"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हि ताकद नाईट किंगकडे नसुन नाईट'स किंग कडे आहे अस दाखवल आहे.
नाईट'स किंग हा नाईट किंग पेक्षा पावरफुल दाखवला आहे. तो तोच जो लढाईमधे सगळे मुडदे चुटकिसरशी खडे करतो. डोक्यावर बर्फाचा क्राउन्/शिंग्/हॉर्न्स असणारा..<<

नाइट किंग आणि नाइट्स किंग मध्ये परत तुमचा गोंधळ झालेला आहे. नाइट्स किंग इज लाँग गॉन. नाइट किंग येतोय सगळ्यांची वाट लावायला... Happy

ट्यागो, अफलातुन!

Somehow मला आजच्या भागात काहीच सनसनाटी झाल्याचं वाटलं नाही. पुढचा भाग season finale आहे बहुतेक! Youtube वर season finale असा trailer करत आहेत. गेला भाग जास्त छान होता. I hope they do justice to season finale. ह्या सिजनचा पहिला आणि आजचा भाग फारच बोरींग. आठच भागात सिजन संपावणार!

ह्या सिजनचा पहिला आणि आजचा भाग फारच बोरींग. >> चलो कुणीतरी आहे माझ्या सोबत..

मलातर मुळात त्या झाँबीला आणायला हे मुर्ख सगळे जातात हाच प्रकार पटला नाही..सगळ्यांची अक्कल एकसाथ घुटण्यात कशी जाते कोण जाणे..

अधिक ते जॉन आणि डेनेरिस जोडी फार इर्रिट्टेट करायला लागलीए...स्टोरी काहीच नाही, केमेस्ट्री काहीच नाही अन डायरेक्त आकंठ एकमेकाच्या प्रेमात बुडले..याला काय अर्थ आहे..
मला हा भाग अ आणि अ वाटला..
काश या सार्‍यांचा व्होल अँड सोल मार्टिनबुवा असता..
हे सारे नवे भाग आता एकदम कॉमिक सुपरहिरोज च्या वळणावर चाल्लेय..
आधीचे सिझन निदान जरातरी मानवाच्या मनाचे खरे कंगोरे दाखवत होते..आता सरळ सरळ एकतर हा खुप खुप चांगला नाहीतर हा खुप खुप वाईट असं दाखवताय..

राडा केला आहे काल! थ्रिलिंग होता एपिसोड. विसेरिऑन आता काय ओकणार हे अजून कळलेले नाही.
माझा फेवरेट पार्ट - त्या ७ लोकांमधले कॉन्वर्सेशन्स आणि अल्मोस्ट बाँडिंग Happy
मलाही एका व्हा.वॉ. ला आणायला सगळ्यांनी जीव धोक्यात का घालायचा ते गेल्या भागापासून कळलेलेच नाहीये. दे मेड थिंग्ज टेरोबली वर्स बाय नॉट ओन्ली लूजिंग विसेरिऑन बट गिविंग हिम टू द अदर साइड!! हे सगळे फक्त सर्सीला व्हा. वॉ. दाखवायला?? त्या बाई ला त्याने काही फरक पडणार नाही, उल्ट ती परिस्थितीचा फायदा कसा उठवायचा ते बघेल. डॅनी, जॉन, तिचे ड्रॅगन्स, सैन्य, सगळे लोक व्हा वॉ शी लढताना मेले तर सर्सीला बरंच आहे Lol
बायदवे जॉन आणि डेनेरिस काही आकंठ प्रेमात वगैरे नाही वाटले अजून . अर्थात पडणार ते दिसतंच आहे.
तिकडे सान्सा - आर्याचे काहीतरी तिसृरेच. कधी नाही ते सान्साच जरा सेन्सिबल वाटली अन आर्या माथेफिरु.

बायदवे काल ती" फक्त ड्र्कॅरिस म्हणा" कविता आठवून फार हसू येत होतं.
आणि शेवटी जॉन तिला "डॅनी" म्हणतो तेव्हा बाबुराव आपटेच आठवला, " डॅनी ? युअर ग्रेस से यकदम डॅनी?" लगता है तेरा भाडा डबल करना पडेगा असलं काहीतरी इमॅजिन केलं :हाहा"

हे सारे नवे भाग आता एकदम कॉमिक सुपरहिरोज च्या वळणावर चाल्लेय..
आधीचे सिझन निदान जरातरी मानवाच्या मनाचे खरे कंगोरे दाखवत होते..आता सरळ सरळ एकतर हा खुप खुप चांगला नाहीतर हा खुप खुप वाईट असं दाखवताय..>>>>
मला पण टीनाचं हे वरचं म्हणणं पटलय

कधी नाही ते सान्साच जरा सेन्सिबल वाटली अन आर्या माथेफिरु. >> +१ पण ब्रियॅन ऑफ टर ला किंग्ज्स लँडिंग ला पाठवायचा डाव काही सेन्सिबल नाही हां वाटलं . दुष्ट मेली.

कालच्या एपिसोडमधलं सगळं एक्स्पेक्टेडच होतं. फक्त GoT असल्याने बघायला मजा आली. पण सारखं राहून राहून हा सगळा प्लॅनच किती फ्लॉड आहे हे (मागच्या एपिसोडपासून) वाटतंच होतं.

आयडीया कोणाची तर टिरियनची, असले काही तरी प्लॅन्स बनवायचे, आणि तिकडं ती माणसं अडकली तर मदतीला जायला डिनेरीसला जाऊ नको म्हणायला लागला :). आधीचा टीरियन कसला भारी होता, पण आजकाल फक्त चिंताक्रांत चेहेरे करत बसलेला पाहून कंटाळा येतोय.

मला कालच्या एपिसोडमध्ये गेंड्रीनं वॉलच्या पलिकडून पळत वॉलला येणं, रेव्हन पाठवणं, डिनेरिसने तो मिळून, पत्ता न चुकता बरोब्बर हाय पॉइंटला (म्हणजे व्हिलन हिरोला गोळी घालणारच तेंव्हा) योग्य ठिकाणी येणं हे पाहून बॉलीवूडची फार आठवण आली. Wink गेंड्री पोचला नसता तर, रेव्हन वेळेत गेला नसता तर, डिनेरिसनं टिरियनचं ऐकलं नसतं तर वगैरे असे विचार करायचे नाहीत. आणि जॉनला मागे सोडून सगळे आले तेंव्हा बाकीच्यांना त्याची फार चिंता लागेलेली मला तरी दिसली नाही. Happy

डिनेरिस आणि जॉनचं सगळं फारच अचानक वाटलं. म्हणजे तिला (आणि आपल्यालापण) तर टिरियननं सांगेपर्यंत जॉन तिच्याकडे कशा नजरेने पाह्तो याची कल्पनाही नव्हती. ते कळल्यामुळे तिने जॉनकडे अचानकच लक्ष द्यायला सुरुवात केली असं वाटलं. Lol

आणि शेवटी जॉन तिला "डॅनी" म्हणतो तेव्हा बाबुराव आपटेच आठवला, " डॅनी ? युअर ग्रेस से यकदम डॅनी?" लगता है तेरा भाडा डबल करना पडेगा असलं काहीतरी इमॅजिन केलं :हाहा" >> Lol अगदी!!

हेतू काय त्यामागे? टिरियन आणि व्हॅरिस बिनकामाचे वाटतात सध्या.

अजून एक , हे लोक तिकडे व्हा.वॉ ला पकडायला गेले अन जाताना व्हॅलिरियन वेपन्स, ड्रॅगन ग्लास वगैरे घेऊन पण गेले नाहीत ? का??? हातोड्या अन चाकू घेऊन वेडात दौडले वीर वेस्ट्रोसी सात असेच म्हणावे लागेल.

व्हॅलिरियन वेपन्स, ड्रॅगन ग्लास वगैरे घेऊन पण गेले नाहीत ? >> गेले होते गं.. जॉन ने त्याची वलेरिअन स्टिलवाली तलवार नेलेली. जोराह दोन्ही हाती ड्रॅगनग्लास घेऊन असतो.. थोरास आणि बेरक्याकडेपन आगवाली तलवार असते .. जेंड्री अन हाऊंड जात्याच बह्याड त्यामुळे त्यांना सोडून द्या..

या टिरियन, जानबा वगैरे यांना वाटलच कसं कि हा झोंबी इकडं तिकडं एकटा सापडेल अन आपण त्याला पएदल जाऊन पकडून आणू..
घोडे संपल्यावानी निघाले सारे पैदल.. अन् बॅकअप काय तर काही नाही...अरे Hardhomeला लढला तेव्हा त्यांच्या ताकदीचा अंदाज आला होता न रे तुला...एवढे हजारो वाईल्डलिंग्ज सोबत असुन हितभर फा** होती अन इथं हे मुर्ख.. लॉजिक?
बिनडोक माणसं तरी स्वतःच्या वागण्यातुन अनुभवातून शिकतात अन हा जॉन स्नो दिवसेंदिवस मंदाकिनी होत चाल्लाय..
राग राग राग येतोय मला या शिरेलीचा...

टीना ला आवरा कुणीतरी Lol
आरार मुर्तिकार, डेव्हिड बिन्निवाले आणि डॅन वाईसकर हात जोडत "चुकलो माते" म्हणत येतील अशाने Proud

मला वाटतं, सिरीअलला पुस्तकांचा अवाका परवडणार नाही आणि त्यात एपिसोड्सची संख्या कमी केल्यामुळे, सगळंच धावतं समालोचन टाईप होतंय... पुर्ण सिजनच गंडल्यासारखा वाटतोय, आणि राहून राहून त्यांनी पुस्तकं येईपर्यंत थांबायला हवं होतं असं वाटतंय...

एकदम बॉलिवूड मसाला व्हायला लागलाय .

Watching Game of Thrones last few episodes gives you mixed feelings.
Yes there are lot of Epic things happening in real short time , but there are so many logical errors too !!
It's like watching V Anand Vs Kasparov playing intense chess for 2 days plotting and planning every move and suddenly they are told to finish the Game in 5 minutes , no matter what !!!!

माझी फेसबुक कमेंट Happy

चालायचंच हो, सा शिजन नादखुळे दाखवले, आता गाडी जरा पंक्चर व्हायलीय, येक डाव मापी द्या त्येसनी. फुडच्या शिजनात डिटेलवार दीड दोन तासाचे एपिसोड्स हैत म्हणे, तेव्हा काढतील भरून समद्या चुका.

रिसरेक्टेड ड्रॅगनचा निळा डोळा लय डेंजर, नाईट्स किंगपण जंक्शन मेनेसिंग दिस्तुय.

मार्टीनबाबाची मस्त ठासून ठेवली आहे पण. सिरीयल मधे दाखवलेले काहीच दाखवायचे नसेल पुस्तकामधे तर आणणार तरी काय ? Happy

त्या ७ लोकांमधले कॉन्वर्सेशन्स आणि अल्मोस्ट बाँडिंग मस्तच होते.

काश या सार्‍यांचा व्होल अँड सोल मार्टिनबुवा असता.. >> पुस्तकात तेव्हढेच घोळ घालून ठेवले आहेत कि. दर पुस्तकामधे नवी पात्रे आणून अर्धवट सोडूण दिलेले आहेत आधीच धागे. कधितरी कुठे एकत्र आणायला लागले कि तिथेही 'ह्या;आ उडव त्याला उडव' होणारच आहे.

आईस डृअगनला मारतना अजून एक ड्रॅगन मरेलच नि उरलेला 'ड्रोगोन' जखमी होईल. नावात क्लू आहेत असे वाटते. The Princess and The Queen वाचले तर लक्षात येईल कि 'ड्रॅगन का पत्ता ड्रॅगनही काट सकत है' ती फाईट बघायला मजा येईल. डॅनीला पण पोएटिक कारणांसाठी उडवतील असे आता वाटायला लागलय.

डॅनीला पण पोएटिक कारणांसाठी उडवतील >> कुठली कारणं?
मला उलट वाटले ती नाही म्हणत असली तरी तिला मुलं होऊ शकतात. जॉन च मरेल कदाचित असे वाटले. पण डॅनीला "वारीस" देऊन मगच Happy
विसेर्यन आग ओकेल असे मला वाटले. म्हणजे तो वॉल तोडायला वापरला जाईल.
फ्रॉस्ट ओकणारा ड्रॅगन तेवढा मेनॅसिंग नाही वाटणार. पण समहाऊ दोन्ही मला चुकीचे वाटते. Happy

सरळ नाईट किंग वर आग सोडायची ना.. ते स्लोव मोशन ने भाला फेकताय, अर्धा तास लावत..त्याच्या आधीच जलायचा त्याला.. आणि हे सगळं कशासाठी तर सारसी ला प्रोव करायला... सारसी कडे घंटा पॉवर आहे की जी मदत केली की नाईट किंग हरेल...

विसेर्यन आग ओकेल असे मला वाटले. म्हणजे तो वॉल तोडायला वापरला जाईल. >> ब्रान ला लहानपणी त्याची ती आजी गोष्ट सांगत असे ती आठव. Ice Dragon breathing deep cold. आता लक्षात येतेय ? तसही ड्रॅगनच्या अंगावर अंगभूत जाड कवच असल्यामूळे त्यांनी एकमेकांवर आग ओकून काहि फरक पडत नाही त्यांना, विशेषतः एकाच वयाच्या ड्रॅगन्स ना. हे त्या The Princess and The Queen मधे सविस्तर दिलय.
ड्रॅगन वॉल वगैरे तोडणार असे वाटत नाही ते सरळ East Watch वरून गोठलेल्या समुद्राचा वापर करून आत शिरतील.

हिंदी सिनेमात हिरो किंवा हिरॉइनला मारण्याची कारणे असतात तीच कारणे डॅनीला मारायची. Happy

डॅनी तिला मुले होउ शकणार नाहीत असं का बरे म्हणते?

ब्रान ला लहानपणी त्याची ती आजी गोष्ट सांगत असे ती आठव. Ice Dragon breathing deep cold. आता लक्षात येतेय ?>>>
असामी, तुला किती डीटेल मागचं सर्व आठवतय. मला परवा काय जेवले ते पण आठवेना.

लोकांच्या इतक्या डझनानं थेअर्‍या निघतात त्यातली एक ना एक तर तुक्का लागेलच..
ह्या सार्‍या प्रेडिक्शन ला धक्का देण्याचं सामर्थ्य फकस्त मार्टिनबुवात हय ..

भारी आहेत memes !

गॉट जर भारतात बनत असती तर-
सूरज बडजात्या स्टाईल - जॉनला डॅनी त्याची आत्या आहे कळल्यावर तो प्रेमप्रकरण आवरतं घेतो आणि सजदे मे अब तेरे ये सर झुकाना है म्हणतो. सर्वाना विवाह मंडळातून योग्य जोडीदार मिळतात, कोणीही नातलगाशी लग्न करत नाही व सर्व आनंदात राहतात. व्हाईटना आपली चूक कळते, आलोक नाथ त्यांच्यावर चांगले संस्कार करतात व शेवट गोड होतो.

करण जोहर स्टाईल- जॉन डॅनी सान्सा आर्या गेंड्री लिटल फिंगर सर्वांमध्ये प्रेमाचे त्रिकोण चौकोन इतके होतात ते बघून व्हाईट्स स्वतःच ड्रॅगन ग्लास खुपसून आत्महत्या करतात.

अक्षय कुमार स्टाईल- सॅमला पुस्तक वाचून कळते की ते सर्व मूळचे भारतीय आहेत. तो दिल्लीला रेव्हन पाठवून मदत मागतो. एअर इंडियाची विमाने सर्वाना भारतात आणतात. तिकडे अमेरिका व्हाईट्सवर ड्रोन हल्ला करते. भारतात आल्यावर सर्सी नवीन राजकीय पक्ष काढते, जॉन डॅनी सिमल्याला हनीमूनला जातात, टिरियन कोथरुडला बाकरवडी आणायला रांगेत उभा आहे अशा हॅपी नोटवर मालिका संपते.

रामगोपाल वर्मा स्टाईल- शेवटी सगळेच मरतात आणि white walkers बनतात.

मराठी आर्ट मुव्ही स्टाईल- सर्व मुख्य व्यक्तिरेखा घोड्यावरून इकडून तिकडे जात असतात. आता काहितरी घडेल ,घडेल असं वाटतं पण काहिच न घडता मालिका संपते.

Pages

Back to top