Submitted by ननि on 12 August, 2017 - 12:01
नमस्कार,
मला गेल्या १ वर्षापासून व्हर्टीगो चा त्रास चालू झाला आहे. सुरवातीला MBBS , नंतर MD, famous MD, neurologist , न्यूरोसर्जन झाले. पित्ताने , लो शुगरने चक्कर येते असे करत neurologist ने सांगितले की कानाचा प्रोब्लेम आहे. त्या टेस्ट केल्यावर त्या नोर्मल आल्या. तेव्हा ते डॉ. म्हणाले रिपोर्ट मध्ये येत नाही. पण हा कानाचाच प्रोब्लेम आहे. आयुश्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. तर असा कोणाला त्रास झाला होता का? कोणाला काही अनुभव आहे का? की हळूहळू त्रास कमी होतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्लीज मदत करा ...
प्लीज मदत करा ...
प्लीज मदत करा ...
प्लीज मदत करा ...
http://www.webmd.com/brain
http://www.webmd.com/brain/liberatory-maneuvers-for-vertigo
यातून काय मिळते का ते पहा.
मला स्वत:ला काही वर्षांपूर्वी
मला स्वत:ला काही वर्षांपूर्वी हा त्रास सुरु झाला होता. माझ्या डॉ. ने Epley Maneuver हा एक सोपा प्रकार त्यांच्या दवाखान्यात केला आणि तो लगेच गेला. त्याने तो घरी कसा करायचा हे ही शिकवून ठेवले.
http://www.webmd.com/brain/home-remedies-vertigo
हा त्रास पुन्हा काही महिन्यांनी परत आला. पण डॉ. ने शिकवले असल्याने मी घरीच हा उपचार करत असे. उपचार करताना तुम्हाला घरातल्या कुणाची तरी मदत लागेल नाहीतर तोल जाऊन पडून शकाल. त्रास पुन्हा परत येणे आणि घरीच उपचार केल्यावर काही आठवडे जाणे असे मधून मधून चालूच होते (जवळ जवळ वर्ष दिड वर्ष). माझा त्रास म्हणजे मला फक्त आडवे होताना आणि उठून बसताना भोवळ येत असे. एरवी नाही.
एक दिवस एका ट्रँपोलीन पार्टीला गेलो होतो. तिथे उड्या मारता मारता हवेत माझ्या नकळत एक समरसॉल्ट मारला. मी उडी मारताना तोल जाऊन पडणार होतो पण तो सावरता सावरता कसा काय कुणास ठाऊक पण समरसॉल्ट झाला.
https://www.skyzone.com/westborough/parties-and-events/parties
त्या दिवसापासून माझा भोवळ येण्याचा प्रश्न कायमचा गेला. पण हे अपघाताने झाले. असे मुद्दाम करा असे मी सुचवणार नाही. कारण दुसरे काही तरी हाड किंवा स्नायू दुखावून बसाल. तुमच्या डॉ. चा सल्ला घ्या. मला झालेला भोवळ येण्याचा आजार धोकादायक नसून खूप जणांना होतो असे माझ्या डॉ. चे मत होते. तुमचा वेगळा असू शकतो.
इंटरनेटवर या एका उपायाचा खूप जणांना फायदा झाला असे वाचण्यात आले. पण मी ते करुन पाहिले नाही. पण उपाय घरगुती आणि सोपा वाटतो आहे.
By Carol Foster, associate professor at the CU School of Medicine
http://www.cuanschutztoday.org/do-it-yourself-vertigo-treatment/
आई ला गेली ३०-३२ वर्षे
आई ला गेली ३०-३२ वर्षे व्हर्टिगो आहे . गोळ्या ती सतत घेताही . पाहिजे असल्यास मी आपला संपर्क करून देईन . व्यनि ( मेसेज) करा
धन्यवाद सर्वाना.
धन्यवाद सर्वाना.
वर दिलेल्या लिंक्स नीट वाचते. मलाही फक्त आडवे होताना आणि उठून बसताना, कूस बदलताना भोवळ येते. पण आता ती भोवळ बराच वेळ राहते. हा आजार धोकादायक नाही हे डॉ. नी सांगितलेले. पण मलाच का? असे वाट्त होते. कारण ओळखीत कोणालाही नाही.
हे मला काही वर्षापूर्वी झाले
हे मला काही वर्षापूर्वी झाले होते. एक दिवस नेहमीप्रमाणे सकाळी उठलो तर हिंडता फिरता चक्कर आल्यासारखे वाटू लागले. एक दोन दिवस गेले तरी कमी नाही. शेवटी डॉक्टरना भेटलो. त्यांनी त्याला व्हर्टीगो म्हणतात हे सांगितले आणि गोळ्या दिल्या. पण गोळ्यांनी काही फरक पडला नाही. नेटवर Vertigo सर्च केले आणि ते का होतेय ते लक्षात आले. इथे थोडक्यात सांगतो: मेंदूला शरीराचा समतोल ज्यांच्यामुळे कळतो असे काही कण कानातल्या रिकिबी सारख्या हाडातल्या पोकळीत असतात. हे कण चुकून (चुकीच्या पद्धतीने झोपल्याने वगैरे) इतरत्र हलले आणि पुन्हा मूळ जागी आले नाहीत तर मेंदू गोंधळून जातो. मग चक्कर येणे वगैरे प्रकार सुरु होतात. काहींच्या बाबत हे कण काही कारणाने बऱ्याच काळासाठी स्थलांतरित झालेले असतात. परिणाम दीर्घकालीन Vertigo.
यावर उपाय म्हणून डोके एका ठराविक पद्धतीने हलवले कि हे कानातले समतोलदर्शक कण पुन्हा जाग्यावर यायला मदत होते असे कळले (पण चुकीच्या पद्धतीने हलवले तर त्रास वाढूही शकतो). युट्युब वर काही कृती (Maneuver) सापडल्या (कि ज्या आमच्या डॉक्टरना पण माहित नव्हत्या). त्यापैकी या व्हिडीओ मुळे मला केवळ दहा मिनिटात आराम वाटू लागला:
https://www.youtube.com/watch?v=1VWyPgfMuvM
त्यानंतर मला पुन्हा कधीही त्रास नाही. (अर्थात त्या आधी पण कधी झाला नव्हता)
मानेच्या मणक्यांना मसाज करत
मानेच्या मणक्यांना मसाज करत जा सकाळ संध्याकाळ.
सर्दी- साइनस असता कामा नये. मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यानेही कानाकडचा भाग स्वच्छ राहील.
हे साधे उपचार स्वत: करता येण्यासारखे आहेत
मला ear vestibular vertigo
मला ear vestibular vertigo चा आजार झाला होता दोनेक वर्षांपूर्वी. डेंटिस्टच्या खूर्चीवर आडवे झाल्याचे निमित्त झाले. उठले तेव्हा चक्कर येउन पडले. मलाही अजय यांनी नमुद केलेल्या Epley Manouever चा फायदा झाला. हा त्रास काही काळ (६ महिने) चालला. त्या वर्षी कामाचा प्रचंड मानसिक ताणही आला होता. दोन फ्रोजन शोल्डर्स होतेच. आणि त्यात हे दुखणं मागे लागलं. मानसिक ताण कमी करायला Buddhist Meditations चा खूप फायदा झाला.
'मीच का' हा विचार करुन काहीच साध्य होत नाही. कुठला ना कुठला आजार, विवंचना, प्रत्येकाला असतात. Involves a mindset change. वैद्यकिय उपचार आणि meditation यांच्या सहाय्याने आजार बरा झाला हळूहळू.
ंमला होता. हो कानाच्या आतल्या
ंमला होता. हो कानाच्या आतल्या ड्रम मधले क्रिस्टलस बाहेर आले की होते.
व्यायामने आणि काही नियम पाळल्यास बरे होते. मानेचे ( कुठल्या अँगलने झोपून फिरवाय्चे, बसून वगैरे), पटकन कसे उठू नये, कुठल्या कुशीला झोपावे, कसे वळावे वगैरे..
उगाच कानात काय ओतु नका.
एकदा का ते क्रिस्टल्स( कॅल्शियम कण ) थराविक जागी गेले वा पडून गेले की होतो बरा. मला जे आठवले ते लिहिलेय.
https://youtu.be/CPLOd6vqWKI
धन्यवाद. वरच्या लिंक्स बघून
धन्यवाद. वरच्या लिंक्स बघून सोपे व्यायाम चालू केलेत.
रैना -- Involves a mindset change.खरे आहे.
ननि,
ननि,
तुमचा vertigo कुठल्या प्रकारचा आहे ते तुमचे डॉक्टरच सांगू शकतील. पण ear vestibular vertigo साठी कोणाला उपयोगी पडेल आणि एका जागी माहिती रहावी म्हणून लिहीते आहे.
- इकडल्या डॉक्टरनी मला सांगीतले की हल्ली अशा व्हर्टिगोच्या केसेस वाढल्या आहेत. लोकं मोबाईलफोने खांद्याच्या आणि कानाच्या मधल्या बेचक्यात ठेवून, मान वाकडी करुन एकीकडे बोलत बोलत, घरातली कामं वगैरे करतात म्हणे. त्यानेही ते कानातले कण , कानाच्या मधल्या पोकळीत येतात, आणि समतोल ढळतो. (वर अतुल पाटील यांनी लिहीलेले स्पष्टीकरण वाचा).
ही वाईट सवय कोणाला असेल तर ती त्वरित थांबवा
- मला तरी त्यांनी 'नो स्क्रीन' सांगीतले होते. पण दुर्दैवाने ऑफिसात इयर एंड सुरु होते आणि मला सुट्टी घेणे शक्य नव्हते. दिवसभर कामासाठी स्क्रीन वापरावाच लागतो. मी स्क्रिन प्रोटेक्टर लावून कसेतरी रेटले. स्क्रीन पाहिला की च्क्कर येत असे. मोबाईल, स्मार्टफोन्चा चा वापर मात्र पूर्ण थांबवला दोनेक महिने.
- सुरवातीला कुस बदलताना, झोपेतून उठताना, एस्कलेटरवर चालताना फार जपून चालावे लागे. नंतर मान वळवताना चक्कर येत असे. समजा मागून कोणी बोलायला आले, की नेहमीच्यअ स्ववयीने झर्व्कन वळले की प्रचंड चक्कर येत असे. गोंगाट, ट्रॅफिकचा आवाज, साधे गर्दीच्या restaurant मध्ये गेले आणि कपबशांच्या जोरात किणकिणाटाने, लोकांच्या गोंगाटाने फार त्रास होत असे. मी triggers लिहून काढले एकेक, आणि काही काळ सगळे बंद केले.रोजचा प्रवास सुद्धा अवघड होऊन बसला. बसने चढणे, उतरणे वगैरे.
- Buddhist Meditation workshop saved me. मन शांत करायला त्याचा फार उप्योग झाला.
योगासनं तर अशक्यच होती. हालले की भोवळ यायची, तिथे कसली डोंबलाची योगासन करणार ?
- आता असं वाटतं की मी नोकरीची पर्वा न करता, महिनाभर सुट्टी घ्यायला हवी होती. आजार आटोक्यात लवकर आला असता. पण तेव्हा माझी परिस्थिती तशी नव्हती आणि तो निर्णय घेऊ शकले नाही.
रैना, चांगली माहिती दिलीस.
रैना, चांगली माहिती दिलीस.
मला दीड-एक वर्षांपूर्वी mild peripheral vertigo चा त्रास झाला. झोपेतून जागं होताना, आडवं पडताना, आडव्याचं उभं होताना आसमंत गोल गोल फिरायचा.
डॉ.नी पाच दिवसांचा कोर्स दिला. त्यानंतर परत औषधं घेतली नाहीत. काहींना आपण स्वत:च गोलगोल फिरतोय असं वाटतं, काहींना आसमंत फिरतोय असं वाटतं असं डॉ.नी सांगितलं.
आता मी वावरताना काही पथ्यं पाळते. मला एकंदरच खूप भराभरा कामं करायची सवय होती. तो वेग मी बराच कमी केला. डोक्याला जोरजोरात हालचाली जाणवता कामा नयेत याची काळजी घेते. माऊस स्क्रोल वापरणं बंद केलं.
रैनाने लिहिलं आहे तसंच मला आवाजाचा, गाण्यांचा त्रास अजूनही होतो. गाणी ऐकणं खूप कमी केलं. घरकामं करताना मला जोरजोरात गाणी म्हणायला आवडतात. ती पण थांबवावी लागली.
मला त्याचं अजूनही खूप वाईट वाटतं. पण इलाज नाही. माझी मोठ्याने बोलण्याची सवय मात्र अजूनही जात नाही. 
एकंदर स्वत:च स्वतःचे त्रास आयडेण्टिफाय करून त्यानुसार मुख्यतः विहारातले बदल करावे लागले असं माझं निरिक्षण आहे.
जुन २०१५ मध्ये मला व्हर्टिगो
जुन २०१५ मध्ये मला व्हर्टिगो झाला होता .यामध्ये डोके हलले तर ,चक्कर येत होती.उलटीची भावना होत होती . याला BPPV व्हर्टिगो म्हणतात.
सकाळी जाग आली म्हणून उठलो .समोर पाहतोय तर ,जसा छताचा पंखा अधिक गतीने(हाय स्पीड ) ज्या वेगामध्ये फिरतो त्या वेगाने घरामधील सर्व वस्तू जोरजोरात फिरत होत्या .कपाळाच्या डाव्या कोपर्यामध्ये डोके दुखी होत होती .चक्कर येतेय आणी जामीनीवरती पडतोय की काय अस सतत जाणवत राही.डाव्या कुशीवर झोपताना वेगाने घरामधील सर्व वस्तू जोरजोरात फिरत असल्याच जाणवायचं.उजव्या कुशीवर झोपताना हा त्रास होत नसे .एम आर आय काढलेला ,२ 'महिने बीटासारक १६च्या https://www.google.com/search?q=BETASSARCK&client=opera&hs=hMu&source=ln... कमी -जास्त डॉक्टरने सांगितल्या प्रमाणे औषधी गोळ्या घेतल्या .त्यानंतर दरम्यान दिलेल्या गोळ्याच्या नावावरून नेटवरती बरीच माहिती मिळवली आणी या Manouever चा फायदा झाला https://www.youtube.com/watch?v=I0hXx14hEtQ . या बद्दल तशी डॉक्टरना कल्पना दिली . त्यानंतर याप्रमाणात त्रास झाला नाही .मधून -मधून डाव्या कपाळाच्या डाव्या कोपर्यामध्ये डोके दुखी होते .पण ती क्षणिक असते.कधी कधी डोळ्यवरती ताण अल्ल्यासारखं होतं.बऱ्याच डोळ्या च्या डॉक्टरना दाखवलं डोळे ड्राय झाले आहेत.आय ड्रॉप दिले जातात.याच्यापुढे निदान होतं नाही .
चक्कर येणे मात्र पूर्ण बंद झाली .
मला डॉ. नी नुसतं कानाचा
मला डॉ. नी नुसतं कानाचा प्रॉब्लेम आहे , याला व्हर्टिगो म्हणतात एवढ्च सांगितले. बरं ते सुधा वरच्या सगळ्या डॉ. नी. कालच परत जाऊन आले. ब्रेन MRI केला. रिपोर्ट नोर्मल. ५ दिवसांच्या गोळ्या दिल्यात. ललिता-प्रिती तुमच्याप्रमाणे मलाही कट्ट्याशी काम करताना पटपट वाकायची सवय आहे. कट्ट्याखालून डबा काढ, विळी काढ अशी. पण हल्ली लक्षात ठेवून हळू वाकतेय.
एकंदर स्वत:च स्वतःचे त्रास आयडेण्टिफाय करून त्यानुसार मुख्यतः विहारातले बदल करावे लागले असं माझं निरिक्षण आहे. ---- रैनानेही हेच लिहिले आहे. आता मी माझे ट्रिगर पॉइंट नोटिस करतेय.
रैना ---- विपू पाहणार का?
माहितीबद्दल सर्वांचे आभार.
मला काही वर्ष पूर्वी कानातून
मला काही वर्ष पूर्वी कानातून कुं कुं आवाज येऊन खूप जोरात चक्कर यायची। कुठल्याही डॉ ला उपाय सापडला नाही । काही डॉ नि सांगितले की अलोपथयी मध्ये उपचार नाही। पण मग आयुर्वेदिक ओषधानी त्रास कमी झाला आणि जवळ जवळ बंद झाला गेल्या 7 वर्षांपासून काही त्रास नाही
यशकाश,
यशकाश,
त्याला Tinnitus म्हणतात. वैताग असतो तो आवाज.
http://www.hear-it.org/Tinnitus-1
गाणी ऐकणं खूप कमी केलं. घरकामं करताना मला जोरजोरात गाणी म्हणायला आवडतात. ती पण थांबवावी लागली > अर्र ललिता
टीनिटस मलाही आहे.
टीनिटस मलाही आहे. तो टीं टीं आवाज येतो कायम.
मलाही जबरी टीनीटस आहे.
मलाही जबरी टीनीटस आहे. सगळ्या चाचण्या झाल्या, काही निष्पन्न झाले नाही. (पण चाचण्या गरजेच्या होत्या, रूल आउट करायला.) मग न्यूरॉलॉ़जिस्ट कडूनच गिंको बिलोबा या TCM चे काही महिने प्रयोग झाले पण काही फरक पडला नाही. मग त्याला जीवनाचा भाग करून घेतलाय. तो त्याच्या कार्यात मग्न असतो, मी माझ्या कार्यात/झोपेत.
ललिता, मा पृ,
ललिता, मा पृ,
)
अरे गाणं ऐकणं बंद करु नका. खरं म्हणजे हेड फोन्स लावून काहितरी ऐकणं हाच टिनीटसवरचा हुकूमी उपाय आहे, असं वाचलं आणि मी हा प्रयोग करुन पाहीला. मलाही व्हर्टीगो आणि मग कानामधे सतत वादळ चालू असल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला होता. मग ईतर कुठलाही आवाज अगदी सहन व्हायचा नाही. टिव्ही नाही, गाणी नाहीत, अगदी कोणी सामान्य आवाजात बोलत असलं तरी ते हि सहन व्हायचं नाही. वेड लागायची पाळी येते, अक्षरशः पिसाळून जायला होतं सतत हा आवाज येत असला तर.
कानातल्या आवाजाला दाबून टाकणारा दूसरा आवाज ऐकणे हा त्यावर एक उपाय आहे, हे वाचलं.
हा ऊपाय कळल्यावर टिव्ही साठीही वायरलेस हेड्फोन्स आणले. आणि मग कायम हेड्फोन्स किंवा इयर्फोन्सवरच ऐकणं सुरु केलं. अक्षरशः काही दिवसातच जादूई परिणाम झाला. आणि कानातला आवाज पुर्ण बंद झाला. अजूनही तो त्रास परत झालेला नाही.
टिव्हीसाठी मी आधी Promede चे वायरलेस आणि सध्या Senneheiser चे हेड्फोन्स वापरते. (मी या लोकांची जाहिरात करणारी एजंट वगैरे नाहीय
मला जानेवारी २०२० मधे
मला जानेवारी २०२० मधे व्हर्टिगोचा त्रास झाला होता. आडवं पडताना आणि उठताना चक्कर यायची . डॉक्टर म्हणाले BPPV आहे. आता चक्कर येत नाहीये पण कानातून सतत आवाज येतोय. @यशकाश, तुम्ही कोणती आयुर्वेदिक औषधे घेतेली ते सांगाल का कृपा करून. सध्या डॉक्टरांकडे पण जाता येत नाहीये लॉक डाउन मुळे.
सर्दी साठून कानाला त्रास होत
सर्दी साठून कानाला त्रास होत असेल तर तो कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्याने निघून जातो. लागोपाठ एक तासाने केल्यास अधिक फायदा होतो.
माझ्या आईला हा त्रास होतो कधी
माझ्या आईला हा त्रास होतो कधी कधी ...
तिच्या नाकात देशी गाईचे तूप 2-3 ड्रॉप्स दोन्ही नाकपुड्या मध्ये सोडले की बरे होते हा आजार..
3-4 दिवस रोज तीन वेळा तूप सोडले की बरे होते..
कॉलर बोन किंवा ब्युटी बोन च्या वर कोणताही आजार असेल तर हा उपाय लागू होतो असे मी उत्तम महेश्वरी यांच्या you tube वरील लेक्चर मध्ये ऐकले होते .. मी हा प्रयोग केला व त्याचा रिझल्ट पण मिळाला..
यात काही फेथ हीलींग वगैरे काही नाही. माझ्या आईचा या उपयावर अजिबात विश्वास नव्हता..
@Srd मला सर्दी नाही आहे.
@Srd मला सर्दी नाही आहे.
@ Rajuguide मी नस्य केले होते गाईच्या तुपाने काही फरक नाही पडला .
तुम्ही व्हिटॅमिन बी१२ चे
तुम्ही व्हिटॅमिन बी१२ चे प्रमाण चेक करून घ्या त्वरीत. आमच्या घरात एकाला त्रास होता असा. सारे डॉक्टर आणि टेस्ट करून थकल्यावर एका हुशार डॉक्टरने हे शेवटी तपासायला सांगितले. बी १२ इंजेक्शनचे दोन-तीन डोस घेतल्याबरोबर त्रास थांबला. शाकाहारी व्यक्तींनी विशेषतः जरूर चेक करावे अधूनमधून. (कानातून आवाज येतो हे लक्षण मात्र नव्हते आणि व्हर्टिगोचा त्रासही नव्हता या केसमध्ये )
मला गेल्यावर्षीपासून हा त्रास
मला गेल्यावर्षीपासून हा त्रास सुरू झाला. एक दिवस सकाळी उठले आणि सगळं गरगरफिरायला लागलं.
डॉक्टरांनी काही व्यायाम सांगितले ते केल्यावर बरं वाटलं. मुख्य म्हणजे आहारात बदल करायला सांगितला. साखर आणि मीठ कमी करायला सांगितलं. पाले भाज्या वाढवायला सांगितल्या. त्याचा खूप उपयोग झाला.
जेव्हा जेव्हा त्रास होतो त्यावेळेस काय खाल्लं होतं हे पाहिल्यावर लक्षात येतं साखर आणि मीठ जास्त होतं :-).
>> डॉक्टर म्हणाले BPPV आहे.
>> डॉक्टर म्हणाले BPPV आहे. आता चक्कर येत नाहीये पण कानातून सतत आवाज येतोय.
BPPV चा त्रास मलाही झाला होता त्याबाबत वरती लिहिले आहे. बायदवे कानातून सतत आवाज येण्याबाबत Submitted by स्वप्नांची राणी on 1 November, 2019 - 15:29 या प्रतिसादात जे सांगितलेय त्याने फरक पडत नाही का?
व्हिटॅमिन बी १२ चेक केले.
व्हिटॅमिन बी १२ चेक केले. नॉर्मल (723 pg/mL) आहे. मॅग्नेशियम पण नॉर्मल आहे (2.1 mg/dL ) हेडफोन्स वापरून tinnitus music therapy करून पाहिली आहे.
माफ करा मी तुम्हाला सध्या
माफ करा मी तुम्हाला सध्या फक्त कानाचा प्रॉब्लेम हे नीट वाचायचं विसरलो. जास्त वेळ नाही मिळाला यावर काही वाचायचा पण भैषज्य रत्नावलीत ६२व्या अध्यायात यावर "क्षारतैल" हा उपाय दिलेला आहे. तसे नस्य, अभ्यंग आणि कर्णपूरम अश्या तीन प्रकारच्या चिकीत्सा आहेत ज्याबद्दल एखाद्या चांगल्या वैद्याचा सल्ला घ्या नंतर. सध्या हे रेडिमेड तेल कोट्टाकल च्या आर्यवैद्य शाळेचे किंवा ते नाही भेटले तर बैद्यनाथचे उपलब्ध आहे. लॉकडाउन असले तरी आयुर्वेदिक औषधांची दुकाने चालू आहेत आमच्या इथे. सध्या आयुर्वेदाचाच अभ्यास चालू आहे ,काही सापडल्यास सांगतो.
https://www.eayur.com/ayurvedic/taila/kottakkal-kshara-tailam.htm
https://www.ayurmedinfo.com/2012/07/23/kshara-thailam-benefits-how-to-us...
हा एक उपाय सापडलाय जुन्या वैद्यांच्या बाडात. आपल्या जबाबदारीने करून पाहू शकता

धन्यवाद जिद्दु ! मी कर्णपूरम
धन्यवाद जिद्दु ! मी कर्णपूरम बद्दल वाचले होते. तिळाचे तेल कोमट करून ड्रॉपरने घातले पण आवाजाची frequency वाढली so बंद केले. सध्या तीन दिवसांपासून अश्वगंधा, जटामांसी, ब्राम्ही, शतावरीचा काढा घेते आहे. त्याने थोडासा फरक वाटतोय. कुठे मिळालं हे एवढं जुनं आयुर्वेदिक टेक्स्ट ? save करून ठेवतेय लॉक डाउन संपल्यावर करेन.
Pages