डाग
तशी ती गावात नवीनच होती. नुकतीच तिची त्या गावातल्या शाळेत बदली झाली होती. गाव तस फार छोटं हि नव्हतं. लाखाच्या आत बाहेर लोकसंख्या असलेलं गाव.
नवीन गावात गेल्यावर शिक्षकेला भेडसावणारा प्रश्न म्हणजे राहण्याची जागा. त्यामुळे तिच्या बजेट मध्ये शाळेजवळच एक तीन चार खोल्यांचा बगला मिळाल्यामुळे बरे वाटले. गावातील बऱ्याच जणांनी तो बंगला तिला भाड्याने घेण्यापासून परावृत्त केलं होत. त्या बंगल्यात काही विचित्र गोष्टी घडतात असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. अर्थातच तिचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि मुख्य म्हणजे तिची शाळा तिथून चालत दहा मिनिटांच्या अंतरावर होती.
बंगल्यात मोजकेच फर्निचर होते. बेडरूम मध्ये बेड व कपाट, हॉल मध्ये कोच, कार्पेट आणि इतर छोट्या छोट्या वस्तू. तसे तिचेही सामान फारसे नव्हते. आल्यापासून तीन चार दिवस फारच छान गेले. एक दिवस तिने बांगला साफ करायचे ठरवले.
त्या दिवशी तिची शाळा दुपारची होती. शाळेच्या मधल्या सुट्टीत तिचा मोबाईल वाजला. तिने फोन उचलताच समोरून आवाज आला
' तुझ्या घरातील कार्पेटवर एक मोठा लाल डाग पडला आहे. तो आज रात्री बाराच्या आत साफ कर नाहीतर ... '
आणि फोन बंद झाला. फोन कोणाकडून आला आहे हे पाहण्याचा तिने प्रयत्न केला आणि परत तो नंबर डायल केला. हा नंबर अस्तित्वात नाही एवढेच उत्तर तिला येत होते. कुणीतरी गंमत केली असावी असे समजून तिने मनातून विचार झटकून टाकला.
पाच वाजता शाळा सुटली आणि घरी जाताना पुन्हा फोन वाजला व परत तोच आवाज ' ‘तुझ्या घरातील कार्पेटवर एक मोठा लाल डाग पडला आहे. तो आज रात्री बाराच्या आत साफ कर नाहीतर नाहीतर ... '
आता तिला नंबर ही कळाला नव्हता पण त्या फोन ने ती विचारात पडली होती हे निश्चित.
घरी गेल्यावर तिने हॉल मधलं कार्पेट पाहिलं. खरोखरच त्याच्यावर एक लालसर रंगाचा मोठा डाग होता. कदाचित रक्ताचा असावा असे तिला वाटले. भीती म्हणून नाही पण डाग काढूनच टाकावा असे तिने ठरवले.
चहा, नाश्ता झाल्यावर सातच्या सुमारास तिने पाण्याची बदली आणून तो डाग साफ करण्याच्या मागे लागली. तासभर प्रयत्न करूनही तो डाग काही कमी होत नव्हता. उलट तो वाढतोच आहे असे तिला वाटले.
किचन मध्ये जाऊन रात्रीच्या जेवणाची तिने तयारी केली. आणि नऊ साडेनऊ जेवायला बसणार तेवढ्या फोन वाजला.
'आता तुझ्याकडे फारच कमी वेळ उरला आहे तुझ्या घरातील कार्पेटवर एक मोठा लाल डाग पडला आहे. तो आज रात्री बाराच्या आत साफ कर नाहीतर नाहीतर ... '
आता तर तिने परत फोन करायचा त्रास हि घेतला नाही आणि जेवण झाल्यावर ती कपडे धुण्याचा ब्रश घेऊन पुन्हा कार्पेट साफ करायच्या मागे लागली. पण तो डाग काही केल्याने साफ झाला नाही. कंटाळून तिने साफ करणं सोडून दिले आणि तिचं आवरून झोपी गेली.
रात्री तिचा फोन परत खणाणला. तिने घड्याळ बघितले तर रात्रीचे साडेअकरा झाले होते. तिने फोन उचलला
‘आता 'तुझ्याकडे तीसच मिनिटे उरली आहेत आज रात्री बाराच्या आत तो डाग साफ कर नाहीतर नाहीतर ... '
ती आता फार खचून गेली होती कुठून हा बंगला भाड्याने घेतला असे तिला वाटू लागले. बरोबर रात्री बारा वाजता दरवाजाची बेल वाजली. दार उघडून बाहेर कोण आहे हे बघण्याची तिची तयारी नव्हती. पण अजून दोनदा बेल वाजल्यावर तिने नाखुशीने दार उघडले ...
बाहेर काळ्या अंगरख्यातील दोन माणसं उभी होती आणि त्याच्या बरोबर एक तिरडी होती. ती आता चांगलीच घाबरली होती. तिला काय बोलावे काहीच कळत नव्हते. तेवढ्यात तिरडीवरचा माणूस उठला . तिच्या दिशेने एक निळा पुडा धरून म्हणाला
' तुम्ही सर्फ वापरून का बघत नाही ?'
[नादभय ह्या आगामी संग्रहातून]
(No subject)
बाप रे !!
बाप रे !!
आधी कुठे प्रकाशित आहे का?
आधी कुठे प्रकाशित आहे का? वाचली आहे कुठेतरी.
(No subject)
सॉलिड आहे गोष्ट!! मजा आली.
सॉलिड आहे गोष्ट!! मजा आली.
क्यु के दाग अछे होते है !!
क्यु के
दागअछे होते है !! आवडली गोष्ट !!!!(No subject)
मस्त, आवडली
मस्त, आवडली
आधी कुठे प्रकाशित आहे का?
आधी कुठे प्रकाशित आहे का? वाचली आहे कुठेतरी. >>>>> १
अव्वा .. मज्जा की
अव्वा .. मज्जा की
(No subject)
मस्तेय
मस्तेय
मस्तचै
मस्तचै
इनोदी हाय का कथा?
इनोदी हाय का कथा?
(No subject)
०००००००
०००००००
व्हाट्सअपवर हि कथा वाचले मी.
काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपवर ही कथा वाचल्याचं आठवतंय.
इनोदी हाय का कथा?>>> हो! (आता
इनोदी हाय का कथा?>>> हो! (आता तुम्ही हसू शकता.)
(No subject)
(No subject)
मला यातून ओस्कर वाइल्ड ची
मला यातून ओस्कर वाइल्ड ची कँटरव्हिले घोस्ट पण आठवली
भूत जिथे मेलं तिथे रोज रक्ताचा डाग पाडून ठेवत असतं.आणि घरात राहायला आलेल्या माणसाची मुलं रोज तो डाग पिंकरटन स्टेन रिमूव्हर ने काढत असतात.
भूताचं वय झाल्याने आणि भूताचा एकंदरच कामाचा उरक कमी असल्याने ते खरं रक्त आणण्याऐवजी घरातल्या हौशी चित्रकार मुलीचे रंग चोरुन हे रक्ताचे डाग रोज बनवत असतं.
http://cbseacademic.in/web_material/doc/The%20Canterville%20Ghost,%20by%...