https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
====================================================================================================
जाखमाता, आदिशक्तिचे हे वेगळेरूप. ना चेहरा, ना डोळे ना मूर्त शरीर, आहे तो फक्त भाव, एका भक्ताच्या भक्तिचा, आहे एक दर्शनीय स्वरूप.
दुर्गम अश्या मोरगिरी किल्ल्यावर आपल्याला हे शक्तीचे अनघड रुपात अनोखे दर्शन होते. लोणावळा परिसरातील शिळीम-मोरवे ह्या गावापासून मोरगिरी हा किल्ला हाकेच्या अंतरावर आहे. जंगल - सपाटी - घसारा अश्या क्रमाने होणाऱ्या चढाईने गडकरी पोहोचतो कातळ टप्प्या जवळ. ह्याच कताळाच्या पोटात असणाऱ्या छोट्याश्या नैसर्गिक गुहेत ही गडदुर्गा म्हणजे जाखमाता स्थानापन्न झालेली आहे. ह्याही गडनिवासिनी शेजारी पाण्याचे टाके आहे आणि पाणी पिण्यायोग्य आहे. गावकारी येथे नेहमी येवून दिवा-बत्ती, हळद-कुंकु, अबीर-गुलाल ह्याने देवीची पूजा मांडतात.
इतिहासात फारशी नोंद नसलेला हा किल्ला एक टेहळणीचा गड म्हणून वापरात येत असावा. जाखमातेच्या गुहेच्या शेजरी असणारा १० ते १५ फुटांचा कातळ टप्पा शिडीच्या साह्याने चढून गड माथ्यावर येता येते (शिडी चढताना काळजी पूर्वक चढावे). माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत तसेच येथून पावणा धरण, तुंग-तिकोना, लोहगड विसापुर, भातराशी डोंगर, कोराईगडाचे मनोहारी दृश्य दिसते.
~विराग
गडाची माहिती आवडली.
गडाची माहिती आवडली.
मोरगिरी किल्ल्याची अधिक विस्तृत माहीती लिहा व आणखी फोटो टाका.
__/\__
धन्यवाद प्रसाद.
धन्यवाद प्रसाद.
मोरगिरी बद्दल लिखाण पूर्वी केले होते. ते आपणास येथे वाचता येईल
https://madhyalok.wordpress.com/2015/07/29/untenanted-morgiri-and-revivi...
चिंब पावसात भटकंती केली होती तेव्हाचे हे लिखाण
धन्यवाद विराग, माहिती आणि
धन्यवाद विराग, माहिती आणि फोटोसाठी