आमच्या घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 21:05

aamacha-ganapati-2017.jpg

आला रे आला बाप्पा आला
दुःख विसरा मनी सुख हे भरा ||

येतोय भेटाया बाप्पा माझा
जल्लोष करा तयारी करा
स्वागत होऊ दे जंगी जरा
प्रसन्न झालाय माहोल सारा ||

कारण आलाय बाप्पा माझा
समई लावा रोषणाई करा
आरतीची वेळ झाली घाई करा ||

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.


श्री. नरेंद्र कुलकर्णी यांनी केरवा तालात बांधलेली ही रचना 'गराज बँड' ह्या सॉफ्टवेअरमधे तयार केलेली आहे. ह्यात गिटार, ट्रम्पेट, व्हायब्रोफोन आणि स्ट्रिंग्स (व्हायोलिन वर्गातील वाद्ये) ह्यांचा वापर केलेला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरचा बप्पा
<img src="/files/u39796/IMG_20170830_130514_A.jpg" width="675" height="1200" alt="IMG_20170830_130514_A.jpg" />
<img src="/files/u39796/IMG_20170830_130456.jpg" width="1200" height="675" alt="IMG_20170830_130456.jpg" />

धन्यवाद vb>>>
प्रत्येक बाप्पा ची मूर्ती ही सुंदर असतेच..पण यावेळी या मूर्तीमागे असलेली ही सजावट खूप आवडली..एका रात्रीत प्रितम आणि प्राची दी ने केलेली सजावट(रंगीत फुले, मोर हे सर्व त्यांनी स्वतः च कागदापासून बनवले आहेत)

ganpatibappa.jpg
हा आमचा असाच आपला बाप्पा... एका दुपारी घरातील जुनी-पानी भांडी वापरून कल्पनेला थोडेस्से मूर्त रूप आणण्याचा केलेला प्रयत्न...

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१७ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

sorry
फोटो देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने गडबड झाली.

Pages