"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच एक खल्लास थिअरी वाचली. ब्रान Ice Dragon चा ताबा घेईल. ३ Dragons will have finally have 3 riders. Of course there will be interference in this by Night King but Bran being our hero will warg in ice dragon at some point.

>> ब्रान Ice Dragon चा ताबा घेईल<<

विसेरियन इज डेड, हि इज ए वायट नाव. ब्रॅन नाइट किंग/व्हावॉ सारखा वाय्ट्सना कंट्रोल करु शकतो? आय थॉट हि कुड वॉर्ग इन्टु लिविंग बिइंग्ज ओन्ली.

फिनाले!! बेस्ट सीन वॉज स्टार्क सिस्टर्स आणि लिटलफिंगर वाला!! क्या डायलॉग मारे सान्सा ! व्वा! असे झाले मला Happy ब्रॅन पण एकदाचा काहीतरी कामाचे बोलला!
सर्सी- टिरियन चा पण सीन चांगला होता. सर्सी ने आपल्याला वाटले तसेच केले शेवटी. नो सरप्राइअज देअर. जेमी तिला सोडून निघाला ते आणि जॉन डॅनी मधला सीन हे दोन्ही टू फास्ट वाटले मात्र. काहीही केमिस्ट्री कधी वाटलीच नाही त्यांच्यात. उगीच इतर लोकच काही बाही बोलताना दाखवलेत . त्या जॉन च्या चेहर्‍यावर ते जे सतत इनेट्न्स , दुखावलेले भाव असतात ते सोडून कसलेही भाव कधी उमटले नाहीत. असो.
निळ्या डोळ्यांच्या ड्रॅगन ला काय लेसर कटर वगैरे मिळाला काय ?!! Proud
वॉल तुटली. अब मारो काटो होणार नेस्ट सीझन. पाह्लिया विकेटी टारमुंड आणि बेरिक च्या पडणार असे दिसते आहे.

टिरियन डॅनी आणि जॉन ला धोका देण्यासारखं काही करेल का काय पुढच्या सिजन मध्ये! Succession planning talk तिनी त्याला successor करावं म्हणून होतं की काय आता जर डॅनी आणि जॉन नी मिळून टार्गरियन बेबी जन्माला घातली तर तो काय successor होत नाही. शिवाय he is loyal to lanninster फॅमिली.

बाकीच्या सिजन फिनाले इतका हा exciting वाटला नाही. लॉर्ड बेलीश, जॉन चा जन्म आणि सारसी टिरियन ला मारायची ऑर्डर देत नाही तो सिन सोडला तर.

फिनाले!! बेस्ट सीन वॉज स्टार्क सिस्टर्स आणि लिटलफिंगर वाला!!>>+१.. तोच एक आरामात घेतला असं वाटल मला..
बाकी सारे खुप फास्ट होते..
ब्रॅन आणि सॅमवेलला सुद्धा लवकरच गुंडाळल आहे..
शेवट आवडला.. एकदाच ं भिंतीला भगदाड पडल ब्वा..

तुम्ही पुस्तक वाचलत तर जेमी मधे होणारा बदल जाणवत जातोय. सिरीयल मधे तो एक साईड पात्र झालाय. पण चौथा किंवा पाचव्या पुस्तकामधे त्याने जबरदस्त फूटेज खाल्लय.

हो जेमी च्या कॅरेक्टर चा ग्राफ जबरदस्त बदलला आहे. पण असे वाटले होते की सर्सीच्या प्रेग्नन्सी न्यूज मुळे त्याची लॉयल्टी तिच्याशीच राहील.
त्या मानाने त्याने सेकंड थॉट पण नाही दिला.

पण एगॉन म्हणजे तो अल्टिमेट कॉन्करर असतो तोच ना?
तसंच मला लिअ‍ॅना आणि र्हेगार ची कथा सांगताना पॅरलली जॉन - डॅनी ला दाखवणे म्हणजे जॉन- डॅनीचे फेट पण र्हेगार - लिअ‍ॅना सारखे होणार की काय, मुलाला जन्म देऊन डॅनी मरणार आणि जॉन लढाईत आणि मग सान्सा/ आर्या मुलाचा सांभाळ स्टार्क म्हणून करतील की काय असे वाटले. Happy
शेवट - अ‍ॅन्ड द गेम कन्टिन्यूज .....

एगॉन पुस्तकाप्रमाणे आलेला पहिला राजा आहे Targaryen चा westeros मधला. मधल्या काही राजांछी नावे पण हीच होती नि ते सगळेच लवकर उडालेत. एकजण Dragon fight मधे उडालाय. अझोर अहाय तोच होता कि नाही ह्याबद्दल सगळेच अर्धवट आहे पुस्तकामधे. फक्त एकच भाग क्लीयर आहे कि त्याने आधीच्या White walker ला हाकलून लावलेले. सिरीयल मधे काय झालेले आठवत नाहीये.

तुम्हाला ब्रान च्या नावाबद्दल पण तसेच काही असे वाटतेय का ? म्हणजे Night King ने उडवलेला हैदोस पाहून Bran भूतकाळात जाऊन Children बरोबर वॉल बांधून घेतो वगैरे टाइप्स. च्यामारी आधी पुस्तक नि सिरीयल मधे होते तेव्हधी गडबड कमी म्हणून कि काय आता Time period मधे पण घोल होणार Wink

मला तर वाटतय सर्सी प्रेग्नंट नसेलच, असलीच तर ते मूल जेमीचं नसेलच. मिरि माझ दुर ची प्रोफ़ेसी होती कि सर्सीला ३ च मुले होतील, जि आधीच मेली आहेत. अस वाटतय कि ते मुल फ़ार जगणार नाही.

टिरियन डॅनी आणि जॉन ला धोका देण्यासारखं काही करेल का काय पुढच्या सिजन मध्ये! Sउccएस्सिओन प्लन्निन्ग तल्क तिनी त्याला सुccएस्सोर करावं म्हणून होतं की काय आता जर डॅनी आणि जॉन नी मिळून टार्गरियन बेबी जन्माला घातली तर तो काय सुccएस्सोर होत नाही. शिवाय हे इस लोयल तो लन्निन्स्तेर फॅमिली. हे मला पण असच वाटतय. पण प्लिज अस नको व्हायला, टिरियन आवडत character आहे

>>अस वाटतय कि ते मुल फ़ार जगणार नाही<<
स्टील्बॉर्न व्हायची शक्यता आहे, प्रॉफसीनुसार.

जॉनचं लिनिएज जगासमोर आल्यावर सक्सेशनचा प्रश्न निकालात निघेल...

माझ्यामते फिनालेचे हाय्लाइट्सः
१. जॉन स्नोचा एकाच राणीशी निष्ठावान राहिन अशी बाणेदार घोषणा Wink
२. बोलणी फिसकटल्यावर परत एकदा संधी करायला टिरियनने एकट्याने जायचं दाखवलेलं धैर्य - बंदेमे दम है!
३. लिटलफिंगरचा अंत

काहि अनाकलनिय बाबी:
१. ब्रॅन, लिअ‍ॅना आणि नेडमधला शेवटचा संवाद ऐकतो पण त्यांचं रितसर लग्न झालंय का याची खातरजमा करत नाहि, सॅमने सांगितल्यावर बघतो
२. सर्सी/युकान चा धाडसी मुर्खपणा. एसॉस वरुन आणलेले मर्सिनरिज नाकिं/व्हावॉ/झांबीजना पुरुन उरतील हा फाजील आत्मविश्वास
३. #२ नुसार तिने डबल्क्रॉस करायचं ठरवलं तरीहि तिच्याकडचे बॅनर्स्/अलायंस तिला सपोर्ट करतील का? ऑनरच्या नावाखाली जेमी ऑलरेडी फुटलाय
४. टिरियन/जॉन जरा मुत्सद्दिपणा दाखवुन, रक्तपात होउ न देता सर्सीची सत्ताच उलटुन (सॉर्ट ऑफ कु) का टाकत नाहि? दॅट वुड बी ए बिग फेदर इन टिरियन्स हॅट... Proud

१. ब्रॅन, लिअ‍ॅना आणि नेडमधला शेवटचा संवाद ऐकतो पण त्यांचं रितसर लग्न झालंय का याची खातरजमा करत नाहि, सॅमने सांगितल्यावर बघतो
>> अरे एकटा माणूस किती किती नि कुठे कुठे बघणार ? Happy

२. सर्सी/युकान चा धाडसी मुर्खपणा. एसॉस वरुन आणलेले मर्सिनरिज नाकिं/व्हावॉ/झांबीजना पुरुन उरतील हा फाजील आत्मविश्वास >> तिचा प्लॅन मला वाटते डॅनी नाकिं/व्हावॉ/झांबीजना पुरुन उरतील नि नंतर वीक झालेल्या त्यांना गोल्डन आर्मी पुरून उरेल असा आहे. नाकिं/व्हावॉ/झांबीज जिंकले तर त्याबाबत काही प्लॅन आहे असे वाटत नाहि तिच्या एकंदर संवादांवरून.

४. टिरियन/जॉन जरा मुत्सद्दिपणा दाखवुन, रक्तपात होउ न देता सर्सीची सत्ताच उलटुन (सॉर्ट ऑफ कु) का टाकत नाहि? दॅट वुड बी ए बिग फेदर इन टिरियन्स हॅट... >> खर तर सर्सी कशाच्या जोरावर सत्ता टिकवून आहे हेच कळत नाहिये सध्या.

खर तर सर्सी कशाच्या जोरावर सत्ता टिकवून आहे हेच कळत नाहिये सध्या>>खरच..अख्या वेस्ट्रॉसमधे तिच्या बाजूने कोणते राज्य आहे असे वाटत नाही....तरी टिकून आहे???

खर तर सर्सी कशाच्या जोरावर सत्ता टिकवून आहे हेच कळत नाहिये सध्या>>आयर्न बँकच्या...
"The Lannisters always pay their debts. Do former slaves, or Dothraki, or dragons?”

आयर्न बँकच्या... >> नाही वाटत तसे. अजून Golden Army यायची आहे. लॅनिस्टर्स ने घेतलेले कर्ज हा वेगळा भाग आहे. Iron Bank पुढे support करेल असे म्हणू शकतो फार तर. पण जसे डॅनी च्या मागे ड्रॅगन, डोथराकी नि फ्री सीटीज्स मधले आर्मी आहेत, जॉनच्या पाठी North आहे, नाईट किंग कडे डेड्स म नि आता आईस ड्रॅगन तसे सर्सीकडे म्हणण्यासारखे कोणीच नाहीये. लॅनिस्टरची आर्मी कधी च प्रचंड मोठी नव्हती नि जेमी पकडला गेल्यानंतर बरीच मारली गेली होती.

अजूनही लॅनिस्टर आर्मी दाखवताना भरपूर मोठी, अन "कवायती फौजे"*सारखी शिस्तबद्ध, गणवेशधारी दाखवतात. (*संदर्भ : इंग्रजांच्या कवायती फौजा वि. देशी लोक्स)

हो खरे आहे. पण तसे शिस्तबद्ध तर अनसलिड आर्मी पण आहे . पण इन्टिमिडेटिंग आणि स्पेक्टॅक्युलर काय असेल तर ते डोथ्राकी घोडदळ Happy काय खतरनाक राइड करतात ते. आणि मधेच ते चालत्या घोड्यावर उभे राहून बाण सोडणे वगैरे भारीच!! लॅनिस्टरांची पार फेफे उडते. तो ब्रॉन नसता तर काही खरे नव्हते हाय गार्डन हून येतानाच्या त्या लढाईत! तो डोथ्राकी सरदार टिरियन ला उपहासाने म्हणतो पण " युअर मेन कान्ट फाइट!"
ती लढाई फार भारी वाटते बघायला!

आणि मधेच ते चालत्या घोड्यावर उभे राहून बाण सोडणे वगैरे भारीच!! >> मै, ते सगळं मंगोल 'लाईट कॅव्हॅलरी'च्या टॅक्टिक्सवरून सरळसरळ उचललेलं आहे. Happy डोथ्राकी हे बरेचसे मंगोल साम्राज्यावरून उचलले आहेत. जश्या युरोपीयन 'हेवी कॅव्हॅलरी' अर्थात आर्मर्ड नाईट्सच्या आर्मीज मंगोल आक्रमणांपुढे टिकाव धरू शकल्या नाहीत, तसेच हे आहे.

Pages