निर्विघ्नं कुरु मे देव!
प्रवासाला निघताना, परिक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखती आधी, शाळा-कॉलेजच्या अॅडमिशन साठी, आणि इतरही अनेकवेळा आपण "निर्विघ्नम् कुरु मे देव!" अशी मनोमन प्रार्थना करतो - कधी उघड, कधी प्रकट तर कधी आपल्या चिंतेत असताना अधाहृत स्वरुपात नकळतही. या प्रार्थनेच्या पुढचं पाऊल म्हणजे अपेक्षित- अनपेक्षित अशा घटनांना तोंड देण्यासाठी आपण करत असलेली तयारी.
कधी प्रवासाला निघताना घरादाराची , बागेची जबाबदारी शेजार्यांवर सोपवतो . क्वचित पाणी /वीज / इंटरनेट सेवा खंडित झाली तर काही उपाय योजना आधीच करुन ठेवलेल्या असतात. रोजच्या शाळा / कॉलेज/ ऑफिसला येण्याजाण्यात काही अडचणी आल्या तर काय करता येईल याचे आडाखे बांधलेले असतात.
काही लोक हे सर्व अतिशय जाणीवपूर्वक , नित्य नेमाने करतात तर कधी प्रसंगातून आलेले शहाणपण असतं. "वेळ काही सांगून येत नाही" या म्हणीचा एकदा अनुभव घेतला की मनुष्य त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो. घरात वीज / पाणी नसताना २४- ४८ तास काढायची वेळ आली तर काय लागेल ते नेहमीच तयार असतं. बर्फाच्या प्रदेशात गाडीत कायम रस्त्यावरील बर्फाशी सामना करायची किंवा वेळ पडलीच तर रस्त्याच्या कडेला अडकलेल्या गाडीत ४-६ तास काढायची तजवीज केलेली असते.
अतिवृष्टी , पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती असोत किंवा दहशतवादी हल्ला, कर्फ्यू, अपघात असे मानवनिर्मित प्रसंग असोत,
अथवा अचानक उद्भवलेले आजारपण, मृत्यू असे वैयक्तिक आघात असोत, अचानक उद्भवलेल्या आपत्तींचा , संकटाचा सामना तुम्ही कसा केलात? त्यातून निभावल्यावर अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून किंवा आलीच तर परत पहिल्यासारखा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केली आहे ? काय सावधगिरी बाळगली आहे ?
फक्त तुम्हीच असे नाही तर तुम्ही राहता त्या प्रदेशात स्थानिक सरकारी यंत्रणा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या नियोजनासाठी काय तयारी करतात ? तुमच्या आजूबाजूचे नागरिक, मित्रमंडळी, ऑफिसमधले सहकारीही साधारणपणे काय तयारी करतात याबद्दल लिहायलाही हरकत नाही. माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांनाच होऊ शकतो.
कुलूप कोयंड्यात लावून:::
कुलूप कोयंड्यात लावून:::
ठेवली तरी बाहेरुन कडी घालता येते... कडी घालायला कुंडीत सरकवलीच पाहिजे असे काही नाही. माझी हीच आयडीया होती बरीच वर्षे, पण कधीतरी हा धोकाही लक्षात आला. तेव्हा जिथे कडी पूर्ण उघडते तिथे एक एक्स्ट्रा कुंडी बसवून घ्यावी, व तिथे कडी कुंडीत घालुन कुलुप लावून ठेवावे.
ठेवली तरी बाहेरुन कडी घालता
ठेवली तरी बाहेरुन कडी घालता येते... कडी घालायला कुंडीत सरकवलीच पाहिजे असे काही नाही.>>>>>>> बरोबर नानाकळा.
कुमार१, तुमचा किंचित गैरसमज
कुमार१, तुमचा किंचित गैरसमज झालाय मैत्रेयीची पोस्ट समजण्यात. जर तुम्ही अॅमेझॉन, फ्लिपक्सर्ट वगैरे साईट्सवरुन ऑनलाईन साईट्सवरुन काही ऑर्डर केल्यास ते घरपोच येईलच पण क्रेगलिस्ट वगैरे साईट्स जिथे तुम्ही इंडिव्हिज्युअल्सशी डिल करता तिकडे तो इंटरनेट सेफ झोन उपयोगी पडू शकतो, तो ही छोट्या खरेदीकरत्ता.
<जिथे कडी पूर्ण उघडते तिथे एक
<जिथे कडी पूर्ण उघडते तिथे एक एक्स्ट्रा कुंडी बसवून घ्यावी, व तिथे कडी कुंडीत घालुन कुलुप लावून ठेवावे.>
आम्ही हे अनेक वर्षं करतोय. वात्रट मुलं जातायेता कडी लावून जायची कोणे एके काळी.
सायो, आभार. मला क्रेगलिस्ट
सायो, आभार. मला क्रेगलिस्ट वगैरे चा अनुभव नाही.
तसेही उठसूठ प्रत्येक गोष्ट घरपोच मागवणे हे काहीसे आपल्यासाठी (विशेषतः एकटे, ज्येष्ठ इ. साठी) काहीसे असुरक्षितच आहे. अगदी अमेझोन वगैरेकडून मागवले तरी कुठल्या कुरीअरचा कोण माणूस घरात शिरेल त्याचा तरी काय भरवसा?
अवांतर : आपल्या सार्वजनिक लिखाणाखाली आपला मोबाइल क्र. देऊ नये, केवळ इ मेल द्यावी असे माझे आग्रही मत आहे.
@नाना : जादा कुंडी व त्यात कुलूप लावलेले ठेवणे असेच म्हणायचे होते. टंकन कंटाळा म्हणून लिहीले नव्हते.
मला क्रेगलिस्ट वगैरे चा अनुभव
मला क्रेगलिस्ट वगैरे चा अनुभव नाही....
कदाचित आपल्या भारतातील OLX सारखेच असावे!
कुंडी हा मराठी शब्द नसून
कुंडी हा मराठी शब्द नसून कोयंडा हा योग्य शब्द आहे. राहवले नाही म्हणून सांगावे वाटले.
ठेवली तरी बाहेरुन कडी घालता
ठेवली तरी बाहेरुन कडी घालता येते... कडी घालायला कुंडीत सरकवलीच पाहिजे असे काही नाही. माझी हीच आयडीया होती बरीच वर्षे, पण कधीतरी हा धोकाही लक्षात आला. तेव्हा जिथे कडी पूर्ण उघडते तिथे एक एक्स्ट्रा कुंडी बसवून घ्यावी, व तिथे कडी कुंडीत घालुन कुलुप लावून ठेवावे.___इति
नानाकळा ==हो तसेच लावलेले आहे आमच्या कडे . आता स्पष्ट झाले ,धन्यवाद.
कुंडी हा मराठी शब्द नसून कोयंडा हा योग्य शब्द आहे. राहवले नाही म्हणून सांगावे वाटले. हया चिडकू यांच्या म्हणण्या कडे लक्ष द्यावे.
कुंडी हा अयोग्य शब्द आहे का
कुंडी हा अयोग्य शब्द आहे का कोयंड्यासाठी की मराठी नाही? दोनपैकी काय?
. कोयंडा कुठे वापरतात, म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात?
प्रमाण भाषेत कोणता शब्द आहे?
कडी - कोयंडा हा प्रमाण शब्द
कडी - कोयंडा हा प्रमाण शब्द आहे बहुतेक. त्याचेच अपभ्रंश झालेले रूप कुंडी असावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं असो. इथे कोणताही शब्द वापरला तरी फार बिघडू नये
आपत्ती व्यवस्थापनाबद्दल लिहा की अजून कोणीतरी!
बाहेरून कडीला कुलूप लावण्या
बाहेरून कडीला कुलूप लावण्या बद्दल अगदी सहमत . आम्ही ही हे करत होतो आता दाराला बाहेरून कडीच नाहीये म्हणून प्रश्न नाही . चोरच कशाला कधी कधी आडनीड्या वयातली मुलं ही टाईम पास म्हणून कडी लावून जातात.
आपल्या इथल्या लाईट फिटिंग बद्दल मला जरा ही भरोसा वाटत नाही. मी जेव्हा बाहेर गावी जाते तेव्हा मला इथल्या लाईट फिटिंग बद्दल नेहमीच काळजी वाटत असते. कधी मी नसताना शॉर्ट सर्किट वैगेरे होऊन काही अनर्थ ओढवेल म्हणून . यासाठी मी निघायच्या आधी इलेकट्रीशीयन कडून सगळं ओके आहे याची खात्री करून घेते आणि जाताना सगळी उपकरण अनप्लग करून जाते . यामुळे माझी काळजी थोडी कमी होते.
जाताना सगळी उपकरण अनप्लग करून
जाताना सगळी उपकरण अनप्लग करून जाते . >>> हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. टिव्ही फ्रीज सारखी उपकरणे नाही पण निदान जी उपकरणे सतत प्लग इन करणे अपेक्षित नाहीत ती अनप्लग करावी. विशेषतः चार्जिंग ला लावलेली डिव्हाइसेस बॅटरी ओवरहीट झाल्यामुळे पेट घेतल्याची बरीच उदाहरणे असल्यामुळे.
बरं मी एक लिहिते.
बरं मी एक लिहिते.
इतक्यातच ती आशा साहनी केस वाचनात आली. तत्सम किंवा कमी जास्त गंभीर इमर्जन्सीज एकट्या राहणार्या ज्येष्ठ नागरिकांना कधीही येऊ शकतात. अगदी तब्येती चांगल्या असल्या तरी वय झालेल्या ज्येनांमधे घरातल्या घरातच तोल जाऊन पडणे, उठता न येणे हेही बरेचदा होऊ शकते.
www.medicalalert.com/personal-medical-alert-systems.html
ही आणि अशा पर्सनल अॅलर्ट सिस्टिम्स एकट्या राहणार्या लोकांना फार उपयोगाच्या वाटतात. तसे हे नविन वगैरे नाहीये. कदाचित सर्वांना माहितही असेल.
यात एक गळ्यात घालायचे छोटे डिव्हाइस मिळते. आणि इमर्जंसी सपोर्ट साठी तुम्हाला दर माहिन्याचे चार्जेस असतात.
इमर्जन्सी मधे फक्त ते गळ्यात घातलेले बटन दाबले की २४/७ ऑनलाइन असलेले ऑपरेटर तुमची इमर्जन्सी काय आहे त्यानुसार लोकल हॉस्पिटल्स किंवा ऑथोरिटीज ना कॉन्टॅक्ट करून काही मिनिटात हेल्प पाठवतात. (डिव्हाइस मधे माइक आणि स्पीकर असतो). तुमचा पत्ता त्यांच्याकडे असतोच, किंवा तुम्ही बाहेर गेला असताना काही झाले तरी जिपिएस ट्रॅकर वरून ते तुमचे लोकेशन शोधून तिथे हेल्प पाठवतात.
इथे अमेरिकेत सिनियर्स नी एकटे राहणे कॉमन आहे त्यामुळे या डिव्हाइसेस सर्रास वापरल्या जातात आणि लाइफ सेवर ठरतात.
भारतात बहुतेक एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मेजॉरिटी ज्येनांना याची गरज पडत नसेल, पण हल्ली मुले परदेशी आणि आई वडील भारतात अशी खूप कुटुंबे आहेत . अशा घरांना अशी एखादी सिस्टिम , असा ऑप्शन भारतात अव्हेलेबल झाला तर बरीच मदत होईल. अर्थात याला लागणारे सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर ही असावे लागेल त्यामुळे हे इम्प्लिमेन्ट करणे जरा चॅलेन्जिंग असेल.
मुंबई पोलिसांची सिनीअर्स
मुंबई पोलिसांची सिनीअर्स साठी हेल्प लाइन
https://mumbaipolice.maharashtra.gov.in/elderline.asp
तसेच मी जिथे काम करते तिथे इमर्जन्सीत ़ कोणाला कॉटॅक्ट करायचे तो नंबर दिलेला आहे. मी आता एक इमर्जन्सी बॅग तयार करते आहे. मुंबई सारख्या ठिकाणी छप्पर पडणे, बिल्डिंग पड णे, गार्बेज च्या डोंगरा खाली दबले जाणे ओपन मॅन होल मध्ये पडणे बांधकाम साइट वर खड् ड्यात प डणे अश्या स्वरूपाच्या अपघातांची शक्यता जास्त आहे. तेव्हा पावसाळ्यात लक्ष असू द्यावे. अति साहस करू नये. सध्या फिटनेस नसतानाही हामता पास ट्रेक सायकल टूर, एकट्याने ट्रेकिंगला जाणे व फेसबुक वर पोस्ट करणे अश्या दु:साहसांची सं ख्या वाढली आहे. तेव्हा आजारातून उठ ल्यावर किंवा फिटनेस नसताना अश्या गोष्टी करू नयेत.
परवा मुंबईत जी बिल्डींग पडली त्यात एक पूर्ण कुटुंब वारले. त्या बाबांनी तो पूर्ण फ्लॅट ७४ लाख देउन ८०० स्क्वे फूट भाडे तत्वावर किंवा कसा विकत घेतला होता. इतर लोक सोडून गेल्याने पूर्ण मजला त्यांना मिळाला होता. पण ते डीलच बरोबर नव्हते. जो भाडेकरू होता त्याने सबलीज अॅग्रिं मेंट केले होते पण बोहरा ट्रस्ट ला सांगितले नव्हते
व डील रजिस्टर्ड नव्हते त्यामुळे भाडेकरुंच्या यादीत अ थॉ रिटी क् डे त्यांचे नाव नव्हते. व घर सोडायला वेळेत सांगितले गेले नाही. पूर्ण फॅमिलीचे चेहरे फोटो त बघून अगदी कसे तरी झाले. हे अवोईड करता आले असते.
मंडळी, मायबोली गणेशोत्सव
मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१७ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!
Pages