दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजली !!

अतिशय पांचट लेख आहे तो लोकसत्तेमधला...

वैद्य प. य. खडीवाले यांचे आज पुण्यात वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना!

ओहह Sad श्रद्धांजली.

ते मुंबईत पण यायचे ना, आमच्या वरती राहतात ते जायचे औषधासाठी. हल्ली काही महिने नाही गेले.

दिनांक २४ रोजी माझ्या धाकट्या भावाचे वय वर्ष २१ दुःखद निधन झाले .माझ्या बाळाच्या आत्म्याला शांती लाभावी ह्यासाठी प्रार्थना करा ही विनंती

वैद्य खडीवाले ह्यांना श्रद्धांजली.

आईची_लेक, तुमच्या धाकट्या भावालाही श्रद्धांजली. त्याच्यासाठी प्रार्थना आहेच. तुमचं दु:ख काय असेल, ह्याची मी फक्त कल्पनाच करू शकतो. ह्या कठीण प्रसंगातून तरून जाण्याचं बळ तुम्हाला देवाकडून मिळो.

आईची_लेक,
वाचून खूप वाईट वाटलं..
धाकट्या भावासाठी श्रद्धांजली....

आईची_लेक,
खूप वाईट वाटलं..
धाकट्या भावासाठी श्रद्धांजली

वैद्य खडीवाले ह्यांना श्रद्धांजली.
आईची_लेक, तुम्हाला त्या धक्क्यातून सावरण्यास बळ मिळो.

आईची_लेक, तुम्हाला यातून सावरण्याचं बळ मिळो.
तुमच्या धाकट्या भावाला मनःपूर्वक श्रद्धांजली.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन झाले

श्रद्धांजली

संगणक विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे विजय मुखी यांचे दु:खद निधन. श्रद्धांजली. नव्वदच्या नंतर त्यांची पुस्तके संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. त्यांना भारताचे इंटरनेट गुरु असेही म्हटले जायचे. सायबर सुरक्षा या विषयामध्येसुद्धा त्याचं विशेष योगदान आहे.

झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेसहित अन्य अनेक मराठी मालिकांमधून भूमिका साकारणारा उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. श्रद्धांजली.

Pages

Back to top