३२ मुलाचे वय म्हणजे फार नाही. माझ्या ओळखीतल्या कित्येक मुलीपण ३२+ आणि happily single आहेत. आताची जी स्थिती आहे त्यापेक्षा आनंदी होऊ अशी खात्री असेल तरच लग्न करायचं! उगाच सगळे पाट्या टाकतात म्हणून आपणपण टाकल्याच पाहिजेत असे नाही
Pages