दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुण साधुंना श्रद्धांजली. आपले आम्हावर अनंत उपकार आहेत. आपल्या शब्दांनी आनंद दिला, आरसा उभा केला, माहिती दिली व वास्तवाचे भान देखील.
मुंबई दिनांक, सिंहासन या राजकीय कादंबर्‍या तर मुखवटा सारखी दीर्घकादंबरी या उच्च दर्जाच्या आहेत. फिडेल चे आणि क्रांती, तिसरी क्रांती हे नॉन-फिक्शन पुस्तके. सर्वच उत्कृष्ट व वाचनीय. तिसरी क्रांतीमधला रशियन सोविएत (बोल्शेविक) क्रांतिपासून गोर्बाचेवच्या पेरेस्त्रोइका/ग्लास्तनोस्त क्रांतीपर्यंतचा आढावा खचितच इतक्या पद्धतशीरपणे इतर कुठल्या मराठी पुस्तकात आला असावा.

माझ्यासाठी मुक्ती हा तुमचा कथासंग्रह सर्वात आवडता राहील.

Shradhanjali a great writer.
Tanya you missed "Sattandh" (written with Ashok Jain). My most favorite book on Emergency. Tisri Kranti sadhya vachat aahe.

'प्लेबॉय' ज्यांनी सुरू केलं, 'सेंटरफोल्ड' ही संकल्पना ज्यांनी लोकप्रिय केली, त्या ह्यू हेफ्नर यांचं निधन.

एल्फीस्टन परेल ब्रिजवर सकाळी गर्दीवेळी चेंगराचेंगरी होऊन बावीस जण गेलेत. वेरी सॅड अँड शॉकींग न्युज फॉर मुंबईकर्स. Sad Sad

मुंबैकरांसाठीच कशाला... सर्व देशवासीयांसाठीच ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी घटना आहे. फारच दुर्दैवी आणि लज्जास्पद!
Sad

ओव्हरऑल जगात काय चाल्लंय काय? चेंगराचेंगरी, भुकंप, चक्रीवादळे, गन शुटींग्स Sad किती माणसे मरताहेत? फारच दु:खद

@च्रप्स
>>
इसिस ने जबाबदारी घेतलीय ... अमेरिका नाही म्हणतोय..
दुर्दैवी घटना... श्रद्धांजली !
>>

हे कुठे वाचलेत? स्टीवन पॅडॉक नावाच्या माणसाने हा हल्ला केला आहे असे सर्व प्रसारमाध्यमे म्हणत आहेत. यात आयसिस अँगल कुठून काढलात कोण जाणे

हे कुठे वाचलेत? स्टीवन पॅडॉक नावाच्या माणसाने हा हल्ला केला आहे असे सर्व प्रसारमाध्यमे म्हणत आहेत. यात आयसिस अँगल कुठून काढलात कोण जाणे>> बर्याचशा बातम्यांमध्ये सांगतायत हे...त्यांनी ती व्यक्ती काही काळापूर्वीची कन्व्हर्टेड असल्याची सांगून जबाबदारी घेतलीय तर अमेरिका नाही म्हणतेय. खरे-खोटे कळेलच बहुदा. अत्यंत वाईट्ट घटना.

जाने भी दो यारों
ये जो है जिंदगी
नुक्कड
वागले की दुनिया
कभी हां कभी ना

कुंदन शाह यांना आदरांजली.

Pages