फळांचे टिकाउ हलवे(खजूर्,केळी,पेरु,फणस)

Submitted by मनःस्विनी on 29 September, 2009 - 16:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

खजूर हलवा साहीत्यः
२ वाटी बिन बियांचा खजूर( बिया असलेला खजुर असला तर बिया काढायचे काम वाढते),
१/२ वाटी कणीदार तूप्(हे घरी काढलेले असेल तर आणखी उत्तम),
२-३ लवंगा,
एखादी दालचीनीची काडी,
१/२ वाटी दूध,
वेलची,
काजू,
केसर
केळी हलवा साहित्यः
चार मोठी पिकलेली राजेळी केळी, नाहीतर केरळा केळी,
१/२ वाटी कणीदार तूप,
लवंग,
किसलेले आले,
वेलची,
काजू,
केसर रोजचेच.
पेरु हलवा साहित्य:
चार पाच पिकलेले पेरु(गावठी लालवाले ज्यास्त सुवासिक असतात असे मला वाटते),
२-४ लवंगा,
वेलची पूड,
१/२ वाटी तूप,
किंचित जिरा-बडिशेप पूड(मस्त चव लागते),
मिठ चिमटीभर
फणस हलवा साहित्यः
४ वाट्या बरका रसाळ फणसाचा रस चाळणीत गाळून घेतलेली,
१/२ वाटी तूप,
वेलची,
काजू,

क्रमवार पाककृती: 

थोड्याशा आठवणी : आजीचा हा खास हलवा म्हणजे खजूर हलवा सुट्टीत घरी यायचा. तसे ती बरेच फळांचे हलवे बनवायची(पेरु,केळे,फणस असे टिकाउ हलवे बनवायची ) पण हा फेमस असायचा. कालच आईने केलेला हलव्याचे पार्सल घरी आले नी आठवण झाली.
तर आता कृती,
खजूर हलवा मूळ कृती:
खजूर बिया काढून जरासा चेचून दूधात भिजत ठेवायचा ४-५ तास. नाहीच भिजला तर सरळ मिक्सीत घालायचा. आता ही वाटलेले मिश्रण सरळ तूपात मिक्स करायचे. त्याआधी तूप गरम झाले की दोन तीन मिनीटे मंद गॅस करून दालचीनी व लवंगा टाकून झाकून ठेवायच्या. मग ह्या काड्या काढून टाकायच्या. आता खजूर घालून ढवळायचे काम करायचे. हात दुखू शकतो पण चांगले खायचे असेल तर करायला लागते. Happy आळत आला की त्यात वेलची, जायफळ्,केसर,काजू तुकडे घालून खूप घट्ट व्हायच्या आधी काढून पाहिजे त्या आकारात गोळे बनवायचे. गोळे नाही बनवले तरी चालतील पण आजीला प्रत्येकाला वाटायचे असायचे म्हणून गोळे बनवायची. हे बाहेर आरामात चार पाच महिने टिकतात. थोडे थोडे काढून आई द्यायची आम्हाला सकाळची .वर गरम कपभर दूध.
तेव्हा कमीच खावे मग सोसते. मस्त लागतो. फोटो घरी गेल्यावर टाकते.
केळी हलवा कृती:
केळी मॅश करून घ्यायची. आता तूपात लवंग टाकून मग थोड्या वेळाने बाहेर काढायचे. मग केळी टाकून परतत राहयचे. गॅस मंदच ठेवायचा. आले किसून टाकायचे. मग आळत आले मिश्रण की काजू,वेलची टाकून वड्या नाहीतर गोळे बनवायचे.
टिपा: काही लोक गूळ टाकतात पण ते म्हणजे एक कडक गूळातले पाकाचे दगडी मिश्रण बनते जर योग्य वेळी मिश्रण उतरवले नाही गॅस वरून तर. तसेही केळी गोडच असतात म्हणून मी(आई) गूळ कधीच टाकत नाही. मस्त लागतो. लहानांना चघळत रहायला खूप आवडते.(रावळगावचे गोळी. मला तरी हा हलवा लहानपणी आवडायचा. आता खजूर ज्यास्त आवडतो.).

पेरू हलवा:
पेरु पिकलेले असतील तरच हातानेच मॅश करावे. मग चाळनीने गर गाळून घ्यावा(सांदण करताना कसा फणसाच घेतो तसाच.) बाकी सेम तो सेम केळे हलव्यासारखा. गावठी पेरु असतील तर वास काय सुटतो ढवळताना. अहाहा!.. खायला ही मस्त लागतो. किंचित जिरा बडिशेप पूड टाकली तर बाधत ही नाही. पण अगदीच चिमटी टाकायची तूपावरच्,खमंग वास सुटतो.

फणसाचा हलवा:(चक्कवर्टी मल्लु भाषेत)
हा केरळी लोकांमध्ये खूपच फेमस आहे. पेरु सारखाच करतात पण गोड नसेल तर जराशी साखर घालावी लागते. ओणम मध्ये खूप मिळतो. माझ्या मैत्रीणीकडे ओनमला जेवायला जायचे तेव्हा ताजे केळा वेफर्स वा हा हलवा दिवसभर खायचो. Happy हा सुद्धा माझी आजी करायची.

सगळे प्रकारचे हलवा लहान मुलांना द्यायला काहि वाईट नाहीत. मस्त लागतात. उपासाला वगैरे चघळत बसायला मस्त. Happy

वाढणी/प्रमाण: 
थोडा थोडा खायचा असतो. त्यामुळे एक मोठा गोळा किती जण संपवतील नाहि सांगू शकत.
अधिक टिपा: 

१. काही विशेष टिप्स नाहीयेत ह्यात. ओला हात लागला नाही तर ४-५ महीने टिकतो. लहान लहान लाडू बनवले तर मुलांना द्यायला बरे पडतात. फ्रीजमध्ये ठेवु नये. कडक गोळा होतो. एकदा जर फ्रीजमध्ये ठेवले तर आत बाहेर करु नये. रमजान वेळी मस्त खजूर मिळतो तोच खजूर् चांगला असतो इतर वेळी मिळण्यर्‍या खजूरापेक्षा. खजूर एकदम कडक नसेल तर जरा वेळच दूधात घालून सुद्धा नरम पडतो बर्‍यापैकी. तो तसाच तूपात घातला तर हरकत नाही ते पिसेस काही एकदम घशात बसत नाहीत. पण खूप कडक असेल दूधात भिजवून सुद्धा तर मिक्सीत वाटलेला बरा. प्रॉबलेम हाच की कायच्या काय पातळ पेस्ट होवून जाते व ती आटवत बसावे लागते. त्यापेक्षा जरासा नरम झालेला दूधातला खजूर घ्यायचा.(दूध ते वापरायची गरज नाही ,पुन्हा तेच कारण दूध आटवत बसावे लागेल). दूध हे फक्त खजूर नरम करायला आहे. Happy

२. खरेतर माझी आजी खजूर चेचून नुसत्या तूपात भिजवून डब्यात ठेवायची मग किंचीत दूध लागलेच तर घालून बाकी पदार्थ(वासाला दालचिनी,केसर) घालून बनवायची. पण आईला आवडत नाही(कै च्या कै तूप ते). म्हणून मग नुसते दूध व बर्‍यापैकी तूप घालून आई करते.
३. गॅस मंदच असावा. करपून टाकले तर खजूर , फणस व पेरु कडवट होतो.
४. असेच पेरु व केळ्याचा हलवा(दूध न टाकता पण) होतो. तो ही सुंदर लागतो. पेरु व राजेळी केळी पिकलेली घ्यायचे. मला मात्र खजूरचा हलवा ज्यास्त आवडतो. Happy
५. पेरु लाल रंगाचे गावठी असतील तर उत्तम लागतो. वास एकदम मस्त असतो पेरुचा.
६. उगाचच सर्व मसाले सगळ्या फळात टाकू नये म्हणून स्पेसीफिकच पदार्थ्(दालचिनी वगैरे) त्या पदार्थाचा खमंगपणा stand out करायला टाकलेत. पेरुत,फणसात दालचिनी वगैरे खूप स्टाँर्ग वाटेल तेव्हा चुकुनही टाकू नये. काजू पेरु हलवात विचित्र वाटतात. तुम्हाला हवे असतील तर टाका.

माहितीचा स्रोत: 
आजी/आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.......

खजूर बिया काढून जरासा चेचून दूधात भिजत ठेवायचा ४-५ तास.
नाहीच भिजला तर सरळ मिक्सीत घालायचा.
आता ही वाटलेले मिश्रण सरळ तूपात मिक्स करायचे. <<<

म्हणजे खजूर दुधात भिजला तर वाटायचा नाही का ? मग त्याचे तुकडे नाही का लागणार ?

खजूर एकदम कडक नसेल तर नरम पडतो बर्‍यापैकी. तो तसाच तूपात घातला तर हरकत नाही ते पिसेस काही एकदम घशात बसत नाहीत. पण खूप कडक असेल दूधात भिजवून सुद्धा तर मिक्सीत वाटलेला बरा. प्रॉबलेम हाच की कायच्या काय पातळ पेस्ट होवून जाते व ती आटवत बसावे लागते. त्यापेक्षा जरासा नरम झालेला दूधातला खजूर घ्यायचा.(दूध ते वापरायची गरज नाही ,पुन्हा तेच कारण दूध आटवत बसावे लागेल). दूध हे फक्त खजूर नरम करायला आहे. Happy
म्हणूनच तर रमजान मध्ये एक विशिष्ट टाईपचा खजूर मिळतो काळासा असतो बिया नसलेला,गोड ही भरपूर असतो तो जरा चेचला तरी तसाच घातला दूधात न भिजवता तरी उत्तम.

मस्त करुन बघते एकदा (खजुर तसाच पडुन आहे घरी, थोडा केक करुन संपवला तरी आहे अजुन शिल्लक) राजेळी केळ्यांचा टिकणारा हलवा कसा करतात? (मी करते तो शिर्‍यासारखा असतो तुप्+ओला नारळ्+साखर्+वेलची+काजु वगैरे घालुन केलेला) आणि पेरुचा हलवा करताना बिया काढुन कशा टाकायच्या? वेगळी रेसिपी किंवा इथेच टिप्स दिल्यास तरी चालेल Happy

.....

मने! खजुर हलव्याच्यापुढेच कंसात पेरु हलवा,फणस हलवा...अस एडिट करतेस का! नंतर पाकक्रुति शोधताना बर पडेल.

खजुर मऊ करायला एक सोपी युक्ती. खजुर बिया काढुन एका घट्ट झाकणाच्या स्टिलच्या डब्यात ठेवुन कुकर मधे वाफवायचा,कोमट असतानाच smash करायचा.

आयडिया चांगलीय पण खजूर वाफवला तर त्याची चव जराशी बदलले. तू करून पाहिलेस का? तुला कशी वाटली चव? मला जरा वेगळी वाटली.

खजूर हलवा केला. सॉल्लीड छान लागतो. मी वडया थापल्या पण गोळे केले असते छोटे छोटे तर जास्त झाले असते मला वाटतं (रोज फक्त एकच खाणं शक्य नाही!)

धन्स मनु Happy मी ही केला शनिवारी खजुर हलवा. छान झाला. लेक एरव्ही खजुर खायला खळखळ करायची. आता हे आवडीने खातेय Happy

ह्याच्यात बाहेरची साखर वगैरे नसल्याने लहान मुलाना पण चांगलेच. शुद्ध तूप आहे जरा ज्यास्त पण कमीच खावे. मी तर रावळगाव गोळीसारखे खजूर व पेरु हलवे खायची सतत. मस्त लागतात. Happy
धन्यवाद कळवल्याबद्दल. Happy