Submitted by योकु on 12 July, 2017 - 10:57
जाडूबाई जोरात ही विनोदी मालिका झी मराठी वर २४ जुलै पासून (सोमवार ते शुक्रवार, दुपारी १ वाजता) चालू होतेय.
किशोरी शहाणे आणि निर्मिती सावंत कलाकार आहेत.
आधीचा धागा दोन मालिकांचा सोबत आहे म्हणून हा वेगळा काढलाय जेणेकरून वेगवेगळं चर्वितचर्वण (चांगलं/वाईट दोन्ही इथेच) करता येईल.
चला सुरू व्हा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झी ची कालिटी दिवसेंदिवस
झी ची कालिटी दिवसेंदिवस खालावत चालली आहे ... नवऱ्याची बायको, कळी, आणि ती सैनिकांची कुठलीतरी ग्रामीण सिरीयल हि त्यातीलच उदाहरणे आहेत ...
ही त्या सई आणि प्रिया चा
ही त्या सई आणि प्रिया चा वजनदार मुव्ही आला होता त्याची नक्कल वाटतेय.
एखाद्याच्या जाडेपणाचा अजून किती गैरफायदा
नावावरून तरी जाड व्हर्सेस
नावावरून तरी जाड व्हर्सेस बारीक अश्या थीमबद्दल वाटतेय
किशोरी शहाणे किती निबर व खराब
किशोरी शहाणे किती निबर व खराब दिसते.....चेहेर्यावरच्या सुरकुत्या मेकप च्या थरांत लपविल्या आहेत.....का पण अट्टाहास काम करण्याचा इतका?
आणि ती निर्मीती सावंत देखिल त्या त्या रोल मधे बोअर झालीय अगदी!
जाड पणा वर उपहास....................................................
निर्मिती सावंतची तीच तीच
निर्मिती सावंतची तीच तीच कॉमेडी बोर झाली आता... त्यांना थोडं गंभीर,व्हिलन अशा वेगवेगळ्या रोल मध्ये बघायला आवडेल...
तरी प्रोमोमध्ये मला जरा
तरी प्रोमोमध्ये मला जरा बारिकच वाटली.
किशोरी शहाणे किती निबर व खराब दिसते.....चेहेर्यावरच्या सुरकुत्या मेकप च्या थरांत लपविल्या आहेत..... >> +१
किशोरी शहाणे किती निबर व खराब
किशोरी शहाणे किती निबर व खराब दिसते.....चेहेर्यावरच्या सुरकुत्या मेकप च्या थरांत लपविल्या आहेत..... >> +१११
आणि तो अॅक्सेंटही डोक्यात जातो
हो ना...... निर्मिति सावंत
हो ना...... निर्मिति सावंत आता बरीच बारीक झालीये पूर्वीपेक्षा....त्यामुळे जाडे पणाचा पंच येत नाही...कितीदा तेच ते............................................................ आणि किशोरी शहाणे ला कुणी घेतलं यात.....? किती बोअर आहे ती..!!
किशोरी, निर्मितीपुढे फार
किशोरी, निर्मितीपुढे फार म्हातारी दिसतेय.
अर्थात आहेच तिचं वय जास्त
अर्थात आहेच तिचं वय जास्त निर्मिती पेक्षा
किशोरी बरी वाटतीये थोडी सोनी
किशोरी बरी वाटतीये थोडी सोनी टीव्ही च्या पेहेरेदार पिया की मध्ये...
किशोरी निर्मिती पेक्षा ५
किशोरी निर्मिती पेक्षा ५ वर्षांनी लहान आहे
वेट लॉस नंतर निर्मिती
वेट लॉस नंतर निर्मिती सावंतांच्या चेहर्यावरचा गोडवा थोडा कमी झाला आहे.
किशोरी शहाणेच्या स्कीनची अचानक खुपच वाट लागली आहे. किती वयस्कर दिसायला लागली आहे. ४९ म्ह़णजे खुप काही वय नाही.
एबीपी माझा वर मालिकेसाठी
एबीपी माझा वर मालिकेसाठी बनवलेला खोटा ट्रेनचा डबा आणि त्या डब्यात बसून निर्मितीची मुलाखत दाखवली. डबा अगदी हुबेहूब खरा वाटावा असा, सर्व बारकाव्यांसकट. मला तरी फारच आवडला.
फ्रेशर्स मधला एक चेहरा दिसला.
फ्रेशर्स मधला एक चेहरा दिसला.. किशोरीचा मुलगा
निर्मिती सावंत ही मालिकांमधील
निर्मिती सावंत ही मालिकांमधील लक्ष्मीकांत बेर्डे आहे.. तोच तोच पणा.. आशा करतो आमच्या घरी ही मालिका बघितली जाणार नाही.. पण ते निव्वळ अशक्य आहे
ऋ. ही सिरियल दुपारच्या एक
ऋ. ही सिरियल दुपारच्या एक वाजता आहे. तुला थोडीच पाहायला लागणारे.. तू ऑफिसमध्ये असशील ना.
दुपारची एक वाजता?? असा का
दुपारची एक वाजता?? असा का सावत्रपणा केला निर्मितीताईंशी? या वेळेला तर बायकाही जेवूनखाउन क्षणभर विश्रांती घेतात.. बघणार कोण मग ही नक्की...
आणि दुपारी एकला असली तरी नक्कीच रात्रीचे एकदिडलाही याचा रिपीट टेलि कास्ट असेलच.. आणि आमच्या घरात रात्रीचे दोन अडीच पर्यत सहज जागे असतात
संध्याकाळी 6 वाजता असतो याचा
संध्याकाळी 6 वाजता असतो याचा रिपीट टेलिकास्ट
किती चीप स्टोरीलाईन आहे. ती
किती चीप स्टोरीलाईन आहे. ती किशोरी शहाणे निर्मिती जाड आहे म्हणून तिच्या मुलीला सून करून घ्यायला नकार देते तो सीन किती भंपक होता.
निर्मिती सावन्त वजनाच्या
निर्मिती सावन्त वजनाच्या काट्यावर उभी राहताना प्रोमो मध्ये दाखवलीये. असल्या बाळबोध विनोदातून कधी बाहेर येणार ह्र लोक कळत नाही. मालिका असावी ती साराभाइ सारखी....
चावटानन्द! हा हा.
चावटानन्द! हा हा.
छान आहे मालिका आवडलि
छान आहे मालिका आवडलि
निर्मिति ताईन्चे ओफिस सेम
निर्मिति ताईन्चे ओफिस सेम गुरुनाथ च्या ओफिस सारखे आहे.
काल आईबाबांना भेटायला गेले
काल आईबाबांना भेटायला गेले तेव्हा ही सिरीयल चालू होती संध्याकाळी. मी नव्हते बघत, पण आई किशोरीच्या कॅरॅक्टरला जाम नावं ठेवत होती, छळते म्हणे ही. मी म्हणाले घेईल निर्मिती थोड्या दिवसाने बदला. तू टेन्शन घेऊ नकोस .
काहिच आवडलं नाही . एकच एपिसोड
काहिच आवडलं नाही . एकच एपिसोड बघितला .
ही लोक ऋ आणि सा का हाका मारतात एक्मेकाना . डोक्यात गेलं ते .
सा चा बाबा कोण आहे ?
घरात रहाणार्या लोकांच एक्मेकाशी नातं काय ?
आपल्या बंगल्याच्या आवारात असं कोणी व्यायम करतं का?
चांगली बँकेत नोकरी करत असताना पण जुई ईतक मोडक-तोडकं ईन्ग्लिश का येत?
ही रोजच्या रोज ईतके डबे घेउन जाते ट्रेनमधल्या मैत्रिणींसाठी?
आणि त्या ईतक्या हावरटासारखी का वाट बघत असतात ?
सध्या काहीच भाग झालेत सो फार
सध्या काहीच भाग झालेत सो फार ग्रेट वाटत नाहीय. जरा ओढून ताणून केलेले संवाद/विनोद इ आहेतच. जरा रुळली की पाहू...
बँकेत नोकरी आहे आणि जवळजवळ १० लोकांचं करते ती एकटीच कुणीही मदतीला म्हणूनही दाखवलं नाहीय हे जरा खटकतं आहेच. नवरा आणि बाकी तरणी काय काम करतात हे अजून दुलग्स्त्यातच
काल चुकुन एक एपिसोड बघायला
काल चुकुन एक एपिसोड बघायला मिळाला. त्यात निर्मिती सावंतला विचित्र मेकप करून तरूण दाखवायचा प्रयत्न होता का काय कोण जाणे. ती भोळेपणाने कोणत्यातरी फुकट्या व्यक्तीला दीड लाख कॅश देते आणि फुकट जेवु घालत असते आणि हॉटेलचे प्लान्स करत असते असे दिसले. तिला घरात लाडाने जाडूच म्हणतात कि काय देवजाणे. ती त्या घरात कोण होती (आई / आत्या / काकु) हेही काही कळले नाही. असो..
शिवाय झीच्या सर्व नायिकांप्रमाणेच ती अती चांगली आणि सोज्वळ आणि भोळी इ. दाखवत होते. यक्स..
फारच कैच्याकै होते पहिले दोन
फारच कैच्याकै होते पहिले दोन एपिसोडस. मी ही मालिका पाहातच नाही कारण दुपारचं जाग्रण होतं.
दुपारचं जाग्रणला +1. एक डुलकी
दुपारचं जाग्रणला +1. एक डुलकी काढुन होते.
मी संध्याकाळी 6 ला एक भाग बघितला. पण फार काय आवडली नाही मालिका. त्यामुळे दुसर्या दिवशी लक्षात राहीलंच नाही.
Pages