गुंतता हृदय हे
आफ्रिकेत दहा बारा वर्षे घालवल्यावर मी भारतात परतलो. जाताना माझ्याकडॆ कपड्यांशिवाय काहीही नव्हते.आणि मी आफ्रिकेच्या अंतर्भागात मायनींग इंजिनियर होतो.तिथल्या मागासलेल्या जीवनाचा कंटाळा आल्यामुळे आणि बक्कळ पैसे जमल्यामुळे मी भारतात परत आलो होतो. आत्तापर्यंत मी लग्नाचा विचारच कधी केला नव्हता. तशा मैत्रिणी भरपूर होत्या पण त्या तेवढ्यापुरत्याच जीव लावावी अशी कुणीच नव्हती. त्यातल्या त्यात फ्रेनी जवळची होती.
मुंबईत परत आल्यावर अंधेरीच्या एका मोठ्या सोसायटीत एक छोटासा प्लॅट घेतला आणि नोकरी शोधायला लागलो. मला आता मायनिंग साइटवर मुळीच जायचे नव्हते. पण मायनिंग ऑफिस मध्ये आणि अधून मधून साइटवर जायलाही माझी हरकत नव्हती. अशाच एका कंपनीत मुलाखतीसाठी गेलो असता राणी भेटली. सुंदर सुशिक्षित आणि नाजूक राणी त्या कंपनीत रिसेप्शनिस्ट होती. मुलाखतीसाठी बरेच कॅन्डीडेट असल्यामुळे वेळ लागणार होता. गप्पा मारताना असे कळले कि राणी माझ्याच सोसायटीत राहत होती. एक प्लॅट भाड्याने घेऊन त्यात ह्या दोन तीन मुली एकत्र राहत होत्या. पाहता क्षणीच ती मला आवडली आणि संद्याकाळी तिला भेटायचे ठरवले. तिचा फोन नंबर ही घेतला. माझ्या नशिबाने त्या कंपनीत मला नोकरी ही लागली.
आमची गट्टी जमली. दोघेही तसे एकटेच होतो. त्यामुळे भरपूर सहवासही होता. लवकरच तिला लग्नाचे विचारायचे ठरवले. दोघांनी मनात ठरविले होते पण कोण आधी विषय काढतो त्याची वाट आम्ही दोघेही पाहत होतो.
मला तसे कुणीच नव्हते.आई मी लहान असतानाच गेली आणि बाबा मी कॉलेजात असताना. भाऊ बहीण असे कुणीच नव्हते. राणीही बहुतेक एकटीच असावी कारण तिच्या बोलण्यात कधी घर, नातेवाईक असा उल्लेख आला नव्हता. नंतर मला असे कळले कि ती अनाथ आश्रमात वाढली आहे.
अशा वेळी माझ्या जीवनात परत फ्रेनी चा प्रवेश झाला. मी तिथून गेल्यावर तिला कळून चुकले कि तिचा जीव माझ्यात गुंतला होता. अर्थात माझ्या मनात फ्रेनी बद्दल असा काहीच विचार नव्हता. आफ्रिकेतल्या भल्या मोठ्या सफारी पार्कची ती मालकीण होती. आणि आफ्रिकन वंशाची होती. मला तिच्यात त्या दृष्टीने काहीच रुची नव्हती.
फ्रेनीला थोड्याच दिवसात माझा जीव राणीत अडकला आहे हे कळून चुकले. लाडात वाढल्यामुळे फ्रेनी रागीट व मत्सरी होती आणि राणी म्हणजे याचे दुसरे टोक होते .
फ्रेनीने माझ्या मागे लग्नाची भुणभुण लावली. राणीपेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर आणि श्रीमंत आहे हे मला पटवून देऊ लागली.
शेवटी मी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि तिने परत जावे असेही सुचवले.
त्यानंतर सात आठ दिवस शांततेत गेले. माझा आणि राणीचा नेहमीचा दिनक्रम सुरु झाला. पण एके दिवशी सकाळी राणी ऑफिसला जायला आलीच नाही. त्या दिवशी ती ऑफिसला ही आली नाही. तिचा फोन ही बंदच येत होता. मी फ्रेनीलाही फोन करून राणीबद्दल विचारले. तिचे ही उत्तर नकारार्थीच होते. आता माझ्या आणि फ्रेनीच्या गाठी भेटी वाढू लागल्या. डिनर डेट्स सुरु झाल्या. अशाच एका डेट नंतर फ्रेनीचाही फोन बंद झाला. तिचे घर ही बंदच होते. तीन दिवस असेच गेले.
तीन दिवसांनी सकाळी सकाळी दोन पोलीस माझ्याकडे आले. मला काहीच कळेना
' सॉरी सर तुम्हाला त्रास देतोय पण एका चमत्कारिक केस करीता तुमच्याकडे आलो आहे 'पोलीस'
' काय झालं? 'मी'
' राणी नावाची एक मुलगी बेपत्ता झाली आहे. तिच्या रूममेट्सनी कल्पना दिली होती आणि दोन दिवसापूर्वी याच एरियातील काही लोकांनी एका प्लॅट मधून कुजकट वास येण्याबद्दल तक्रार दिली. दरवाजा फोडून आत गेलो तर आत फ्रेनी नावाच्या अफ्रीकेवरून आलेल्या मुलीने आत्महत्या केली होती. गळफास लावून ती मेली होती. 'पोलीस'
' मग ??
' सगळ्यात चमत्कारिक गोष्ट म्हणजे पोस्ट मार्टम मध्ये तिच्या पोटात काही मानवी मांसाचे अंश सापडले आणि ते राणी नावाच्या बेपत्ता मुलीच्या DNA बरोबर जुळत आहेत. 'पोलीस'
' मग तुम्ही माझ्याकडे का आला आहात? 'मी'
' तुमची दोनीही मुलींशी चांगली ओळख होती आणि तुम्ही त्या दोघींकडेही जात होतात. राणीच काय झालं हे आम्हाला कळलं आहेच पण फ्रेनीने आत्महत्या का केली असावी हे कळत नाही. 'पोलीस'
' फ्रेनी रागीट आणि मत्सरी होती. त्यामुळेच तिने राणीला संपविले असावे. तिला राणीचे काळीज खायची फार इच्छा होती आणि ते जर मिळालं नाही तर आत्महत्या करण्याची तिने धमकी दिली होती. 'मी'
' अरे बापरे!! मग त्या काळजाचं काय झालं ? 'पोलीस'
' तिच्या समोर ते मीच खाल्लं होत !!!! 'मी'
[नादभय ह्या आगामी संग्रहातून]
शी!!!
शी!!!
ट्विस्ट इन द टेल !!!
ट्विस्ट इन द टेल !!!
असं डोक्यात तरी कसं येतं
असं डोक्यात तरी कसं येतं
Kaljacha thoka chukla
Kaljacha thoka chukla
नाव वाचून मला वाटलेलं एक भारी
नाव वाचून मला वाटलेलं एक भारी प्रेमकथा वाचायला मिळणार पण... अर्थात् हेही भारीच लिहीलं आहे पण वेगळ्या एंगलनं..ट्विस्ट देऊन थोडक्यात आवरती घेतली.
पुलेशु.
काहीही आहे ही कथा.
काहीही आहे ही कथा.
फ्रेनीने राणीला खाल्ले. राणीचं काळीज नायकाने खाल्ले. यक्क.
पण फ्रेनीने आत्महत्या का केली?
तुमचा भयकथा संग्रह येणार आहे का? नादभय नावाचा?
काहीही.. मला नाही आवडली.
काहीही.. मला नाही आवडली.
फ्रेनीने राणीला खाल्ले.
फ्रेनीने राणीला खाल्ले. राणीचं काळीज नायकाने खाल्ले. यक्क.
शक्य आहे. फ्रेनी तर आधीपासूनच आफ्रिकन आणि नायकही काही वर्षे तिथे राहिलेला आहे. तिथे अजुनही काही नरभक्षक जमाती आहेत. ह्या दोघांची मने त्यामुळे निगरगट्ट झालेली असू शकतात.
पण फ्रेनीने आत्महत्या का केली?
सो सिंपल. कथेतच उत्तर आहे की -
तिला राणीचे काळीज खायची फार इच्छा होती आणि ते जर मिळालं नाही तर आत्महत्या करण्याची तिने धमकी दिली होती. 'मी'
' अरे बापरे!! मग त्या काळजाचं काय झालं ? 'पोलीस'
' तिच्या समोर ते मीच खाल्लं होत !!!! 'मी'
ही कथा आवडली. तुमच्या
ही कथा आवडली. तुमच्या बाकिच्या भयकथा जास्त विनोदी वाटल्या (शेवटी हसू यायचं! तसच तुम्हाला अपेक्षित आहे का माहिती नाही).
ट्विस्ट इन द टेल !!! >> +1
ट्विस्ट इन द टेल !!! >> +1
मला नाही आवडली. शेवट अनपेकशित
मला नाही आवडली. शेवट अनपेकशित आहे पन पट्त नहि. Nayak polisana khare sangun ka jail madhe jail.
Nayak polisana khare sangun
Nayak polisana khare sangun ka jail madhe jail.>>
कारण त्याने काहीच गुन्हा केला नाही. त्याने समोर अलेले खाल्ले