दिवाळीत मज्जा केलीत ना ?
दाबून फराळ केलात ना?
गिल्टी वाटतंय ना?
डाएट करायलाच हवं, जिमला जायलाच पाहिजे असे विचार मनात येताहेत ना?
वरील सगळ्या प्रश्नांची उत्तर 'हो' असतील नसतील तरी घ्या एक साधी सोपी पौष्टीक डाएट रेसिपी
मध्यम चिरलेला एक मोठ सफरचंद, एक छोटं बीट, छोटासा तुकडा लाल भोपळयाचा, एक लांब चिरलेला छोटा कांदा, दोन पाकळ्या लसूण , एक चमचा धणेजिरे, कढीपत्त्याची आठदहा पानं, थोडी कोथिंबीर, अर्ध्या नारळाचे दूध , मीठ चवीनुसार, मीरपूड
एका छोट्या कुकरमध्ये तूप गरम करून त्यात कांदा लसूण परतून त्यात नारळाचे दूध व मीरपूड सोडून सगळे जिन्नस टाकावे व पाणी घालून मऊ शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून बारीक वाटून घ्यावं. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळावे. नारळाचे दूध घालून एक उकळी काढावी. बाऊलमध्ये काढून मीरपूड घालून गरमागरम सर्व्ह करावे.
एका पाककृतीच्या कार्यक्रमात बघितली होती त्यात बदल केले, बीटाचा उग्रपणा कमी व्हावा म्हणून ला. भो घातला. मखाणे थोड्या तूपावर परतून घातले तर मस्त लागतात चवीला व दिसायलाही ब्रेड क्रंम्ब्स ऐवजी.
अरे वा ! वेगळच आहे हे सूप ..
अरे वा ! वेगळच आहे हे सूप .. करून बघायला हवं .. !!सोप्प वाटतंय
बीटामुळे लालेलाल दिसत नाही का ?
प्रचि असेल तर टाका ना ..
(No subject)
डाएट न करणार्यांनी पण प्यायल
डाएट न करणार्यांनी पण प्यायल तर काही हरकत नाही ना
छान दिसतंय !
रंग मस्त दिसतोय
रंग मस्त दिसतोय


सफरचंदाचं काय प्रयोजन? वाचल्यापासनं उग्गा मला ते ऑड म्यान औट वाटायलंय...
आणि हो, ते बीसलाभो ऐवजी बीसघटाओ बरं नै?
मस्त मस्त!! करुन पाहणेत येइल.
मस्त मस्त!! करुन पाहणेत येइल.
मस्तच आहे रेसिपी आणि फोटो
मस्तच आहे रेसिपी आणि फोटो सुंदर आलाय.
मखाणे घालायची कल्पना छानच आहे.
बीट आणि लाल भोपळा पटकन
बीट आणि लाल भोपळा पटकन समजलेलं.. सूप म्हटलं की मेलं असलंच काहीतरी..
फक्त ते स म्हणजे काय हे बघायला सूपात आलो.
स = सफरचंद
स = सफरचंद
स्लर्प ...... _____/\____
स्लर्प ......
_____/\____
चवि बद्दल साशंक आहे ! आणि
चवि बद्दल साशंक आहे ! आणि इतके वेगवेगळे जिन्नस (म्हणजे नारळाचे दूध, कांदा लसूण, बीट, कढीपत्ता इ इ ) एकमेकांसोबत कसे जातील असे वाटते. त्यामुळे माझा पास! नो नो...!!!
चवि बद्दल साशंक आहे ! आणि
चवि बद्दल साशंक आहे ! आणि इतके वेगवेगळे जिन्नस (म्हणजे नारळाचे दूध, कांदा लसूण, बीट, कढीपत्ता इ इ ) एकमेकांसोबत कसे जातील असे वाटते. त्यामुळे माझा पास! नो नो...!!!>>>>>>>>> +१
प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद !
प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद !
तरी लिहीते की कांदा व लसणाच प्रमाण अत्यल्प आहे. सुपात काहिही खपवू शकतो\वगळू शकतो. मूळ पाककृतीत वरून तूप जिरे कढीपत्ता फोडणी होती. ती मी वगळली. असो नव्हते,
योकु बीसघटाओ
आंगो, सस्मित पसंद अपनी अपनी
ममो, मी बर्याच सूपमध्ये मखाणे घालते.
मस्त दिसतंय. मला उकडलेले बीट
मस्त दिसतंय. मला उकडलेले बीट नाही आवडत. पण रेसिपी आवडली.
छान आहे सूप
छान आहे सूप
भन्नाट पा. कृ! मस्तच लागत
भन्नाट पा. कृ! मस्तच लागत असणार..