(स्थळ- गायकवाडांचा वाडा , अंजलीबाई हातात B2 वनस्पती तेलाची बाटली घेऊन राणादांच्या मागे फिरतायेत)
राणादा:- तुम्हास्नी एक डाव सांगितलय न्हवं मी हे असलं तेल लावणार न्हाय म्हणुन
अंजलीबाई:- का बरं? काय वाईट आहे ह्या तेलात?
राणादा:- ते वहिनिस्नी त्रास होतोया न्हव असल्या तेलाच्या वासान. ते काय न्हाई त्या मला आईवानी हैत. त्या निघुन जात्याल माहेरी पुन्यांदा.
अंजलीबाई:- अहो तुम्ही काळजी नका करु हे तेल मी दक्षिण मुंबईहुन आणले आहे. ह्या तेलाचे खुप फायदे आहेत. हे तेल डोक्याला लावल तर तुम्ही काहीही वाचले तर् आयुष्यभर लक्षात राहिल. जर हे तेल तुम्ही मनगटाला चोळले तर मणगटात ताकद येईल तुम्ही कुणालाही उचलुन आखाड्याच्या बाहेर फेकु शकाल. द.मु त हे तेल ज्याने पहिल्यांदा वापरले त्याला सगळेजण माबोचा सुपरस्टार म्हणतात. हे तेल तुम्ही जरासे तळहातावर घेऊन डोक्याला पुसले तर दिवसात तीन चार धागे काढु शकता
राणादा:- (खुश होऊन) व्हय काय?
अंजलीबाई:-हो आणि इकडे या(लॅपटॊप दाखवत) 'हा ब'घा ह्याआयडी याला इतक्या केसेस सुचतात की त्या सोडवुन सोडवुन येथे एखादा शेरलॊक तयार होईल. ह्या तेलाचा एक घोट तुम्ही घोट तुम्ही पिला की तुम्ही कोणतीहि कोडी सोडवु शकता. इतकी बुद्धी तल्लख होते. सोबत पोटाची कोणतीही तक्रार उरणार नाही. सांधेदुखी, गुडघेदुखी यासारख्या दुखण्यांवर जालिम उपाय आहे हे तेल.
राणादा:- ह्या तेलामुळ साईडचा इफेक्ट् तर व्हणार न्हाई न्हव.
अंजलीबाई:- आजिबात नाही ह्या बी2 तेलाचा शोध बाबाकोल्हापुरी यांनी लावला. बाबाबंगाली हे त्यांचेच शिष्य आहेत. त्यांचे फेबु स्टेटस खुप प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरी बाबांनी तेल लावलेला हात चुकुन त्यांच्या डोक्यावर ठेवला. तर त्यांना अफलातुन स्टेटस सुचु लागले. म्हणुन त्यांनी ह्या तेलाला नाव ही त्यांचेच दिले बाबा बंगाली ( B2 ) वनस्पती तेल. हिमालयातील उत्क्रुष्ट् वनौषधीं पासुन हे तेल बनवल आहे. चालतय न्हव
राणादा:- चालतय की
एकत्र् :- मग आजच वापरा बाबा कोल्हापुरी यांच्या सौजन्याने तयार झालेले बाबा बंगाली
म्हणजेच बी2 वनस्पती तेल. ऒफर मर्यादित कालावधीपर्यंत
आमचा पत्ता- बिटरगाव. परश्याचे घर.
अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा : बी2 उर्फ् बाबा बंगाली वनस्पतीचे तेल
Submitted by Nikhil. on 26 August, 2017 - 23:56
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
राणा अंजलीबाईंची आयड्या झकासच
राणा अंजलीबाईंची आयड्या झकासच
भारी जमलंय
भारी जमलंय
अरे व्वा!
अरे व्वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीये हि कल्पना...
मस्त!!!!!!!!!!!!!
___/\___ साष्टांग गुरूदेव
___/\___ साष्टांग गुरूदेव
>>> दक्षिण मुंबई........हे तेल ज्याने पहिल्यांदा वापरले त्याला सगळेजण माबोचा सुपरस्टार म्हणतात. हे तेल तुम्ही जरासे तळहातावर घेऊन डोक्याला पुसले तर दिवसात तीन चार धागे काढु शकता<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ऋन्मेष...
भारी जमलयं
सहिये हे
सहिये हे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझं मत तुम्हालाच
माझं मत तुम्हालाच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जय बाबा राम रहीम बंगाली !!
माझं मत तुम्हालाच Lol
माझं मत तुम्हालाच Lol![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जय बाबा बंगाली !!
भारीये
भारीये![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हायला!
हायला!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाबा बंगालीची लिंक तर हिट होतीये!....
जय महाकाली
(No subject)
छान.
छान.
सर्वांचे मनापासुन धन्यवाद
सर्वांचे मनापासुन धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं मत तुम्हालाच>>> यासाठी मतदान आहे हे माहित नव्हते
माझे मत तुम्हाला
खुसखुशीत !
खुसखुशीत !
(No subject)
भारीच
भारीच
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>राणादा:- चालतय की
>>राणादा:- चालतय की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नंबर..!
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाख दुखोंकी एक दवा है क्यों
लाख दुखोंकी एक दवा है क्यों ना आजमाये गाण्याची आठवण झाली
केस सुचणारा हा ब
धन्यवाद मेधाजी, धनि
धन्यवाद मेधाजी, धनि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मेधाजी, धनि
धन्यवाद मेधाजी, धनि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)