शुक्रवारा धुंद प्याला

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

शुक्रवारा धुंद प्याला घेऊ दे पेल्या तूनी
ग्लास आहे बर्फ वाहे मंद ह्या सोडया तूनी
आज तू पेल्यात माझ्या मिसळून सोडा पहा
तू असा समोरी रहा

मी कश्या वाक्यात सांगू मागण्या माझ्या सख्या
तू तुझ्या समजून दे रे ऑर्डरी माझ्या सोन्या
मुखाचा गंध माझा लपवी तो मुखवास हा

घोगरा आवाज तुझा अन ग्लास तो निसटे पहा
पाहता घड़या ळी च आता वाजले केवळ दहा
तरंगणाऱ्या ह्या वारुणीने कंपतो कसा देह हा

शोधितो बशीत तुजया घास तो माझ्या मुखा
तोडितो रोटिच कच्ची आणि भात तो साधा सुका
परती कधी घेणार नाही जाम मी माझ्या सख्या

केदार साखरदांडे

विषय: 
प्रकार: 

मस्तच....
एक दुरुस्ती सुचवू का?

बर्फ आहे ग्लास वाहे मंद ह्या सोडया तूनी >> ग्लास आहे बर्फ वाहे मंद ह्या सोडया तूनी

कडक