"अनुराधा.. अग कुठं आहेस तू? कुठं लपलियेस..
अनु.."
"अहो.. परत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेलेय ती.."
"काय सांगताय?.."
"हो.. जे बघितलं तेच सांगतेय.."
"बरं.. मी बघतो.."
"अनु.."
"हो, आले आजोबा.."
"बेटा कुठं होतीस? असं संध्याकाळी बाहेर फिरणे ठीक नाही.."
"का?.. काय होतं संध्याकाळी बाहेर फिरल्याने?.."
"अगं.. ते पिंपळाचं झाड आहे ना, त्याच्यावर रात्री एक म्हातारा येऊन बसतो.."
"तुमच्यासारखा?.."
"छे.. नाही तो खूप वाईट असतो, तुझ्यासारख्या लहान मुलींना आपल्या जाळ्यात फासून त्याचं रक्त पितो.."
"अय्या खरचं?.. तुम्ही कधी बघितलं त्याला?"
"मी.. मी नाही गेलो कधी तिकडे.. "
"मग तुम्हाला कसं माहीत?.."
"मला.. मला माझ्या आईनं सांगितलं."
"बरं.. पण आजोबा माझी आई कुठं आहे?.."
"अं.."
"सांगाना आजोबा.."
" तुझी आई देवाकडे गेले.."
"देव बाप्पाकडे?.."
"हो.."
"मग ती परत कधी येईल?.."
"तू जेंव्हा त्या रात्री पिंपळाच्या झाडाकडे जायचं बंद करशील तेंव्हा.."
"पण का.. मला आवडतं तिथं बसायला.. आणि हे तर आईला पण माहीत आहे.."
"ते मला माहित नाही.. तुझी आई म्हटली की तू तिथं जाणं बंद केल्याशिवाय ती परत येणार नाही.."
"बरं.. मी नाही जाणार तिकडे. तुम्ही आईला लवकर यायला सांगा.."
"हो.. बर, तू जा आत.. टी.व्ही. लाऊन बस.."
"आज काय समजूत काढली तिची?.."
"काही नाही.. परत तीच समजूत.. आणि परत तोच प्रश्न.. माझी आई कुठं आहे.."
"अहो, असं किती दिवस चालणार.. मी काय म्हणते, आपण तिला एकदा स्पष्टच सांगितलं तर.."
" छे!.. काय बोलताय तुम्ही.. सात वर्षाचं पोर आहे ते.. त्याला काय समजावणार?.."
" पण.."
" पण वगैरे काही नाही.. ह्या सगळ्यावर विचार करायला अनु अजून लहान आहे.. योग्य वेळ आल्याशिवाय तिला असलं काही सांगणं ठीक नाही.."
" मग काय.. रोज कशी समजूत काढायची तिची?.."
" जशी आज काढली.."
नाही कळली.
नाही कळली.
अमोल परब यांच्या कथेची आठवण
अमोल परब यांच्या कथेची आठवण झाली
'मी नाही बोलणात जा ' अस नाव होत.
तितकीशी प्रभावी नाही झाली.
नाही कळली.
नाही कळली.
प्रयत्न चांगला होता..पण अजून
प्रयत्न चांगला होता..पण अजून खुलवता आली असती..
पु.ले.शु.
मला वाटतं, झाडावरच्या
मला वाटतं, झाडावरच्या म्हाताऱ्याची गोष्ट खरी आहे आणि तिच्या आईचा मृत्यू सुद्धा त्या म्हाताऱ्यामुळे झाला