पान हे थुन्कीत जाशी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

(पान हे थुन्कीत जाशी एका बेशीस्त पान्थस्ताचे वर्णन)

पान हे थुन्कीत जाशी , चालता तू मार्गी रे
पचकूनी रन्गवित भिन्ती, रन्गली भित्ती पूढे

फुन्कशी सिगरेट किती त्या धुम्र किती हा सोडीशी
त्रास तो पाठल्यास देई तुज कधी का कळतसे

फेकशी कचरा किती हा, साल ही पायी तुझ्या
जे तुझ्या हातात आहे, उडवीशी जमिनीवरी

अडवूनी फुटपाथ ठेवी गाडी तुझी ही आडवी
पाहु दे पार्कीन्ग विना रस्ते कधी मज हे मोकळे

मूळ गाणे

चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफूले

वाहती आकाशगंगा, की कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी, तार पदरा गुंफीले

गुंतविले जीव हे, मंदीर ही पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले

विषय: 
प्रकार: 

Dhanyawaad