सोनेरी गवत भाग ५

Submitted by निर्झरा on 31 July, 2017 - 05:21

https://www.maayboli.com/node/63245 भाग १
https://www.maayboli.com/node/63260 भाग २
https://www.maayboli.com/node/63275 भाग ३
https://www.maayboli.com/node/63290
आधीच्या भागात.....
(बोलता बोलता अवनीच लक्ष रुपा कडे जात. झाडांच्या फांदीत ती काहीतरी अडकवत असते. ती थोडी पुढे जाते. तेवढ्यात रुपा मागे बघते. त्या वेळी रुपाचा चेहरा बघून अवनी घाबरते. विखूरलेले केस, लाल बूंद डोळे, घामजलेला चेहरा, चेहर्यावर विचित्र असे भाव. अवनी तिच रूप बघून घाबरून आत जाते.)
ईथून पुढे....
“काय ग मोहितचा फोन होता का? काय म्हणाला? झाली का मिटिंग?”
‘मिटींगलाच निघाला होता. दोन दिवस त्याच्या फोन बंद होता. म्हणुन उशीर झाला फोन करायला.’
“तरीच म्हणल दोन दिवस होऊन गेले. जावईबापूंचा फोन कसा आला नाही. तुझ्याशी एक दिवस बोलल नाही तर करमत नाही त्याला.”
‘काय हो बाबा तुम्ही पण….’
(दिवस दुसरा जोसेफ बंगल्याकडे जाऊन येतो. जेनी, अवनी आणि जोसेफ जेनीच्या घरी भेटतात)
‘बोल जोसेफ ईतक्या घाईनी का बोलावलस?’
“अवनी मी काल बंगल्याकडे जाऊन आलो. बर्याच गोष्टी मला त्या वेळी कळाल्या. त्या मी तुला सांगणारच आहे पण त्या आधी मला सांग तुला काल रात्री काही अनुभव आले का?”
‘ नाही काल मला काहीच जाणवल नाही, इनफॅक्ट मला तर काल रात्री जागच आली नाही.’
“गुड, मला सांग कालच्या दिवसात तुला काय काय अनुभव आले .”
‘विषेश काही नाही, हं मी जेव्हा मोहितशी फोनवर बोलत होते तेव्हा बोलता बोलता अंगणात आले. त्या वेळी रुपा झाडांपाशी काहीतरी करत होती. मी जरा ती काय करतेय हे बघायला पुढे गेले आणि रुपाचा चेहरा बघून घाबरले. तिला अस कधीच पाहिल न्हवत मी. खुप विचित्र होता चेहरा तिचा. मी घाबरले आणि घरात गेले. थोड्या वेळानी ती पण घरात आली. त्या वेळी तिचा चेहरा नेहमी सारखा होता.’
“ह्म्म्म म्हणजे मला जे वाटल ते खरय तर’
‘जोसेफ नीट सांगशील का काय चाललय ते.’
“अवनी, आपण जेव्हा सगळे तुमच्या बंगल्यावर गेलो होतो. त्याच वेळी मला तिथ विचित्र शक्ती जाणवली होती. मी तिची जागा शोधुन काढली. तु सांगीतलस त्या प्रमाणे, तुमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला जे सोनेरी गवत आहे. तिथेच त्या शक्तीचा वास आहे. मी काही मंत्रपठन तिथे केले. त्या मुळे ती शक्ती चिडली. ती नक्कीच त्रास देणार हे मला माहीत होत. ती शक्ती ईथपर्यन्त तुझ्या मागे आली आहे. त्या साठी ती रुपाचा वापर करतीये.”
‘मग आता काय?’
“हे बघ, आपल्याला तिथ नेमक काय घडलय हे शोधून काढाव लागेल. पुढ्च्या काही दिवसांत मला तिथ काही गोष्टी कराव्या लगतील ज्या मुळे ती शक्ती स्वताहुन आपल्या समोर येईल. मग आपण तिला पकडू शकतो. मला रूपाला एकदा भेटायचय. उद्या तू तिला घेऊन ईथ ये पुढच सगळ मी बघतो. आज रात्री मला तुझ्या घरी रहाव लगेल, अर्थात तुझी हरकत नसेल तर.”
‘माझी कसलीच हरकत नाही. पण आईला संशय येईल अस काही करू नकोस.’
“अवनी काकूंना सांग तुझ्या कडे आपण नाईट आऊट करणार आहोत म्हणुन.”
व्वॉव जेनी! गुड आईडिया. चला मी आता घरी जाते आणि आपल्या नाईट आऊटची तयारी ‘करते.’
“अवनी मघा पासुन बघतेय, कसली एवढी तयारी चाललीये”
‘आई, जेनी आणि जोसेफ आज रात्री आपल्या घरी येणार आहेत.’
“अच्छा, म्हणजे आज पण तुला माझ्या बरोबर गप्पा मारायला वेळ मिळणार नाही.”
‘आई अग, अजुन चार पाच दिवस आहे मी ईथ. बर मी माझ्या खोलीत आहेत. जेनी आणि जोसेफ आले की वरच पाठव.’
(तेवढ्यात बेल वाजते. काकू दार ऊघडतात.)
“ये जेनी, ये जोसेफ. जेनी, अवनी आल्यापासून मी बघतीये फारच गप्पा रंगल्यात तुमच्या.”
“हो काकू. खुप दिवसांनी अवनी भेटलीये. आता ईतक्या दिवसांच्या गप्पा एका दिवसांत थोडीना संपणार. “
“ह्ं ठिक आहे. जा अवनी वरती तिच्या खोलीत आहे. तुम्हालापण तिथेच बोलवलय.”
(सर्व जण अवनीच्या खोलीत बोलत असतात. एव्हाना रात्रीचे अकरा वाजलेले असतात.)
“अवनी, आता थोड्याच वेळात आपल्याला काही अनुभव येतील. तुम्ही दोघीही घाबरून जाऊ नका. मी ही खोली मंत्रपठन करून सेफ करतो. काहीही झाल तरी या खोलीच्या बाहेर पडायच नाही.”
‘पण जोसेफ आई-बाबा…..’
“त्यांची काळजी नको करूस. मी ते झोपले तेव्हा त्यांच्यापण खोलीला सेफ केलय. तसही, त्या शक्तीला फक्त तुलाच त्रास द्यायचाय. अजुन एक गोष्ट तुला स्वताला करवी लागणार आहे.”
‘कोणती?’
“मी तुला एक धागा देईन तो तुलाच रूपाच्या हातात बांधावा लागेल. हे ईतक्या सहज होणार नाही. ती नक्कीच तुला अस करू देणार नाही. पन काहीही झाल तरी उद्याच्या दिवसांत तुला हा धागा तिच्या हातात बांधावा लागेल. नाहीतर आपण त्या शक्ती पर्यन्त कधीच पोहचू शकणार नाही.”
(घड्याळात बाराचे ठोके पडतात. खोलीतील गप्पांचा ओघ आता कमी होतो. खोलीत एक प्रकारची शांतता पसरते. सर्व जण एक मेकांशी डोळ्यांच्या खुणांनी नाहीतर दबक्या आवाजात बोलत असतात. तेवढ्यात अवनीला मेन गेट ऊघडल्याचा आवाज येतो. ती ते जोसेफला सांगते. जोसेफ त्यांना ईथेच थांबण्याची खूण करून गॅलरीत जातो. आपण कोणाला दिसणार नाही याची तो काळजी घेतो. गेटच्या बाहेर रुपा कोणाशी तरी बोलत असते. ती कोणाशी बोलतीये हे बघायला जोसेफ गॅलरीच्या कठडयावर जरासा वाकतो. समोरच दृष्य बघून त्याला घाम फुटतो. हवेत गारवा जाणवायला लागतो. दबक्या आवाजात अवनी जोसेफशी बोलू लागते.)
‘जोसेफ , काय झाल?, काय दिसल तुला?’
“ अवनी, मला वाटल होत त्या पेक्षा भयानक प्रकार आहे हा. माझ्या आत्तापर्यन्तच्या अनुभवात मी अशी शक्ती कधीच पाहीली नाही. कदाचित रुपाच्या हातात धागा बांधायला उद्याचा दिवस पण आपल्याकडे असेल की नाही ते मला आत्ता सांगता येत नाही. तुला आज रात्रीच हे काम कराव लागेल.”
‘काय? अरे पण अस काय पाहिलस तू. थांब मी बघते.’
( अस म्हणुन अवनी गॅलरीत येते आणी तोच, तोच आकाशात वीजा चमकतात, निरभ्र आकाशात ढग दाटून येतात. हवेतला गारवा अधिकच बोचरा होतो. जणु काही ती शक्ती याच क्षणाची वाट बघत असावी. जोसेफ अवनीला थांबवायचा प्रयत्न करतो, पण तो पर्यन्त उशीर झालेला असतो. अवनी खोलीतुन बाहेर गॅलरीत आलेली असते. अवनी समोरच दृष्य बघून जागीच थिजून जाते. जेनी तिला परत आत ओढण्याचा प्रयत्न करत असते, पण अवनी तस्सूभरही जागची हालत नाही. जोसेफ जेनीला खोलीतच थांबण्याचा इशारा करतो. त्याच्या हातातील क्रूस तो हवेत धरतो आणि काही मंत्र म्हणायला सुरवात करतो. त्याच क्षणी ते समोरील सोनेरी गवत एक आक्राळ विक्राळ रूप धारण करते. त्या सोनेरी गवताचा एक मोठा लालसर-काळाकुट्ट् गोळा तयार होतो. हळू हळू जमीनीपासुन तो उंच होत जातो. त्याची उंची गॅलरी एवढी होते आणि थांबते. त्या गोळ्यातून कधी आग तर कधी धूर बाहेर पडत असते. रुपा अवनी कडे बघून मोठ मोठ्यांनी हसत असते. तिच्या हातातील कसलीतरी राख ती त्या गोळ्यात टाकत असते. एव्हाना तो गोळा अवनीच्या जवळ येऊन पोहोचतो. हे दृष्य बघून जेनी बेशूद्ध होते. जोसेफ अजून जोर जोरात मंत्र म्हणतो. त्याच वेळी त्याच्या जवळचे मंतरलेले पाणी त्या गोळ्यावर फेकत असतो. काही वेळापुरते का होईना ज्या वेळी ते मंतरलेले पाणी त्या गोळ्यावर पडते तेव्हा तो गोळा क्षणभर अवनी पासून लांब होत असतो.
Mask.jpg
अचानक त्या गोळ्याचा आकार बदलू लागतो. एक विद्रूप असा चेहरा त्यात तयार होतो. डोळ्यांच्या खोबणीत आगीचे लोट असतात. तोंडाच्या जागी राखेनी भरलेला मोठ खड्डा असतो. त्या खड्ड्यातून राखे बरोबर हिरवट रंगाचा द्रव खाली गळत असतो. तो जिथे पडत असतो तिथला भाग आगीनी भस्मसात होत असतो. बोट नसेलेले दोन हात अवनीच्या दिशेने येत असतात. अवनी तिच्या उघड्या डोळ्यांनी हे सगळ बघत असते. पण ती काहीच करू शकत नसते. जणू काही तिला कशाने तरी घट्ट बांधून ठेवले आहे असे वाटत असते. आता ते हात अवनीच्या गळ्या जवळ येतात तोच जोसेफ मंतरलेले पाणी त्या हातांवर फेकतो आणि एक खंजीर त्या हातांमधे खुपसतो. क्षणातच तो भयानक गोळा छोटा होत जातो आणी त्याचे परत सोनेरी गवत बनते आणि ते अदृष्य होते. अवनी अंगातील शक्ती गेल्यासारखी जमीनीवर कोसळते. जोसेफ तिला ओढून खोलीत आणतो. एव्हाना जेनीला शुद्ध आलेली असते. जोसेफचे मंत्रोच्चार चालुच असतात. रुपा अजूनही खाली जोर जोरात हसत असते आणि बडबडत असते. जोसेफ अवनीला ऊठवतो.)
“अवनी उठ. आपल्याला घाई करायला हवीये. ती शक्ती जागी झालीये. मी तिला जास्त वेळ थोपवून नाही ठेवू शकत. तुला आत्ताच रुपाच्या हातात तो धागा बांधावा लागेल.”
“जोसेफ अरे अवनीत काहीच शक्ती उरली नाहीये. कस जमेल तिला हे? आणि रुपा… रुपा तर कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेलीये मग,,,,”
“जेनी काहीही झाल तरी अवनीला ते करावच लागेल. नाहीतर उद्या सकाळपर्यन्त आपल्या पैकी कोणीच जिवंत नसेल.”
“अरे तू अस बोलतोयस, तु तर घोस्ट ह्ंटर आहेस ना?”
“हो, पण आमच्यावर काही बंधन असतात. ती आम्हाला पाळावी लागतात. त्या वेळी काही गोष्टी आमच्या हातात नसतात. ह्याच्याच फायदा त्या शक्ती उचलतात.”
(अवनी आता जरा उठून बसते. तेवढ्यात अवनीच्या मोबाईलवर मेसेज वाजतो.)
‘एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आलाय. मोहित!, जोसेफ मोहितचा मेसेज आलाय. ओह! ओह माय गॉड!’
“काय झाल अवनी? काय लिहलय त्यात. बघु दे मला फोन ईकड. ओ नो!. अवनी ती शक्ती मोहित पर्यन्त जाऊन पोहोचली.”
“जोसेफ काय लिहलय त्यात?”
“जेनी, आत्ता काही वेळापूर्वी मोहित ज्या खोलीत झोपला होता. तिथे त्याला सोनेरी गवत दिसल. ते गवत त्याच्या बेडजवळ गेल. मोहितला काय कराव ते सुचेना म्हणुन त्याने रूम मधील चादर त्या गवतावर टाकली. त्याच वेळी त्या चादरीला आग लागली. हॉटेल मधे असलेल्या फायर अलार्ममुळे त्याच्या खोलीत हॉटेलचे सर्व जण आग विझवायला जमा झाले. त्या वेळी ते गवत खिड्कीतून निघुन जाताना मोहितला दिसल. त्याने ही गोष्ट सगळ्याना सांगीतली. पण त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. तो खुप घाबरला आणि म्हणुन त्याने अवनीला हा मेसेज केला.
‘जोसेफ, आता काय करायच आपण?, मोहित तिकडे….’
“हे बघ, तु घाबरू नको. मी काहीतरी उपाय करतो. पण तो फक्त काही वेळा पुरताच असेल. आपल्याला मोहितला लगेच ईकडे बोलावून घ्यायला लागेल.”
‘ त्याचा या गोष्टींवर विश्वास नाही. तो येणार नाही.’
“हे बघ अवनी मी आत्ता मोहितशी बोलतो आणि त्याला समजावतो. त्याने जे काही पाहिल आहे त्यामुळे त्याचा यावर नक्कीच विश्वास बसेल. तु पहिले रुपाच्या हातात तो धागा बांध.”
(तेवढ्यात बंगल्याच दार जोर जोरात वाजू लागत. रुपा अजूनही हसत असते. आई बाबा ही आवाज ऐकून जागे होतात. सर्व जण खाली हॉल मधे येतात.)
“अवनी काय चालू आहे हे? कसले आवाज आहेत हे? आणि रुपा.. ती अशी का हसतीयये’
‘हे बघा बाबा आत्ता तुम्हाला सगळ सांगायला वेळ नाही. तुम्ही घाबरू नका.’
“काका , हे सगळ मी तुम्हाला नंतर सांगतो.
(अवनी मुख्य दाराजवळ तो धागा घेऊन जाते. तोच रुपा हसायच थांबते.)
“ ए ए ए….. थांब तिथच. पुढ येऊ नको.”
‘रुपा, रुपा मी तुझी ताईसाहेब… अस काय करतेस. चल घरात चल.’
“ए ए …. थांब म्हणल ना तिथच. का पुढ पुढ येतीयेस. माझी कोणी ताईसहेब नाही. माझा फक्त एकच देव हाय. ‘बबन्या’ तो आता जागा झालाय. लवकरच तो जीता होणार हाय.”
‘हे बघ रुपा मी तुझी मदत करायला तयार आहे. माझ ऐक जरा’
(बोलत बोलत अवनी एक एक पाऊल पुढ टाकत असते. ती रुपाच्या अगदी समोर उभी असते. पुढे पुढे जात असतानाच अवनी त्या धाग्याला एक प्रकारची गाठ मारून घेते. जेणे करून तो धागा रुपाच्या हातात बांधण सोप जाईल. ती रुपाला हात लावणार तोच रुपा काहीतरी मंत्र म्हनते आनि अवनी तिच्या पासून लांब फेकली जाते. तिच्या हातातील धागा खाली पडतो. कसबस करत अवनी परत तो धागा शोधते आणि रुपाच्या दिशेने परत चालू लागते.)
“तु माझी मदत करणार…… खरच तु माझी मदत करणार.”
‘होय रुपा बोल काय मदत करू मी तुझी? काय हवय तुला?’
“मला….., तुझ रक्त हवय….. रक्त हवय तुझ माझ्या बबन्याला जीता करायला.”
( अस म्हणत असताना रुपा तिचा एक हात अवनीच्या समोर करते. याच संधीचा फायदा घेत अवनी पटकन तो धागा रुपाच्या हातात अडकवते आणि ती विशीष्ट पध्दतीने मारलेली गाठ ओढते. त्याच वेळी तो धागा रुपाच्या हातात घट्ट बसतो आणि रुपा जमीनीवर कोसळते.)
“शाब्बास अवनी!, माझ खुप मोठ काम केलस तू. रुपाला उचलून आत घेऊयात.”
“जोसेफ आतातरी सांगशील का हे काय चाललय ते.”
‘हो काका सांगतो.”
( आत्ता पर्यन्त घडलेल सगळ जोसेफ काका-काकूंना सांगतो.)
“काय? म्हणजे अवनीच्या आणि मोहितच्या जीवाला धोका आहे?”
“होय काकू. तुम्ही घाबरू नका. आता रुपा आपल्या ताब्यात आहे. ती आता त्या शक्तीच काही ऐकणार नाही. मी आता मोहितशी बोलतो आणि त्याला पण ईकडे बोलावून घेतो.”
क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.. असे पटापट भाग आले न कि छान वाटत वाचायला.

ओह हो, निर्झरा तब्बल ८ दिवसांनी माबो वर चक्कर मारली, आणि खजिना मिळाल्याचा आनंद झाला. खूप धमाल येतेय.