लोकहो, मस्त थंडी चालू झाली आहे आणि बाजारात जागोजागी मटाराच्या शेंगांचे ढीगच्या ढीग दिसू लागलेत. खादाडीचे, चंगळ करण्याचे दिवस चालू झाले आहेत.
'नाव एक चवी अनेक' यानुसार प्रत्येकाची मटाराची उसळ करण्याची पद्धत वेगवेगळी असेल. या धाग्यावर आपण निरनिराळ्या चवीच्या मटार उसळीच्या कृती जमवूया.
पाककृती वेगळ्या, नवीन धाग्यावर लिहा, इथे प्रतिसादात फक्त लिंक द्या, मी हेडरमधे अपडेट करेन. कारण काय आहे की ढीगाने आलेल्या प्रतिसादांतून नेमकी पाककृती शोधणे अवघड जाईल, स्वतंत्र धाग्यावर लिहिलेल्या पाककृती शोधायला सोपे जाईल कारण त्या सर्चमध्ये येतात.
मटार पुलाव, मटार पॅटीस, मटार कचोरी, मटार हलवा, मटार खीर इत्यादींसाठी वेगळा फॅन क्लब काढा
इथे फक्त आणि फक्त मटार उसळच येऊद्या. करी, भाजी इत्यादी पदार्थ चालतील, थोडक्यात पोळीशी लावून खायचे मटाराचे पदार्थ इथे येऊ द्या. आणि पाककृतीमध्ये फोटो हवेतच.
:मटार उसळ करण्याची माझी पद्धत:
चार वाट्या ताजे मटाराचे दाणे
दोन छोटे कांदे
अर्धी वाटी ओलं खोबरं
तीन-चार लसणीच्या पाकळ्या
गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, गूळ
तेल आणि फोडणीचं साहित्य
मटाराचे दाणे शिजवून घ्या. अगदी टणटणीत दाणे नकोत आणि अगदी गाळही शिजवायचे नाहीत. मी बेबीकूकरमधे एक शिट्टी काढून शिजवून घेते, म्हणजे सगळेच दाणे एकसारखे शिजतात.
कांदा उभा पातळ चिरून घ्या. लसणी सोलून घ्या. कढईत अगदी दोन-तीन थेंब तेल तापवून त्यात कांदा-लसूण-ओलं खोबरं खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून मस्त गुळगुळीत वाटून घ्या.
कढईत तेल तापवून मोहरी-जिरं-हिंग-हळदीची फोडणी करा. शिजलेले मटार त्यात परतून घ्या. थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मग त्यात कांदा-खोबर्याचं वाटण घाला. लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून ढवळा. आमच्याकडे तिखट-गोड या चवी बरोबरीने लागतात त्यामुळे गूळ लागतोच. रस्सा पातळ हवा की अंगासरशी हे आपापल्या आवडीप्रमाणे ठरवा त्याप्रमाणे आवश्यक तेवढं पाणी घालून उसळ मस्त उकळू द्या.
गरम फुलक्यांबरोबर ओरपा. सोबत ताजा गाजरहलवा असेल तर मग स्वर्गच!
गाजर मटार भाजी - मनिषा लिमये
गाजर-मटर सब्जी - अल्पना
ओल्या मटारचं पिठलं - अल्पना
कटर की सब्जी (मटारच्या सालींची भाजी) - अल्पना
मृण, अहाहाहाहाहाहा!! तू
मृण, अहाहाहाहाहाहा!! तू लिहिल्याप्रमाणे उसळ करतेच आता. तू पाकृ लिहितेस तेव्हा त्यात एखादी तरी पंचलाईन जबरी असते, वाचल्यावर एकदम जीभेवर ती चव तरळलीच पाहिजे. उदा. इथे लिहिलं आहेस तसं 'थोडी (ताजी) लवंग-दालचिनीपूड घालायची.' किंवा 'तुपात पोळवून घेतलेलं तिखट' वगैरे
सिंडे, मटाराच्या मागे धावणारी मांजरीची खट्याळ पिल्लं डोळ्यांसमोर आली.
काऊ, हा धागा केवळ मटाराच्या उसळी किंवा भाज्यांच्या रेसिप्यांसाठीच आहे. बाकी मटाराच्या कचोर्या, पुलाव करंज्या, पॅटीस, सूप, हलवा तुम्ही नव्या धाग्यांवर लिहू शकता. या धाग्याचे नाव 'मटार उसळ फॅन क्लब' हेच राहिल.
मृण मस्त रेसिपी. लगेच
मृण मस्त रेसिपी. लगेच करणार.
टोमॅटों+ कांदा+ आलं असं एकत्र उकळवून त्याच्या रसात शिजवलेले मटारही मस्त लागतात. फक्त लाल तिखट थोडं घालायचं. सूप सारखंही पिता येतं. मात्र अगदी गरम गरमच हवं.
मंजूडी - प्रतिसादात आलेले
मंजूडी - प्रतिसादात आलेले उसळीचे प्रकार हेडरमध्ये घेणार का प्लीज, म्हणजे मग एकाच पानावर सगळ्या रेस्प्या सापडतील नाहीतर मग ही सगळी पानं धुंडाळावी लागतील!
योकु, प्रतिसादातल्या कृती
योकु, प्रतिसादातल्या कृती हेडरमध्ये घेतल्या तर हेडर केवढे मोठे लांबलचक होईल?
म्हणूनच लिहिलं होतं की नव्या धाग्यामध्ये पाककृती लिहा आणि इकडे लिंक द्या.
लेकिन हमारी कुछ वॅल्यूही नही है यहां पर!
मंजूडी, हेडरमधला फोटो मस्त
मंजूडी, हेडरमधला फोटो मस्त आलाय. त्याबरोबर मला फुलक्यांपेक्षा पाव खायला आवडेल.
सायो, पावाबरोबर खायच्या
सायो, पावाबरोबर खायच्या उसळीचा फोटो टाकेन लवकरच
कसला कातील आहे हा धागा!
कसला कातील आहे हा धागा! जिभेखाली बादली लावावी लागेल आ ता!
फार म्हणजे फारच लाळ गाळणारी बाहुली!
लवकर टाक.
लवकर टाक.
मी थोडीशी मृ च्य सारखी रेसिपी
मी थोडीशी मृ च्य सारखी रेसिपी करते.
भरपूर कोथिंबीर , नारळ, आले लसूण, हिरव्या मिरच्या असे वाटण, ते जिरे मोह्र्री , कढिपत्ता अशा फोडणीत परतायचं आणि मग मटार, मीठ , लिंबाचा रस घालून उकळणे. कांदा किंवा कोणताही मसाला लागत नाही.
सुंदर हिरव्या रंगाची झणझणीत उसळ होते.
इथे एक फोटो आहे पूर्वी टाकलेला
काल या पद्धतीनी उसळ केली.
काल या पद्धतीनी उसळ केली. भारी चव होती! धन्यवाद रेस्पीबद्दल.
मटार थोडे कमी होते म्हणून बाकीचं साहित्य पण त्या प्रमाणात कमी घेतलं; अप्रतिम चव आली होती. कांदा-खोबरं भाजून वाटून लावल्याचा वेगळा खमंगपणा येतो. माझ्याकडे ओलं खोबरं नसल्यानी मी सुकं खोबरंच किसून वापरलं. त्यामुळे उसळ उकळल्यावर त्यावर चांगलाच सात्त्विक तवंग आला होता.
जनहितार्थ...
जनहितार्थ...
शाबास योकु धागा खणुन
शाबास योकु धागा खणुन काढल्याबद्दल. आज डीनर ला या पद्दतीने उसळ करायचा प्लॅन करत होते .
हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ
हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ
पुनःश्च जनहितार्थ
पुनःश्च जनहितार्थ
आजच मटाराचा ढीग पाहीला बाजारात...
Pages