Submitted by हर्षल_चव्हाण on 22 August, 2017 - 20:32
मला गेल्या काही महिन्यांपासून उजव्या कानात आवाज येण्यास सुरूवात झाली आहे. घूंsssss असा आवाज येतो, ते ही फक्त कानात हवा ब्लॉक असेल तर. नाक दाबून कान मोकळे केले की बरं वाटतं, पण नंतर पुन्हा तसा त्रास होतो. कधी कधी झोप नीट झाली नसेल तर हा त्रास जास्त जाणवतो, आणि एरव्ही सुद्धा थोड्या-बहूत प्रमाणात होतोच आहे. या आधी कधीच झालं नव्हतं असं. इथे हिवाळा सुरू झाला आणि हा त्रास सुद्धा. पण मागच्या दोन हिवाळ्यात असं काहीच झालं नव्हतं. डॉक्टरांनी सुद्धा केवळ थंडीमुळेच असेल असं सांगितलं. ते काही अजून बरं होत नाहिये...
इथे कुणाला असं काही झालंय का, किंवा बरं होण्यासाठी काही (घरगुती) उपाय आहेत का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हर्षल जी डॉक्टरांचा सल्ला
हर्षल जी डॉक्टरांचा सल्ला घेण च योग्य राहिलं..घरचे उपचार करण्यापेक्षा...
नक्कीच मेघा जी
नक्कीच मेघा जी
ENT तज्ञाला गाठा
ENT तज्ञाला गाठा
नाही, टिनिटस वर 'ठोस' उपाय
नाही, टिनिटस वर 'ठोस' उपाय काही नाही (माझ्या अल्प माहितीनुसार). पण तरीही, ध्यान, प्राणायाम, मनावरील ताण कमी करणे याचा उप्योग होऊ शकतो.
इकडे काही लोकांनी अनुभव लिहिले आहेत. ते व्हर्टिगो बाबत आहेत, तरीही वाचून पहा.
https://www.maayboli.com/node/63464
धन्यवाद रैना, धागा वाचला
धन्यवाद रैना, धागा वाचला आत्ताच
आशा आहे कि उपयोग होईल 
धन्यवाद बाबू.
पुण्यात असलेले तज्ञ डॉ सुचवा
पुण्यात असलेले तज्ञ डॉ सुचवा प्लीज कोणाला माहीती असतील तर. इत्के दिवस जाणवले नाही पण आता खुप जास्त आवाज येतोय. दाव्या कानातुन.
हे एक प्रॉडक्ट पाहिलं होतं पण
हे एक प्रॉडक्ट पाहिलं होतं पण कधी वापरलं नाही त्यामुळे जास्त काही माहित नाहि.
https://bit.ly/tinnitusRecovery