खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो . असंही असू शकत ... >>> द्या द्या आणखी नको नको त्या आयडिया द्या तुम्ही लोक लेखकाला , आपल्या छळवादाच्या ....

आतल्या सोर्स कडून कळलंय मालिका संपणार आहे लवकरच >> सुजा तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय मला. Happy
संपवा म्हणावे आमचा छळ लवकर.

भरत Lol Rofl

इकडे अपडेट वाचून आज थोडी मालिका पाहण्याचं धाडस केलं... फास्ट फॉरवर्ड झाली की एकदम... लवकर संपेल हे जरी चांगलं असल तरी सगळं संपल्यावर त्या छोटुश्या इशू बाळाचा कित्ती प्रॉब्लेम होणारे...म्हणजे सगळं गोड गोड झालं तर मंद जोडी एकत्र आणि चालू मो आणि रा एकत्र होईल असं गृहीत धरू...
मग इशू बाळ मो ला आई म्हणणार का मोठी आई.. रा ला बाबा का मोठा बाबा...मा ला छोटी आई का मावशी...आणि वि ला छोटा बाबा का मावसा(??)(मावशीचा नवरा) का स्टेप बाबा(मोठ्या आई चा पहिला नवरा(??)).. जाऊ दे..चकवा लागायचा विचार करून.. Proud

राजन म्हणतो की माझे हेर सगळीकडे आहेत ज्यान्च्याकडून मला तुझी म्हणजे मोनिकाची सगळी बातमी कळते.
हा हेर म्हणजे नक्कीच सई. नाहीतर तिला का एवढा मोठा रोल दिलाय ?
राजन सई आणि सावन्त काका तिघे मिळून पैसे मागतील. सई राजनची बहीण प्रेयसी किन्वा बायको सुद्धा असू शकते.
मोनिकाला फसवतील बहुतेक .
म्हणजे मालिका काही एवढ्यात सम्पत नाही .

नाहीतर तिला का एवढा मोठा रोल दिलाय ? >>> सई, म्हणजे शर्वरी पाटणकर या मालिकेची संवाद लेखिका पण आहे. आणि मूळात ती एक चांगली अभिनेत्री आहे. म्हणून घेतला असेल मोठा रोल

सई राजनची बहीण प्रेयसी किन्वा बायको सुद्धा असू शकते. >> तर किती तो घोळ होईल ! मधल्या मम्मा ची पोस्ट तयार होईल ना मालिकेत मग !!

@ शुगोल

सई, म्हणजे शर्वरी पाटणकर या मालिकेची संवाद लेखिका पण आहे. आणि मूळात ती एक चांगली अभिनेत्री आहे. म्हणून घेतला असेल मोठा रोल>>>>>>>>>>>>>>>>

सई नई काई शर्वरी ...........
अहो ती मोहन काकाची बायको दाखवलीय ना आता नंतर बदललेली म्हणजे काका पण बदल्लाय म्हणा ....
....ती गीता काकू म्हणजे विक्रांत ची काकू .....

ती हाय ओ शर्वरी पिल्ले पाटणकर .
ती लेखिका हाय या सिरीयल ची. Bw

मोहन काकाची बायको - शर्वाणी पिल्ले
सई - शर्वरी पाटणकर (लेखिका)>>
बरोब्बर
मी पण गोंधळले राहुल यांचा प्रतिसाद वाचून.
मधली मम्मा>> अरे देवा. Rofl

जेव्हा जेव्हा मो विक्र्या व मानसीला झापत असते तेव्हा वि मारे बेदरकार पणाचा आव आणून तिच्या कडे पाहाताना दाखवतात..पण आतून तो दर वेळी सटपटलेला असतो हे जाणवते. Happy काहीही....... म्हणजे त्याला अगदी खंबीर व फर्म विक्रांत चा रोल करायला सांगितला तरी तो अगदीच गुळमुळीत भाव आणेल. त्याला ना धड लॉजीकल उत्तरं सुचत तिचं तोंड बंद करायला ना तिला खडसावून गप्प करता येत!

मला वाटतं विक्रांत आणि मानसी ईशामुळे अडकलेत. आता काल मोनिकाने त्यांना धमकी दिली की मी तुमच्याबद्दल तिला खरं खरं सांगेन . तसंच तेही मोनिकाबद्दल ईशाला खरं खरं सांगू शकतात. पण त्यांचा चांगुलपणा आड येतो.

मी नताशा +१
ह्यांचे चांगुलपणे नेहमीच बरे आडवे येतात. मुद्द्यचं काही बोलायचं असल्यास, स्पष्ट काही बोलायचं असल्यास.
चांगुलपणा नसुन मुर्खपणा आहे सगळा.

त्या मोनिका समोर ते दोघंही इतके गुळमुळीत का वागतात समजत नाही . बर त्यांना तिला सडेतोड उत्तर देणारे हि डायलॉग दिले नाही हे जरी मान्य असलं तरी रागवल्याचा अभिनय तरी करता येतो ना ? पण तोही त्या दोघांना जमत नाही . जरी ते बोलू शकले नाहीत तरी फेशियल एक्सप्रेशन्स वरून तरी दिसायला पाहिजे ना " बस हा आता मोनिका तुझा हा नाटकी पणा " निदान कुत्सिक लूकस पण वि आणि मानसी दोघंही ढिम्म चेहऱ्यांनी ऐकत बसलेले असतात. त्यातल्या त्या वि अगदी थोडीफार एक्स्प्रेशन्स तरी देतो पण मानसीच मात्र संपूर्ण सीनभर सतत एकच एक्स्प्रेशन ? बदलतच नाही ती चेहऱ्यावरची रेषा . ढिम्म कुठची Proud

नवी मालिका सुरु होतेय . अठरा सप्टेंबर पासून . आजच प्रोमो बघितला . हि वेगाने आटोपती घ्यायला सुरवात झालीच आहे Happy

Pages