खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिका संपायला आली असं समजायला हरकत नाही. राजन आणि सई चं जुळवणार, मा आणि वि कधीचे वाट बघतायत, मो चा काटा दूर होईल आणि आपण नवीन मालिकेची चर्चा करण्यात बिझि होऊ Lol

राजन (तरी) बघण्यासारखा आहे का? कोणे कलाकार? >>> लगोरी नावाच्या मालिकेत मो होती त्यात हा राजन तिचा हिरो होता. नाव नाही माहीत.

कुरुडी... Biggrin
प्राजक्ता, किती मेमरी!

प्राजक्ता, किती मेमरी! >>> आठवतं असतं असं काय काय Happy

मंद मा आणि वि च्या हाच तो पत्र वाला राजन हे लक्षात यायला किती भाग खर्ची पडतील देव जाणे !!

राजन क्यूट आहे. Happy >> अगाव पण आहे Sad
सई नको नको म्हणतेय तरी आत घुसत होता. आणि घर न्याहाळत किती होता.
पण हा इशाचा बाबा असेल का?

मालिका संपायला आली असं समजायला हरकत नाही. >>प्राजक्ता -शिरिन तुमचे म्हणणे पटले होतेच पण संपायला आली की संपवायला लागलेत, कळेना, एकाच भागात एवढ्या घडामोडी दाखवल्या की बोटावर मोजण्या इतके एपि राहिलेत अशी शंका यावी इतका वेग गाठलाय ह्या मालिकेने.... बरच आहे संपली एकदाची तर...

राजन चा रोल करणारा actor कोठारेंच्या "शुभमंगल सावधान" चित्रपटातील नायक आहे असे वाटतेय. चित्रपटाच्या Credits मध्ये नाव निरंजन असे आहे.

राजनचे काका , ते सावंत तर म्हणत होते की मोनिकामुळे माझा पुतणा आयुष्यातून उठलाय, तिने त्याला बरबाद केलं वगैरे. हा तर बरा टुणटुणीत दिसतोय.
पण त्याच्या येण्याने कथानक भराभर पुढे सरकलं हे छान झालं.

राजनचे काका , ते सावंत तर म्हणत होते की मोनिकामुळे माझा पुतणा आयुष्यातून उठलाय, तिने त्याला बरबाद केलं वगैरे. हा तर बरा टुणटुणीत दिसतोय.>> +१ कालच्या भागात का पुढच्या भागात मोनिकाला तो म्हणतोय पण अजून माझं तुझ्यावर प्रेम आहे तू विचार कर इत्यादी इत्यादी .मालिका संपवणार बहुतेक . नवीन मालिकेचा काही सुगावा नाहीये पण Happy

पण संथ विक्याला कळलं का की हाच तो पत्रवाला राजन ? मि फकस्त शुक्रवारी बघते मालिका हल्ली. घडामोडी झाल्या म्हणताय तर ओझी वर बघायला हरकत नाही Lol

कळलं त्याला म्हणूनच तर तो धावत आला ना देशपांडेजकडे.

मोनिका इतक्यात काही मालिका संपू देणार नाही. राजनला रिचानी सगळं सांगितलंय, तरीही त्याचं मोनिकावर प्रेम कायम आहे.

मोनिका इतक्यात काही मालिका संपू देणार नाही. राजनला रिचानी सगळं सांगितलंय, तरीही त्याचं मोनिकावर प्रेम कायम आहे >> मला अजून संशय आहे की राजन सूड घ्यायला आला आहे.

हं. हे शक्य आहे. नाहीतर आल्यापासून मोनिका मोनिका करायचं कारण नव्हतं त्याला. पण काकांशी बोलताना तो माझ्या भविष्याचा प्रश्न आहे असं म्हणाला. भविष्य म्हणजे ब्लॅकमेल करून पैसे उकळणं हे नसूदे.

मला अजून संशय आहे की राजन सूड घ्यायला आला आहे. >> हो . असंही असू शकत तो गोड गोड बोलून मोनिकाला सरळ करेल आणि नंतर निघून जाईल तिच्या आयुष्यातून . तो पर्यंत तो विक्याला पण डिव्होर्स घ्यायला सशक्त कारण देईल. राजन सिद्ध करेल कोर्टात कि मीच ईशाचा खरा बाप आणि विक्याचा डिव्होर्स चा मार्ग मोकळा होईल . नंतर तो आणि आणि मानसी लग्न करतील आणि राजन मोनिकाच्या आयष्यातून निघून जाईल आणि मोनिका सर्वात शेवटी एकटी किव्वा तो एक्सेप्ट करेल मोनिकाला . एकतर मोनिका एकटी किव्वा राजन बरोबर Happy

नुसते मनातले मांडे खातोय आपण इथे! लेखकाच्या मनात नक्की काये कोण जाणे!
तसेही मंद मा- वि च्या लक्षात येऊन ते क्लिअर होई पर्यंत पंचविसेक एपिसोड्स तरी नक्की जातील!
आणि पत्राची काय भानगड आहे? मी मिसली बहुतेक!
आणि इतके दिवस राजन बद्दल (बहुतेक हं!) पूर्णपणे मौन बाळगून बसलेली मो आणि तिला चकार शब्दाने चुकूनही न विचारणारे आजी आजोबा, मा , वि....... आताच कसे काय एकदम सक्रीय झाले...? लेखकाने मरगळ झटकलेली दिसत्ये...पेमेंट मिळाले की काय थकलेले?

आत्ता ओझी वर पाहीला कालचा भाग, फारचं फास्ट हालचाली झाल्या की. राजन चे काका दळवींच्या संपर्कात आहेत हे माहीत नव्हतं. नक्कीचं मालिका संपवणार आहेत. आपला छळ संपणार आहे लवकरचं.....................

इशाचं काय? Uhoh जोवर ती विक्र्या आणि मान्शी ला मिळत नाही तोवर शेवट गोड होणार नै.
राजन मो ला धडा शिकवून निघून जाईल आणि मो आत्महत्या करेल, मग विक्र्या आणि मान्शी लगिन करून इशा नामक आयत्या मुलिसोबत सौंसार करतील. इशाचे पण मोथी मम्मा, छोटी मम्मा हे कन्फ्हुजन संपेल होपफुली. अगोबाई ला पण जरा शांतता..
पण राजन इशाला सहजासहजी सोडेल सं वाटत नाही.

आंबट गोड Lol
कसली इडियट सिरियल आहे Sad
*विक्र्या ने लग्गेच मो ला बाहेर का नाही काढले? ४ वर्ष हा राजन कधीच क्रुज वरून आला नाही का? Uhoh या दरम्यान आत्या, मधुकाका यांनी सावंताना शोधले, पण इशाचा बाबा कोण आहे हे त्यांना शोधता आले नाही? आणि शोधले तर कधी ४ वर्षांनन्तर?? Uhoh वर मो ला घरात ठेवून घेतले? तिचा माज सहन करत? कशासाठी? विक्र्या इतका चांगला बनून नक्की काय मिळवणार होता? त्याने मो ला अ‍ॅबॉर्शन करायला परवानगी द्यायला हवी होती (रादर तो कुणी नाहिये निर्णय घेणारा) सरळ तिला घरातून काढून टाकून डिव्होर्स देऊन स्वतःला मोकळे करून घ्यायला हवे होते.
जे करायला हवे होते ते या सिरियल मध्ये कुणिच केले नाही. अचानक सगळ्यांना धुमारे फुटलेत आता.

Pages