सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी,
तर लायन द सिंहासारखे काळीज असणारया सर्वांसाठी..
फक्त वीतभर कपडे अंगावर नेसून घराबाहेर पडण्याचे धाडस कधी केले आहे का?
कधी तशी ईच्छा झाली आहे का?
जर पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर "नाही" आणि दुसरयाचे "हो" असेल, तर आता तुमची प्रतिक्षा संपली आहे.
डाल डाल पे बेबी डॉल आता घेऊन येत आहेत फक्त एका काडेपेटीत मावणारे अंगभर कपडे.
दचकलात!
पण हे खरे आहे. काडेपेटी उघडून अंतर्वस्त्रासमान भासणारया त्या कपड्यांकडे पाहून दचकू नका.
हे घालून आपण चारचौघात गेलो तर आपली लाज नाही का जाणार या विचारांनी गचकू नका.
फक्त एवढेच करा. एखाद्या 'सनी डे' ला हे कपडे आपल्या अंगावर योग्य जागी जमेल तसे नेसा आणि सुर्यप्रकाशात जाऊन उभे राहा. बघता बघता तुमच्या अंगावरच कपडे वाढू लागतील आणि तुमची लाज लज्जा सारे काही झाकून टाकतील.
हबकलात !
पण हे खरे आहे.
आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ग्रंथांतील ज्ञान वापरून आता हे शक्य झाले आहे.
हे कपडे परीधान करून सूर्यप्रकाशात जाताच या कपड्यांमधील वनस्पती पेशी सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करत भरभर वाढू लागतात आणि तुमच्या अंगभर पसरू लागतात. बघता बघता पापणी लवते न लवते तोच तुमचे वीतभर झाकलेले शरीर संपुर्ण वस्त्राच्छादित होऊन जाते.
जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी परततात तेव्हा सुर्याचे शेवटचे किरण पृथ्वीतलावरून गायब होताच हळूहळू संथपणे कपडे आपल्या पूर्व आकारावर येऊ लागतात. आणि तुम्हाला घरी पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ देतात.
कपडे छोटे होतानाच स्वत:हून त्यावर जमलेली दिवसभराची धूळ माती झटकून टाकतात. ज्यामुळे तुम्हाला कपडे न धुता, न सुकवता, न झटकता, न ईस्त्री करता आणि हो हो अगदी न घडी करता वाटेल तसे काडेपेटीत कोंबून ठेवता येतात. हॉस्टेलवर राहणारया मुलांसाठी तर ही पर्वणीच आहे. गृहीणींसाठी तर हे वरदानच आहे.
याची ईतर काही वैशिष्ट्ये :-
1) सनी लायनचे वीतभर कपडे वनस्पतीपेशींपासून बनवलेले असल्याने दिवसभर तुमच्या आसपासचा कार्बन डाय ऑक्साईड खेचत राहतात. आणि तुम्हाला ऑक्सिजन पुरवत राहतात. जेणेकरून तुम्ही राहतात सदैव फ्रेश आणि तजेलदार.
2) सनी लायनचे वीतभर कपडे तुमच्या शरीराच्या मापानेच वाढत असल्याने फिटींगचा प्रश्नच उद्भवत नाही. वाढत्या वयाच्या मुलांच्या पालकांची चिंता आता संपली आहे.
3) दहा बारा दिवसांच्या लांबच्या प्रवासाला जाताना आता सूटकेस न्यायची गरज नाही. फक्त रात्रीची सोय म्हणून नाईट सूट नेल्यास उरलेले दिवसा घालायचे सारे वीतभर कपडे एका पर्समध्ये भरता येतील.
4) पोपटी रंगाच्या दहा विविध छटांमध्ये उपलब्ध.
तुमच्या वीतेच्या आकारानुसार 4 ईंच ते 14 ईंच आकारांमध्ये ऊपलब्ध
5) स्त्री-पुरुष सर्वांसाठी एकच काडेपेटी असल्याने हे सनी लायनचे वीतभर कपडे वस्त्रोद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या ईतिहासातील पहिलेच लिंगनिरपेक्ष वस्त्र ठरणार आहे.
**खुशखबर**
चंद्रप्रकाशातही वाढू लागतील असे कपडे बनवण्यासाठी आमच्या अतरंगी शास्त्रज्ञांचे सतरंगी संशोधन चालू आहे.
पण तो पर्यंत ....
***वैधानिक ईशारा -
सातच्या आत या घरात,
नाहीतर निघेल तुमची वरात !
अधिक माहितीसाठी "सनी लायन वीतभर कपडे" असे टाकून गूगल करा.
वाह अभिषेक.. खूप दिवासानी
वाह अभिषेक.. खूप दिवासानी आपले लिखाण वाचायचा योग आला... वेलकम बेक...
छान लिहिलंय...
छान कल्पक शोध आहे. लोक तुटून
छान कल्पक शोध आहे. लोक तुटून पडतील.
सही जमलंय
सही जमलंय
__/\__
सही जमलेय
सही जमलेय
सातच्या आत या घरात,
सातच्या आत या घरात,
नाहीतर निघेल तुमची वरात ! >>>.
भारी जमलंय!
भारी जमलंय!
भारी आहे!
भारी आहे!
अति भयंकर सुन्दर
अति भयंकर सुन्दर
मस्तच जमलंय .
मस्तच जमलंय .
भारी
भारी
झकास!
झकास!
भारी जमलयं
भारी जमलयं
च्रप्स, अहो मला वेलकम बॅक
च्रप्स, अहो मला वेलकम बॅक बोलू नका.. मी असतो ईथेच सारे वाचत.. उगाच मग ते पाहुण्यासारखे वाटते.
पाथफाईंडर, शोधाचे माहीत नाही पण प्रॉडक्टचे नाव मात्र लोकं तुटून पडावीत या हिशोबानेच ठेवलेय
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे !
सातच्या आत घरात : D
सातच्या आत घरात : D
भारी
भारी
मस्त
मस्त
प्रोडक्ट भारीच आहे पण घेणार
प्रोडक्ट भारीच आहे पण घेणार नाही बुवा...उगा ७ च्या आत घरात नाही पोहोचलो तर काय घ्या!! :ड
भारी प्रॉडक्ट.
भारी प्रॉडक्ट.
सातच्या आत या घरात,
नाहीतर निघेल तुमची वरात !>>>
लोकांनी सातच्या आत घरातचे
लोकांनी सातच्या आत घरातचे फारच टेंशन घेतलेले दिसतेय.. चंद्रप्रकाशात वाढणारे कपडे मार्केटमध्ये आणायचे लवकरात लवकर मनावर घ्यायला हवे
लोकांनी सातच्या आत घरातचे
लोकांनी सातच्या आत घरातचे फारच टेंशन घेतलेले दिसतेय.. चंद्रप्रकाशात वाढणारे कपडे मार्केटमध्ये आणायचे लवकरात लवकर मनावर घ्यायला हवे
>>
अमावास्येसाठी पण काही तरी शोधा
(No subject)
हवेने वाढणारे कपडे हवेत. :ड
हवेने वाढणारे कपडे हवेत. :ड
सूर्य चंद्र प्रकाशात डिझाईन लोचा आहे.परत ढगाळ हवामानात मनात शंकेची पाल चुकचुकत राहील ते वेगळेच.
मस्तच.
हे कपडे आमचे पूर्वज वापरत होते.सज्जड पुरावा आहे. सुर्य ग्रहण बघू नये हे आमच्या संस्क्रुतीत लिहिलं आहे, ते लज्जारक्षणार्थ!!! आता माशेलकरांना बोलवून पेटंटच करतो की त्यांना हळद सोडून काही बोलायला विषयपण मिळेल.
भारी आहे
भारी आहे
ते जनरेटर, कन्वर्टर की इन्वेटर की काय ते असते ना.. ते जर याला जोडले, वा चार्जेबल ब्याटरीची सोय केली तर दिवसाची सौर उर्जा रात्रीला राखून लज्जानिवारण नाही का करता येणार?
त्यातही एनर्जी सेव्हिंग मोडला गेले तर फुल्ल्प्यांटची हाल्फप्यांट, नववारी ची पाचवारी अशी काही तरी अॅडजस्टमेंट केली तर अगदी रात्री बाराच्या आत घरात गेले तरी चालेन .. सातच्या आत घरात अगदीच लवकर होते.. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा ठिक आहे.
अवांतर - ती सिंड्रेला सुद्धा असेच काहीतरी घालून राजकुमाराच्या पार्टीत गेलेली का?
सिंड्रेला चे कपडे ओअरीची
सिंड्रेला चे कपडे परीची जेन्युइन मॅजिक होते.अन्यथा राजकुमाराला काचेचा बूट मिळालाच नसता.एखादा दगड वगैरे मिळाला असता.
फक्त तिचा रथ आयुर्वेदिक असल्याने त्या रथाचा १२ नंतर लाल भोपळा बनणार होता
मला आठवत नाही सिण्ड्रेला
मला आठवत नाही सिण्ड्रेला
पण रथाचा लाल भोपळा होतो तर बाकी कपड्यांचे आणि बूटांचे काय होते? त्याचे काही होते तर एका राहिलेल्या बूटाचे काही का होत नाही? आणि कश्याचेच काही होत नाही तर ती दुसरा बूट आणि कपडे कुठे लपवते?
आणि सिंड्रेलाचा पाय असा काय विचित्र मापाचा आणि आकाराचा असतो जे तिच्या पायात फिट होणारा बूट राज्यातल्या ईतर कुठल्याही बाईच्या पायात होणार नाही?
कपडे पार्टी ड्रेस गायब होऊन
कपडे पार्टी ड्रेस गायब होऊन नॉर्मल फाटके घरातले बनतात १२ नंतर.
परीने कपडे आणी बूट यासाठी वेगवेगळे कस्टमायझेशन केले असावे.
किंवा बूट सिन्ड्रेला ने स्वतःचे त्यातल्या त्यात बरे पार्टीवेअर शूज घातले असतील.
तिचा शू साइझ ३४ किंवा ३६ वगैरे असेल(बहुतांश बायकांचा ३८-४० च्या मध्ये असतो.)
मस्त
मस्त
खुपच छान लिहले आहेस ......
खुपच छान लिहले आहेस ......
Pages