भाग ०१ –
https://www.maayboli.com/node/63852
भाग ०२ –
https://www.maayboli.com/node/63863
भाग ०३ –
https://www.maayboli.com/node/63883
भाग ०४ –
https://www.maayboli.com/node/63976
भाग ०४ पासून पुढे..
काही वेळानंतर..
(वेळ : संध्याकाळी ६ वा.
स्थळ : जयसिंगपूर पुलिस स्टेशन.)
सागरची मनस्थिती समजावता येण्या पलीकडची झाली होती. थरथरत्या हातांनी प्रिती आपले डोळे पुसत पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी होती इन्स्पेक्टर राणे साठी स्थितीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं होतं अशी अचानक झालेली घटना त्यांना मुळीच अपेक्षित नव्हती.
सगळेच शॉक मधे होते राणेंनी स्थितीचा अंदाज घेत विचारपूस करण्यासाठी कॉन्स्टेबलला सागरला आत बोलावण्यास सांगितलं. कॉन्स्टेबल बाहेर आला सागर आणि प्रिती बाहेरच उभे होते कॉन्स्टेबलने सागरकडे बघून हाक मारली.
‘सागर देशमुख, तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब बोलवतायेत.’ कॉन्स्टेबल बोलून आत गेला खरा, पण सागर जागेवरचा हलला सुद्धा नाही त्यानं कॉन्स्टेबलचं बोलणं ऐकलं तर होतं पण त्याला काहीच सुचेनासं झालं होतं जणू त्याचे हातपाय गळून पडले असावेत..
काही वेळ वाट बघून कॉन्स्टेबल परत बाहेर आला आणि सागरला घेऊन आत घेऊन गेला
इन्स्पेक्टर राणे समोर बसले होते. कॉन्स्टेबल ने सागरला त्यांच्या समोरील खुडचीवर बसवून पाण्याचा ग्लास हातात दिला. सागरने ग्लास सरळ तोंडाला लावला पाणी संपायच्या आतच इन्स्पेक्टर राणे बोलले.
‘हे सगळं कसं झालं सागर..’ सागरने पाण्याचा ग्लास अर्धवटच थांबवला जणू त्याच्या गळ्यातून पाण्याचा घोट खाली उतरनासा झाला थरथरत्या हाताने त्याने ग्लास खाली ठेवला.
स्थिती खूप अस्वस्थ झाली होती राणे टक लावून सागर कडे पाहत होते सागर काहीच बोलत नव्हता काही वेळ वाट पाहून राणेंनी परत विचारलं
‘हे बघा देशमुख, मला कळतंय की असे प्रश्न विचारायची ही योग्य वेळ नाहीये. पण नाईलाज आहे आम्हाला आमचं काम..’
इन्स्पेक्टरचं बोलणं अर्धवट मोडत सागर बोलू लागला
‘आम्ही तिघे.. तिघेही राधा मागे गेलो मी प्रिती आणि निखिल. राधाने गाडी सरळ सावगावच्या पुलावर थांबविली जिथे.. जिथे त्यांनी आनंदची हत्या केली होती. निखिलने राधाला आवरलं आणि ती शांत झाली ही.. ते परत कशाचीतरी प्लॅनिंग करत होते आणि राधाने अनिकेतला फोन लावून पुलावर येण्यास सांगितलं..’ सागर बोलताना मधेच थांबला त्याला एक विचित्रशी धाप लागल्यासारखी झाली होती
‘मग.. मग काय झालं सागर?’ इन्स्पेक्टर राणे उंचावलेल्या स्वरात म्हणाले. सागरचं स्वास्थ बिघडत चाललं होतं कोणत्याही क्षणी तो बेशुद्ध होईल अशी त्याची स्थिती होत असताना राणेंनी त्याला एक शेवटचा प्रश्न विचारला..
‘सागर.. काय प्लॅन होता त्यांचा. अनिकेत सोबत काय करणार होते ते?’
‘ते.. ते तेच करणार होते जे त्यांनी आनंद सोबत केलं..’ अडखळत आपलं वाक्य पूर्ण करून सागर बेशुध्द झाला राणेंनी लगेच एम्बुलेन्स बोलवून प्रितीला सागर सोबत हॉस्पिटलला लावून दिलं.
इन्स्पेक्टर राणे डोक्याला हात लावून आपल्या खुडचीवर बसले होते. झालेला प्रकार थोडाफार त्यांच्या लक्षात येऊ लागला होता विचारात गुंग होऊन ते स्वतःशीच पुटपुटत होते. ‘जर निखिल आणि राधाने अनिकेतला मारण्याचा प्लॅन करून त्याला पुलावर बोलावलं मग अनिकेतने राधा आणि निखिलला कसं?.. आणि का?..’
इन्स्पेक्टर राणे तातडीने उठले त्यांनी लॉकअपचं दार उघडलं. अनिकेत सेलच्या मधोमध बसला होता राणेंनी काही क्षण त्याला निरखून पाहिलं त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते राणेंनी अनिकेतच्या समोरासमोर खुडची टाकून ते तेथे बसले.
काही वेळ भयानक अशी शांतता पसरल्यानंतर राणेंचा आवाज संपूर्ण सेल मधे घुमला.
‘का अनिकेत?’ राणेंचा आवाज ऐकून आपली झुकलेली नजर वर करत त्याने बोलायला सुरुवात केली
‘का?... मीही राधाला तेच विचारलं होतं.. का?.. कशासाठी.. प्रेमासाठी?.. मग आनंद सोबत लग्न का?.. प्रेम असं इतक्यात बदलत नसतं इन्स्पेक्टर साहेब.. आधी आनंदवर मग आता निखिलवर आणि नंतर?.. नंतर कोणावर.. पण या सगळ्यात बिचाऱ्या आनंदचा काय दोष होता इन्स्पेक्टर साहेब.. त्याचा दोष इतकाच की त्यानं प्रेम केलं.. आणि त्याला काय मिळालं..’ अनिकेत भारावून गेला होता त्याच्या तोंडून बाहेर निघणारा प्रत्येक शब्द सोबत आसवांची ओघळ घेऊन येत होता. त्याने आपला गुन्हा कबुल केला.
शेवटी इन्स्पेक्टर राणेंनी त्याला एक शेवटचा प्रश्न विचारला..
‘अनिकेत, एक प्रश्न माझ्या मनात खूप वेळ झालं खटकतोय. राधा आणि निखीलला मारूनही शेवटी तुला काय मिळालं. शेवटी तुला आता आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागणार.’
‘तुरुंगवास... अरे कसल्या तुरुंगवासाबद्दल बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब. खरा तुरुंगवास तर मी भोगलाय.. या आधीही.. जेव्हां पहिल्यांदा आपल्याच मैत्रिणीवर प्रेम केलं तेव्हा.. आणि जेंव्हा तीच मैत्रीण आपल्या जिवलग मित्राची संगिनी झाली तेंव्हाही.. त्याच जिवलग मित्राची हत्या झाली तेव्हां.. आणि जेंव्हा कळलं त्याची हत्या आपल्याच मैत्रिणीने केली.. त्यावेळीही...
माझं आयुष्यच एक तुरुंगवास आहे इन्स्पेक्टर साहेब. म्हणतात ना, आभाळाला पावसाची कसली भीती?...’
‘पण राधावर तुझं प्रेम असुनही तू’
‘आनंदनेही राधावर जीवापाड प्रेम केलं तिला कशाचीही कमतरता भासू दिली नाही आणि शेवटी त्याला काय मिळालं?...’
इन्स्पेक्टर राणेंकडे विचारण्यासाठी आता काहीच उरलं नव्हतं त्यांनी सेलचा दरवाजा लॉक केला आणि ते आपल्या केबिनकडे जाऊ लागले.. जाताना मधेच थांबून त्यांनी अनिकेत कडे पाहिलं
‘अनिकेत... आता पुढे?’ अनिकेतने आपल्या चेहऱ्यावर किंचितसे हास्य आणत म्हटलं
‘आता एक नवीन सुरुवात.. न संपणाऱ्या
"संघर्षाला"
......................................................................
समाप्त.
– दिपक लोखंडे.
(No subject)
मस्त.
मस्त.
शेवटच्या पोलिस स्टेशनमधल्या प्रसंगांना आणि संवादांना तेथील वास्तवदर्शी रूप दिलं असतं तर आणखी छान खुलला असता हा भाग.. असो.
पु. ले. शु.
@कऊ @राहुलजी धन्यवाद!.
@कऊ @राहुलजी
धन्यवाद!.
छान ५ही भाग मस्त झाले..
छान ५ही भाग मस्त झाले.. आवड्ली हि कथा!..
पुढिल लेखणासाठी शुभेच्छा!!!!!!!!!!!!!
शेवट जरा घाई घाई ने झाल्या
शेवट जरा घाई घाई ने झाल्या सारखा वाट्ला ... आधीच्या ४ भागात जी उसुक्ता होती ती या भागात मिसिंग वाटली
शेवट जरा घाई घाई ने झाल्या
शेवट जरा घाई घाई ने झाल्या सारखा वाट्ला ... आधीच्या ४ भागात जी उसुक्ता होती ती या भागात मिसिंग वाटली>>+111
मला तर कथा खुप अर्धवट वाटली
मला तर कथा खुप अर्धवट वाटली.शेवट असा का गुंडाळला??? अजुन छान फुलवता आली असती तुम्हांला.
शेवट जरा घाई घाई ने झाल्या
शेवट जरा घाई घाई ने झाल्या सारखा वाट्ला ... आधीच्या ४ भागात जी उसुक्ता होती ती या भागात मिसिंग वाटली >>> +१
शेवट रिलेट नाही झाला