"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
>>कदाचित त्यामुळे नायमेरीया
>>कदाचित त्यामुळे नायमेरीया तिच्या सोबत जात नाही का?<<
हो. आर्या आणि नमेरिया यांची ताटातुट झाल्यानंतर पुलाखालुन बरंच पाणी वाहुन गेलेलं आहे. नमेरिया वाइल्ड मध्ये परतुन बहुतेक एका पॅकची लिडर झालेली आहे आणि आर्याचं उद्धिष्ट तर जगजाहिर आहे. थोडक्यात दोघींच्यात पुर्विसारखं काहिहि राहिलेलं नाहि; दोघींनी आपापले स्वतंत्र मार्ग निवडलेले आहेत. म्हणुनच त्या सीनच्या क्लोजींग डायलॉग मध्ये आर्या म्हणते - दॅट्स नॉट यु..
पण मग तो सीन का दाखवला असेल ?
पण मग तो सीन का दाखवला असेल ? तो सीन त्या एड शीरन च्या सीनसारखा अनावश्यक फिलर होता का?
>>पण मग तो सीन का दाखवला असेल
>>पण मग तो सीन का दाखवला असेल ?<<
माझा अंदाज - ब्रिंगिंग क्लोजर टु देर रिलेशन्शिप. आय कुड बी राँग...
सिरीयल वाल्यांनी भराभर लूज
सिरीयल वाल्यांनी भराभर लूज ends बआंधून समारोपाची सुरूवात केलेली दिसते.
कर्सी ला जेमी, लीटल फिंगर/सांसाच्या हाती जॉन, नि आर्याच्या हाती लीटल फिंगर, ब्रिर्याना कडून जेमी मरतील असे मला वाटते.
पुस्ताकांमधे म्हातारा सिरीयल्स पासून काहितरी वेगळे करायच्या नादात भयंकर घोळ घालून ठेवेल ह्याची पूर्ण खात्री आहे. खर तर आता पुस्तके नि सिरीयल मधे प्रचंड घोळ होतोय. बरेच कॅरॅक्टर रानोमाळ हरवले आहेत.
बाबो! असाम्याने डायरेक्ट जॉन
बाबो! असाम्याने डायरेक्ट जॉन चीच सुपारी घेतली. र्हाऊ द्या की त्याला तो आणि डेनेरिस असं रोम्यान्टिक पेअरिंग दाखवणार आहेत म्हणे ना?
पुस्ताकांमधे म्हातारा
पुस्ताकांमधे म्हातारा सिरीयल्स पासून काहितरी वेगळे करायच्या नादात भयंकर घोळ घालून ठेवेल ह्याची पूर्ण खात्री आहे. खर तर आता पुस्तके नि सिरीयल मधे प्रचंड घोळ होतोय.
Hhmm..पुस्तक वाचणार्याना माझी एक शन्का विचारायची आहे- अजून विंड्स ऑफ विंटर चा पत्ता नाही. शेवटचं ड्रीम फॉर स्प्रिंग कधी येणार..दोन्ही पुस्तकं एकदम येणार का, काहीच माहीत नाही. शेवट वाचायची प्रचंड उत्सुकता आहेच.
आजोबांनी शेवट आधीच ठरवला आहे व तो सिरियलच्या मेकर्सना सांगून ठेवला आहे म्हणे. म्हणजे जर आजोबा पुस्तकं पूर्ण न करता गचकले तर मेकर्स तोच शेवट करतील जो आजोबाना अपेक्षित आहे. म्हणजे जर आठवा सिझन शेवटचा असेल तर पुढच्या सिझनला आपल्याला शेवट कळणार का- regardless of whether dream for spring is not released by then???
बरं तो ब्रॉन सध्या कुठे आहे
बरं तो ब्रॉन सध्या कुठे आहे कुणाला आठवतंय का? मला आठवेना त्याचं स्टेटस आता. टिरियन सोबत नाहीये ना आता तो? जेमीसोबत होता वाटते लास्ट.
Hhmm..पुस्तक वाचणार्याना माझी
Hhmm..पुस्तक वाचणार्याना माझी एक शन्का विचारायची आहे- अजून विंड्स ऑफ विंटर चा पत्ता नाही. शेवटचं ड्रीम फॉर स्प्रिंग कधी येणार..दोन्ही पुस्तकं एकदम येणार का, काहीच माहीत नाही. शेवट वाचायची प्रचंड उत्सुकता आहेच.
आजोबांनी शेवट आधीच ठरवला आहे व तो सिरियलच्या मेकर्सना सांगून ठेवला आहे म्हणे. >> मी ही असेच वाचलेले होते पण बारकाईने पुस्तके वाचली तर लक्षात येईल कि जे कॉमनली होईल असे वाटत असते ते होउ न देण्याकडे किंवा एखादे नवीनच कॅर्अॅक्टर आणण्याकडे किंवा लोकांना एखादे कॅर्अॅक्टर आवडते आहे असे दिसले कि त्यात बदल करून भलतीकडे नेणे हा प्रकार शेवटच्या दोन भागांमधे जास्त होउ लागलाय. त्यामूळे पुढची दोन्ही पुस्तके एकदम टँजंट जातील असे वाटते. दोन्ही पुस्तके वेग वेगळी येणार आहेत पण एकत्र लिहायला घेतली आहेत (म्हणजे काय ते कृपया विचारू नका)
दोन्ही पुस्तके वेग वेगळी
दोन्ही पुस्तके वेग वेगळी येणार आहेत पण एकत्र लिहायला घेतली आहेत >> अवघड आहे! आजोबा डेन्जर आहेत !
खूप लुस एन्ड्स ठेवतात...
खूप लुस एन्ड्स ठेवतात...
>>खर तर आता पुस्तके नि सिरीयल
>>खर तर आता पुस्तके नि सिरीयल मधे प्रचंड घोळ होतोय.<<
कारण जीआरआरएम अॅक्टिवली इन्वॉल्व्ड नाहि स्क्रीन्प्ले टीम मध्ये, बहुतेक सहाव्या सिजनपासुन. त्याने स्वतःहुन अंग काढुन घेतलं, लाँग ओवर्ड्यु पुस्तकांसाठी वेळ द्यायला. ऑब्वियस्ली सिनेमॅटिक लिबर्टीच्या नांवाखाली काहि डिविएशन्स आढळणारच. बातमी आहे कि एचबीओ, जिओटीचे एक-दोन स्पीनॉफ करायच्या हि विचारात आहे...
तो आणि डेनेरिस असं
तो आणि डेनेरिस असं रोम्यान्टिक पेअरिंग दाखवणार आहेत म्हणे ना?
<<
दोघे कझिन्स आहेत.
पण जिओटीवाल्यांना त्याचं काय म्हणा!
तो आणि डेनेरिस असं
तो आणि डेनेरिस असं रोम्यान्टिक पेअरिंग दाखवणार आहेत म्हणे ना?
<<
दोघे कझिन्स आहेत.>>> कझिन्स कसे? आत्या-भाचा ना...
पुस्ताकांमधे म्हातारा
पुस्ताकांमधे म्हातारा सिरीयल्स पासून काहितरी वेगळे करायच्या नादात भयंकर घोळ घालून ठेवेल ह्याची पूर्ण खात्री आहे. >> डेफिनेटली. एक तर मार्टिनसाहेबांची वर्णनशैली म्हणजे ... 'तुमचे आणि तुमच्या सहकार्याचे ऑफिसमधले भांडण' असा प्रसंग जर मार्टिनसाहेबांना रंगवायला दिला, तर मार्टिनसाहेबांची गाडी तुम्ही त्या दिवशी सकाळी उठल्यावर घातलेल्या चपलेचा रंग काय होता, इथपासून सुरू करून तुम्ही ब्रेकफास्टला सिरीअल खात असताना माशीच कशी झटकली, त्या माशीच्या आयुष्यात सध्या काय उलथापालथ चालू आहे त्यावर एक चॅप्टर, मग तुम्हाला आंघोळीला जात असताना बेबीआत्याचा फोनच कसा आला आणि बेबीआत्याच्या पुतणीच्या मुलाच्या शाळेत सध्या विंटर स्पोर्ट्सच कसे चालू आहेत ते तिने तुम्हाला कसे सांगितले, नंतर तुमच्या कारमध्ये बसत असताना तुम्ही सीटवर सांडलेलं पाणीच कसं पुसलं, त्या पाण्यातल्या बॅक्टेरियाच्या आयुष्यावर एक चॅप्टर, मग ऑफिसामध्ये तुमच्या ड्रॉवर हँडलवर असलेल्या खाचांमध्ये सूर्य कसा चकाकत होता, इ. इ. अनेक बिनकामाची स्टेशन घेऊन फापटपसारा करून रानोमाळ हरवून मग इष्ट स्टेशनाला पोहोचते. उगाच वेगळेच कॅरॅक्टर आणायचे वगैरे अट्टाहास ह्याच फुकाच्या फापटपसार्यामुळे होतो.
भास्कराचार्य
भास्कराचार्य
तरीही मार्टीनबाबाकी जय हो..एवढं लिहिणं म्हणजे का खायची गोष्टय का..
खतरनाक होता एपिसोड टू..
फारच पटापटा मारुन टाकल्या त्या दोन पोरी..
मला वाटलं थिऑनच्या बहिणीचही नेड सारख डोकं उडवतो कि काय तो युरॉन पण नाय..हाय ती जित्ती..
इंदिरा वर्मालाबी ठेवलय जित्त ना..
मज्जा आली..
ते लिटिलफिंगरला जॉन धमकावतो तो सिन तर पूर्ण बॉलीवूड इन्स्पायर आहे.."तूने अगर मेरे बहन को हाथ भी लगाया तो गर्दन उखाड के रख दुंगा" इति जॉनबाबा देओल
कारण जीआरआरएम अॅक्टिवली
कारण जीआरआरएम अॅक्टिवली इन्वॉल्व्ड नाहि स्क्रीन्प्ले टीम मध्ये, बहुतेक सहाव्या सिजनपासुन. ... >> राज मी त्या अँगल ने म्हणत नव्हतो तर सिरीयल्स मधली नि पुस्तकांमधली कॅरॅक्टर आता वेगवेगळ्या दिशांना नि वेगवेगळ्या भविष्याकडे चालली आहेत त्यामूले उद्या सहावे पुस्तक आले कि ते वाचताना प्रचंड गोंधळ होणार आहे.
ते लिटिलफिंगरला जॉन धमकावतो तो सिन तर पूर्ण बॉलीवूड इन्स्पायर आहे.. >> जॉन चे कॅरॅक्टर ज्या दिषेने develop झालय त्या कडे बघता तो प्रसंग जॉन एकदम आततायीपणे हातळतो असे वाटले, कारण लिटील फिंगर ला जॉन च्या विरुद्ध ढकलायचे असणार हे उघड. नि ह्या कामात तो सांसा ला वापरणार हे तो ज्या तर्हेने तिच्याकडे बघतो हे दाखवलेय ह्यावरून लक्षात येते. एकदमच बाळबोध वाटला हा प्रकार विशेषतः वारीस, डॅनी, रेड प्रिस्ट्रेस ह्यांच्यामधल्या प्रसंगांसमोर.
एक तर मार्टिनसाहेबांची वर्णनशैली म्हणजे .. >> पुस्तकांमधे भरभर पुढे जायची सोय असते ह्याचा फायदा असतो रे भा
एकदमच बाळबोध वाटला हा प्रकार>
एकदमच बाळबोध वाटला हा प्रकार>> एक्झॅटली ..म्हणुनच तर म्हटल ना बॉलीवूड इन्स्पायर
तो आणि डेनेरिस असं
तो आणि डेनेरिस असं रोम्यान्टिक पेअरिंग दाखवणार आहेत म्हणे ना?
दोघे कझिन्स आहेत. कझिन्स कसे? आत्या-भाचा ना...>>>>>>>
टार्गेरियन्स मध्ये आधि पासुन बहिणभावा ची लग्न होत होती वंशशुद्धि साठी, या लॉगिकने जॉन आणि डेनेरिस च लग्न दाखविले तर विषेश नाही.
http://gameofthrones.wikia
http://gameofthrones.wikia.com/wiki/Rhaegar_Targaryen
>>टार्गेरियन्स मध्ये आधि
>>टार्गेरियन्स मध्ये आधि पासुन बहिणभावा ची लग्न होत होती वंशशुद्धि साठी, या लॉगिकने जॉन आणि डेनेरिस च लग्न दाखविले तर विषेश नाही.<<
**** पॉसिबल स्पॉयलर अलर्ट ****
.
.
.
.
.
.
.
.
.
तुमच्या लक्षात असेलच कि जॉन रोझ फ्रॉम डेड इन सिजन ६. टेक्निकली मेल्यावर जे जिवंत केले जातात ते वाय्ट असतात; म्हणजेच जॉन वाय्ट आहे बेरीक सारखाच - फायर वाय्ट, टु बी प्रिसाय्ज (नाईट किंगने जिवंत केलेले आइस वाय्ट आणि फायर गॉडने केलेले फायर वाय्ट). सो दिज वाय्ट्स डोंट ब्लीड, हॅव नो बॉडिली फ्ल्युइड्स, दे डोंट रिप्रोड्युस. तर या दृष्टिकोनातुन जॉन टार्गॅरियन वंश पुढे नेण्यास असमर्थ आहे; हि गोष्ट जॉनला माहिती आहेच, त्याचबरोबर मेलिसँड्रे हि महत्वाची बातमी डॅनीशी शेअर केल्याशिवाय रहाणार नाहि. यावरुन माझा अंदाज - जॉन डॅनीशी तर सोडा, इतर कोणाशी/कधिहि लग्न करणार नाहि...
तळ टिपः जीआरआरएम साहेब कॅन प्रुव धिस थेअरी राँग...
क्वीन'स जस्टिस झाला.
क्वीन'स जस्टिस झाला.
आता ४ तासांत कशी काय पूर्ण करणारेत म्हणे गोष्ट?
४ कुठे ? अजून ४ भाग या सीझन
४ कुठे ? अजून ४ भाग या सीझन चे आणि अजून एक शॉर्ट सीझन आहे ना?
स्टोरी ला वेग आला आहे.
सर्सी ची पीछेहाट होण्याची अजून काही लक्षणे नाहीत! डिनेरीस लाच एका पाठोपाठ एक सेटबॅक्स बसलेत!
काल सान्सा आणि ब्रॅन चे रियुनियन झाले बघून वाटले आता आर्या काही पोहोचत नाही इतक्यात. एकदम सगळंच गोग्गोड नाही करणार हे लोक्स.
काल सान्सा आणि ब्रॅन चे
काल सान्सा आणि ब्रॅन चे रियुनियन झाले बघून वाटले आता आर्या काही पोहोचत नाही इतक्यात. एकदम सगळंच गोग्गोड नाही करणार हे लोक्स. >> GRRM म्हणाला कि शेवट हा बिटरस्वीट असेल, आपले कोणितरी आवडते मरणार आहे. तो ज़ॉन नसेल अशी अपेक्षा ठेवु.
आर्या विन्टरफ़ेलला पुढच्या भागात पोहोचणार, शेवटच्या शॉट मध्ये आर्या विन्टरफ़ेल बघतिये असा होता.
>>स्टोरी ला वेग आला आहे.<<
>>स्टोरी ला वेग आला आहे.<<
हो; होपफुली उरलेले भाग गुंडाळणार नाहित. या गडबडीत टाइमलाइनचा ट्रॅक ठेवणे जरा कठिण झालेलं आहे. उदा: ग्रेवर्म च्या आर्मीने कॅसर्ली रॉक जवळजवळ काबीज केलेलं असतानाच शेवटी-शेवटी युरानची नेवी त्यांच्या बोटी उध्वस्त करते. त्या आधीच्या सीन मधे युरान सर्सीचं गिफ्ट घेउन किंग्ज लँडिंगला दाखवलाय आणि त्यानंतर डायरेक्ट कॅसर्ली रॉकच्या सामुद्रधुनीत. वेल, त्याला प्रत्यक्षात दाखवलेला नाहि पण त्याची नेवी तिथे पोचलिय. भौगोलिक दृष्ट्या कॅसर्ली रॉक समुद्रमार्गे किंग्ज लँडिंगच्या पश्चिमेला डायागॉनली अपोझिट आहे. हे सगळं विचारात घेता युरानची नेवी तातडिने कॅसर्ली रॉकच्या मदतीला वेळेवर कशी पोचते याचं गुढ कोणितरी उकलवा...
या गडबडीत टाइमलाइनचा ट्रॅक
या गडबडीत टाइमलाइनचा ट्रॅक ठेवणे जरा कठिण झालेलं आहे>>> येस, डिट्टो... इकडे हायगार्डन पराभूतच की डायरेक्ट... जेमीने म्हातारी ओलेना ला संपवलं... ती डिनेरीस ला भेटून लगेच हायगार्डनला पोचली पण, आणि सँडस्नेक्स आणि यारा ग्रेजॉय तोवर पाण्यातच ऑनरूट टू डॉर्न?
टीरीयन लॅनिस्टरचा सगळा होरा चुकीचा ठरवला सर्सीने, व्हिच इज हायली अनलाईकली... किंवा मग गेम ऑफ थ्रोन्स खेळतांना जिंकता किंंवा मरता, या सर्सीच्या उक्तीनुसार, टीरीयन खूपच नवखा खेळाडू आहे असं वाटलं...
अजून एक थिअरी वाचली, की टीरीयन आणि जेमी एकमेकांना जीव लावतात, सो ते दोघे एकमेकांशी युद्ध करू शकत नाहीत, सो टीरीयन एका प्रकारे लॅनिस्टरांना मदत करू शकत असेल की... बघूय , काय होतंय पुढच्या ४ भागांत...
ओलेना टीरेल चा डिनेरीस ला आधीच सल्ला होता, डोन्ट लिसन टू वाईज मेन... तिने त्या सल्ल्यांना इग्नोर केलं म्हणूनच ती सगळ्यांना पुरून उरली होती असा... आता शत्रूपक्ष ड्रॅगनच्या हल्ल्यांनीच पराभूत होऊ शकेल असं वाटतंय...
बघीतला का नवा एपिसोड गड्यांनो
बघीतला का नवा एपिसोड गड्यांनो?
इंतजार कि घडीया खत्म..आर्या, डेनी आणि तिचे ड्रॅगन पोरं, थिऑन, ड्रॅगनग्लास सगळ्यांचाच निकाल लागला..
नेद पेक्षा जास्त शॉक होता
जेमी पण खपला वाटतोय...
लीक झालेला भाग शनिवारीच
लीक झालेला भाग शनिवारीच पाहिला, आज पुन्हा पाहिन...
(No subject)
>>लीक झालेला भाग शनिवारीच
>>लीक झालेला भाग शनिवारीच पाहिला, आज पुन्हा पाहिन...<<
मंडळी - लीक्ड भाग तुम्ही तुमच्या जबाबदारीवर बघितले इतपत ठिक आहे, पण कृपया स्पॉयलर्स इथे माबोवर वा इतर कुठेहि सोशल नेटवर्किंग साइट्स वर शेर करु नका. प्रकरण एफबीआय कडे गेलेलं आहे - कोणिहि गोत्यात येउ नये हि अपेक्षा आहे...
Pages