बीसलाभो सूप

Submitted by मंजूताई on 25 October, 2017 - 06:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिवाळीत मज्जा केलीत ना ?
दाबून फराळ केलात ना?
गिल्टी वाटतंय ना?
डाएट करायलाच हवं, जिमला जायलाच पाहिजे असे विचार मनात येताहेत ना?
वरील सगळ्या प्रश्नांची उत्तर 'हो' असतील नसतील तरी घ्या एक साधी सोपी पौष्टीक डाएट रेसिपी
मध्यम चिरलेला एक मोठ सफरचंद, एक छोटं बीट, छोटासा तुकडा लाल भोपळयाचा, एक लांब चिरलेला छोटा कांदा, दोन पाकळ्या लसूण , एक चमचा धणेजिरे, कढीपत्त्याची आठदहा पानं, थोडी कोथिंबीर, अर्ध्या नारळाचे दूध , मीठ चवीनुसार, मीरपूड

क्रमवार पाककृती: 

एका छोट्या कुकरमध्ये तूप गरम करून त्यात कांदा लसूण परतून त्यात नारळाचे दूध व मीरपूड सोडून सगळे जिन्नस टाकावे व पाणी घालून मऊ शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून बारीक वाटून घ्यावं. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळावे. नारळाचे दूध घालून एक उकळी काढावी. बाऊलमध्ये काढून मीरपूड घालून गरमागरम सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
सहा जण सूप म्हणून पिणार असेल तर्/जेवणाऐवजी असेल तर दोघांसाठी
अधिक टिपा: 

एका पाककृतीच्या कार्यक्रमात बघितली होती त्यात बदल केले, बीटाचा उग्रपणा कमी व्हावा म्हणून ला. भो घातला. मखाणे थोड्या तूपावर परतून घातले तर मस्त लागतात चवीला व दिसायलाही ब्रेड क्रंम्ब्स ऐवजी.

माहितीचा स्रोत: 
एका चॅनेल दाखवलेले व स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! वेगळच आहे हे सूप .. करून बघायला हवं .. !!सोप्प वाटतंय
प्रचि असेल तर टाका ना .. Happy बीटामुळे लालेलाल दिसत नाही का ?

रंग मस्त दिसतोय Happy
सफरचंदाचं काय प्रयोजन? वाचल्यापासनं उग्गा मला ते ऑड म्यान औट वाटायलंय... Uhoh
आणि हो, ते बीसलाभो ऐवजी बीसघटाओ बरं नै? Proud

बीट आणि लाल भोपळा पटकन समजलेलं.. सूप म्हटलं की मेलं असलंच काहीतरी..
फक्त ते स म्हणजे काय हे बघायला सूपात आलो.

चवि बद्दल साशंक आहे ! आणि इतके वेगवेगळे जिन्नस (म्हणजे नारळाचे दूध, कांदा लसूण, बीट, कढीपत्ता इ इ ) एकमेकांसोबत कसे जातील असे वाटते. त्यामुळे माझा पास! नो नो...!!!

चवि बद्दल साशंक आहे ! आणि इतके वेगवेगळे जिन्नस (म्हणजे नारळाचे दूध, कांदा लसूण, बीट, कढीपत्ता इ इ ) एकमेकांसोबत कसे जातील असे वाटते. त्यामुळे माझा पास! नो नो...!!!>>>>>>>>> +१

प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद !
योकु बीसघटाओ Happy
आंगो, सस्मित पसंद अपनी अपनी Happy तरी लिहीते की कांदा व लसणाच प्रमाण अत्यल्प आहे. सुपात काहिही खपवू शकतो\वगळू शकतो. मूळ पाककृतीत वरून तूप जिरे कढीपत्ता फोडणी होती. ती मी वगळली. असो नव्हते,
ममो, मी बर्याच सूपमध्ये मखाणे घालते.