सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.
सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.
आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.
सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?
आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.
अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.
( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************
पण, दागिन्यांच्या चोरीची भीती
पण, दागिन्यांच्या चोरीची भीती जबरदस्त असते .
तशीच भीती शेअर मार्केट
तशीच भीती शेअर कोसळण्याची, जमीन घेताना फसवणूक होण्याची, आपण घेतलेली जागा आरक्षणात जाण्याची, फ्लॅट घेतल्यावर भूकंप होण्याची पण असते. याचा अर्थ असा नाही की हे सर्व करूच नये.
माझा अंतरंगींना सपोर्ट आहे.
माझा अंतरंगींना सपोर्ट आहे. हाब, प्लिज एक्स्प्लेन!
शेअर मार्केटमध्ये अभ्यास लागतोच. शेअरचा, कंपनीचा, सेक्टरचा अभ्यास ही खरी गुंतवणूक आहे. शेअर विकत घ्यायला लागणारा पैसा ही गुंतवणूक नव्हे. ह्या अभ्यासाच्या जोरावर रिटर्न्स मिळतात. शेअर घ्या म्हणून 'कोणतेही' शेअर घेतले आणी झाला फायदा असे नसते.
सोन्यात ती रिस्क नाही. ज्यात रिस्क नाही त्यात रिटर्न्सही कमी असतात. ज्यात रिस्क जास्त त्यात रिटर्न्सही जास्त असतात. सोने व शेअर्स यांची तुलना अयोग्य आहे.
ज्याला ज्यातले कळते, कळते म्हणून फायदा होतो, त्याला तेच बेस्ट वाटत असते. मी इथे बोलतांना स्पेशलिस्ट लोकांना सल्ले द्यावे म्हणून बोलत नाही. तुमच्यासारख्या शेअरबाजारातल्या महारथींना परत शेअरचे महत्त्व सांगणे म्हणजे सुर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. ती चर्चा करुन उपयोग नाही ना?
कालच म्हटले मी, अॅक्सेस टु इन्फर्मेशन इज नॉट गॅरंटी ऑफ नॉलेज. तेव्हा सगळी माहिती हात जोडून समोर उभी आहे म्हणून वॉरेन बफे होत नसतो. करोडो लोकांना तुम्ही उल्लेख केलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण ज्ञान नसल्यानेच त्या सुविधांचा उपयोग शून्य आहे. हॅविंग टुल्स डज नॉट मेक यू अॅन आर्टीस्ट.
हाब, तुम्ही शेअर मार्केटला
हाब, तुम्ही शेअर मार्केटला सोन्याची तुलना करू नका. शेअर मार्केट चांगला पर्याय असेल पण सामान्य माणसाला त्यातलं किती कळतं? कोणता घ्यायचा ? कधी विकायचा? पोर्टफोलिओ कसा हवा??? किती तरी गोष्टी आहेत.
सोनं म्हणजे कसं अगदी सोप्पं. महिन्याला 2 ते 4 हजार पु ना गाडगीळ कडे भिशी मध्ये नाही तर एखाद्या बँक मध्ये RD मध्ये ठेवा. ते पैसे आले की त्यातून सोने घ्या. गरज लागले की विकून टाका. अजिबात जास्त डोकं लागत नाही. >> घेणं सोपं म्हणजे चांगली गुंतवणूक असते का? गाडगीळ काय भाव देणार हे तुम्हाला माहित अस्ते का? गाडगीळ ला मिळणारा भाव शेअर बाजार ठरवतो हे तुम्हाला माहित आहे का? गाडगीळ ने जादा भावाचे सोने घेवून ठेवलेले असल्यास आणि शेअर बाजारात भा ऊतरणारची नांदी असल्यास गाडगीळ तोटा कुणाच्या पैशातून काढणार.
सोने घ्यायचे घ्या , पण सेफ गुंतवणूक म्हणून स्वतःला आणि दुसर्याला दिलासा देवू नका एवढेच म्हणणे आहे.
शेअर मार्केट तुमच्या सारख्या हुशार आणि माहिती असलेल्या लोकांसाठी चांगले आहे, पण आमच्या सारख्या सामान्य लोकांना सोने, घर आणि फ्लॅट हे सोडून काय कळतं? आणि जे कळत नाही त्यात >> तुम्हाला सोन्यातले कळते का? त्याचा भाव दोन महिन्यांनी कमी असेल की जास्तं ते तुम्हाला माहित आहे का?
कमी असेल की जास्तं त्याचा अंदाज येईल अशी माहिती तुमच्याकडे आहे का किंवा अशे माहिती तुम्ही वाचता का? सोनार जो भाव देतो तो तुम्ही घेता ह्या ऊपर गुंतवणूक म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता?
उगीच मेहनतीने कमावलेले पैसे घालून का आणि कशी जोखीम घ्यावी? कोणाच्या मार्गदर्शना खाली घ्यावी? >> सोन्यात तुम्ही ० मार्गदर्शानाअभावी मेहनतीच्या पैशांवर जास्त जोखीम घेत आहात असे मी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?
रिअल ईस्टेटसाठीही तेच प्रश्न लागू.
माझ्या मागच्या शंकेचे कोणी
माझ्या मागच्या शंकेचे कोणी उत्तर देइल का ? भारतीय लोकांनी सोन्याचा हव्यास ठेवणे योग्य आहे का ?
नाना, आपल्याला तब्येत, आजारपण
नाना, आपल्याला तब्येत, आजारपण ह्यातले काही कळते का? मग गरज पडल्यावर आपण काय करतो? डॉक्टर कडे जातो बरोबर?
तसे गुंतवणूक विषयक सल्ला देणारे ब्रोकर एजंट, बँका, न्यूज चॅनल, एल आय सी ई> अनेक मदती ऊपलद्भं आहेत ना?
मायबोलीवरसुद्धा लिहिणाअरी लोकं आहेत.
तुम्ही रिटर्न भरता ना दरवर्षी? सी ए लोकंही चांगली माहिती ठेवून असतात. जसे आता सोने घ्यावे, आत घर घ्यावे असे आपण ठरवतो ते कुठल्या ज्ञानावर.
ऊदा. रिलायंस ला एवढे ग्राहक मिळाले हे तुम्ही २४ तास ऐकत आहात, मग ही माहिती वापरून रिलायंस्ला नफा होणार असल्यास मी त्याचा फायदा कसा ऊचलू श्कतो हा विचार येत नाही का?
अजून चार लोक रिलायंस बद्दल काय म्हण्त आहेत हे शोधणे एवढे अवघड आहे का?
मार्केट मध्ये गुंतवणूक करून
मार्केट मध्ये गुंतवणूक करून खूप लोकांनी पैसे कमावले, त्या सक्सेस स्टोरीज म्हणून सांगितल्या जातात, पण ज्यांनी गमावले त्यांचे काय ?
शेअर मार्केट कोसळलं की लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या, आत्महत्या केल्याच्या बातम्या पेपरात येतात, पण सोन्याचे भाव कोसळले किंवा त्यामुळे लोकांनी असे काही केले अशी बातमी येते का
हाब, तेच म्हणतोय हो मी.
हाब, तेच म्हणतोय हो मी. तुमच्या माझ्या म्हणण्यात अंतर नाहीये, फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. तुम्हाला जे अगदी सोपे-त्यात काय एवढे वगैरे वाटते ते प्रत्येकाला वाटेलच अशी अपेक्षा जरा जास्त आहे. तुमचे म्हणणे एका शब्दानेही खोटे नाहीये, पण त्यामागचा कार्यकारणभाव तुम्ही लक्षात घेत नाही आहात. तुमचा जो विश्वास आहे तो अभ्यासातून आलाय. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अनुभव, ज्ञान व अभ्यास हीच गुंतवणूक असते. पैसा हा फक्त माध्यम आहे. तुमचा पैसा तुम्ही 'नेमका कशात ठेवल्याने जास्त फायदा होईल, कमी फायदा होइल' ही माहिती उपलब्ध होण्यासाठी जी मेहनत केली जाते ती खरी गुंतवणूक असते.
रिलायन्सला एवढे ग्राहक मिळाले म्हणून 'रिलायन्सची आता भरभराट होईलच' म्हणून शेअर घ्यावे असे सुचवत आहात काय? Aerotyne International आठवली अचानक.
एवढ्यातच कुठे तरी वाचले की सकाळी अमुक एक सल्ला देणारे दुपारपर्यंत त्याच्या अगदी उलट सल्ला देतात. काल एक सांगितलं तर आज दुसरं सांगतात. त्याचे कारण कंपन्याच्या व्यवहारात वेळोवेळी होणार्या बदलांमुळे त्यांच्या सल्ल्यातही बदल होत असतो. जगातल्या हुश्शार सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यावरुन ह्यातली रिस्क कशी जोखणार? ह्यातला कोणी एक सल्लागार मला कबूल केलेल्या रिटर्न्सची १०० टक्के खात्री देत असेल तर मी उद्याच्या उद्या १०० कोटी रुपये त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करायला तयार आहे. नव्हे, असे गुंतवणूक करु इच्छिणारे लाखो लोक उभे करु शकेन.
म्युच्युअल फण्ड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स, हे वाक्य ठळकपणे जिथे तिथे दिसते. सोन्यावर अशी काही वाक्ये कोरलेली दिसली नाहीत कधी.
तुम्ही शेअरमार्केटबद्दल इतके खात्रीलायक बोलत आहात याचे खरंच आश्चर्य वाटत आहे.
अतरंगी तुम्ही शेअर बाजार
अतरंगी तुम्ही शेअर बाजार म्हणजे सट्टा, जुगार अर्ग्यूमेंट करनार असाल ते मग बोलणंच खुंटलं.
पण तुम्ही फक्तं पैसे जातील ह्या भिती पाई ईन्वेस्ट करत नसाल तर सोने आणि घर ही सेफ ईन्वेस्टमेंट केली हा तुमचा गोड गैरसमज आहे कारण दोघांच्याही किंमती आणि शेअर बाजार ह्यात बर्यापैकी हाय कोरिलेशन आहे.
शेअर मार्केट कोसळलं की लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या, आत्महत्या केल्याच्या बातम्या पेपरात येतात, पण सोन्याचे भाव कोसळले किंवा त्यामुळे लोकांनी असे काही केले अशी बातमी येते का >> डॉच्या ऊपचारानंतर लोकं मरतात मग तुम्ही डॉ कडे जाणे सोडले का?
अॅक्सिडंट मध्ये लोक मरतात मग तुम्ही गाडी चालवणे सोडले का? घटस्फोट होतात म्हणू लग्नं करणे सोडले का ?
तर नाही कारण तुमचा स्वतःच्या निर्णयक्षमतेवर विश्वास आहे. शेअर मार्केटचेही तसेच असते.
नाना मी रिलायंस बद्दल काहीही
नाना मी रिलायंस बद्दल काहीही सजेस्ट करत नाहीये.. त्याबद्दलच्या बातम्या ऐकून ईंट्र्स्ट, क्युरिऑसिटी वाढत नाही का जसे राजकारण क्रिकेट सिनेमा बद्दलच्या बातम्या वाचून वाढते एवढाच प्रश्न होता. असो.
तुमच्या पूर्ण पोस्टला 'डेविल ईज ईन द डीटेल्स' आणि '...... अपनी अकल लगाओ' एवढेच ऊत्तर देईन.
दृष्टीकोनातला फरक लक्षात आला त्यामुळे पुढची चर्चा निरर्थक आहे.
माझ्या आईला वॉशिंगमशीन चालवता
माझ्या आईला वॉशिंगमशीन चालवता येते, माईक्रोवेव ओवन वापरता येतो, एसीचेही सगळे फंक्शन सहज समजतात.
पण मोबाईल वापरायची तिला आजही भिती वाटते. अगदी तिचा स्वत:चा घेऊन दिला तरी आपण काहीतरी गडबड करू याची भिती वाटते.
मग स्मार्टफोन घेऊन दिला. वाटले, वापरायला सोपा. म्हटलं हे घे, यात तर डोक्याचा भाग आणखी कमी, आजकालची चार वर्षांची पोरेही वापरतात....
पण तिची भिती आणखी वाढली. मला माझा मागचाच फोन दे रे बोलते
तुम्ही शेअर बाजार म्हणजे
तुम्ही शेअर बाजार म्हणजे सट्टा, जुगार अर्ग्यूमेंट करनार असाल ते मग बोलणंच खुंटलं.>>>
नाय यार, तू नवीन नवीन मुद्दे मंडतोयस आणि आमचं एकच पालुपद चालू आहे म्हणून असंच
सोनं, घर, FD, RD इतकेच दोन अक्षरी शब्द ऐकत लहानाचे मोठे झालो आम्ही. शेअर्स हा तीन अक्षरी शब्द जरा जड जातो
ह्यातला कोणी एक सल्लागार मला
ह्यातला कोणी एक सल्लागार मला कबूल केलेल्या रिटर्न्सची १०० टक्के खात्री देत असेल तर मी उद्याच्या उद्या १०० कोटी रुपये त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करायला तयार आहे.>>>
मी असाच मुद्दा मांडणार होतो.
आपण फायनान्शिअल consultant कडे गेलो की ते आपण शेअर्स वर मिलवलेल्या प्रोफिटच्या रकमेच्या 15 टक्के घेतात. जर मला लॉस झाला तर स्वतःच्या पदरहून कात्री लावून स्वतः त्यातला लॉस बेअर करणारा कोणी असतो का? ते काही स्टार लोक नाही का निर्मात्यांना तोटा झाला तर स्वतः काही पैसे परत करतात. असला तर जरा डिटेल्स द्या.
वर हाब नी एस and पी ५००
वर हाब नी एस and पी ५०० सांगितला आहे.
इंडीव्हीज्युअल शेअर्स घेण्यापेक्षा असे इंडेक्स फंड उत्तम. लॉंग टर्म मध्ये फायद्याची हमी (इतिहास साक्ष आहेच) आणि काहीही अभ्यास करायची गरज नाही. कुणा एजंटला पैसे द्यायचीही गरज नाही.
धागाकर्त्याचे देशासाठी इ. आर्ग्युमेंट बाळबोध आहे. देशाला डेफिसिट असेल तर इंपोर्ट ड्युटी (आणखी जास्त) लावून (ते ही आंतरराष्ट्रीय नियमांत शक्य असेल तर... किंवा मग मेक इंडिया ग्रेट अगेन, मेक इन इंडिया असली काही स्लोगन दिली असेल तर) देश चालवणारे काय करायचं ते बघतील. सामान्य माणसांनी सोनं घेऊ नका इत्यादी फुटकळ आर्ग्युमेंट कोणी करू नये असं मला वाटतं.
समजा दहा वर्षाच्या हिशोबाने
समजा दहा वर्षाच्या हिशोबाने मी सोने घेतले किंवा त्याऐवजी एफडी केली तर फायदेशीर काय असेल?
धागाकर्त्याचे देशासाठी इ.
धागाकर्त्याचे देशासाठी इ. आर्ग्युमेंट बाळबोध आहे >> मुळात हे विधान माझे नाही. गतवर्षी 'लोकप्रभा' ने सोने-विशेषांक काढला होता व त्यामध्ये अनेक अर्थतज्ञांचे लेख होते. त्यात मी वाचले होते.
देश चालवणारे काय करायचं ते बघतील. >>> हे विधान मला अत्यंत बेजबाबदार वाटते. आपण सगळेच देशाचे भाग आहोत व देश चालवण्यात आपलाही वाटा असतो.
आता मला अभिप्रेत असलेला
आता मला अभिप्रेत असलेला मुद्दा अधिक स्पष्ट करतो :
१. जो देश सोने उत्पादनात स्वयंपूर्ण असेल त्या नागरिकांनी हवे तेवढे सोने घ्यावे, हे पटते. पण, जर भारत तसा नाही तर मग आपले बहुमूल्य परकीय चलन हौसेखातर खर्च होणे बरोबर आहे का? (याचे उत्तर तज्ञाकडून ऐकायला आवडेल).
२. एक सामान्य नागरिक म्हणून माझा विचार असा :
जर आपण व्यक्तिगत सोन्या च्या दागिन्यांची हौस कमी केली >> आपले परकीय चलन बरेच वाचेल >> हेच बहुमूल्य चलन जीवनवश्यक ( म्हणजे अन्न-वस्त्र-निवारा संबंधित) वस्तूंच्या आयाती साठी वापरता येइल. तसेच त्या चलनाचा वापर रोगनिदान व रोगोपचारासंबंधीची अत्याधुनिक उपकरणे/ तंत्रज्ञान खरेदीसाठी (आयातीसाठी) वापरता येइल. एक डॉ. म्हणून मला हे अतिशय महत्वाचे वाटते.
अमितव म्हणत आहेत ते बरोबर आहे
अमितव म्हणत आहेत ते बरोबर आहे. सोन्याच्या आयातीत चलन जात असेल तर सोन्यावर आयात कर लादणे उत्तम असते. सरकारच हे करु शकते.
माझ्या मते सामान्य लोक सोने
माझ्या मते सामान्य लोक सोने हे दागिने म्हणूनच वापरतात , अन बायप्रॉडक्ट इज गुंतवणूक.
अन इथे त्यांची मोठी फसवणूक होते , हे त्याना कळत नाही .
गाडगीळ मधेच त्यानी विकलेल १० ग्रॅम सोन्याच मंगळसूत्र त्याना देऊन परत १० ग्रॅमच करायला मला १६००० लागले , जवळ जवळ ५ ग्रॅम सोन्याची किंमत तेही सोने आधी पेक्षा उतरलेल असताना . हिशोब करताना लक्षात आल की ४% अशुद्धता (जी ते विकताना मोजत नाहीत) , काळ्या मण्यांच वजन , अन खरेदी विक्रीतला टॅक्स यात हा फरक येतो.
तेव्हा वळे घ्या , पण दागिने मात्र शोभेसाठी आहेत , फारतर तुमचे पैसे साठलेले आहेत इतकच .
आपण सगळेच देशाचे भाग आहोत व
आपण सगळेच देशाचे भाग आहोत व देश चालवण्यात आपलाही वाटा असतो.
> अशी विधाने आदर्शवादी वाटतात, प्रत्यक्षात याचा उपयोग नसतो. करोडो लोकांना समजवण्यापेक्षा तुम्ही जे टॉप चे दहा ज्वेलर्स आहेत त्यांना त्यांची दुकाने बंद करायला सांगा, बघा काय होते ते....
हायझेनबर्ग यांच्या सगळ्या
हायझेनबर्ग यांच्या सगळ्या पोस्ट्सना +१.
<आर्थिक तज्ञांच्या मते सोनं हे गुंतवणूकीमधे Hedging साठी वापरतात. त्याचे एकूण प्रमाण एकंदर गुंतवणूकीच्या (Portfolio) 5 ते 8 % असावे असा दंडक आहे. - निरू > +१.
सोने हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. जर तो तुमच्यासाठी एकमेव पर्याय असेल, तर तुम्हाला (थोडासाच) अभ्यास करायची गरज आहे.
शेअर मार्केटला पर्याय नाही. तो गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. जग आगगाडीने प्रवास करत असताना, अपघात होईल, म्हणून तुम्ही बैलगाडीने प्रवास करत राहणार असाल आणि तरीही तुम्ही इच्छित स्थळी इच्छित वेळी पोचत असाल, तेव्हा हरकत नाही. पण तुम्ही आणखीही कुठे कुठे पोचू शकला असता, हे तुम्हाला माहीतच नसेल.
शेअर बाजारात गुंतवणूक अजिबात कठीण नाही . विशेषतः म्युच्यल फंड्समुळे . त्यातले धोकेही कमी होत आहेत . ब्लु चिप कंपन्यांत दीर्घ मुदतीची गुंतवणूक सामान्य माणसं अभ्यासाशिवाय करत आलीत.
सोने, बँक एफ डी, एलायसी, एन एस सी, पीपीफ झालंच तर एल आयसी यात कधीही गुंतवणूक न केलेला गुंतवणूकदार. मात्र या सगळ्यांची कोणाकोणाला गरज असू शकते, त्यांना ते सूट होईल, हे मान्य.
<आपण फायनान्शिअल consultant कडे गेलो की ते आपण शेअर्स वर मिलवलेल्या प्रोफिटच्या रकमेच्या 15 टक्के घेतात.>
एक्दा सोन्यावर तुम्हाला किती रियल रिटर्न मिळालं ते पहा.
एक्दा सोन्यावर तुम्हाला किती
एक्दा सोन्यावर तुम्हाला किती रियल रिटर्न मिळालं ते पहा
>> २००८ मध्ये १२ हजाराने खरेदी केलेल्या सोन्याचे २०१५ ला ३१ हजार मिळाले.
पण आता तुम्ही उत्तम परतावा देणार्या एखाद्या शेअरची याच्याशी तुलना करुन सोन्यापेक्षा ह्या कंपनीत गुंतवले असते तर याच्या पाचपट नफा मिळाला असता असे म्हणाल.... म्हणून त्याचे ही उदाहरण देतो. येसबॅन्केत २०११ला २८५ वगैरे भाव सुरु होता, आज १५००+ आहे.
त्याहीपेक्षा जबरा म्हणजे
त्याहीपेक्षा जबरा म्हणजे बिटकॉइन..... त्याची तर आजची किंमत दिड लाखाच्या आसपास आहे. चार वर्षात ही किंमत शुन्यापासून इतकी चढली आहे.
आजच्या 'सकाळ' मधील खालील
आजच्या 'सकाळ' मधील खालील बातमी :
सार्वभौम सुवर्ण रोख्यांची झळाळी वाढली! (http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-62610)
"भौतिक स्वरूपातील सोन्याला पर्यायी गुंतवणूक म्हणून केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची योजना दोन वर्षांपूर्वी आणली.सध्याच्या नियमानुसार, या सुवर्ण रोख्यांत एका वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५०० ग्रॅमपर्यंतच गुंतवणूक करता येत होती. आता दर आर्थिक वर्षांसाठी व्यक्तींना ४ किलो, हिंदू अविभक्त कुटुंबाला (एचयूएफ) ४ किलो, तर सरकारने मान्यता दिलेल्या ट्रस्ट व त्यासारख्या संस्थांना २० किलोंपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. "
मला सोन्याचे दागिने वापरायला
मला सोन्याचे दागिने वापरायला आवडतात म्हणून घेते त्यांचा गुंतवणूक हा दुसरा उपयोग आहे. किती ग्राम /किलोचे दागिने घ्यायचे हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी काय fd receipt / demat id / portfolio pie chart गळ्यात/ हात-पायात अडकवून इतकी छान दिसणार नाही किंवा छानच दिसणार नाही. मला एखादी जुजबी ओळख असलेली बाई अमुक एक दागिना छान आहे अशी कॉम्प्लिमेंट जितक्या पटकन देईल तितकी काही माझ्या mf portfolio ला मिळणार नाही. पैसा दोन्ही कडे गेलाच आणि कोणीच मला छान दिसतेस म्हणालं नाही
<शेअर मार्केट कोसळलं की
<शेअर मार्केट कोसळलं की लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या, आत्महत्या केल्याच्या बातम्या पेपरात येतात,>
या बातम्यांतले लोक गुंतवणूकदार्/इन्व्हेस्टर्स असतात की ट्रेडर्स्/ब्रोकर्स्/स्पेक्युलेटर्स.
आता म्हणा, शेअर मार्केट हाच एक सट्टा आहे.
जो तक्ता दिला आहे तो अमेरीके
जो तक्ता दिला आहे तो अमेरीके चा आहे. भारतात सोन्याने गेल्या १००-२०० वर्षात महागाई पेक्षा खुप जास्त रेट नी परतावा दिलेला आहे.
सोन्याचा दुसरा फायदा भारतीयांसाठी : रुपयाचे मुल्य डॉलर किंवा युरो पेक्षा कमी झाले तरी सोन्यात गुंतवलेले रुपये त्यांची क्रयशक्ती ( पर्चेसिंग पॉवर ) राखुन ठेवतात.
सोन्यात गुंतवणूक करण्याचा
सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. काहीजण सोन्यात वृद्धी व तरलता असल्यामुळे गुंतवणूक करतात. तर काहीजणांना आपला काळा पैसा रोखीत सांभाळण्यापेक्षा सोन्यात धातूरूपात सांभाळणे सोयीचे वाटते.
बँक मुदत ठेवी, सरकारी रोखे सोडल्यास ईतर कुठल्याही आर्थिक गुंतवणूकीत हमखास परतावा मिळेल ह्याची शाश्वती देता येत नाही. २००७ ला सोन्याचा भाव १०,००० च्या आसपास होता, २०१२ ला केवळ ५ वर्षात तो तिपटीने वाढून ३१००० पर्यंत गेला. आज ५ वर्षानी २०१७ ला सोन्याचा भाव २७५०० ते २९००० हजाराच्या आसपास रेंगाळत आहे. म्हणजे २०१२ च्या सोन्यातील गुंतवणूकीतून निगेटीव्ह परतावा मिळाला. ह्याचा अर्थ दिर्घ मुदतीत सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर असेलच असं म्हणता येत नाही.
तरलतेचे म्हणाल तर बॅकेतील मुदत ठेवी सुद्धा मुदत पुर्ण होण्यापूर्वी थोडा व्याजाचा दंड सोसून मोडता येतात. सोन्याच्या बाबतीत सोने मोडताना कुठलाही सोनार १००% सोन्याचा भाव देत नाही. सोनाराकडे वर्तमान भाव व धातुतील घट ह्यात पारदर्शकता असेलच असंही नाही.
पूर्वी गुंतवणूकीचे सुऱक्षीत पर्याय नव्हते तेव्हा सोन्यात गुंतवणूक करणे समजण्यासारखे होते. आज अडाणी माणूसही पोस्टात किंवा बँकेच्या मुदत ठेवीत आपला पैसा सुरक्षीतपणे गुंतवू शकतो. सोनाराकडची भीशी म्हणजे कमी व्याजात आपला पैसा सोनाराला वापरायला देण्यासारखे आहे.
ज्याला खरोखरच सोन्यात गुंतवणूक करायची आहे तो ई-गोल्ड मध्ये डिमॅट स्वरूपात गुंतवू शकतो व पाहीजे तेव्हा धातू रूपात घेऊ शकतो.
योगायोगाने बरोबर ५० वर्षांपुर्वी लोकसभेत नव्या स्वरुपातील सुवर्ण नियंत्रण विधेयक मांडताना नागरिकांनी सोन्याचा मोह टाळला पाहीजे असं अर्थमंत्री मोरारजी देसाईं म्हणाले होते. आज आपण ते आचरणात आणायला काही हरकत नाही.
आजपर्यंत आमच्या घरात आजोबांपासून माझ्यापर्यंत कोणीही गुंजभरही सोने ह्या धातूत गुंतवणूक केलेली नाही. कमोडिटी ट्रेडिंग करायचो. आता ते ही नाही. आई कुठल्याही समारंभाला अंगावर खोटे दागिनेच घालते, आईच्या राहणीमाणामूळे अजुनपर्यंत समोरच्यानी कधीही शंका व्यक्त केलेली नाही.
मार्मिक, तुमच्या प्रतिसादाला
मार्मिक, तुमच्या प्रतिसादाला प्रचंड अनुमोदन !!! तुमच्या कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन.
योगायोगाने बरोबर ५० वर्षांपुर्वी लोकसभेत नव्या स्वरुपातील सुवर्ण नियंत्रण विधेयक मांडताना नागरिकांनी सोन्याचा मोह टाळला पाहीजे असं अर्थमंत्री मोरारजी देसाईं म्हणाले होते. आज आपण ते आचरणात आणायला काही हरकत नाही. >>>> + एकावर अनंत शून्ये.
हा मुद्दा मला खूप पटतो. पण, सर्वसाधारणपणे आपण कुठलीही बचत, काटकसर, जपून वापर् , हाव कमी करणे असे काही बोलू लागलो की ते इ-माध्यमात वावरणार्या बहुसंख्य लोकांना आवडत नाही, असा माझा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर तुमचा प्र. खूप भावला.
सुशिक्षितांनी तरी भौतिक सोन्याऐवजी सुवर्ण-रोख्यांकडे वळावे असे मला वाटते
कुणी काय (कायद्याच्या कक्षेत
कुणी काय (कायद्याच्या कक्षेत राहून) घ्यावं अथवा घेऊ नये हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या व्यक्तीलाच असला पाहिजे. ती वस्तू घेणे हे कोणत्याही कारणाने (जसे मोरल, एथिकल, आर्थिक इ.) डिस्करेज करायचे असेल तर सरकारकडे आयुधे आहेत त्याचा वापर (जसे कर, बंदी, वयोमानानुसार) सरकारने करावा. अंमली पदार्थ सेवन बंदी, लीगल एज नसेल तर सिगारेट/ दारू विक्री बंदी, सिगारेट/ दारू वर कर, करमणूक सेन्सॉर केल्यावर आणि योग्य सर्टीफिकेट असलेल्या प्रेक्षकांनाच दाखवणे ही काही सहज आठवणारी उदाहरणे.
ट्रेड बॅलंस करायचा असेल तर आपली निर्यात वाढवणे, बाहेरून येणारी गुंतवणूक वाढवणे, ती वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे, देशातील उद्योगधंदे असलेली नकद गुंतवून नवे प्रोजेक्ट चालू करतील ते बघणे ना की नुसत्या पैशाच्या डोंगरावर बसतील, बाहेरच्या देशातून पर्यटक येतील असं वातावरण बनवणे, रेमिटंस कसा वाढेल ते बघणे इत्यादी खूप जास्त महत्त्वाचे मार्ग आहेत.
त्यातूनही सोन्यावर परकीय चलन खर्च होत आहे हा मुद्दा निकाली काढायचा असेल तर सोन्याच्या आयातीवर निर्बंध, सोन्यावर आणखी जास्त कर (अर्थात त्यातून वाढणारी सोन्याची तस्करी रोखणे इ. आलेच) हे पर्याय सोर्सला लावून हा मुद्दा निकाली काढणे सहज शक्य आहे. ह्या वर दिलेल्यातील काही करण्याऐवजी मराठी मध्यमवर्गीय सामान्य लोक (मायबोलीचा ओडीयांस तोच आहे) जे काही मिलग्रॅम सोनं खरेदी करत आहेत ते बंद करा आणि देशाला परकीय चलन गंगाजळीतून तारा हा संदेश हे जे कोणी तज्ञ लोक देत आहेत ते प्रचंड दिशाभूल करणारे आहे.
सामान्य माणसाने काय केलं पाहिजे हे मोरल ओब्लीगेषनच आहे असा आव आणून काही सांगितलेलं माझ्या डोक्यात जाते. कायद्याचे उल्लंघन न करता कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्नच राहिला पाहिजे.
Pages